गुलाब

kalpana joshi's picture
kalpana joshi in जे न देखे रवी...
27 Aug 2013 - 7:53 pm

गुलाब
तू राजा असे सर्व फुलांचा,
मानही मिळतो तुझ्या गुणांना।
सौंदर्याची बरसात करतो
आवडतो तू सर्वांना सर्व रूपांत।
फूल होता, तू
सुकुमार दिसे।
साठवता सौंदर्य तुझे,

सौंदर्याचा वरदहस्त तुला
पहिला मान गुलाबाला,
विविध रंग रूप तू घेऊन येतो।
आम्हांस तू चकित करतो -

प्रसन्न होऊनी आम्ही वाहतो, तुला `श्री' चरणी,
दिमाखात, तू कोठेही विराजतो,
सौंदर्याने बघणारायाचे मन जिंकतो,
किती रंगात रंगून जातो तू,
स्वरक्षण करण्या काटे आणतोस तू,
जीवनाचे सत्य जाणण्या, काटेरी वाट करतोस तू,
तुझ्या सौंदर्याने घायाळ आम्ही, बोचवितो तो काटा तू।
आधी काटे मग गुलाब,
आधी कष्ट मग सुख
हेच शिकवतो आम्हांस तू।।

कविता

प्रतिक्रिया

दादा कोंडके's picture

27 Aug 2013 - 7:58 pm | दादा कोंडके

आपण कितवीत आहात?

kalpana joshi's picture

27 Aug 2013 - 8:08 pm | kalpana joshi

मी काल जोइन झाले आहे.

संजय क्षीरसागर's picture

27 Aug 2013 - 11:21 pm | संजय क्षीरसागर

मी काल जोइन झाले आहे.

आणि त्यांच्या या ओळी पाहा... अत्यंत अर्थपूर्ण आहेत :

चालून आली नामी संधी ,
नाही दवडणार मी कधी ,

म्हणजे आता सगळी वही इथे दाखवणार!