आई
असा एकही दिवस नाही,तुझी आठवण येत नाही,
सतत डोळ्यासमोर असते तू ,भू लोकी नसूनही करते पाखरण आमची I
मनात हूर हूर दाटून येते ,तू असतीस तर किती बरे वाटले असते,
मार्ग दर्शन तुझे लाभले असते ,काही वेळा काही सुचतच नाही I
चलबिचल मनाची होई ,तुझ्या फोटो समोर येऊन मी उभा राही,
तू गेल्याने झालेले नुकसान कसे बरे भरून येई?
मनातील पोकळी कशी बरे भरून येणार ?
तुझ्यावर भार टाकून अश्रूंना मोकळी वाट करून कशी देऊ ?
प्रत्येकाच्या जिव्हाळ्याची आई तू , दुरून का होईना पाखरण करतेस तू ,
माया ,ममता प्रेमाचा तुझा स्पर्श , आठवणीत जपून ठेवला तो,
सुरक्षित असे आशीर्वाद रुपी कवच ,सौरक्षण करते आमचे ,
निर्भय पणे वावरतो आम्ही ,टप्पे टोणपे पचवतो आम्ही I
तू दाखविलेला कष्टाचा मार्ग ,अवलंबितो आम्ही,
तुझ्याच मार्गदर्शनाने पुढची वाट चालतो आम्ही ,
पण तू नाही ,याचे शल्य जाणवत असते मनी I
प्रतिक्रिया
28 Aug 2013 - 12:18 pm | Bhagwanta Wayal
तू दाखविलेला कष्टाचा मार्ग ,अवलंबितो आम्ही,
तुझ्याच मार्गदर्शनाने पुढची वाट चालतो आम्ही ,
पण तू नाही ,याचे शल्य जाणवत असते मनी I
खुपच छान..! कविता आवडली.
28 Aug 2013 - 12:52 pm | प्रभाकर पेठकर
आई बद्दलची भावना मनाला भिडणारी असली तरी ती फारच विस्कळीत स्वरूपात मांडली आहे. काव्य सदरात टाकलेल्या ह्या साहित्यप्रकारात काव्य कुठेच जाणवत नाही. तसेच, 'पाखरण' आणि 'टप्पेटोणपे' हे दोन्ही शब्द चुकीचे आहेत. ते 'पखरण' आणि 'टक्केटोणपे' असे असले पाहिजेत.
यमक, वृत्त आणि व्याकरणावर लक्ष दिल्यास मनातील भावना अजून फुलून येईल आणि वाचकांना भावेलही.
28 Aug 2013 - 1:51 pm | संजय क्षीरसागर
काळजी नसावी, त्या आता पिच्छा सोडणार नाहीत.
28 Aug 2013 - 1:26 pm | दत्ता काळे
पेठकरकाकांशी सहमत.
'सौरक्षण' हाही चुकीचा शब्द. बरोबर शब्द 'संरक्षण' आहे. पण कवितेत वापरताना 'रक्षण' चालला असता.
तुम्ही नव्यानेच कविता करता आहात, त्यादृष्टीने प्रयत्न सफल झाला आहे.
पुढील लेखनसाठी शुभेच्छा.