एकाच छायाचित्राने उद्यानाची नीट कल्पना येत नाही. छायाचित्रांबाबत एवढी कंजूषी का? कमीतकमी ८-१० वेगवेगळ्या छायाचित्रांनी पुलं उद्यानाला न्याय देता आला असता. पुलंचं नांव दिले आहे पण उद्यानात पुलंचा पुतळा आहे का? तिथे लाल महाला समोरून हलविलेला दादोजी कोंडदेवांचा पुतळा प्रस्थापित केला आहे असे बातम्यांमध्ये ऐकले होते. त्याची छायाचित्रे. तसेच लहान मुलांसाठी खेळण्याची काय सोय आहे? ज्येष्ठ नागरीकांसाठी गप्पा-टप्पा करण्यासाठी बसण्याची काय सोय आहे?, जॉगींग ट्रॅक सारख्या अत्याधुनिक सोयी आहेत का? पाळीव प्राण्यांना आंत आणण्यास परवानगी आहे का? वगैरे वगैरे माहिती दिली तर उद्यानाचे सर्वांगिण आकलन झाले असते. अजूनही वेळ गेली नाही. प्रतिसादातून जास्तीची छायाचित्रे आणि माहिती दिलीत तरी चालेल.
माझ्या लहानपणापासून अनेकदा बडोड्याला भेट देण्याची संधी मला मिळाली. तिथली रावपुरा विभागतली 'सूर्यनारायण बाग' तसेच रेल्वे स्थानकाजवळील 'कमाठी बाग' आणि अहमदाबादेतील 'कांकरीया तलाव' ह्या सर्व बागांमधून खांबाखांबांवर स्पीकर्स लावून मंद आवाजातील संगीत आणि रेडीओवरील बातम्या वगैरे लागतात. आवाज जवळच्या बाकालाच फक्त ऐकू येईल एवढा कमी असतो. त्यामुळे कोणालाही त्रास होत नाही. अशी ज्येष्ठ नागरिकांसाठी उपयुक्त सोय आपल्या इथे कुठे दिसत नाही. ज्येष्ठांना (आणि इतरांनाही) मनावरील ताणतणाव दूर करण्यासाठी, मनाच्या सैलावण्यासाठी ही सोय खुप चांगली आहे. मी तर माझ्या लहानपणी अनेकदा ह्या उद्यानांमध्ये जाऊन रेडिओ आणि मंद संगीत ऐकत बसायचो. त्या सकारात्मक गोष्टीने मनांत कायमस्वरूपी घर केले आहे.
आपल्या प्रशासनास समज येउन किंवा एखाद्या समाजसेवी संघटनेच्या लक्षात येऊन आपल्या इथल्या उद्यानांमध्ये अशी सोय कोणी केल्यास आनंद होईल. अन्यथा, निवृत्ती नंतर, मीच पुढाकार घेऊन एखाद्या उद्यानाचा उद्धार करेन.
ह्या सर्व बागांमधून खांबाखांबांवर स्पीकर्स लावून मंद आवाजातील संगीत आणि रेडीओवरील बातम्या वगैरे लागतात
सहकारनगरच्या (पुणे) बागूल उद्यानामध्ये तशी सोय केली होती, आणि तशी गाणी ऐकलेली मला आठवत आहेत. पण नंतर त्याचे काय झाले मला माहित नाही, बहुतेक पावसाने स्पीकर्स बंद पडले.
कलमाडी रेल्वेमंत्री होते तेव्हा सिंहगड एक्स्प्रेस पुणे स्थानकातून निघायच्या वेळेस (सकाळी ६ वाजता) सनई लागत असे. त्यामुळे कायम लग्नाचं वर्हाड निघालं आहे असं वाटायचं :)
सुरेश कलमाडी रेल्वे राज्यमंत्री होते. ते कॅबिनेट दर्जाचे मंत्री कधीच नव्हते. पुढील लोकसभा निवडणूकीत राष्ट्रीय काँग्रेसतर्फे पुन्हा एकदा विजयी झाल्यास व संपुआचेच सरकार पुन्हा आल्यास एक बरेच अनुभवी खासदार म्हणून कॅबिनेट दर्जाचे मंत्री बनण्यास प्रबळ दावेदार असतील; विशेषकरून भारी उद्योग मंत्री पदासाठी ;-).
# म्हैस - छायाचित्र आवडले पण एकोळी लेख जसे प्रकाशित करू नये तसेच एकचित्री पण करू नये.
मी प्रकाशित केलेल्या छायाचित्राला दिलेल्या प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद!
मिपा ची सभासद झाल्यानंतर प्रथमच प्रकाशित केलेल्या
छायाचित्राला मिळालेल्या प्रतिसादावरुन आणि
पेठकर काकांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आणखी काही छायाचित्रे देत आहे. दोन दिवसांपासून देण्याच्या प्रयत्नात होते परंतु काही तांत्रिक अडचणी येत होत्या.
हे उद्यान बाहेरून पाहिले आहे पण आतून पाहण्याचा योग नाही आला. आता रजेवर आल्यावर 'पु.ल. देशपांडे उद्यान' हे 'पाहण्याच्या' यादीत सर्वांत वर असेल.
सर्व छायाचित्रे पाहता, एकूणच उद्यानात गर्दी अज्जिबात जाणवत नाहीए. शांततेच्या दृष्टीने हे उत्तम असले तरी उद्यान, अजून दुर्लक्षित असल्याचे खेदजनक चित्र मनांत उभे राहात आहे. पण असो. तुमच्या लेखाने मिपास्थित पुणेकरांना तरी उद्यानभेटीची ओढ निर्माण होईल अशी आशा बाळगतो.
मला वाटतं ताथवटे उद्यानाला तिकीट आहे. पण उद्यानाची स्वच्छता आणि इतर सोयी सुविधा पुरवायच्या असतील तर माफक तिकीट असण्याला कोणाची हरकत नसावी. मोफत पण गलिच्छ उद्यानास भेट देऊन मन प्रसन्न होत नाही.
ह्या प्रश्नात, नविन धागा सुरु करण्याची क्षमता आहे. जसे आपण रेल्वेचे तिकिट काढतो, रस्त्याचा टोल भरतो, एस्टीचे तिकिट काढतो त्याच भावनेने उद्यानाच्या सेवेकडे पाहावे. मनस्ताप कमी होईल.
आमच्यासारख्यांना स्वच्छ उद्यानाचा पैसे गेल्याच्या चुटपुटीमुळे आनंदपण घेता येत नै ना.
If yoiu don't get what you like, you must like what you get.
एक तर गलिच्छ उद्यानांमध्ये आनंद मिळवा किंवा उद्यान स्वच्छते बाबत लोकांचे प्रबोधन करा.
फोटो अप्रतिमच आहेत.
पण तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारावासा वाटतो ... तशी म्हैस मला पण आवडते , पु. ल. ची चांदी वाचल्यापासून त्यात आणखी भर पडली आहे पण … तरीही तुम्हाला ते नाव का घ्यावस वाटल??
प्रतिक्रिया
18 Aug 2013 - 10:37 pm | मुक्त विहारि
छान
18 Aug 2013 - 10:59 pm | नावातकायआहे
वाचनखुण साठवली आहे..
19 Aug 2013 - 8:27 am | बॅटमॅन
लेखाचे शीर्षक आणि सदस्यनाम पाहून एकदम वेगळेच वाटले क्षणभर, मग लक्षात आले. =))
20 Aug 2013 - 7:26 pm | आनन्दिता
+१ :)
19 Aug 2013 - 11:10 am | अमोल केळकर
एक दोनदा गेलो होतो इथे, उद्यान छान आहे
अमोल केळकर
19 Aug 2013 - 11:24 am | नानबा
सिंहगड रोडवर आहे तेच का हे उद्यान?? बाहेरून गाडीवर जाताना पाटी वाचल्यासारखं आठवतंय, पण कधी आत जाण्याचा योग आला नाही.
19 Aug 2013 - 11:55 am | म्हैस...
होय...सिंहगड रोडवर आहे तेच..
एकवेळ अवश्य भेट द्यावी असे आहे उद्यान......
19 Aug 2013 - 12:01 pm | नानबा
पुढल्या पुणे भेटी दरम्यान करण्याच्या कामांमध्ये नोंद करण्यात आलेली आहे.. :)
19 Aug 2013 - 2:25 pm | प्रभाकर पेठकर
एकाच छायाचित्राने उद्यानाची नीट कल्पना येत नाही. छायाचित्रांबाबत एवढी कंजूषी का? कमीतकमी ८-१० वेगवेगळ्या छायाचित्रांनी पुलं उद्यानाला न्याय देता आला असता. पुलंचं नांव दिले आहे पण उद्यानात पुलंचा पुतळा आहे का? तिथे लाल महाला समोरून हलविलेला दादोजी कोंडदेवांचा पुतळा प्रस्थापित केला आहे असे बातम्यांमध्ये ऐकले होते. त्याची छायाचित्रे. तसेच लहान मुलांसाठी खेळण्याची काय सोय आहे? ज्येष्ठ नागरीकांसाठी गप्पा-टप्पा करण्यासाठी बसण्याची काय सोय आहे?, जॉगींग ट्रॅक सारख्या अत्याधुनिक सोयी आहेत का? पाळीव प्राण्यांना आंत आणण्यास परवानगी आहे का? वगैरे वगैरे माहिती दिली तर उद्यानाचे सर्वांगिण आकलन झाले असते. अजूनही वेळ गेली नाही. प्रतिसादातून जास्तीची छायाचित्रे आणि माहिती दिलीत तरी चालेल.
माझ्या लहानपणापासून अनेकदा बडोड्याला भेट देण्याची संधी मला मिळाली. तिथली रावपुरा विभागतली 'सूर्यनारायण बाग' तसेच रेल्वे स्थानकाजवळील 'कमाठी बाग' आणि अहमदाबादेतील 'कांकरीया तलाव' ह्या सर्व बागांमधून खांबाखांबांवर स्पीकर्स लावून मंद आवाजातील संगीत आणि रेडीओवरील बातम्या वगैरे लागतात. आवाज जवळच्या बाकालाच फक्त ऐकू येईल एवढा कमी असतो. त्यामुळे कोणालाही त्रास होत नाही. अशी ज्येष्ठ नागरिकांसाठी उपयुक्त सोय आपल्या इथे कुठे दिसत नाही. ज्येष्ठांना (आणि इतरांनाही) मनावरील ताणतणाव दूर करण्यासाठी, मनाच्या सैलावण्यासाठी ही सोय खुप चांगली आहे. मी तर माझ्या लहानपणी अनेकदा ह्या उद्यानांमध्ये जाऊन रेडिओ आणि मंद संगीत ऐकत बसायचो. त्या सकारात्मक गोष्टीने मनांत कायमस्वरूपी घर केले आहे.
आपल्या प्रशासनास समज येउन किंवा एखाद्या समाजसेवी संघटनेच्या लक्षात येऊन आपल्या इथल्या उद्यानांमध्ये अशी सोय कोणी केल्यास आनंद होईल. अन्यथा, निवृत्ती नंतर, मीच पुढाकार घेऊन एखाद्या उद्यानाचा उद्धार करेन.
20 Aug 2013 - 6:56 pm | कपिलमुनी
>>बाखांबांवर स्पीकर्स लावून मंद आवाजातील संगीत आणि रेडीओवरील बातम्या वगैरे लागतात. आवाज जवळच्या बाकालाच
>>फक्त ऐकू येईल एवढा कमी असतो.
मस्तच कि ओ !
रसिक सरकार दिसतय
20 Aug 2013 - 7:05 pm | arunjoshi123
नोईडाच्या बागांत क्लासिकल मुझिक चालतं. फारच सुखद अनुभव!
21 Aug 2013 - 9:41 am | जॅक डनियल्स
सहकारनगरच्या (पुणे) बागूल उद्यानामध्ये तशी सोय केली होती, आणि तशी गाणी ऐकलेली मला आठवत आहेत. पण नंतर त्याचे काय झाले मला माहित नाही, बहुतेक पावसाने स्पीकर्स बंद पडले.
21 Aug 2013 - 11:20 am | आदूबाळ
कलमाडी रेल्वेमंत्री होते तेव्हा सिंहगड एक्स्प्रेस पुणे स्थानकातून निघायच्या वेळेस (सकाळी ६ वाजता) सनई लागत असे. त्यामुळे कायम लग्नाचं वर्हाड निघालं आहे असं वाटायचं :)
21 Aug 2013 - 9:35 pm | श्रीरंग_जोशी
सुरेश कलमाडी रेल्वे राज्यमंत्री होते. ते कॅबिनेट दर्जाचे मंत्री कधीच नव्हते. पुढील लोकसभा निवडणूकीत राष्ट्रीय काँग्रेसतर्फे पुन्हा एकदा विजयी झाल्यास व संपुआचेच सरकार पुन्हा आल्यास एक बरेच अनुभवी खासदार म्हणून कॅबिनेट दर्जाचे मंत्री बनण्यास प्रबळ दावेदार असतील; विशेषकरून भारी उद्योग मंत्री पदासाठी ;-).
# म्हैस - छायाचित्र आवडले पण एकोळी लेख जसे प्रकाशित करू नये तसेच एकचित्री पण करू नये.
20 Aug 2013 - 12:52 pm | क्रेझी
बॉडीगार्ड मूव्हीमधला एक सीन ह्या उद्दानामधे शूट केलेला आहे. खरंच बघण्यासारखं आहे हे उद्दान.
21 Aug 2013 - 8:56 am | म्हैस...
दुनियादारी चित्रपटातील सीनदेखील ह्या उद्यानातच चित्रीत केले आहेत असे समजते............
21 Aug 2013 - 1:15 pm | गणपा
वर पेठकर काकांनी जो सल्ला दिलाय तो आमलात आणला तर बरं होईल.
22 Aug 2013 - 11:59 am | म्हैस...
मी प्रकाशित केलेल्या छायाचित्राला दिलेल्या प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद!
मिपा ची सभासद झाल्यानंतर प्रथमच प्रकाशित केलेल्या
छायाचित्राला मिळालेल्या प्रतिसादावरुन आणि
पेठकर काकांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आणखी काही छायाचित्रे देत आहे. दोन दिवसांपासून देण्याच्या प्रयत्नात होते परंतु काही तांत्रिक अडचणी येत होत्या.
22 Aug 2013 - 12:00 pm | म्हैस...
याही चित्रांना प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा
22 Aug 2013 - 12:11 pm | म्हैस...
22 Aug 2013 - 12:13 pm | म्हैस...
22 Aug 2013 - 12:14 pm | म्हैस...
22 Aug 2013 - 12:16 pm | धन्या
अप्रतिम फोटो. स्वारगेटवरुन कसे जायचे हे उदयान पाहायला?
22 Aug 2013 - 12:31 pm | म्हैस...
स्वारगेट वरुन सिंहगड रोडकडे जाण्यासाठी रिक्शा किंवा सिक्स सीटर मिळते ना........
वाटेतच आहे उद्यान
22 Aug 2013 - 12:34 pm | प्रभाकर पेठकर
स्वारगेटकडून सिंहगड रस्त्यावर आल्यावर, राजाराम पुलाआधी, डाव्या बाजूस 'पु. ल. देशपांडे उद्यान' आहे.
22 Aug 2013 - 12:17 pm | म्हैस...
22 Aug 2013 - 12:19 pm | बॅटमॅन
हे फटू मस्त आवडले.
22 Aug 2013 - 12:29 pm | प्रभाकर पेठकर
व्वा! आता भरपूर छायाचित्रे आली. धन्यवाद.
हे उद्यान बाहेरून पाहिले आहे पण आतून पाहण्याचा योग नाही आला. आता रजेवर आल्यावर 'पु.ल. देशपांडे उद्यान' हे 'पाहण्याच्या' यादीत सर्वांत वर असेल.
सर्व छायाचित्रे पाहता, एकूणच उद्यानात गर्दी अज्जिबात जाणवत नाहीए. शांततेच्या दृष्टीने हे उत्तम असले तरी उद्यान, अजून दुर्लक्षित असल्याचे खेदजनक चित्र मनांत उभे राहात आहे. पण असो. तुमच्या लेखाने मिपास्थित पुणेकरांना तरी उद्यानभेटीची ओढ निर्माण होईल अशी आशा बाळगतो.
22 Aug 2013 - 12:34 pm | म्हैस...
छायाचित्रे सकाळची आहेत...........त्यामुळे गर्दी नाहिये संध्याकाळी गर्दी असते असे ऐकले आहे.......
पुणेकरांकडून
22 Aug 2013 - 12:38 pm | प्रभाकर पेठकर
ओ.के. धन्यवाद.
22 Aug 2013 - 1:30 pm | दादा कोंडके
आणि बक्कळ तिकिट ठेवल्यामुळे आमच्यासारखी फुकटी लोकं तिकडे फिरकत नाहीत.
22 Aug 2013 - 4:41 pm | प्रभाकर पेठकर
कुठे तिकीट आहे? पुल देशपांडे उद्यानाला?
मला वाटतं ताथवटे उद्यानाला तिकीट आहे. पण उद्यानाची स्वच्छता आणि इतर सोयी सुविधा पुरवायच्या असतील तर माफक तिकीट असण्याला कोणाची हरकत नसावी. मोफत पण गलिच्छ उद्यानास भेट देऊन मन प्रसन्न होत नाही.
22 Aug 2013 - 4:54 pm | दादा कोंडके
हो. चांगले पाच-दहा रुपडे तिकिट आहे. कितीतरी वेळी बागेच्या गेटजवळ जाउन खिश्यातल्या चिल्लर कडे बघत परत जावं लागलय. :(
मग ट्याक्स कशाला घेतात?
पण आमच्यासारख्यांना स्वच्छ उद्यानाचा पैसे गेल्याच्या चुटपुटीमुळे आनंदपण घेता येत नै ना...
22 Aug 2013 - 5:35 pm | प्रभाकर पेठकर
हं! जाताना पैसे घेऊन गेलेले बरे.
ह्या प्रश्नात, नविन धागा सुरु करण्याची क्षमता आहे. जसे आपण रेल्वेचे तिकिट काढतो, रस्त्याचा टोल भरतो, एस्टीचे तिकिट काढतो त्याच भावनेने उद्यानाच्या सेवेकडे पाहावे. मनस्ताप कमी होईल.
If yoiu don't get what you like, you must like what you get.
एक तर गलिच्छ उद्यानांमध्ये आनंद मिळवा किंवा उद्यान स्वच्छते बाबत लोकांचे प्रबोधन करा.
22 Aug 2013 - 2:43 pm | अनिरुद्ध प
छायाचित्रे व माहीती आवडली
22 Aug 2013 - 4:24 pm | sanjivanik१
फोटो अप्रतिमच आहेत.
पण तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारावासा वाटतो ... तशी म्हैस मला पण आवडते , पु. ल. ची चांदी वाचल्यापासून त्यात आणखी भर पडली आहे पण … तरीही तुम्हाला ते नाव का घ्यावस वाटल??
22 Aug 2013 - 5:48 pm | कुसुमावती
बादवे म्हैस पु. ल. ची कथा आहे आणि चांदी हा त्यावर आधारित चित्रपट आहे.
24 Aug 2013 - 9:15 pm | sanjivanik१
कुसुमावती यांस ,
मी पु. ल. च्या वाचलेल्या म्हशीलाच चित्रपटाच्या म्हशीच्या नावाने संबोधले आहे.
22 Aug 2013 - 7:24 pm | म्हैस...
हा हा....मोठा भाऊ या नावाने हाक मारतो...म्हणून
24 Aug 2013 - 9:17 pm | sanjivanik१
हा, हा, हा, कारण खरोखरच मजेशीर आहे. पण पैसा यांच्या मताशी मी पण सहमत आहे. तुम्हाला त्या नावाने संबोधताना खरच खूप अवघड जाणार आहे.
22 Aug 2013 - 11:42 pm | पैसा
पु ल देशपांडे उद्यानाचे फोटो "म्हशीने" द्यावेत हा मस्त योगायोग! पण तुम्हाला इथे हाक मारताना आम्हाला जरा अवघड वाटणार आहे!
20 Feb 2014 - 2:52 pm | मॅन्ड्रेक
मस्त..