फिमेल बाइटस!

स्पंदना's picture
स्पंदना in जे न देखे रवी...
1 Jul 2013 - 8:03 am

"फिमेल बाइटस!" पक्षी विक्रेता सांगत होता.
"यु कॅन टेम अ मेल बट नॉट अ फिमेल" त्याने माहिती पुरवली.
माझ्या चेहर्‍यावर अनेक भाव,
थोडा उपहास, थोड आश्चर्य, थोडा राग...
मग तो माझ्या नवर्‍याकडे वळला
"माय वाइफ अल्सो बाइटस" हसु, विनोद
गिर्‍हाईकाशी थोडी जवळीक
"हाउ अबाउट यु?" माझा नवरा मजेशीर हसला
मी ही दात काढले
मी चावत नाही हे दाखवायला
मी चावणार नाही हे पटवायला
मी चावरी नाही हे ठसवायला.
रात्री अंथरुण काटेरी झालं
पुन्हा पुन्हा तेच वाक्य..."फिमेल बाईटस"
व्हाय? व्हाय डज शी बाइट?
तिथे न विचारु शकलेला प्रश्न आता मनात वादळत होता.
काना कोपर्‍यातुन घोंगावत होता.
फिमेल बाईटस बाय नेचर
नॅचरली शी बाइटस
का? का ग?
आठवली एक रात्र
बिल्डींगच्या सुरक्षीततेत राहुन रस्त्यावरच्या तिच्या आक्रंदाची.
बडबड, न कळत्या बोलीतली
तरीही काहीतरी लुटल्याची, परतुन न मिळणारं हरवल्याची, हरल्याची भावना मनापर्यंत पोहोचवणारी.
शी कुड नॉट बाइट.
मग आठवली एक शेवटचा प्रयत्न म्हणुन चावलेली.........!!!!
मी समाजात राहुन हे निसर्गाच देणं विसरले का काय?
बाकिच सारं निसर्गदत्त; मी लावण्य म्हणुन मिरवते
मग हेच लेण, हे नैसर्गीक देणं मी का विसरले?
शी बाईट्स
कारण पुढची पिढी तिच्या कुशीत रुजते, त्या पिढीच्या रक्षणासाठी.
शी बाईटस
कारण तिचं एकटीच जगणं मह्त्वाच नसत, तिच्या अंगाखांद्यावर खेळणारा जीव महत्त्वाचा तिच्यासाठी.
शी बाईट्स
कारण तिच कोमल,नाजुक दिसणं तिला व्हिक्टीम बनवु शकतं.
शी बाईटस
कारण संसाराचा ध्यास मनी असतो. काडी काडीच मह्त्व ती मानते. उबदार घरट्याच रहस्य ती जाणते.
सुखासमाधानच फळ तिच्या असण्याने फुलत.
शी बाईटस, आय शुड फॉलो!
एल्स नेचरर्स ऑल होप्स विल एंड अप हॉलो.

__/\__
अपर्णा

मुक्तक

प्रतिक्रिया

दिपक.कुवेत's picture

1 Jul 2013 - 1:36 pm | दिपक.कुवेत

पण काय म्हणतेयस ते कळलं नाहि

सस्नेह's picture

1 Jul 2013 - 2:12 pm | सस्नेह

ही डझ नॉट नीड टु बाईट अ‍ॅट ऑल..!

आतिवास's picture

1 Jul 2013 - 3:04 pm | आतिवास

हं! खरं आहे - ती स्वसंरक्षणाची एक उपजत ऊर्मी आहे.

पैसा's picture

1 Jul 2013 - 5:07 pm | पैसा

सगळ्याच लोकांना ते स्वसंरक्षणाचं साधन आहे. आपण खरेच विसरतो.

पिलांसाठी आमच्या घरची मांजरी ५ ६ कुत्र्यांच्या झुंडीवर धावून गेलेली मी पाहिली आहे. स्वत:साठी जमेल न जमेल पण पिलांसाठी मांजरही वाघीण बनते.

निवांत पोपट's picture

1 Jul 2013 - 9:35 pm | निवांत पोपट

सुरेख ! फिमेल बाईट्स....., ह्या बाईट्स मध्ये आक्रमण तर नाहीच्,बचावातल्या निरर्थकतेमधलं आक्रंदन पोहोचतं आहे.आवडली.

पोहोचल्या, अपर्णाजी..

प्रभाकर पेठकर's picture

2 Jul 2013 - 1:24 am | प्रभाकर पेठकर

पटतंय..पण तिच्यावर ही वेळ यावी ह्याचेही दु:ख आहे. तशी वेळ तिच्यावर येणार नाही, असा समाजाच्या मानसिकतेत बदल घडेल...तो सुदिन.

रेवती's picture

2 Jul 2013 - 4:16 am | रेवती

bhaavanaa pohochalyaa.

michmadhura's picture

2 Jul 2013 - 12:37 pm | michmadhura

__/\__

निनाव's picture

2 Jul 2013 - 10:32 pm | निनाव

khoopach sundar lihile aahe.. vichaar karaayla laavNaari kavita..
stri-swaatantrya fakta parliament madhe Womens Bill paryanta maryaadit ka rahaave..there is a lot about respecting women.. it takes a lot of courage to offer equality and respect.. ti courage yaayla ajoon barrach awakaash ahe aplya samajaat..
aplya deshaatil loka paisya ney nahve tar 'vicharaaney' gareeb aahet..

chhaan lihile ahe. manaa paasoon aawadle..shubhechha.

निनाव's picture

2 Jul 2013 - 10:39 pm | निनाव

maazhe hey statement "aplya deshaatil loka paisya ney nahve tar 'vicharaaney' gareeb aahet.." sarsakat sarvansaathi nahi.. tar asya lokan saathi ahet jey striyaanna fakta ek object mhannoon treat kartaat.. :( sorry.. mala kuthleheee vaad nirmaaN karayche nahiye.. please! with due respect to everyone's views.

पिशी अबोली's picture

3 Jul 2013 - 2:55 am | पिशी अबोली

शी बाईटस, आय शुड फॉलो!

आवडलं.. त्याला नेचर्स गिफ्ट म्हणून अ‍ॅक्सेप्ट करण्यात किती धैर्य आहे! मनापासून आवडलं...

नवर्‍याने तिला कशासाथी खिजवले. मेल बाईट्स......

सर्वांना मनापासुन धन्यवाद.
@विजुभाऊ-नवर्‍याने तिला खिजवल्याचा कोठेही उल्लेख नाही. एक साधासा प्रसंग जो मनात विचारांचे वादळ उठवुन गेला तेव्हढाच उतरवण्याचा प्रयत्न!

गंगाधर मुटे's picture

9 Jul 2013 - 1:02 pm | गंगाधर मुटे

स्वसंरक्षणाची एक उपजत ऊर्मी आणि एकमेव हत्यार आहे.
मनुष्यप्राणी जसजसा सुसंस्कृत होत गेला तसतसा हे हत्यार वापरणे म्हणजे असंस्कृततेचे लक्षण आहे, असा समज दृढ होत गेला. त्यामुळे महिलांच्या बाबतीत तरी हे हत्यार निरुपयोगी ठरले.

अप्रतिम कविता. खूप आवडली.

वेल्लाभट's picture

9 Jul 2013 - 3:21 pm | वेल्लाभट

_/\_
ग्रेट

जेपी's picture

9 Jul 2013 - 4:53 pm | जेपी

*****

टवाळ कार्टा's picture

21 Sep 2016 - 6:24 pm | टवाळ कार्टा

बाब्बौ...भारीये हे

रातराणी's picture

21 Sep 2016 - 8:11 pm | रातराणी

सुंदर!

पथिक's picture

22 Sep 2016 - 10:55 am | पथिक

नीट कळली नाही पण आवडली.