ढाळु नकोस आसवे, अस्वस्थ नको मज करु
समजदार असताना तु, नको असा अविचार करु
हि अशिच रित जिवनाची,टिचभर पोटाचि खळ्गी भरन्याचि
दुर देशी जावे लागते, यास उपाय काय करु
समजदार असताना तु नको असा अविचार करु
आस धरुन सुखाचि उध्याच्या, गोड स्वप्नात र॑गुया
मनि उ॑च ईमले उभारुन, चल स्वप्न साकारु
समजदार असताना तु, नको असा अविचार करु
मी येईन परतोन, ही मनात ठेव खुण,
कधी ? केव्हा ?????, नको विचारु
समजदार असताना तु, नको असा अविचार करु
प्रतिक्रिया
11 Jul 2008 - 6:28 pm | शितल
मी येईन परतोन, ही मनात ठेव खुण,
कधी ? केव्हा ?????, नको विचारु
समजदार असताना तु, नको असा अविचार करु
हे तर मस्तच.
11 Jul 2008 - 8:57 pm | अनंतसागर
विचार अतिशय चांगला
पण प्रत्यक्षात मात्र असं नाही होत
सर्व काही कळतं पण वळत काहीच नाही.
12 Jul 2008 - 12:41 pm | विसोबा खेचर
कविता ठीक वाटली..
पुलेशु
तात्या.