"मिसळ"णारी कोण कोण??? - इस्ट कोस्ट मध्ये??

प्राजु's picture
प्राजु in काथ्याकूट
10 Jul 2008 - 6:55 pm
गाभा: 

नमस्कार मंडळी,
आता जरा उन्हाळा मस्त चालू झाला आहेच इथे... तर आपणही जबरदस्त मिसळकट्टा भरवू. काय म्हणता?? इस्ट कोस्ट ला कोण कोण आहे?? छोट्या डॉनची बहीण शोभाव्या अशा वरदाबाई कट्टा भरवायचं पिल्लू सोडून आता स्वतःच 'जमणे अवघड आहे असे सांगताहेत." तेव्हा आता ही जबाबदारी आपण सगळे मिळून घेऊ.. कसं?? इस्ट कोस्ट ला मी, शितल, संदीप चित्रे, चतुरंग.. आणखी कोण कोण आहे?? केव्हा जमूया, कुठे जमूया?? कोणाच्या घरी की एखाद्या बीच वरच जमायचं?? इस्ट कोस्ट वाले तुम्हाला काय वाटतं? सगळ्यांचं मत घेऊन निर्णय घेऊ? घरी जमायचं असेल तर सगळ्यांसाठी कोल्हापूरी मिसळ मी करण्याची जबाबदारी घेते?? काय गं शितल.. तू करशील ना मदत?

- प्राजु

प्रतिक्रिया

llपुण्याचे पेशवेll's picture

10 Jul 2008 - 8:05 pm | llपुण्याचे पेशवेll

मी आहे इस्ट कोस्ट मधे पण थोड्याच दिवसाचा सोबती. :) जाणार जुलै महिनाअखेरीला परत पुण्यास...
पुण्याचे पेशवे

शितल's picture

10 Jul 2008 - 8:08 pm | शितल

अग प्राजु आपण कोल्हापुरी मिसळ सगळ्याना चाखायला देऊच
आपण एखाद्या बीच वर जाऊ मस्त पैकी
मिसळ करू तेथे.
बारबेक्यु करू ;)
मस्त फोटो टाकु आणि मिपाकराना जळवु.
मी तर तयार आहे.
तारीख ठरवु.
जुलै मध्येच करू . शुभच्य शिघ्रम!

प्राजु's picture

10 Jul 2008 - 8:11 pm | प्राजु

वरदाला २६ जुलै ला जमते आहे... बाकिच्यांचे काय??
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

प्राजु's picture

10 Jul 2008 - 8:09 pm | प्राजु

पेशवे.. आपण जाण्या आधीच करू कट्टा.. कुठे आहात आपण?? आपल्याला कुठे जमेल?? न्यूजर्सी, हार्टफर्ड की मॅस मध्ये?/
ठरवा लवकर.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

llपुण्याचे पेशवेll's picture

10 Jul 2008 - 11:39 pm | llपुण्याचे पेशवेll

मी न्यू जर्सी मधे येऊ शकतो. :)
पुण्याचे पेशवे

शितल's picture

10 Jul 2008 - 8:12 pm | शितल

आपल्या जवळ एक बीच आहे तुला माहित आहे ना
किवा मग जास्त मिपाकर कोठुन आहेत ते पाहु आणि मध्य ठरवु.
सदीप काय तुला म्हणायचे आहे

प्राजु's picture

10 Jul 2008 - 8:15 pm | प्राजु

क्लिंटन मॉलच्या थोडा पुढे आहे तो बीच ना..

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

शितल's picture

10 Jul 2008 - 8:12 pm | शितल

हो मला चालेल
२६ ला.

शितल's picture

10 Jul 2008 - 8:17 pm | शितल

हो पण तो आपल्याला जवळ आहे. बाकीच्याचे काय.

मुक्तसुनीत's picture

10 Jul 2008 - 8:17 pm | मुक्तसुनीत

बरेचसे ईस्टकोस्ट वाले उत्तर भागातच आहेत. डिसी च्या दक्षिणेला कुणी आहे की नाही ते माहीत नाही. या दृष्टीने, जर्सी-न्युयॉर्क ही ठिकाणे सर्वाना सोयीची होतील. कुणालाही ४-५ तासांपेक्षा जास्त प्रवास करावा लागू नये असे मला वाटते.

अर्थात, डीसी ला सगळ्याना येता येणे शक्य असेल तर आमचा गरीबखाना उघडा आहे. चाळीत असताना गच्चीत खेळलो ; ग्यालरीत झोपलो. इथे लोकांनी आमच्या बेसमेंट ची डॉर्मेटरी करावी अशी विनंती.

वरदा's picture

10 Jul 2008 - 8:19 pm | वरदा

जमलं मला तर कुठेही यायला काहीच प्रॉ. नाही...पेशव्यांना लिफ्ट देईन मी...चालेल ना रे?
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

llपुण्याचे पेशवेll's picture

10 Jul 2008 - 11:40 pm | llपुण्याचे पेशवेll

लवकर लवकर ठरवा.

पुण्याचे पेशवे

प्राजु's picture

10 Jul 2008 - 8:29 pm | प्राजु

कुठेही चालेल...- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

शितल's picture

10 Jul 2008 - 8:34 pm | शितल

हो कोठे ही
पण मिसळ हाच खादाडीचा मेन मेनु

टारझन's picture

10 Jul 2008 - 8:57 pm | टारझन

हो कोठे ही
पण मिसळ हाच खादाडीचा मेन मेनु

अहो ईस्ट कोस्ट वाले .. ईस्ट अफ्रिका चालेल का ? आयला आमच्या तोडाच्या बादल्याभर लाळा पाडून मिसळ पार्टी करताय राव.
ईस्ट अफ्रिकेचे बिच अमेरिकेपेक्षा फार सूंदर आहेत हो.. प्लिज याना ईकडे.

(स्वगतः मरूदे खविसा .. कोणी ऐकणार नाही तुझं :( ते एन्जॉय करत आहेत त्यांना शूभेच्छा दे ! नेहमी चे स्पेक्टेटर ना तू? )

एकांतवासी )
कु,ख,


तू भारी ...तर मी लई भारी...


http://picasaweb.google.com/prashants.space

मुक्तसुनीत's picture

10 Jul 2008 - 8:47 pm | मुक्तसुनीत

एक प्रस्ताव मांडतो. एकूण प्रतिसाद लक्षात घेऊन निर्णय घेता येईल.

प्रस्ताव : डीसी भागात भेटायचे. आमच्या घरी सगळ्यानी यायचे. शुक्रवारी रात्री सगळ्यानी पोचायचे. सर्वानी रविवार पर्यंत एकत्र रहावे. (ज्याना रविवार नंतर रहाता येणे शक्य आहे त्यानी जरूर रहावे)मी डिसीची सफर जमेल तितपत घडवून आणेन. बार्बेक्यु ग्रिल आहेच. कोल्लापुरी लोकानी त्यांचा मिसळ मसाला/रेसिपि आणावी. बाकीची व्यवस्था मज गरीबाकडे लागली. २६ जुलाय चा विकांत मोकळा आहे आम्हालासुद्धा.

बोला. कोणकोण येतंय ?

विकास's picture

10 Jul 2008 - 9:25 pm | विकास

मी पण इस्टकोस्टचाच!

पण मी एका अटीवर येण्यास तयार आहे: ह्याला कट्टा न म्हणता - अखिल भारतीय इस्टकोस्ट अमेरिका मराठी साहीत्य संमेलन असे म्हणले पाहीजे ;)

प्राजु's picture

10 Jul 2008 - 9:50 pm | प्राजु

पण मी एका अटीवर येण्यास तयार आहे: ह्याला कट्टा न म्हणता - अखिल भारतीय इस्टकोस्ट अमेरिका मराठी साहीत्य संमेलन असे म्हणले पाहीजे

म्हणजे सर्किट रावांना टवाळकीसाठी आणखी एक विषय मिळेल.. (ह्.घ्या.)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

सर्किट's picture

10 Jul 2008 - 10:50 pm | सर्किट (not verified)

अभाईकोअमसासं ला शुभेच्छा.

म्हणजे सर्किट रावांना टवाळकीसाठी आणखी एक विषय मिळेल.. (ह्.घ्या.)

अहो, हल्ली विषय अनेक आहेत. त्यामुळे तुमच्या संमेलनाची टवाळकी सप्टेंबरापर्यंत तरी करायला जमणार नाही. :-)

- सर्किट

प्राजु's picture

10 Jul 2008 - 8:55 pm | प्राजु

नवर्‍याला विचारते. हार्टफर्डवरून डि.सिला यायला किती वेळ लागेल?? आम्ही नक्की जमवू. आणि मिसळही नक्की करू.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

शितल's picture

10 Jul 2008 - 8:57 pm | शितल

अहो आमची पोर ढोर ही साधाळावी लागतील त्याची तयारी आहे का.

मुक्तसुनीत's picture

10 Jul 2008 - 8:59 pm | मुक्तसुनीत

मला दोन मुले आहेत. तेव्हा आमचे घर किड्स्-फ्रेंडली आहेच. काळजी नको. (तुमच्या मुलाबद्दलचे किस्से वाचले आहेत. :-) )

छोटा डॉन's picture

10 Jul 2008 - 9:06 pm | छोटा डॉन

आत्ता होय म्हणाल आणि नंतर "हरे राम" म्हणायची वेळ येईल ...
तुमच्याकडे पण "नॉईज कंप्लेंट" होते का ? हो असेल तर दंड भरायची तयारी करा ...

अवांतर : जर "बेंगलोर - डीसी तिकीटाचे" निम्मे पैसे अनुदान म्हणुन मिळत असतील तर आम्ही येऊ ...
म्हणजे "हो" म्हणुन नेहमीप्रमाणे शेवटी" काडी टाकुन पळुन" जाऊ ...

तुमच्या "डी सी कट्ट्यास शुभेच्छा" !!!
ऐश करा लेको, शिकरण खावा, मटार उसळ खावा !!

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

वरदा's picture

10 Jul 2008 - 9:16 pm | वरदा

डॉन भाऊ तुअम्चं हो म्हणून काडी टाकून पळायचं काम मी करणार यंदा असं दिसतय.....:)
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

छोटा डॉन's picture

10 Jul 2008 - 9:23 pm | छोटा डॉन

तरी मला शंका आलीच होती ...
मगापासुन मी ह्या वाक्यांचा अर्थ लावायचा प्रयत्न करत होतो वरदाताई ...

"जमलं मला तर कुठेही यायला काहीच प्रॉ. नाही...पेशव्यांना लिफ्ट देईन मी...चालेल ना रे?"
आणि
"बाकी माझं नक्की नाहीच त्यामुळे तुम्ही ठरवा मी शेवटच्या क्षणाला सांगते...."

आता आपणच सफाई दिलीत, प्रश्नच मिटला ...
आधीच सांगितले बरे केलेस, नाहीतर पुणेकर जसे माझ्या नावाने खडे फोडत होते तशी वेळ तुझ्यावर यायची...

जोक्स अपार्ट, तुम्ही सगळे जमा, मस्त मज्जा करा, काय केले ते आम्हाला सांगा, यातच आम्हाला आनंद आहे ...

आद्य काडीसम्राट छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

वरदा's picture

10 Jul 2008 - 10:33 pm | वरदा

नाहीतर पुणेकर जसे माझ्या नावाने खडे फोडत होते तशी वेळ तुझ्यावर यायची...

अरे प्राजुच्या लेखाची सुरुवातच पहा ना..तिने ऑलरेडी फोडलेत थोडे खडे...:)))))
(काडीसम्राटाची बहीण) :)
वरदा
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

तो झणझणीत कोल्हापुरी मिसळ तयार करायला नकी मदन करेल....

वरदा's picture

10 Jul 2008 - 11:01 pm | वरदा

का गं माझ्या पोटावर पाय आणते? मी २०० पानांची वही आणलेय कालच १०० पानं भरली सुद्धा खाऊची यादी लिहून....
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

असं नाही वाटत पण शनिवारी दुपारी येऊ शकेन्..मला साधारण ५ तास तरी लागतील मी नॉर्थ न्यू जर्सी ला आहे....
बाकी माझं नक्की नाहीच त्यामुळे तुम्ही ठरवा मी शेवटच्या क्षणाला सांगते....

(स्वगतः नक्की नाही तरी किती बडबडतेयस? जरा लोकांना ठरवू देत की)
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

वरदा's picture

10 Jul 2008 - 9:18 pm | वरदा

मानस, चतुरंग, धनंजय, लंबूटांग आणि मीनल हे लोक आहेत इस्ट कोस्ट वर पाहू ते काय म्हणतात
http://www.misalpav.com/node/887 इथे तयार होते बरेचजण.....
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

लंबूटांग's picture

10 Jul 2008 - 10:50 pm | लंबूटांग

माझा नायगारा ला जाण्याचा प्लॅन ऑलमोस्ट ठरला आहे :(.. बदलल्यास नक्कीच येईन. कुठे डी.सी. ला जमणार आहात का? कुणी बॉस्टन हून जाणार आहे का? कारण माझ्याकडे गाडी नाही आहे. अर्थात हे सगळे पुढचे प्रश्न आहेत म्हणा.

अनामिक's picture

10 Jul 2008 - 9:44 pm | अनामिक

मी नवीन आहे मिपावर.. मी येऊ शकतो का??

प्राजु's picture

10 Jul 2008 - 9:53 pm | प्राजु

आपण अमेरिकेत इस्ट कोस्ट ला रहात असाल तर जरूर सहभागी व्हा..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

धनंजय's picture

10 Jul 2008 - 10:16 pm | धनंजय

कट्टा असेल तर जरूर येऊ शकेन. (पण जुलै पहिले तीन आठवडे जरा व्यस्त आहेत.)

वरदा's picture

10 Jul 2008 - 10:29 pm | वरदा

आम्ही शेवटचा आठवडाच म्हणतोय्..म्हणजे जमेल ना तुम्हाला?
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

ऋषिकेश's picture

10 Jul 2008 - 10:20 pm | ऋषिकेश

इस्ट कोस्ट कट्ट्यासाठी "इष्ट"शुभेच्छा! :)

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

मुक्तसुनीत's picture

10 Jul 2008 - 10:47 pm | मुक्तसुनीत

येणार :

प्राजू
शीतल
विकास
धनंजय
अनामिक

अधांतरी :

चतुरंग
वरदा

मानस आमच्या भागातले. ते असणारच.

बाकीच्यानी आपापले प्रतिसाद कळवावेत.

येणार्‍या मित्र्-मैत्रिणिनो , आपापले इमेल्स मला पाठवा. मी डिरेक्शन्स पाठवतो आहे .....

धन्यवाद .

संदीप चित्रे's picture

10 Jul 2008 - 10:54 pm | संदीप चित्रे

मिसळीने तोंडाल पाणी सुटतंय पण मी आधांतरी आहे.
--------------------------
www.atakmatak.blogspot.com

विसोबा खेचर's picture

10 Jul 2008 - 11:01 pm | विसोबा खेचर

प्राजु's picture

10 Jul 2008 - 11:08 pm | प्राजु

अजून मालकिणबाई कशा नाही आल्या..! - (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

नारदाचार्य's picture

11 Jul 2008 - 6:19 pm | नारदाचार्य

अनुष्का अभ्यंकर? हे काय? कधी? इथं काहीही घोषणा न करताच? पत्रिका द्यायची वगैरे पद्धत? अहो केला असता ना आहेर... किंवा आहेर तुम्हाला न देता त्या सोहळ्याला येणाऱ्यांसाठी आम्ही काही समव्यसनी मित्रांनी मिसळीची सोय वगैरे केली असती... नुसतंच हादडून नसतो गेलो आम्ही!!! दिलदार माणसाला शोभत नाही हे विसोबा (लक्षात घ्या आम्ही दिलदार शब्दाला पेठेतल्या पुणेकरासारखं अवतरण टाकलेलं नाहीये)...
बाकी एरवी मालक-मालकीण आम्ही आनंदानं स्वीकारलेलं आहेच की (तुम्ही कोण स्वीकारणारे, अस प्रश्न ऐकू आलाच)... तरीही ही छुपे-रुस्तमगिरी नाही पटली... याचा दंड करावा लागेल. समस्त मिपाकरांनो, यावर तुमचे मत द्या. अर्थात, कोणीतरी कष्ट घेऊन स्वतंत्र धागा सुरू करा...

कट्ट्याला मात्र शुभेच्छाच...

वरदा's picture

10 Jul 2008 - 11:04 pm | वरदा

तर वहिनी एवढ्या का बरं लाजतायत बॉ? :O
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

खादाड_बोका's picture

10 Jul 2008 - 11:24 pm | खादाड_बोका

प्राजु,
मी मेरीलॅन्ड कोलंबीयाला राहतो. कटटयामधे भाग घ्यायला आवडेल. पण २६ जुलईला जर्सीला जायचे ठरवीले आहे. काही फरक पडला तर जरूर सागेन. कोणाला विचारावे लागेल. नम्बर मिळाला तर बर होईल.
कळवावे.

भेटी लागी जीवा लागली समाधी....

मुक्तसुनीत's picture

10 Jul 2008 - 11:27 pm | मुक्तसुनीत

आयत्या वेळी प्लान्स बदलले तर कधीही या. इमेल कळवा. डिरेक्शन्स पाठवितो.

खादाड_बोका's picture

11 Jul 2008 - 1:19 am | खादाड_बोका
वरदा's picture

11 Jul 2008 - 1:23 am | वरदा

आमच्या शेजारच्या गोडबोलांच्या कुत्र्याचं नाव होतं रँबो.. ही हि ही.. ह. घ्या नक्की...
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

वरदा's picture

10 Jul 2008 - 11:41 pm | वरदा

जर्सीला कट्टा असेल तर जमेल का तुम्हाला? तुम्ही आणि चतुरंग दोघांच्या म्हणण्याप्रमाणे आपण जर्सीला करुयात
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

चतुरंग's picture

10 Jul 2008 - 11:26 pm | चतुरंग

मी बॉस्टनजवळ आहे. मला कनेटीकटला जमेल (प्राजू, शीतल तुम्ही कोणता बीच म्हणताय तो ऑप्शन चांगला आहे). न्यू जर्सी थोडे लांब आहे पण २६ तारखेला जमू शकेल.

डि.सी. मात्र बरेच लांब पडेल (९-१० तासाचे ड्रायविंग) त्यामुळे जमेल असे वाटत नाही.

तुमचे काय ठरेल त्याप्रमाणे कळवा. त्याप्रमाणे काय पदार्थ आणायचे ते ठरवता येईल.

चतुरंग

वाटाड्या...'s picture

10 Jul 2008 - 11:46 pm | वाटाड्या...

मलाही यायला आवडेल. पण मी राहातो Detroit मध्ये. तेंव्हा हा कट्टा मला भलताच लांब पडणार...तरीपण शुभेछा....वृतांत्त नक्की कळवा...

अवांतर : आज तात्या एकदम खुष दिसतात. आपल्या कट्ट्यामुळे मालकीण बाई गाणं वगैरे म्हणतायत वाट्टं.... साडी नेसुन..;) ह. घ्या...मध्ये एखादं झाड ठेवा म्हणजे एकदम फिल्मी श्टाइल....

आपला,

मुकुल

चित्रा's picture

10 Jul 2008 - 11:59 pm | चित्रा

घरी घरचेच लोक आले असल्याने सर्वांना घेऊन २६ जुलै ला येणे जमणे कठीण वाटते आहे, पण आयत्या वेळी बेत बदलले तर नक्की येऊ.

प्राजू, आणि वरदा, तुम्हाला प्रत्यक्ष भेटायला आवडेलच.

मुक्तसुनीत's picture

11 Jul 2008 - 12:01 am | मुक्तसुनीत

तुम्ही कुठे आहात ते माहीत नाही ; पण घरच्याना घेऊन या ! डीसी सुद्धा होईल की "घरच्यांचे" :-)

चित्रा's picture

11 Jul 2008 - 12:30 am | चित्रा

आम्ही खडूस बॉस्टनकर.

डीसी ला यायला एरवी हरकत नसती, पण तसा थोडा लांबचाच प्रवास आहे, त्यामुळे जरा बोलून ठरवतो आणि सांगतो (म्हणजे 'आम्ही' ठरवतो आणि सांगतो.. हे असे पूर्वी या प्रतिसादाआधी लिहायला काही वाटत नव्हते, पण आता भिती वाटते ;-))

प्राजु's picture

11 Jul 2008 - 12:10 am | प्राजु

तुम्ही काय म्हणता आहात?? तुम्हाला जर्सि किंवा कनेक्टीकट मध्ये जमेल का? चतुरंग ना लांब पडेल म्हणताहेत..
मी नी शितल करू तयारी सगळी...
चतुरंग, आय - ८४ वेस्ट वर, न्यू हेवन्स च्या बाजूला हा बीच आहे. हार्टफर्ड पासून साधारण ३०-४५ मिनिटे लागतात. नाव : हॅम्मोनोसेट बीच..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

वरदा's picture

11 Jul 2008 - 12:27 am | वरदा

मुक्तसुनीत ना लांब पडेल ना... जमेल का तुम्हाला मुक्तसुनीत?
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

प्राजु's picture

11 Jul 2008 - 12:31 am | प्राजु

मुक्तसुनित ना जमेल का?
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

असेल तर चालेल...
वरदा चे स्वगत कॉपी पेस्ट :)
(स्वगतः नक्की नाही तरी किती बडबडतोयस? जरा लोकांना ठरवू देत की)

वरदा's picture

11 Jul 2008 - 1:11 am | वरदा

मी असं कन्क्लूजन काढलय की जर्सी सगळ्यांना जमतय्..कारण प्राजु जवळचा बीच मुक्तसुनीत ना ७ तासांवर आहे ते लांबच पडेल आणि मुक्तसुनीत कडे यायला चतुरंग ना लांब पडेल....

तेव्हा आता शेवटी ठीकाण फिक्स करुयात जर्सी...मी घरी असले तर माझं घर नाहीतर जर्सीत भरपूर बीच आहेतच ;)
मला अजुन एक दिवस द्या आणि मी सांगते की मी घरी आहे का...पण माझं घर किड्स फ्रेंडली नाहीये बरं का...जमेल तेवढ्या वस्तु मी उचलून ठेवेन बाकी तुम्ही मदत करालच :)))

आता मेनू ठरवा....
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

अवांतर -
पण माझं घर किड्स फ्रेंडली नाहीये बरं का...जमेल तेवढ्या वस्तु मी उचलून ठेवेन बाकी तुम्ही मदत करालच

जमेल तेवढ्या वस्तू तू उचलून ठेव, बाकी लहान मुलं 'मदत' करतीलच! ;)

चतुरंग

वरदा's picture

11 Jul 2008 - 3:35 am | वरदा

मी आताच तुमचं पहिलं वाक्य वाचलं...
खरंतर मी मुक्तसुनीत यांना विचारुन नव्हतं टाकलं कंक्लूजन्...ते ७ तासावर आहे पहातो काय करातचं असं म्हणाल्यावर मीच बडबड केली...सॉरी मुक्तसुनीत तुम्हाला विचारलच नाही.....
समजून घेतलत हे मी समजूनच चालते.. ;)
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

खादाड_बोका's picture

11 Jul 2008 - 1:26 am | खादाड_बोका

वरदा,

न्यु जर्सी ला कुठे? जमेल तेव्हा सान्गा.

धन्यवाद,

खादाड_बोका :)

वरदा's picture

11 Jul 2008 - 1:37 am | वरदा

एकदा कन्फर्म करते नवर्‍याबरोबर आणि मग पत्ता टाकते इमेल मधे सगळ्यांना उद्या किंवा विकांताला....
चतुरंग ती 'मदत' भन्नाट असेल....

"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

मुक्तसुनीत's picture

11 Jul 2008 - 1:45 am | मुक्तसुनीत

एकूण कट्टा जर्सी/कन्नेटीकट मधे भरणार असे दिसते आहे तर. संबंधितानी योग्य तो निर्णय घेऊन कट्ट्याचे प्रस्तावित डिटेल्स कळवावेत ....
धन्यवाद !

मानस's picture

11 Jul 2008 - 7:42 am | मानस

मी व मुक्तसुनीत नक्की येऊ. ठरवा व त्याप्रमाणे कळवा आम्हाला.

बाकी सगळ्यांना जमणार असेल तर "न्यु यॉर्क" सुद्धा चालेल. बरेच दिवस विचार करतो आहे, ग्राऊंड झिरो ला जरा नमस्कार करुन येईन. (९/११ चा 'सर्वायवर ')

मानस

मी मिसळ्पावचा नियमित वाचक आहे.
(वाचकांचा पञव्यवहार श्टाइल....)

माझा एमैल पत्ता --omkargogate@gmail.com
सध्या वास्तव्य New Jercy

कळावे,

आपलाच....
मानून घ्या हो.....

llपुण्याचे पेशवेll's picture

11 Jul 2008 - 2:44 am | llपुण्याचे पेशवेll

न्यू जर्सी जवळ पण बीच आहेतच की चांगले..
पुण्याचे पेशवे

वरदा's picture

11 Jul 2008 - 3:38 am | वरदा

काय हो पुण्याचे असून गोगट्यांना चिडवता हे काय बरं नाय...

ह्म्म माझ्याही डोक्यात आलं होतं की जर बीच वर जायचं असेल तर मी ग्रील आणीन घरुन आणि मिसळ आहेच तेव्हा इथे भरपूर बीचेस आहेत्...मुद्दाम लांबून लोक न्यूजर्सीचे बीचेस पहायला येतात तेव्हा तसं करायचं असेल तरी कळवा......

"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

llपुण्याचे पेशवेll's picture

11 Jul 2008 - 3:51 am | llपुण्याचे पेशवेll

पण तुझे आणि बाकीच्यांचे काय? बाकीचेही यायला तयार झाले आणि तूच ऐनवेळी डीच मारलीस तर?? :)
बाकी लोक काय म्हणतात ? सुनीतराव, प्राजुताई, चतुरंगराव काय म्हणता सगळे लोक?
पुण्याचे पेशवे

गणा मास्तर's picture

11 Jul 2008 - 6:11 am | गणा मास्तर

लोक तिकडे भारतात कट्टे भरवत आहेत. दंगली करत आहेत, लग्नाच्या पंक्ती उठवत आहेत.
अमेरीकेत कटटा भरवत आहेत.
मी तोक्योत काय करु?

(जपानमधला कदचित एकमेव मिपाकर) अनिकेत केदारी

वरदा's picture

11 Jul 2008 - 6:56 am | वरदा

तिथून एक तिकीट काढा अमेरिकेचं....:)
सिरिअसली, तिथे कुणी मराठी आहेत का हो आजुबाजुला?
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

वरदा's picture

11 Jul 2008 - 8:34 am | वरदा

मला जमतय २६ला...कन्फर्म ,..आता माझ्या घरी आलात तर आनंदच्..कुणाला बीच पहायचा असेल तिथे गेलो तरी मजा करु..किंवा न्यूयॉर्क मधेही मला काहीच हरकत नाही....
पटकन ठरवा म्हणजे जर माझ्या घरी जमणार असू तर मला सगळ्यांना पत्ता पाठवता येईल.....
आणि मेनू पण ठरवूयात्...मी काहीतरी गोड करेन्..मिसळ तिखट लागली तर :)

"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

मुक्तसुनीत's picture

11 Jul 2008 - 8:36 am | मुक्तसुनीत

तुमच्या शहर/राज्याचे नाव सांगता काय ? अंतर पाहातो ...

चतुरंग's picture

11 Jul 2008 - 5:25 pm | चतुरंग

बीचवर कट्टा करायचा तर ऐन दुपारी करता येणे जरा अवघड आहे कारण ऊन खूप आहे.
एकतर झाडी हवी किंवा मोठ्या छत्र्या तरी हव्यात, हे दोन्ही नसेल तर मात्र तुझ्या घरी कट्टा करुन नंतर बीचवर जाणे योग्य.

चतुरंग

अमोल केळकर's picture

11 Jul 2008 - 5:37 pm | अमोल केळकर

२६ जुलैला पाऊस नसतो ना हो तिथे ( कृ. ह. घ्या ) :H

मिसळपावच्या कट्ट्यासाठी शुभेच्छा

(२६ जुलैची भिती वाटणारा ) अमोल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

शितल's picture

11 Jul 2008 - 5:46 pm | शितल

मला वाटते चतुर्॑ग जी उन्हात बसण्याला ज्या मोठ्या छत्र्या असतात त्या बद्दल बोलत आहे
पावसाच्या नव्हे.
बरोबर का हो चतुर॑गजी.

चतुरंग's picture

11 Jul 2008 - 5:51 pm | चतुरंग

डायरेक्ट कडक उन्हात बसलं तर बार्बेक्यू व्हायचा आपला! ;)

चतुरंग

शितल's picture

11 Jul 2008 - 5:53 pm | शितल

=)) =))
हो मग त्याचे मिपावर फोटो टाकु
करायलो गेलो कट्टा
झालो बारबेक्यु.:)

प्राजु's picture

11 Jul 2008 - 6:43 pm | प्राजु

म्हणजे मला आणि माझ्या नवर्‍याला न्युजर्सी जमेल... मी आणि शीतल मग एकत्रच निघू इथून.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

वाचक's picture

11 Jul 2008 - 9:16 pm | वाचक

आहे ईस्ट कोस्ट ला (बॉस्टन)
२६ जुलै जमू शकेल - डीसी कठिण जाईल पण जर्सी जमू शकेल
काय ठरतय कळवा :)

लंबूटांग's picture

11 Jul 2008 - 10:58 pm | लंबूटांग

माझा नायगारा प्लॅन बहुतेक नक्की आहे :( त्यामुळे शक्यता कमी आहे जमण्याची मला..तरी मावशीला विचारतो आणि प्लॅन चेंज झाला तर नक्की येतो..पण न्यु जर्सी ला कुठे नक्की? ट्रेन / बस :ss (नको ती बस ची आठवण - वेळ मिळाला की पोस्ट करेनच तो अनुभव) स्टेशन आहे का जवळ पास?

बबलु's picture

12 Jul 2008 - 4:06 am | बबलु

ईस्ट कोस्ट वाले कट्टा कर्ताहेत. आम्ही वेस्ट कोस्ट ला आहेत.
अरे... सान फ्रांसिस्को बे एरीया मधिल लोक आहेत का कोणी ???

आपला...
~बबलु-अमेरिकन