संशोधन प्रकल्पात सहभागी होण्यासाठी आवाहन

सन्जोप राव's picture
सन्जोप राव in काथ्याकूट
6 Apr 2013 - 3:41 pm
गाभा: 

'पर्यावरण साक्षरता व उपभोक्त्यांचे वर्तन' या विषयावरील संशोधनात सहभागी होण्यासाठी काही स्वयंसेवकांची गरज आहे. स्वयंसेवक हे अठरा वर्षांपेक्षा अधिक वयाचे व संगणक साक्षर असावेत. सदर स्वयंसेवकांना एक प्रश्नावलीचा दुवा पाठवण्यात येईल. त्या दुव्यावर दिलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी भरायची आहेत. सर्व प्रश्न हे बहुपर्यायी स्वरुपाचे आहेत. कोणतीही खाजगी माहिती, अगदी स्वयंसेवकाचे नावही, देणे बंधनकारक नाही. सदर माहिती गोपनीय ठेवली जाईल व तिचा फक्त संशोधनासाठीच वापर करण्यात येईल.
ही प्रश्नावली थोडी मोठी (व मोठ्या कष्टाने तयार केलेली ) आहे. ज्यांना संशोधन या विषयात रस आहे त्यांना या संशोधनाचे निष्कर्ष व्यक्तिगत निरोपातून कळवण्यात येतील. 'मिसळपाव'च्या वाचकांना मी सदर संशोधनात भाग घेण्याचे आवाहन करतो आहे. ज्यांना या प्रकल्पात भाग घ्यावासा वाटतो, त्यांनी कृपया त्यांचा ई-मेल पत्ता मला व्यक्तिगत निरोपातून पाठवावा.
सदर संशोधन माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. जितके अधिक स्वयंसेवक यात भाग घेतील, तितकी या संशोधनाची व्यापकता वाढेल. कृपया या उपक्रमात सहभागी होऊन या संशोधनाला हातभार लावावा.
धन्यवाद.

प्रतिक्रिया

कापूसकोन्ड्या's picture

6 Apr 2013 - 4:08 pm | कापूसकोन्ड्या

मी इंटरेस्टेड आहे
व्य.नि.तून एमेल आयडी कळविला आहे.

साती's picture

7 Apr 2013 - 4:20 pm | साती

उपभोक्ता म्हणजे काय?

प्रतिज्ञा's picture

7 Apr 2013 - 4:47 pm | प्रतिज्ञा

चा वापर करून घेणारा..... म्हणजेच उपभोक्ता असावा अस मला वाटत. पक्क माहित नाही. :(

प्रतिज्ञा's picture

7 Apr 2013 - 4:45 pm | प्रतिज्ञा

संगणक साक्षर म्हणजे काय ? यात तुम्हाला डिग्री होल्डर हवे आहेत कि संगणक हाताळता येतील असेही चालतील ?

सन्जोप राव's picture

7 Apr 2013 - 10:34 pm | सन्जोप राव

'कन्झ्युमर' या शब्दासाठी मी 'उपभोक्ता' हा शब्द वापरला आहे. नंतर वाटले की 'ग्राहक' हा साधा शब्द आपल्याला कसा सुचला नाही? असो.
संगणक साक्षर म्हणजे आपण सगळे. ई-मेल, इंटरनेट वापरता आले की झाले. संगणकाच्या वापराचे प्रशिक्षण वगैरे घेतलेले असावे अशी काही अट नाही.
यात सहभागी झालेल्या आणि या प्रकल्पात रस दाखवलेल्या सर्वांचे आभार.

श्रीरंग_जोशी's picture

8 Apr 2013 - 11:40 pm | श्रीरंग_जोशी

या उपक्रमाबद्दल अभिनंदन व शुभेच्छा. मला स्वयंसेवक म्हणून सहभागी व्हायला आवडेल.

माझा विपत्र पत्ता - jshrirang@gmail.com.

चौकटराजा's picture

9 Apr 2013 - 8:55 am | चौकटराजा

माझा ऋणकणीय संपर्क ठावा - barvearun20@gmail.com असा आहे .निसर्ग प्रेमी असल्याने पर्यावरण हा विषय जिव्हाळ्याचा. सबब प्रतिसादास तयार आहे.

श्रीरंग_जोशी's picture

9 Apr 2013 - 8:36 pm | श्रीरंग_जोशी

या प्रश्नावलीतील प्रश्न नेहमीच्याच माहितीमधले असले तरी उपलब्ध पर्यायांतून उत्तरे निवडतांना अनेकदा गोंधळ उडाला. 'सांगता येणार नाही' हाही पर्याय काही वेळा उपलब्ध असल्याने सोय झाली.

उत्तरे देताना जालावरून शोध घेऊन उत्तरे दिली नाही. संयोजकंद्वारे योग्य उत्तरे जाहीर झाल्यावर पडताळून पाहीन की मी किती पाण्यात आहे?

मला या प्रकल्पात सहभागी होण्याची इच्छा आहे. माझा ईमेल आयडी व्यनि केला आहे.

शुचि's picture

11 Apr 2013 - 11:36 am | शुचि

प्रश्नावली चांगलीच कॉम्प्रिहेन्सीव्ह (सर्वसमावेशक) आहे. मला माझा स्वतःचा (जोर येण्याकरता द्विरुक्ती) पर्यावरणविषयक अवेअरनेस (जागृती)खूप कमी वाटला. जसे साधेच उदाहरण द्यायचे झाल्यास लिहीतेवेळी कागदाच्या दोन्ही बाजूंचा वापर करणे - याचा विचार मी केला नव्हता.
पण कॉफीच्या प्लास्टीक वा पेपर कपऐवजी मी नेहमीच आवर्जून काचेचा (बायोडिग्रेडेबल)कप वापरते - या गोष्टीचा अभिमान वाटला.

अनेक प्रश्नांनी उत्सुकता चाळवली गेली. जसे भारतातील किनारपट्टीवरील कोणता मासा एन्डेंजर्ड स्पीशीत येऊ घातला आहे वगैरे.

या प्रकल्पाचे निष्कर्ष खाजगी (अभ्यासापुरता) राखण्याचा विचार आहे की येथे देता येतील?

श्रीरंग_जोशी's picture

11 Apr 2013 - 10:26 pm | श्रीरंग_जोशी

मी तर गेल्या ६-७ वर्षांत हापिसच्या कामात स्वतःच्या सोयीसाठी एकही प्रिंट आउट घेतलेले नाही.

अत्यावश्यक असेल जसे सरकारी फॉर्म वगैरे तरच स्वतःसाठी प्रिंट आउट काढतो. कधी कधी इतरांसाठी प्रिंट आउट काढावे लागते. आजकाल चतुरभ्रमणध्वनीमुळे कागदांचा वापर कमी करण्याची चांगली सोय झाली आहे.

बाकी उर्जाबचतीद्वारे पर्यावरण-संवर्धनासाठी आणखी काय काय करता येईल यावर विस्ताराने येथे चर्चा झालेली आहे.

फारच स्तुत्य निर्णय. माझ्या एका सहकार्‍याची कार्बन फूटप्रिंटबद्दल सहीच होती. त्यात हा मुद्दा लिहीलेला होता.

सासूबाईंना व नवर्‍याला हा सर्वे पाठविला आहे. एक उत्तम, अभ्यासपूर्ण एकत्र एक्झर्साईझ वाटला.

चौकटराजा's picture

11 Apr 2013 - 12:42 pm | चौकटराजा

मी प्रश्नावली भरून पाठविली आहे. पण हा एक प्रकल्प वगैरे काही नाही असे वाटते.. एका कंपनीला काही उत्पादन आणायचे आहे. त्याचे स्वरूप त्याचे जाहिरात धोरण वितरण धोरण यासाठी त्याना फीडबॅक हवा आहे.पण असा डायरेक्ट मागितला तर कदाचित चुकीचा (misguiding ) सर्व्हे ही होउ शकतो. यासाठी आपल्याला फीडबॅक देणार्‍याची लायकी काय हे शीधण्यासाठी पात्रता निकष म्हणून पहिले अवेअरनेसचे काही प्रश्न देण्यात आले आहेत.
एकच सांगतो घर घेणार्‍या ग्राहकानी दिलेली उत्तरावली व एजंटानी दिलेली उत्तरावली यात फारच फरक पडून पहाणी मधे चुकीचे निष्कर्ष येऊ शकतात. तसेच घर घेणार्‍यांच्याच एकाच उत्तरावलीत खूप अंतर्विरोध दिसून आला तर अशा गोंधळलेल्या ग्राहकाची उत्तरावली पाहणीतून रद्द करता येऊन योग्य तो निश्कर्ष काढता येउ शकतो.

सन्जोप राव's picture

12 Apr 2013 - 4:15 am | सन्जोप राव

ही किचकट प्रश्नावली भरुन पाठवलेल्या सर्वांचे आभार.
चौकटराजा: ही प्रश्नावली कुठल्याही कंपनीने त्यांचे उत्पादन बाजारात आणण्यासाठी केलेला सर्व्हे नाही. हे केवळ एक उत्सुक संशोधन आहे याचा मी आपल्याला निर्वाळा देऊ इच्छितो.
याचे निष्कर्ष जाणून घेण्यासाठी मी आपणा सर्वांइतकाच अधिर आहे. ते हाती येताच सर्व प्रतिसादकर्त्यांना कळवत आहे.
धन्यवाद.

चौकटराजा's picture

12 Apr 2013 - 9:30 am | चौकटराजा

म्हणूनच अंदाज हा शब्द वापरला.मला यातून 'पाहणी' संदर्भात नवीन विचार दिसला म्हणून तो प्रकट केला. असे पहा ना माध्यमांवर येणारे पाहाणी निष्कर्ष असे सांगतात की सध्याचे केंद्र सरकार कुचकामी आहे. हे ग्रामीण भारताचे मत आहे का? असे त्यांचे जर मत असेल तर काँग्रसला ५० जागा जेमतेम मिळतील.पण शहरी लोकांच्या भावना व ग्रामीण लोकांच्या यात फरक असल्याने इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे अंदाज साफ चुकीचे ठरण्याची शक्यता असते.

पुष्कर जोशी's picture

13 Apr 2013 - 9:20 am | पुष्कर जोशी

२१ पक्के ३-४ गुगल उरलेले टुक्के