संशोधन प्रकल्पात सहभागी होण्यासाठी आवाहन
'पर्यावरण साक्षरता व उपभोक्त्यांचे वर्तन' या विषयावरील संशोधनात सहभागी होण्यासाठी काही स्वयंसेवकांची गरज आहे. स्वयंसेवक हे अठरा वर्षांपेक्षा अधिक वयाचे व संगणक साक्षर असावेत. सदर स्वयंसेवकांना एक प्रश्नावलीचा दुवा पाठवण्यात येईल. त्या दुव्यावर दिलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी भरायची आहेत. सर्व प्रश्न हे बहुपर्यायी स्वरुपाचे आहेत. कोणतीही खाजगी माहिती, अगदी स्वयंसेवकाचे नावही, देणे बंधनकारक नाही. सदर माहिती गोपनीय ठेवली जाईल व तिचा फक्त संशोधनासाठीच वापर करण्यात येईल.
ही प्रश्नावली थोडी मोठी (व मोठ्या कष्टाने तयार केलेली ) आहे. ज्यांना संशोधन या विषयात रस आहे त्यांना या संशोधनाचे निष्कर्ष व्यक्तिगत निरोपातून कळवण्यात येतील. 'मिसळपाव'च्या वाचकांना मी सदर संशोधनात भाग घेण्याचे आवाहन करतो आहे. ज्यांना या प्रकल्पात भाग घ्यावासा वाटतो, त्यांनी कृपया त्यांचा ई-मेल पत्ता मला व्यक्तिगत निरोपातून पाठवावा.
सदर संशोधन माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. जितके अधिक स्वयंसेवक यात भाग घेतील, तितकी या संशोधनाची व्यापकता वाढेल. कृपया या उपक्रमात सहभागी होऊन या संशोधनाला हातभार लावावा.
धन्यवाद.
प्रतिक्रिया
मी इंटरेस्टेड आहे
उपभोक्ता ?
चा वापर करून घेणारा.....
संगणक साक्षर म्हणजे काय ? यात
उपभोक्ता
+१
म्या पन ...
माहितीपूर्ण प्रश्नावली
मला या प्रकल्पात सहभागी
प्रश्नावली चांगलीच
कागद वाचवणे
फारच स्तुत्य निर्णय. माझ्या
सासूबाईंना व नवर्याला हा
माझा अंदाज ...
प्रश्नावली
.म्हणूनच अंदाज .
स्कोर