पावसाळा सुरू झाला कि आजूबाजूचा परिसर विविध छटांचा हिरवा रंग लेवू लागतो.
मग अवचित येतो श्रावण, रिमझिम पाऊस अन उन-पावसाचा लपंडाव घेऊन!
विविध रंगांची रानफुले माळरानांत, पठारांवर, डोंगरांच्या कुशीत बहरून येतात आणि मन मोहरून जाते.
त्यांच्या आकारांत सुद्धा किती वैविध्य! अगदी नखाएवढी छोटुकलीपण असतात काही फुलं.
हा अविष्कार आणि फुलांचा रंगीबेरंगी सोहळा बघण्यासाठी भटकंती करायला मनापासून आवडतं.
अगदी खूप लांबच जायला पाहिजे असेच काही नाही. सकाळी लवकर घरातून निघालं आणि एखाद्या जवळच्या घाटरस्त्याची वाट धरली तरी हा बहर बघायला मिळतो.
हिरव्यागार गवताच्या पात्यांवर, वेलींवर वार्याबरोबर डोलणारी निळी,जांभळी,लाल,पिवळी,गुलाबी,पांढरी फुले बघताना, टिपताना अगदी दोन-तीन तास कुठे निघून जातात कळतही नाही.
ह्याच मोसमात फुलणार्या काही रानफुलांचे हे फोटो.
(बर्याच फुलांची नावं माहित आहेत, काही फुलांची नावं माहीत नाहीत)
१.नभाळी (Cyanotis Cristata)ह्या फुलांचे ताटवे दूरवर पसरलेले असतात.
२.लाल गोधडी (Narrowleaf Indigo)
३.कानपेट (Commelina)
४.चिरे हबॆअमरी (Habenaria Rariflora)
५.नाव माहित नाही.
६.घाणेरी (Lantana)
७.घाणेरी (लाल)
८.घाणेरी (पिवळी)
९.सोनकडी (Pentanema Indicum)
१०.नाव माहित नाही.(Anisomeles?)
११.पिवळी पुंगळी (Obscure Morning glory )
१२.विष्णूक्रांत (Dwarf Morning glory)
१३.संकासूर (Peacock Flower / Caesalpinia Pulcherrima)
१४.हि फूले खूपच सुंदर दिसतात.
१५. याचेही नाव कळले नाही.
प्रतिक्रिया
2 Apr 2013 - 10:17 am | स्पा
अप्रतिम आलेत फटू
सर्व फुल मस्तच
2 Apr 2013 - 10:22 am | साळसकर
छान.. सकाळी सकाळी प्रसन्न वाटले... संकासूर.. राक्षसासारखे नाव.. पण आवडली फुले त्याची..
यंदाच्या पावसाळ्यात देखील कोकणात एक राऊंड मारून यायला हवे... वर्षभराची प्रसन्नता चारच दिवसात जमा होते..
12 Apr 2013 - 6:03 pm | शुचि
खरच फार प्रसन्न वाटले.
2 Apr 2013 - 10:23 am | महेश हतोळकर
नावेही दिली आहेत. खूपच छान!
2 Apr 2013 - 10:24 am | कवितानागेश
मस्तच आलेत फोटो. सुंदर. :)
2 Apr 2013 - 11:04 am | आदूबाळ
+१
2 Apr 2013 - 11:02 am | अभ्या..
छान छान श्रीया.
मस्त आलेत फोटो. बोके पण आलाय की काही ठिकाणी ;)
2 Apr 2013 - 9:27 pm | श्रिया
अभ्या हे "बोके पण आलाय" म्हणजे काय, मला नाही समजले.
2 Apr 2013 - 9:51 pm | अभ्या..
आपल्या बाणरावानी नुकताच दिलाय हा धागा. :)
http://www.misalpav.com/node/24363
2 Apr 2013 - 11:23 am | सस्नेह
शाळेतली कविता आठवली..
रंगरंगुल्या सनसानुल्या गवतफुला रे गवतफुला,
असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा..
(गवतफुलांचा लळा असणारी) स्नेहांकिता
2 Apr 2013 - 11:35 am | ऋषिकेश
काल धागा टाकला असतात तर 'एप्रिल फूल' असे नाव देता आले असते ;)
अओ. फटु आवडले
2 Apr 2013 - 12:40 pm | धनुअमिता
मस्त आलेत फोटो. आवडले
2 Apr 2013 - 12:45 pm | सौरभ उप्स
मस्त आलेत क्लिक्स... १४ नं. च फुल लई भारी आहे ......
2 Apr 2013 - 1:19 pm | अस्मी
एकदम सुरेख आलेत सगळे फोटो. लाल घाणेरी, संकासूर, विष्णुकांत ही अगदी घराजवळ असलेली फुलं...अगदी ओळखीची :)
2 Apr 2013 - 4:45 pm | अनन्न्या
यातील बरीचशी फुले पाहिली आहेत पण नावे माहित नाहीत सर्वांची!!
2 Apr 2013 - 7:55 pm | श्रिया
प्रतिसादांबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद!
इथे फोटो डकवण्यासाठी स्पा आणि इस्पीकचा एक्का यांचे तत्पर आणि उपयुक्त मार्गदर्शन मिळाले, त्याबद्दल ह्या दोघांचे आभार मानते.
2 Apr 2013 - 11:49 pm | ५० फक्त
फोटो मस्त आले आहेत, धन्यवाद.
आता मुदलाचं - आभारप्रदर्शन झालं, अल्पोपहाराची काय सोय आता.
3 Apr 2013 - 11:37 am | श्रिया
५० फक्त यांच्या सुचनेनुसार, सर्व उपस्थित मन्यवरांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था केली आहे, तरी अल्पोपहार केल्याशिवाय कोणी जाऊ नये.:-)
13 Apr 2013 - 2:10 pm | प्यारे१
लिमिटेड थाळी दिसते ही!
हा अल्पोपहार नव्हे हो! अल्पोपहार वेगळा ;)
-'श्रमपरिहारा'ची ओळख असलेला प्यारे
2 Apr 2013 - 7:58 pm | जेनी...
मस्त!!!!!
घाणेरीचे सर्व प्रकार अमेझिंग .....!!!!
2 Apr 2013 - 9:41 pm | निवेदिता-ताई
:)
2 Apr 2013 - 8:00 pm | प्यारे१
प्रसन्न वाटतात फोटो!
2 Apr 2013 - 9:33 pm | डॉ सुहास म्हात्रे
बघून मन प्रसन्न झालं !
2 Apr 2013 - 9:57 pm | आतिवास
मस्त आहेत सगळेच फोटो. आवडले.
2 Apr 2013 - 11:58 pm | श्रीरंग_जोशी
फारच मनमोहक आहेत सर्वच फोटो.
आवडले.
हरकत नसल्यास नेमके कुठल्या ठिकाणी काढले ते ही लिहावे हि विनंती.
3 Apr 2013 - 11:04 am | श्रिया
ह्यातले बहुतेक फोटो सासवड व पुरंदर परिसरातील आहेत. ह्या परिसरात बरीच प्रेक्षणीय स्थळे आहेत. सासवडवरून वीर (धरण) कडे जाणारा रस्ता हि खूप छान आहे. काही फोटो तिथेही टिपलेले आहेत.
![purandar](https://fbcdn-sphotos-h-a.akamaihd.net/hphotos-ak-ash4/483574_505454126158467_156212051_n.jpg)
हा पुरंदर जवळचा एक फोटो,
4 Apr 2013 - 2:35 am | श्रीरंग_जोशी
या परिसरात मी देखील बराच फिरलोय. पुरंदर वरून सासवडकडे जाणारा रस्ता छानच आहे.
तसेच सासवडकडून पुण्याला येताना दिवेघाटाच्या अगोदर मल्हारगड किल्ल्याचा परिसरही सुंदर आहे.
3 Apr 2013 - 2:15 pm | अमोल केळकर
छान फोटो :)
3 Apr 2013 - 4:23 pm | दिपक.कुवेत
बघुन एकदम प्रसन्न वाटलं. खरचं निसर्ग किती रंगांची उधळण करत असतो. फोटो क्रं १३ ची फुले नेहमी दिसतात पण नाव आज कळले.....संकासूर सह्हिच!
3 Apr 2013 - 4:44 pm | सुहास झेले
मस्त... :) :)
8 Apr 2013 - 5:52 pm | अधिराज
खूपच छान आहेत फुलांचे फोटो.
काही ओळी आठवल्या,
"मोसमात गवतावरही कसली कसली फुलं फुलतात,
रंगरुपासाठी काय ती पार्लर मध्ये जातात"
8 Apr 2013 - 6:10 pm | पैसा
सगळेच फोटो अप्रतिम!
9 Apr 2013 - 9:28 am | श्रिया
पैसा आणि अधिराज तुमचे प्रोत्साहनपर प्रतिसादांसाठी धन्यवाद!
12 Apr 2013 - 6:35 pm | शुचि
रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला
असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा
मित्रांसंगे माळावरती पतंग उडवीत फिरताना
तुला पाहीले गवतावरती डुलता डुलता झुलताना
विसरुन गेलो पतंग नभीच अन विसरुनी गेलो मित्रांना
पाहुन तुजला हरखुन गेलो अशा तुझ्या रे रंगकळा
हिरवी नाजुक रेशिम पाती दोन बाजुला सळसळती
नीळ निळुली एक पाकळी पराग पिवळे झगमगती
तळी पुन्हा अन गोजिरवाणी लाल पाकळी खुलती रे
उन्हा मधे हे रंग पहाता भान हरपुनी गेले रे
पहाटवेळी अभाळ येते लहान होउनी तुझ्याहुनी
निळ्या करानी तुला तुला भरविते दवमोत्यांची कणीकणी
वारा घेऊन रूप सानुले खेळ खेळतो झोपाळा
रात्रही इवली होउन म्हणते अंगाईचे गीत तुला
रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला
असा कसा रे मला लागला सांग तुझारे तुझा लळा
– शांता शेळके