भगोरिया

राजा सोव्नी's picture
राजा सोव्नी in जे न देखे रवी...
26 Mar 2013 - 9:28 pm

अपरे नाक भृकुटी चाप
लघु भाल ,गुलाबी गाल ,
सिह कटी ,उन्नत वक्ष ,
गालात खळी ,अपुरी चोळी.
फाटके नेसू ,मुखी हासु ,
वेचते वनबाला ,मोहाच्या फुला,
मोहाचा सुटेना मोह,मद्याचे साठले डोह ,
ढोलक्या ची थाप ,तालात पदचाप .
येता सण भगोरिया ,किरात धुंडती प्रिया ,
जीवाचे करुनी रान ,करिती मद्यपान,
प्राशुनी महुवाची दारू ,पळती बैसुनी वारू,
घेऊनी आनंद उरी,पळवती तरण्या पोरी.
लग्नाची सुंदर प्रथा,नसे चिंता कुणा वृथा.
डौलात निघते स्वारी.भिल्लाची रीतच न्यारी.

भूछत्रीकविता

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

27 Mar 2013 - 5:42 am | स्पंदना

मस्त! अगदी मस्त!

चित्रगुप्त's picture

30 Mar 2013 - 8:40 pm | चित्रगुप्त

dd
gh
fd ds
मध्य प्रदेशातील झाबुआ भागात आदिवासींचा हा महत्वाचा सण असून हा होळीच्या सुमारास महिनाभर साजरा केला जातो. यावेळी भिल्ल तरूण-तरुणी मेळ्यात मुक्त पणे फिरत असतात. आवडलेल्या तरुणीच्या तोंडात पान घातले, आणि तिने त्याचा स्वीकार केला, तर ते दोघे पळून जातात व एकत्र (घोटुल मधे?) रहातात...
हा संदर्भ ठाउक असणार्‍यांना ही कविता खचितच आवडावी.
(मी फार पूर्वी या मेळ्यात बरेच फोटो घेतले होते, ते मिळाल्यास टाकेन, वरील फोटो जालावरून घेतले आहेत).

अत्रुप्त आत्मा's picture

30 Mar 2013 - 11:51 pm | अत्रुप्त आत्मा

@तर ते दोघे पळून जातात व एकत्र (घोटुल मधे?) रहातात...>>> हे शाम मानवांच्या भाषणात आंम्ही एकदा ऐकलवत.त्यामुळे वाचताना अंदाज आला.आणी पान भरवतानाच्या फोटूंमुळे पुरावाही मिळाला. ;-)

पाषाणभेद's picture

30 Mar 2013 - 10:11 pm | पाषाणभेद

सुंदर काव्य

प्यारे१'s picture

31 Mar 2013 - 2:10 pm | प्यारे१

छान झालीये कविता!

गंगाधर मुटे's picture

31 Mar 2013 - 3:09 pm | गंगाधर मुटे

अशा तर्‍हेच्या लग्नाविषयी ऐकून होतो.
छान कविता. :)