सेकंड इनिंग - ( रवि शास्त्री )

अमोल केळकर's picture
अमोल केळकर in जनातलं, मनातलं
5 Jul 2008 - 9:52 am

सेकंड इनिंग -

आज काल बरेच क्रिकेटर, क्रिकेटची आपली पहिली इनिंग संपल्यावर समालोचन करणे चालु करतात. बर्‍याच खेळाडुंचे समालोचन ऐकताना( काही अपवाद वगळता ) वाटते की हा जो आत्ता सल्ले देत आहे ते, तो स्वतः खेळत असताना का नाही आचरणात अणायचा? म्हणजे 'दुसर्‍या सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडा पाषाण' असे काहीसे.

असो. या लेखनमालेतुन क्रिकेट खेळत असताना जितकी प्रसिध्दि मिळाली नाही त्यापेक्षा जास्त प्रसिध्दि इतर गोष्टीत ( समालोचन/ राजकारण) मिळाली अशा काही माझ्या आवडत्या खेळाडुंची माहिती संग्रह करण्याचा प्रयत्न.

सुरुवात चॅम्पियन ऑफ चॅम्पियन पासुन--

--------------------------------------------------------------------------

रवीशंकर शास्त्री. - २७ मे १९६२ ला मुंबईत जन्म.

आजचा सर्वात आघाडिचा ( आणी इतरांपेक्षा जास्त भाव खाऊन जाणारा) समालोचक. आधी म्हणल्याप्रमाणे सेकंड इनिंग एकदम यशस्वी ठरलेला खेळाडु. उत्तम संभाषण कौशल्य, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व. उत्तम व्यक्तिमत्व विशेषतः बॉडी लैंग्वेज, खेळासंबंधी सखोल महिती / अभ्यास, योग्य विश्लेषण करण्याची कला, हजरजबाबीपणा, सामना ज्या शहरात खेळला जात आहे ते शहर/ संस्कृती याबाबत माहिती , हे सर्व गुण रवी शास्त्रीला इतर समालोचकां पेक्षा नक्किच एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतात. खेळणार्‍या सर्व खेळाडुंची अक्षरशः कुंडलीच शास्त्रीला पाठ असते. त्याची कॉमेंट्री ऐकत सामना बघायला एक वेगळीच मजा येते.
प्रत्यक्ष मैदानावर साधारणपणे ८० कसोटी व १५० पेक्षा जास्त एक दिवसीय सामने खेळलेला शास्त्री लक्षात राह्तो ते मुख्यत्वे १९८५ मधील "बेन्सन अन्ड हेजेस" मधील अंतीम सामन्यातील ( बहुतेक पाकिस्तान विरुध्द) खेळीने , त्याने मिळवलेल्या ओडी कारमुळे ( अन् गमवलेल्या अमृता सिंगमुळे).

आजच्या धोनी -युवराज -दिपिका प्रमाणे रवी शास्त्रीच्या ऐन उमेदीत रवी - अमृता प्रकरण ही चांगलेच गाजले होते.

उजव्या हाताने फलंदाजी करणारा शास्त्री स्पिन गोलंदाजी मात्र डावखुरा करायचा. मनिंदरसिंग बरोबर त्याची चांगली जोडी जमली होती. संघातील आणी संघाबाहेरील खेळाडुंशी चांगली मैत्री होती. मुंबई संघाचा खेळाडु/ संघनायक, भारतीय संघ खेळाडु/ संघनायक, कौंटी क्रिकेट्,संघ व्यवस्थापक ते यशस्वी समालोचक रवी शास्त्री याने क्रिकेट रसिकांच्या मनात त्याच्या सेकंड इनिंग मधे का होईना मानाचे स्थान नक्कीच मिळवले आहे यात शंका नाही.

----------------------------------------------------------------------------------------

क्रीडाप्रकटन

प्रतिक्रिया

सुचेल तसं's picture

5 Jul 2008 - 11:26 am | सुचेल तसं

अजुन काही माहिती:

१) एका रणजी सामन्यात शास्त्रीने बडोद्याच्या तिलक राज नावाच्या गोलंदाजाला सहा चेंडुत सहा षटकार ठोकले.
२) रवी शास्त्रीचे वडिल मुळचे मॅंगलोरचे. व्यवसायाने डॉक्टर. पण रवीचा जन्म आणि शिक्षण मुंबईत झालं.
३) रवी मुंबईकडुन जेव्हा त्याच्या कारकिर्दीतला पहिला सामना खेळला; तेव्हा तो मुंबईकडुन खेळणारा सर्वात लहान वयाचा खेळाडु ठरला (वयः १७ वर्षे आणि २९२ दिवस).
४) १९ वयाखालील संघ जेव्हा १९८०-८१ मधे पाकिस्तानच्या दौर्‍याला निघाला तेव्हा शास्त्रीचा अगदी शेवटच्या क्षणी संघात समावेश करण्यात आला. आश्चर्य म्हणजे नंतर त्याला संघाचं नेतृत्व देखील बहाल करण्यात आलं. पण हा दौरा अचानक रद्द झाला.
५) शास्त्री त्याचा कारकिर्दीत पहिल्या क्रमांकाच्या स्थानापासुन ते थेट दहाव्या स्थानापर्यंत खेळला आहे.
६) १९८३ च्या विश्वचषक स्पर्धेतील बहुतेक सामन्यांत त्याचा समावेश करण्यात आलेला नव्हता.
७) इंग्लड विरुद्धच्या एका कसोटी सामन्यात त्याने ३५७ चेंडुत १११ धावा केल्या; तसेच दुसर्‍या डावात देखील सलामी फलंदाज म्हणुन गेला. अशा रितीने तो सामन्यातील पाचही दिवस फलंदाजी करणारा एक खेळाडु ठरला.
८) ऑस्ट्रेलियातील 'दि वर्ल्ड चॅंपियनशिप ऑफ क्रिकेट' ह्या स्पर्धेत तो मालिकेचा मानकरी ठरला. त्याबद्दल त्याला ऑडी-१०० ही गाडी बक्षिस मिळाली.
९) १९८७ मधे त्याची १५ मिनिटांची दूरदर्शन वर एक मालिका ('दॅट्स क्रिकेट') दाखवली जायची.
१०) १९९० मधे त्याचं रितु सिंगशी लग्न झालं. मार्च १९९५ पासुन त्याने समालोचनाला सुरुवात केली.

-ह्रषिकेश

http://sucheltas.blogspot.com

देवदत्त's picture

5 Jul 2008 - 12:11 pm | देवदत्त

चांगले आहे.
त्याची कॉमेंट्री ऐकत सामना बघायला एक वेगळीच मजा येते.
सहमत. कित्येक वेळा सामना बघताना कंटाळा आला तर रवी शास्त्री, सुनील गावसकर, टोनी ग्रेग (आणि एक कोण ते? नाव विसरलो :( ) ह्यांचे समालोचनच मी ऐकत बसायचो.

रवी शास्त्रींच्या कारकिर्दीतील क्रिकेट मी जास्त पाहिले नसेल किंवा मग ते आता आठवत नाही
आणि सध्या तर क्रिकेट बघणे सोडून दिले त्यामुळे त्याबाबतीतही काही जास्त लिहिणे नाही.

ब्रिटिश टिंग्या's picture

5 Jul 2008 - 1:18 pm | ब्रिटिश टिंग्या

चांगली सुरुवात....

रमीज राजा अन् नवज्योत सिद्धु येउ देत आता!

पुलेशु!

- (हर्षा भोगलेचा चाहता) टिंग्या

सखाराम_गटणे™'s picture

5 Jul 2008 - 1:29 pm | सखाराम_गटणे™

मंदिरा बेदी बद्द्लही येउ द्या.

सखाराम गटणे

भडकमकर मास्तर's picture

5 Jul 2008 - 1:45 pm | भडकमकर मास्तर

उत्तम सीरीज...
छान विषय..
(रवी शास्त्रीच्या कॉमेंट्रीचा चाहता...)
मास्तर
अवांतर : या अमृता सिंगमध्ये कमावण्यासारखं आणि गमावण्यासारखं आहे काय??
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

टारझन's picture

5 Jul 2008 - 3:08 pm | टारझन

>>>>अवांतर : या अमृता सिंगमध्ये कमावण्यासारखं आणि गमावण्यासारखं आहे काय??
खरंय मास्तर... मला तर त्ये बाय नायं.... बायमाणूस वाट्टय.... खंड्या अम्रुतराव सिंग =))


तू भारी ...तर मी लई भारी...


http://picasaweb.google.com/prashants.space

टारझन's picture

5 Jul 2008 - 2:59 pm | टारझन

तसा रवी शास्त्री पण ठीक आहे, पण तो बोर करतो आधी-मधी... पण "बिनज्योत बूद्धू" आणि "लोणी ग्रेट" यांसारखा कोणी नाही... समालोचन करताना प्रसंगी बोंबा मारून हे दोघे काय रोमांच ऊभा करतात....."the boll has gone the sky high ... it will kiss the air hostess in the aeroplane" व्वा बूद्धूसाब वा !!

अवांतर :
आता समालोचकांचा विषयंच निघालाय तर थोडे मन मोकळे करावे वाट्टे
काही वर्षांपुर्वी मनिंदर-अरूण लाल हिंदी समालोचन करायचे ... "जीं हा अरूण -मनिंदर " आणि "मै बिल्कूल सहमत हूं आपसे -अरूण" काय दोघे गोदडी फाडायचे .. समालोचन कमी आणि टीकाच् जास्त... आणि नुस्त एकमेकांच कौतूक ..
आता अरूण आंग्लभाषेत समालोचन ऊत्तम करतात .. आणि तो सगळ्या जगाला नावं ठेवनारा मन्नी कुठे गांजा/ड्रग्स का काय हुंगत फिरतो म्हणे.... नस बिस कापून घेतली होती बिचार्‍याने ....

समालोचकांचा समालोचक
कुबड्या खविस

तू भारी ...तर मी लई भारी...


http://picasaweb.google.com/prashants.space

सुचेल तसं's picture

5 Jul 2008 - 3:30 pm | सुचेल तसं

कुबड्या खवीस,

माझ्या मते शास्त्री (आणि टोनी ग्रेग सुद्धा) हा एक उत्कृष्ट समालोचक आहे. पण सिद्धु कित्येक वेळा अगदी डोक्यात जातो. त्याचा आणि जडेजा एका वाहिनीवर मतं व्यक्त करत असतात. त्यात हा बाबा ना जडेजाला काही बोलू देत, ना त्या कार्यक्रमाच्या होस्टला.

http://sucheltas.blogspot.com

विसोबा खेचर's picture

5 Jul 2008 - 5:59 pm | विसोबा खेचर

शास्त्री हा एकेकाळचा खूप गुणी खेळाडू. माझाही आवडता! :)

तात्या.

भडकमकर मास्तर's picture

6 Jul 2008 - 4:03 am | भडकमकर मास्तर

रवी शास्त्री त्याच्या कारकीर्दीच्या शेवटी ( निदान वन डेत तरी) अगदी संथ आणि डोक्यात जाणारा खेळ करायचा...
( खुद्द मुंबईत त्याच्या पोस्टर्सना चपलांचा हार खावा लागला होता)...
...
पण त्याच्या टेस्टमधला खेळ मला अधिक आवडत असे...तो उत्तम कप्तान होता..
त्याने एकच टेस्टमध्ये भारताची कप्तानी केली... १९८८ मद्रास टेस्ट ..विरुद्ध वेस्ट इन्डीज...आणि ती जिंकली.. १००% रिझल्ट...तीच हिरवाणीची १६ विकेटवाली टेस्ट...

अवांतर : आपल्याला मांजरेकर आवडतो... २००६ पकिस्तान दौर्‍यात एक जाणीव झाली की त्याच्या इंग्रजी समालोचनात प्रचंड सुधारणा झालेली आहे..टेन स्पोर्ट्स वरती तो इम्रान खान बरोबर काय अप्रतिम समालोचन करत असे...
( मांजरेकर हल्ली सचिनविरोधी सारखी वक्तव्यं करतो तरीही आवडतो... त्यात थोडंफार तथ्य असतंच...आणि तो विश्वचषक विजयाच्या २५ व्या वर्धापनदिनाचीसुद्धा खूप मस्त खिल्ली उडवत होता...हे मस्तच)

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मांजरेकर हल्ली सचिनविरोधी सारखी वक्तव्यं करतो तरीही आवडतो...

हल्ली सचिनविरुद्ध वक्यव्ये करायची ष्टाईलच झाली आहे. मला फक्त त्या मंडळींना एवढंच सांगावसं वाटतं की लेको सचिनच्या जेवढ्या सेंच्युर्‍या आहेत तेवढी अजून तुमची वयंही झालेली नाहीत! आधी स्वत:ची लायकी ओळखा, आपण स्वत: मैदानावर काय दिवे लावले ते पाहा आणि मगच सचिनबद्दल बोला!

सचिनबद्दल काही कॉमेन्टस करायचा अधिकार फक्त डॉन ब्रॅडमनचा होता आणि आता ब्रायन लाराचा आहे असं माझं मत आहे!

आपला,
(सचिनप्रेमी) तात्या.

--
आमच्या किशोरीताई नेहमी म्हणतात की संगीत समिक्षकांनी दोन तंबोरे लावून १०० लोकांसमोर किमान १० मिनिटं तरी गाऊन दाखवावं आणि मगच समिक्षा वगैरे करावी! :)