कवि गोपालदास 'नीरज' यांच्या एका अतिशय गाजलेल्या कवितेचा अनुवाद करण्याचा माझा प्रयत्न. ही कविता 'नई उमर की नई फसल' या चित्रपटात गीत म्हणून घेतली आहे.
सुकली, गळली स्वप्नफुले अन् सखे बोचरे काटे
बाग पारखी सौंदर्याला, बाभुळबन हे वाटे
खुळ्यासारखी घेत राहिलो बहराची चाहूल
निघून गेले कधीच तांडे, बघत राहिलो धूळ ||
सरली नव्हती नीज अजुन तरि ऊन शिरावर आले
पाउल उचलत होतो, जीवन निसटून दूर पळाले
फांदी फांदी जळून गेली, पान न् पान गळाले
सरला जन्म तरी ना काही मनासारखे झाले
*****
अश्रू झाले गीतांचे, स्वप्नांची झाली थडगी
मालवून गेल्या ज्योतीही करुन धुराशी सलगी
वळणावर अगतिकसा थांबुन, गलितगात्र अन् जर्जर, वाकुन
चढत्या आयुष्याची उतरण पहात मी व्याकूळ ||
पाहुन त्या रूपास फुलांनी मोहित होउन जावे,
रोमांचित दर्पणही त्याच्या धुंदीने हरखावे
सौंदर्याला मानवंदना गगन-धरेने द्यावी
बघेल त्याच्या काळजातुनी केवळ 'हाय' निघावी
*****
अकस्मात फिरले वारे, वाटा साऱ्या घुसमटल्या
या वाटांवर नियतीने निष्पाप कळ्या कुस्करल्या
लुटून गेलो असा रंक मी, काळाचे सोसतो डंख मी
श्वासांची चढते धुंदी अन् अडखळते पाऊल ||
चंद्राची बट सावरायला हात लाभले होते
वसंतास हाकारण्यास हे ओठ उघडले होते
दु:खितांस रिझवावे यास्तव दु:ख मिळाले होते
स्वर्ग धरेवर उतरविण्या श्वासांचे इमले होते
*****
काही घडले नाही हातुन, दिन अस्ताला जाई
गूढ वावटळ मनोरथांचे विश्वच उधळुन देई
भयकंपित मी थरथर कापत, डोळ्यांमधले पाणी लपवत
बघत राहिलो कफन ओढली थडगी शांत, मलूल ||
प्रसन्न किरणापरी कुणी सौभाग्यकांक्षिणी नटली
झडे चौघडा, नृत्य रंगले, सुरांत सनई सजली
'पहा चालली वधू सासरी' दिशांत वार्ता घुमली
आणि निरोपाच्या अश्रूंनी अवघी नगरी भिजली
*****
क्षणार्धात झाला कोठुनसा शस्त्राघात विषारी
कुंकुमतिलक पुसटला, झाले जीर्ण वस्त्र जरतारी
मी अलिप्तसा, अंतर राखत; दूरदूरची जशी इमारत
घेत राहिलो मेणा धरल्या भोयांची चाहूल ||
निघून गेले कधीच तांडे, बघत राहिलो धूळ..........................
मूळ रचना : कारवां गुजर गया
मूळ रचनाकार : कवि गोपालदास 'नीरज'
स्वैर भावानुवाद : क्रांति
******************************************
मूळ रचना : कारवां गुजर गया [कवि गोपालदास नीरज]
स्वप्न झरे फूल से, मीत चुभे शूल से
लुट गये सिंगार सभी बाग के बबुल से
और हम खडे खडे बहार देखते रहे
कारवां गुजर गया, गुबार देखते रहे
नींद भी खुली न थी कि हाय धूप ढल गई
पांव जबतलक उठे कि जिंदगी फिसल गई
पात पात ढह गये कि शाख शाख जल गई
चाह तो निकल सकी न पर उमर निकल गई
*****
गीत अश्क बन गये, स्वप्न हो दफन गये
साथ के सभी दिये धुआँ पहन पहन गये
और हम झुके झुके मोड पर रुके रुके
उम्र के चढाव का उतार देखते रहे
क्या शबाब था कि फूल फूल प्यार कर उठा
क्या कमाल था कि देख आईना सहर उठा
इस तरफ जमीन और आसमां उधर उठा
थामकर जिगर उठा कि जो मिला नजर उठा
*****
एक दिन मगर यहां ऐसी कुछ हवा चली
लुट गई कली कली कि घुट गई गली गली
और हम लुटे लुटे वक्त से पिटे पिटे
सांस की शराब का खुमार देखते रहे
हाथ थे मिले कि जुल्फ चांद की संवार दूं
होंठ थे खुले कि हर बहार को पुकार दूं
दर्द था दिया गया कि हर दुखी को प्यार दूं
और सांस यूं कि स्वर्ग भूमिपर उतार दूं
*****
हो सका न कुछ मगर, शाम बन गई सहर
वो उठी लहर कि ढह गये किले बिखर बिखर
और हम डरे डरे, नीर नैन में भरे
ओढकर कफन पडे मजार देखते रहे
मांग भर चली कि एक जब नई नई किरन
ढोलकें धुमक उठी, ठुमक उठे चरन चरन
शोर मच गया कि लो चली दुल्हन, चली दुल्हन
गांव सब उमड पडा, बहक उठे नयन नयन
*****
पर तभी जहरभरी गाज एक वह गिरी
पुछ गया सिंदूर, तार तार हुई चुनरी
और हम अजानसे, दूर के मकान से
पालकी लिये हुए कहार देखते रहे
प्रतिक्रिया
19 Feb 2013 - 5:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अनुवाद आवडला आणि उत्तम जमलाही आहे.
और भी आने दो.
-दिलीप बिरुटे
19 Feb 2013 - 5:47 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
__/\__
20 Feb 2013 - 10:42 am | तिमा
उत्तम अनुवाद, चपखल शब्दरचना.
19 Feb 2013 - 6:19 pm | पैसा
मूळ कविता/गीत सुंदर आहे आणि भावानुवाद पण छान जमला आहे!
19 Feb 2013 - 10:00 pm | अभ्या..
सहमत. आणि दोन्ही अत्यंत आवडलेले आहेत.
धन्यवाद क्रांतीतै
19 Feb 2013 - 8:01 pm | जयवी
मस्तच :)
19 Feb 2013 - 10:15 pm | अत्रुप्त आत्मा
शॅल्यूट.............!
20 Feb 2013 - 3:22 am | फिझा
खूपच मस्त !!!
20 Feb 2013 - 8:37 am | पक पक पक
एकदम झकास.... :) खुप छान.
20 Feb 2013 - 11:17 am | नानबा
अप्रतिम... खूपच सुंदर...
22 Feb 2013 - 4:14 pm | पद्मश्री चित्रे
मूळ कविता छान आहेच आणि भावानुवाद पण.
22 Feb 2013 - 4:20 pm | jaypal
ऊत्त्म कवी आणि ऊत्तम कवितांची ओळख होत आहे.
अनुवाद खरच छान जमला आहे.
धन्यवाद क्रांतीजी