आज अचानक तुला भेटता
जुने दिवस ते आठवले
दशकापासून या हृदयाच्या
तळभागी जे साठवले
तशीच दिसशी सुंदर अजुनी
बटा जाहल्या रजत जरी
चाल आजही डौलदार ती
स्थूल वाटशी जरा तरी
आठवते मज तुझे अजुनी
मुग्ध बोलणे भर भरुनी
क्षणाक्षणाला मोहविणारे
गोड हासणे खळखळूनी
तेव्हा गेलीस हात सोडूनी
डाव प्रितीचा असा मोडूनी
मिही रमलो मग संसारी
प्रपंच पाठीवर घेऊनी
विरहा नंतर तुझ्या सखी गे
मन हे नाही पुन्हा भटकले
संसाराच्या वेलीवरती
आजवरी ते फक्त लटकले
काल अचानक समोर दिसलीस
सोबत तुझीया कन्या होती
प्रतिरूप ती तुझी वाटली
तुझ्यासारखी हासत होती
विचारता तव कन्येने मग
परिचय माझा काका म्हणूनी
काका नाही हे तर मामा
तुझे बोलणे फार खटकले
प्रतिक्रिया
10 Feb 2013 - 3:54 pm | संजय क्षीरसागर
ओके?
10 Feb 2013 - 4:01 pm | अभ्या..
अप्रतिम शैलेशजी.
तुमच्या काव्यसंग्रहाचे नाव काय ठेवले आहे?
10 Feb 2013 - 4:54 pm | शैलेन्द्र
दमलास?
10 Feb 2013 - 5:05 pm | अभ्या..
हो. अगदी चपखल नाव आहे.
10 Feb 2013 - 6:54 pm | शैलेश हिंदळेकर
इतक्या लवकर दमलास ? अजून पुष्कळ यायच्या आहेत, तयार आहेत. तुम्ही तयार रहा म्हणजे झालं
10 Feb 2013 - 7:37 pm | अत्रुप्त आत्मा
कविता छान आहे. :-)
फक्त 3 दिवसाला 1 या मापात टाका. ;-)
10 Feb 2013 - 7:43 pm | शैलेन्द्र
तुम्ही तुमचा स्पीड वाढवा.. आमच्या शेतातला ऊस तुमच्या कारखान्याच्या बॉयलरची साईझ विचारुन वाढत नाही..
10 Feb 2013 - 9:13 pm | अभ्या..
गुर्जी औंदा कस्काय गेटकेन झालाय ह्येंचा. अतिरिक्त चा बी प्रश्न हाय, तवा हायेच मग छावणीला चारा म्हणून. ;)
10 Feb 2013 - 10:56 pm | अत्रुप्त आत्मा
@तुमच्या कारखान्याच्या बॉयलरची साईझ विचारुन वाढत नाही.. >>> अरे...अरे...अरे... काय झालं एकदम??? आंम्ही पुढे बाजार उठू नये म्हणून सरळ शब्दात मनोगत व्यक्त केलं...
एखाद्या रचनाशील कविनी एवढं पटकन चिडणं बरं नाही हो.............!!! :-)
10 Feb 2013 - 11:00 pm | पैसा
काय हो बुवा? कवी आहेत 'शैलेश'. ते बिचारे गप्पच आहेत. तुम्हाला सांगतायत ते 'शैलेंद्र'.
10 Feb 2013 - 11:04 pm | अत्रुप्त आत्मा
अगागागागागा..........=)) काय झालं वो हे..........???
धरले.... धरले कान!!! अता उडवा मान ;-) स्वारी...प्रतिसाद.
11 Feb 2013 - 1:17 pm | शैलेन्द्र
काय राव.. लईच पोपट केलात..
आता ऊस कुठला आन कारखाना कसला ते सांगायला लावु नका..
11 Feb 2013 - 7:23 pm | शुचि
हाहाहा ..... खोखो हसते आहे. इथे भयाण मजा चालू आहे =)) =))
12 Feb 2013 - 8:41 pm | धन्या
इथे ऊस प्रश्नावर उभा पश्चिम महाराष्ट्र पेटला होता काही दिवसांपूर्वी आणि तुम्हा यनाराय लोकांना हसणं सुचतंय.
10 Feb 2013 - 9:16 pm | आनन्दिता
संक्षी काका, अभ्या, अत्रुप्त आत्मा,..... तुमचा शैलेन्द्र यांनी मामु बनवला आहे...!!
-कविता न वाचताच प्रतिसाद देणारी ( आनन्दिता)
10 Feb 2013 - 9:27 pm | अभ्या..
अरे वा. तिघं आहोत का. बरे झाले. एकटा मामा व्हायला नको वाटते.
बादवे आनंदितातै तुम्हाला ती जास्त प्रतिसाद जास्त बक्षीसाची स्कीम माहिती नाही वाटतं?
10 Feb 2013 - 10:17 pm | आनन्दिता
कसली स्किम वो.?. अभ्या असलेले दादा?.
10 Feb 2013 - 11:11 pm | अत्रुप्त आत्मा
@-कविता न वाचताच प्रतिसाद देणारी ( आनन्दिता)>>>
ते असू दे..!!!...........पण या पुढे निदान सगळे प्रतिसाद तरी वाचत जा
10 Feb 2013 - 11:43 pm | आनन्दिता
गेल्या दोन तीन दिवसात झुरळ वैग्रे विषयावर आलेल्या कविता वाचुन मी कवितांचा धसका घेतला आहे.... !!!
10 Feb 2013 - 9:21 pm | शुचि
हे पाश्चात्यांचं बरं असतं - मामा/काका अशी वेगवेगळी भानगड नाही. सगळे एकजात अंकल!
10 Feb 2013 - 9:58 pm | सस्नेह
मग पुढे काय झाले ऊसवाले शैलेशमामा ?
10 Feb 2013 - 10:06 pm | अभ्या..
पुढे काय? गुर्हाळ.
काढताहेत गूळ.
(शैलेशमामा हलके घ्या बर का. गूळाला पण चांगला भाव आहे)
10 Feb 2013 - 11:06 pm | शैलेन्द्र
अरे वा! गुळ निघतोय का?
चला मग, ताटलीभर शेंगदाणे घेवुन.. लय भारी चिक्की बनते..
बाकी त्या प्रेयसीला बहुदा आत्तेभावाच्या नात्याने मामा म्हणायचे असावे.. :)
11 Feb 2013 - 9:13 am | अधिराज
खूप छान कविता आहे मामा. वाचून काळजात कालवाकालव झाली.
11 Feb 2013 - 11:09 am | श्रिया
एकदम भारी. आवडली.
11 Feb 2013 - 3:57 pm | धन्या
कवितेवरील अवांतर प्रतिसाद वाचून शैलेशजींना आपल्याला कविता होत असतानाच ती का वारली नाही असं वाटत असेल.
युनिकोड आणि आंतरजाल हाती आले हो
लेखक आणि कवी होणं खुप सोपे झाले हो !!!
11 Feb 2013 - 4:09 pm | परिकथेतील राजकुमार
तुम्ही त्यांनी भ्रुणहत्या करायला हवी होती असे सुचवत आहात का ?
11 Feb 2013 - 4:22 pm | धन्या
त्यांनी भ्रुणहत्या करायला हवी होती असं मी मुळीच सुचवत नाही. पण आपण प्रसवलेल्या काव्याला अशी वागणूक मिळतेय हे पाहून ईथून पुढे ते पुढचा चान्स घ्यायचा की नाही याचा नक्कीच विचार करतील असे वाटते.
च्यायला, नरेंद्र मोदींच्या राज्यात गेल्यावर तुम्ही खुपच सुधारलात असं दिसतंय. चक्क भ्रुणहत्या वगैरे सामाजिक विषयांवर भाष्य करायला लागलात तुम्ही. याचा अर्थ सौदर्यफुफाटयावर अधिकारवाणीने भाष्य करणारा आमचा मित्र आम्ही गमावला की काय? ;)
11 Feb 2013 - 4:25 pm | परिकथेतील राजकुमार
'तसे सुचवा', असे आम्ही आडून आडून सुचवत आहोत. ;)
बाकी, उगा ह्या वाळवंटात सौंदर्यफुफाट्याची आठवण करून देऊ नका बॉ !
11 Feb 2013 - 7:16 pm | अत्रुप्त आत्मा
@उगा ह्या वाळवंटात सौंदर्यफुफाट्याची आठवण करून देऊ नका बॉ !>>> :-D का हो..........? गरम होतं का? :-p
11 Feb 2013 - 8:39 pm | शैलेन्द्र
"गरम होतं का? smiley"
हे चुकून गरम पडत का, असं वाचल्या गेलयं..
11 Feb 2013 - 11:51 pm | शैलेश हिंदळेकर
धन्यवाद मित्रांनो, वात्रट का होईना, प्रतिसाद दिलात आणि त्या निमित्ताने माझी कविता वाचलीत, आता मी पण तुम्हाला सोडत नाही, यापुढे अशाच किंवा यापेक्षा चांगल्या कविता माझाकडून येतच राहतील. बघुया किती टोचता ते…..
12 Feb 2013 - 10:01 am | स्पंदना
ये फुगा फुटनेवालोंमेसे नही है!
12 Feb 2013 - 11:18 am | संजय क्षीरसागर
फुगवून झालेला दिसत नाय.
12 Feb 2013 - 10:32 pm | शैलेन्द्र
मस्त.. तेवढ उसाच अन बॉयलरच लक्षात ठेवा..