Perfume: The Story of a Murderer,,,, directed by Tom Tykwer,,
Perfume हा Hollywood चा चित्रपट २००६
नेट वर टंगळ मंगळ करताना हा सिनेमा मिळाला ..तोरेन्त वरुन त्याला डाऊन केला ..त्याची हि कथा
हि कथा एका Jean-Baptiste Grenouille नावाच्या तरुणाची आहे...कथा फ्रान्स मधे १८ व्या शतकात घडते
जन्म झाल्यावर लगेच ह्याची आई गरिब असल्याने व सांभाळ करता येणे शक्य नसल्याने त्याला कच~यात टाकुन देते..
अनाथ व बेवारस हे मुल एका फ्रांस मधल्या अनाथ आश्रमात वाढु लागते...
हे जरी असले तरी त्या गंधाची पारख असलेले घाणेन्दिय्र परमेश्वराने बहाल केले असते..
दैवि देणगीच त्याला मिळाली असते..पाने. फुले..दगड माति..पक्षि, फळे, हिरवे गार गवत, यांचे गंध लांबुन हि तो अचुक ओळखत असतो...
वयात आल्यावर तो मजुर म्हणुन बोटिवर काम करु लागतो.
एकदा मालाची डिलिव्हरी करण्या साठी त्याला पॅरिस ला जावे लागते.
जाताना एका फळे विकणा~या तरुण मुलिच्या तनु गंधाने तो मोहित होतो..
हा गंध त्याला नविन असतो..
तो मालाची डिलिव्हरि Giuseppe Baldini ह्या मालकाच्या अत्तरे बनवणा~याच्या दुकाना मधे देतो.
Giuseppe Baldini हा फ्रांस मधला प्रख्यात परफ्युम बनवणारा असतो..पण आता वय झाल्याने व स्पर्धे मुळे त्याचा व्यवसाय बसला असतो..कारण त्याच्या प्रतिस्पर्ध्याने असे एक अत्तर शोधले असते ज्याची मोहिनी पॅरिस च्या ललना वर पडली असते..Giuseppe Baldini त्या प्रकारचे पर्फ्युम बनवण्याचा प्रयत्न करतो पण त्याला ते जमत नाहि.
मात्र आपला कथानायक तसे पर्फ्युम Giuseppe Baldini ला देतो..यावर Giuseppe Baldini खुश होतो व त्याला पर्फ्युम बनवण्याची कला शिकवण्याचे मान करतो..
आपला हा युवक बाल्डिनि कडुन परफ्युम बनवण्याची कला शिकतो..व त्याला नवनविन अत्तरे तयार करुन देतो व त्याचा बसलेल्या व्यवसायास उभारि देतो...
मात्र त्याला जगातिल सर्वात सुंदर स्वर्गिय आनन्द देणारे परफ्युम तयार करायचे असते.
व त्या साठी तो बाल्डिनिच्या सल्ल्याने "ग्रासे" या गावाकडे कुच करतो.व तिथे एका परफ्युम बनवणा~या प्रयोगशाळेत काम सुरु करतो...
तरुणीच्या तनुगंधाने मोहित झालेला तो गंध त्याच्या स्मरणात असतो.व त्याला तरुणींच्या तनुगंधा पासुन परफ्युम तयार करायचि कल्पना त्याच्या मनात येते
त्या साठी तो एका वेश्येला भाड्याने घेतो पण तिला त्याच्या हेतुचा संशय येतो व ति निसटायला पहाते..व हा तरुण तिचा खुन करतो...व तिच्या शरिरापासुन एक परफ्युम तयार करतो..
असे करत असतानाच त्याची खात्री पटते की स्त्रियांच्या शरीरापासून केलेलं हे Perfume हे प्रचंड उन्मादक आहेत व मग तो स्त्रियांचा खून करून ,त्यांच्या शरीरापासून तो Perfume करु लागतो
कालांतराने हा गुन्हा उघड होतो..आणि या तरुणानेच अनेक स्त्रियांचे खून केले अस सिद्ध होत..आणि त्याच्या वर खटला भरतो...व त्याला मृत्यू दंडाची शिक्षा होते ,व ते पहाण्यास जनता जमली असते आणि त्याला वध स्थंभाकडे नेल्यावर तो त्या Perfume ची कुपी उघडतो...जी मृत स्त्रियांच्या शरीरापासून तयार केलेली असते..तो परफ्युम एका रुमालावर शिंपडतो व तो रुमाल हवेत भिकावतो..त्या परफ्युम च्या दिव्य सुगंधाने सारी जनता बेहोश होते ...
हा परफ्युम इतका भुरळ पाडणारा आणि मनमोहक असते की लोकांना आपण एक स्वर्गीय आणि अवर्णनीय अनुभव घेत आहोत अस वाटू लागते....आणि हा ..खुनी आहे....हा सुगंध स्त्रियांचे खून पडून आणलेला आहे ...हे सगळ ते लोक विसरतात ...विसरून जातात की हा पापाचा सुगंध आहे.....!
सगळे लोक त्याला देवदूत समजतात ,हाच आपला उद्धारकर्ता आहे असे समजून त्याला शरण जातात ...ज्यांना माहित असते की हाच खुनी आहे...ते मात्र लोकांच्या रेट्यासमोर हतबलपणे पहात राहतात ...............!
आणि याचा फायदा घेऊन तो तिथून सहीसलामत बाहेर पडतो.......!
प्रतिक्रिया
7 Feb 2013 - 10:29 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व्वा. चित्रपटाची छान ओळख. धन्स.
(मला वाटलं पुन्हा काथ्याकूट आहे की काय)
-दिलीप बिरुटे
7 Feb 2013 - 10:44 pm | रेवती
वेगळ्याच कथेशी गाठ घालून दिल्याबद्दल आभार.
7 Feb 2013 - 10:48 pm | मदनबाण
चक्क अकुंनी इतका मोठा धागा काढला हे पाहुन जरा तिखट मिसळीच्या तर्रीचा ठसकाच बसला मला ! ;)
असो... असेच लिहा.
जाता जाता :---
लोक या चित्रपटातील नायकाला शेवटी देव समजतात तेही परर्फ्युमच्या प्रभावामुळे हे कळल्यावर जरा गंमत वाटली आणि त्यामुळे माझ्याकडे जे दोन पर्फ्युम आहेत त्यांची नावे देतो.
हा मी वापरतो... अगदी जबरदस्त आहे. ( मेड फॉर मेन) याचा पाखरांवरचा प्रभाव अजुन चेक केला नाही,पण अंदाज आहे की त्यांना तो नक्कीच जाणवेल. ;)
दुसरा आहे अजमलचा "इग्नाईट" हा पर्फ्युम स्त्रीयांकरिता आहे.(मला व्यक्तीशः गंध स्त्री / पुरुष यांना वेगळा करुन का सांगतात ते कळत नाही ! एकच गंध दोघांनाही आवडु शकतो.)
ज्या ज्या स्त्रीयांना मी याची ओळख करुन दिली, त्या याच्या सुगंधाने भारावुन गेल्या होत्या, हे इथे नमुद करु इच्छितो. ;)
(अत्तर प्रेमी);)
8 Feb 2013 - 10:34 am | चाणक्य
आता साक्षात मदनबाणच वापरतोय म्हणजे वापरून बघितलाच पाहिजे.
7 Feb 2013 - 11:12 pm | अग्निकोल्हा
कथा तर मस्त आहे.
7 Feb 2013 - 11:39 pm | अभ्या..
एका मित्राने असाच रेफर केल्याने बघितला गेलेला अप्रतिम चित्रपट. अजूनही माझ्याकडे ठेवलेला आहे.
अत्यंत धक्का देणार्या प्रारंभापासून ते न पटणार्या शेवटापर्यंत सगळेच प्रभावी.
नायकाच्या फाटक्या तुटक्या शरीरातली एका अप्राप्य शोधासाठी आसुसलेली नजर, त्या शोधासाठी पत्करलेले अघोरी मार्ग त्यात सुध्दा जाणवणारी निरागस ज्ञानपिपासा. त्याची शेवटची बळी ठरलेली त्याच्याच मालकाची अनाघ्रात अल्लड कन्या.
प्रत्येक फ्रेम बघताना जाणवणारा कलादिग्दर्शकातला जातिवंत चित्रकार. सारेच अप्रतिम.
अकु एका सुंदर चित्रपटाची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद.
7 Feb 2013 - 11:40 pm | संजय क्षीरसागर
तुम्ही इतक्या वेगळ्या विषयावर लिहीलंय हे पाहून आनंद झाला.
(परफ्युम बनवणा~या हा शब्द banavaNaaRyaa बनवणार्या असा लिहावा. अर्थात तोही इथल्या तांत्रिक गफलतीनं योग्य उमटत नाही.)
7 Feb 2013 - 11:57 pm | सांजसंध्या
मस्त आहे लेख. कथा आवडली. शेवट प्रतिकात्मक असावा असं वाटलं.
8 Feb 2013 - 2:13 am | Mrunalini
मी बघितला आहे हा सिनेमा.... खुप आवडला होता तेव्हा पण....आता परत बघितला पाहिजे...
8 Feb 2013 - 3:57 am | शुचि
बापरे भयानक आहे कथा.
पण वेगळ्या विषयावर धागा काढल्याबद्दल अभिनंदन.
8 Feb 2013 - 4:26 am | सानिकास्वप्निल
सिनेमा खूपचं छान होता आणी तुम्ही करुन दिलेली सिनेमाची ओळख आवडली.
नेहमीपेक्षा वेगळे काही दिले हे जास्त आवडले :)
8 Feb 2013 - 6:07 am | अस्वस्थामा
अकुसाहेब, प्रथमतः काकुंमधून बाहेर येवून काहीतरी लिहिल्याबद्दल धन्यवाद! (तशी ती कविता छान होती हो.)
या आमच्या अतिशय आवडत्या चित्रपटाबद्दल कोणीतरी लिहिलंय हे पाहून आम्ही धावत येवून धागा उघडला आणि भ्रमनिरास झाला.
ही फक्त ओळख असेल तर ठीक.. तरीपण हा अख्खा लेख म्हणजे अत्तरातला सुगंध काढून उरलेलं पाणी अंगावर फेकण्याचा प्रकार झालाय हो.
अर्थात सुगंध पाहणाऱ्यांसाठी ठेवला असेल तर तो भाग अलाहिदा. पण तो हेतू वाटत नाही कारण सगळी कथा तर निबंधासारखी इथेच ओतली आहे.
पण राहून राहून वाटून राहिलं की या अप्रतिम चित्रपटास ओळख म्हणून पण न्याय नाही झालाय.
तुम्हाला ती पहिली शिकार झालेली मुलगी आठवतेय.? लाल कुरळे केस, काळे डोळे, अन् गुलाबी हातात रसरशीत लिंबं मोठी मोठी.. आणि या सगळ्याशी काहीही कर्तव्य नसलेला गंधवेडा तो. मग गंध हरवल्यावर वेडापिसा झालेला. हातून खून झालाय याचं काहीच नाही पण गंध हरवल्याच दुःख मात्र भारी. आपण पण त्याला खुनी अशा तऱ्हेने पाहतच नाही मग हळूहळू. कधी त्याचा राग येतो तर कधी कौतुक वाटावं असा.
शेवटावर एक अख्खा लेख पाडता येईल. त्याला काय हवं असतं, काहीतरी तो शोधत असतो आणि शोध पूर्ण झाल्यावर हा शेवटचा प्रसंग येतो. बऱ्यापैकी धक्कादायक असा. (पुस्तकात म्हणे अजून भारी शेवट आहे! हम्म.) बाकी ज्याने त्याने स्वतः अर्थ काढलेला बरा. तरी दिग्दर्शकाने निवेदक वापरून बऱ्याच गोष्टी वेळोवेळी स्पष्ट केल्यात तशा.
असो. दिग्दर्शन आणि मुख्य पात्राचा अभिनय जबराच. ज्यांनी पहिला नाही त्यांनी नक्की पहा, फक्त बर्यापैकी हिंसा आणि नग्नता आहे तेव्हा स्वतःच्या जबाबदारीवर..
8 Feb 2013 - 9:10 am | किसन शिंदे
व्वा!!
एका वेगळ्याच चित्रपटाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद! चित्रपट नक्कीच पाहीला जाईल.
अवांतरः हे असंच कहितरी लिहीत जा हो अकु, उगा त्या काथ्याकुटाच्या मागे का लागताय? :)
8 Feb 2013 - 10:11 am | नानबा
सहमत... नुकताच बघितला हा चित्रपट... संथपणे पुढे सरकणारा, ढिश्शुम ढँड हाणामार्या, बेफाट वेगाने पाठलाग करणार्या भन्नाट गाड्या, उन्मादक कपडे घालून नायकाला, (आणि प्रेक्षकांनासुद्धा) नेत्रसुख देणार्या ललना असला काहीही टिपीकल मसाला नसूनसुद्धा हा चित्रपट खिळवून ठेवतो.
चित्रपटात मला आवडलेला प्रसंग - जेव्हा नायक पहिल्यांदा सामान पोहोचवण्यासाठी Giuseppe Baldini च्या घरी जातो, आणि फक्त त्याच्या घ्राणेंद्रियाच्या बळावर त्याला त्याच्या प्रतिस्पर्ध्याने बनवलेला परफ्युम काही क्षणात तयार करून देतो. अप्रतिम चित्रपट.. :)
8 Feb 2013 - 11:47 am | एकुजाधव
एकदा पाहिला आहे मी.
9 Feb 2013 - 11:11 am | खटासि खट
अशा चित्रपटांसाठी थ्रीडी प्रमाणेच प्रेक्षकास वास येण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध होणे आवश्यक आहे.
9 Feb 2013 - 11:46 am | प्रसाद गोडबोले
चित्रपट परीक्षण (/ की वर्णन ) छान आहे . काही छोट्या मोठ्ठ्या गफलती झाल्या आहेत ...
उदा.
वयात आल्यावर तो मजुर म्हणुन बोटिवर काम करु लागतो
>> बोटीवर नाही हो ...चामडे कमावण्याच्या कारखान्यात .
त्याला जगातिल सर्वात सुंदर स्वर्गिय आनन्द देणारे परफ्युम तयार करायचे असते.
>> त्याला फक्त त्या आवडलेल्या मुलीची आठवण करुन देईल असा परफ्युम करायचा असतो ...
याचा फायदा घेऊन तो तिथून सहीसलामत बाहेर पडतो.......>>> ह्याच्या पुढे जे घडतं , जे पिक्चर मधे जे दाखवले आहे ते जबरदस्त आहे :)
असो.
पुलेशु.