सांभाळा हो! मला कुणीतरी

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जे न देखे रवी...
2 Jul 2008 - 9:18 pm

(अनुवादीत. कवी- आनंद बक्षी)

पाहूनी तुझे नयन गुलाबी
मन माझे झाले शराबी
सांभाळा हो! मला कुणीतरी
माझेच सांभाळणे मला
झाले आता अशक्यपरी

असते एकच जशी प्रतिमा
भिंतीवरच्या तस्वीरी
आहे तशी तुझी प्रतिमा
सदैव माझ्या अंतरी

का झालो तुझ्यावर फिदा
कळेल का एकदा
विचार करूनी कळे ना मला
संताप येई माझ्याच प्रीतिवरी

ऐकून माझ्या मना
गेलो मी पस्तावूनी
माझाच मी नाही आता
काय करू मी साजणी

जादू तुझ्या नयनातली पाहून
झालो मी तिचा दुष्मन
वाटे सदैव मला रहावे जपून
अनेक सुंदरी पासून
शपथ तुझी सांगतो तुला
वाचवी स्वपनातुनही मला

अरेरे! मिळाले नयनासी नयन
जरासे हास्य तुझे पाहून
तसाच झालो मी घायाळ

श्रीकृष्ण सामंत

कविता

प्रतिक्रिया

सामंत साहेब,

वरील अनुवाद वाचुन 'द ट्रेन' मधील 'गुलाबी आंखे जो तेरी देखी' गाण्याची आठवण झाली...

शेखर

श्रीकृष्ण सामंत's picture

3 Jul 2008 - 8:17 pm | श्रीकृष्ण सामंत

हो अगदी बरोबर
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com