बेमुवर्त पणे येथे, मद्याचे प्याले वागती
यांना न कसली नीती, यांना न कसली भिती
तो जो ऊभा राहिला, अन्याय बोलण्या काही
तो ही म्हणे आताशा, मद्यात धुंद राही
कोणीच आज येथे, शिरसावंद्य नाही
हात जोडूनी तिष्ठलो, देव राऊळी नाही
होती काल परवा, हिरवी डौल शेते
केव्हा लिलावले त्यांना, आम्हा कळलेच नाही
पाऊस अजुनही पडतो, न पडतो ऐसे नाही
झाडांचे वॄक्ष व्हाया, आकाश मात्र नाही
तो तुका थोर, त्याने अभंगही तरवले
आम्ही करंटे आम्हाला,आमुचाच तोल नाही
वाटे जरी निराशा, माझ्या स्वरांतुनी तुम्हाला
मी बिभीषण एकटा, धनुष्य पेलवत नाही
झटलो बांधावया सेतू,तरले दगड नाही
लिहिणा-याच्या अहो आज, हातात राम नाही...
प्रतिक्रिया
8 Jan 2013 - 7:39 pm | पैसा
आवडले.
9 Jan 2013 - 9:36 am | समयांत
आवडलं रोखठोक!
फक्त मी बिभीषण एकटा, धनुष्य पेलवत नाही चा संदर्भ लागला नाही.
9 Jan 2013 - 9:48 am | श्री गावसेना प्रमुख
एकट्याने होत नाहे असे म्हणताहेत वाटते
9 Jan 2013 - 10:57 am | शिवप्रसाद
खुप सुंदर आहे
बाकी समयांत शी सहमत
9 Jan 2013 - 11:42 am | चाणक्य
आजुबाजूला घडू नयेत अश्या ब-याच गोष्टी घडताना मी बघतो. पण दुर्दैवाने ईच्छा असूनही परिस्थिती बदलता येत नाही, कारण माझी एकट्याची ताकद अपुरी पडते. रावणाच्या राज्यात असलेल्या बिभीषणा सारखी माझी अवस्था झाली आहे. बघवत तर नाही, पण एकट्याने काही करताही येत नाही. आजुबाजुला सगळेच रावणाधिष्ठीत....
9 Jan 2013 - 12:13 pm | परिकथेतील राजकुमार
पण..
हे काय पटले नाही. ते वागवावे तसे वागतात.
9 Jan 2013 - 12:16 pm | स्पा
सुंदर गझल
हे तर
खासच
9 Jan 2013 - 2:23 pm | पाषाणभेद
सुंदर
9 Jan 2013 - 3:56 pm | अत्रुप्त आत्मा
अतीशय मस्त रचना.........!
9 Jan 2013 - 4:05 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
भन्नाट आहे.
फिदा झालो मी या रचनेवर
तुफान..
10 Jan 2013 - 12:12 am | बहुगुणी
रचना आवडली म्हणावं तर आपल्याच नाकर्तेपणाचा विषण्ण स्वीकार होतो! तरीही आवडलीच.
10 Jan 2013 - 12:53 am | जेनी...
छान वाटली कविता .
सद्ध्याच्या परिस्थितिवर अचुक बसतेय .
10 Jan 2013 - 7:37 pm | अनन्न्या
कविता सुंदर आहे, पण आपल्या राज्यातही येईल राम होईल सारे ऑल-वेल. नक्कीच!! आशा ठेवायला काय हरकत आहे?
10 Jan 2013 - 10:17 pm | चाणक्य
काळजी नसावी, बाकी प्रतिसादाबद्दल धन्यवाद
13 Jan 2013 - 4:34 pm | सुधीर
रचना खूप चांगली झाली आहे.
13 Jan 2013 - 4:50 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आवडली रचना.
-दिलीप बिरुटे
13 Jan 2013 - 5:16 pm | मन१
अप्रतिम
16 Jan 2013 - 12:36 pm | चेतन
रचना आवडली
अवांतर
कोणीच आज येथे, शिरसावंद्य नाही
हात जोडूनी तिष्ठलो, देव राऊळी नाही
येथे युधिष्ठीर आणि दुर्योधनाला भिष्मांनी सभेत शिरसावंद्य माणुस शोधण्याच्या प्रसंगाची आठवण झाली