शांती नवं वर्षातली

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
3 Jan 2013 - 4:02 pm

नावातकायआहे... यांनी ख.फ...सुना सुना झाल्याचे पाहुन तिथे शांति करायचे आंमंत्रण आंम्हास दिले..http://www.misalpav.com/user/7405 पण आमच्या मनातुन आज ही वेगळीच शांति बाहेर आली,,, तिचे बीजंरोपण केंव्हा झाले?-ते शोधायची हुरहुर लाऊन...

नावातकायआहे,म्हणती मला इथेही
लागणार करावी शांती ,या नवं वर्षी ही...

आंम्हासी आहे येथे, रोजचाची मुहुर्त,
लाकडे पेटवा फक्त, आग लाऊनी...

होम हवन शांती,करायची कोणी?
पापांच्या भरल्या गोणी,ते शांत झोपिले बा...

नसे कोणी येथे,भला वीर ऐसा
जो आत्मबळे सार्‍यांना,देऊ शके शांती...

मी ही सांगे मना,टाक थोडी आहुती
संसारास निगुती,ऐसी मानवे ना...

खरे तेची मर्म,जे हाती घडे कर्म
प्राप्य अ-प्राप्य सारे,सामावले त्यात...

होऊन बैसलो मी,दुनियेचा या भाट
दक्षिणेचा थाट,येथे कुचं कामी...

शेवटी तशी माझीही,पेटणार अखंड धुनी
चार आसवांची शांती,अखंड करोनिया...
=================================================================================

करुणकविता

प्रतिक्रिया

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

3 Jan 2013 - 4:05 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

होम हवन शांती,करायची कोणी?
पापांच्या भरल्या गोणी,ते शांत झोपिले बा

खरे तेची मर्म,जे हाती घडे कर्म
प्राप्य अ-प्राप्य सारे,सामावले त्यात...

होऊन बैसलो मी,दुनियेचा या भाट
दक्षिणेचा थाट,येथे कुचं कामी...

शेवटी तशी माझीही,पेटणार अखंड धुनी
चार आसवांची शांती,अखंड करोनिया...

व्वाह बुवा... आज मिपावर आल्याचे सार्थक झाले...
खुप सुंदर...

स्पा's picture

3 Jan 2013 - 4:10 pm | स्पा

कं लिवलय , कं लिवलय

बुवा

__/\__

मूकवाचक's picture

4 Jan 2013 - 8:57 am | मूकवाचक

+२

कवितानागेश's picture

3 Jan 2013 - 4:44 pm | कवितानागेश

:)

शेवटी तशी माझीही,पेटणार अखंड धुनी
चार आसवांची शांती,अखंड करोनिया...

आवडले...

पैसा's picture

3 Jan 2013 - 5:02 pm | पैसा

मस्त लिहिलंय.

सस्नेह's picture

3 Jan 2013 - 5:07 pm | सस्नेह

नवं बर्ष 'शांती'चं जाणार तर !

अनिल तापकीर's picture

3 Jan 2013 - 5:14 pm | अनिल तापकीर

छान

अत्रुप्त आत्मा साहेब, वा झकास काव्य.

बॅटमॅन's picture

3 Jan 2013 - 6:21 pm | बॅटमॅन

लै भारी हो आत्मूस. मस्त लिहिलंय एकदम!!!

प्रचंड आवडल्या गेले आहे. असंच काही लिहित जा राव. उगाच आपलं भांडं घेऊन ताक मागत फीरता. ;)

मी ही सांगे मना,टाक थोडी आहुती
संसारास निगुती,ऐसी मानवे ना...

हे जास्त आवडले. भारीये कविता.

नावातकायआहे's picture

3 Jan 2013 - 9:41 pm | नावातकायआहे

झकासच आणि धन्यारावांशी प्रचंड बाडिस!

धन्या's picture

3 Jan 2013 - 9:47 pm | धन्या

मी ही सांगे मना,टाक थोडी आहुती
संसारास निगुती,ऐसी मानवे ना...

यातलं निगुती म्हणजे काय? सवड का?

अत्रुप्त आत्मा's picture

3 Jan 2013 - 10:59 pm | अत्रुप्त आत्मा

@यातलं निगुती म्हणजे काय? सवड का?>>> नाही. इथे निगुती या शब्दाचा मतितार्थ मी वेगळ्या पद्धतीनं वापरलाय. मी ही मनाला सांगतोय,कृत्रिम,निव्वळ भावनिक उपायच अता जगताना कर.माझ्या दुबळ्या(संसारि)मनाला परखड सत्याकडे जाणारे,एकंहि टप्पा न चुकवता येणारे, कठोर मार्ग (=निगुती) जमणारे नाहित.

किसन शिंदे's picture

4 Jan 2013 - 7:33 am | किसन शिंदे

मस्तच लिहलंय हो बुवा.

बाकी आपल्या इतर कवितांवर बाजार उठवणारा वल्ल्या आता कुठे गायब झालाय म्हणे? ;)

५० फक्त's picture

4 Jan 2013 - 8:39 am | ५० फक्त

तुझे चालणे अन मला वेदना / अचपळ मन माझे नावरे आवरिता आणि प्रवास 'माझ्या मना बन दगड' कडे. - अशातली वाटली ही कविता.

आज अचानक एवढे निगेटिव्ह विचार का हो बुवा ?

अवांतर - @ मा.संपादक की जे श्री. किसन शिंदे यांक,

मा. संपाद्क कि जे श्री. वल्ली हे हल्ली, अँटी सॉल्ट आणि अँटीपेपर जॅकेट हुड्कतात असे समजले आहे.

=))

बाकी बुवांच्या इतर कवितांचा पण मी फ्यान आहे.
मा. स. सं. किसन शिंदे यांच्या निराधार आरोपांचा निषेध. :-/

मोदक's picture

7 Jan 2013 - 1:45 pm | मोदक

नुस्ते अँटी सॉल्ट आणि अँटीपेपर जॅकेट नै कै..

अँटी सॉल्ट आणि अँटीपेपर वॉटरप्रूफ जॅकेट म्हणा.. :-D

बुवा - काव्य झकास जमले आहे. कच्चा माल.. कच्चा माल.. म्हणून उघडले पण सुखद धक्का बसला.

(भ्रमनिरासामुळे आनंदित) मोदक.

बॅटमॅन's picture

7 Jan 2013 - 2:21 pm | बॅटमॅन

(भ्रमनिरासामुळे आनंदित)

एग्झॅक्टलि हेच्च म्हणायचे होते, धन्यवाद रे मोदका.

होऊन बैसलो मी,दुनियेचा या भाट
दक्षिणेचा थाट,येथे कुचं कामी...

शेवटी तशी माझीही,पेटणार अखंड धुनी
चार आसवांची शांती,अखंड करोनिया...

खूप सुंदर.

स्पंदना's picture

4 Jan 2013 - 10:12 am | स्पंदना

शांती?

अच्छा बालिका गेली आता शांती काय?

आत्मुस कविता फारच हळवी आहे. तुम्हाला शोभत नाही. पन फकत कविते बद्दल बोलायच तर अतिशय उच्च!

वपाडाव's picture

4 Jan 2013 - 11:01 am | वपाडाव

हेच्च अन असेच बोल्तो...

बोलुन घ्या बोलुन घ्या सगळ्या धाग्यावर कमी दिवस राहलेत बोलायचे, नंतर सगळा मुक्याचा संसार आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

4 Jan 2013 - 4:06 pm | अत्रुप्त आत्मा

@लायचे, नंतर सगळा मुक्याचा संसार आहे.>>> =)) अश्या तह्रेनी वपा यांचा डाव झालेला आहे. =))

बॅटमॅन's picture

4 Jan 2013 - 7:33 pm | बॅटमॅन

मुक्यावर श्लेष काय बेक्क्क्कार मारलाय =))

सूड's picture

5 Jan 2013 - 8:55 pm | सूड

शब्दश्लेष की अर्थश्लेष म्हणे ? ;)

मूकपणे आश्लिष्ट झाल्यास क्व शब्दः क्व अर्थः भो: सुडकेश ;)

आर्णव's picture

4 Jan 2013 - 12:40 pm | आर्णव

आवडली. सुन्दर काव्य.

लीलाधर's picture

4 Jan 2013 - 7:21 pm | लीलाधर

आवडेश ओ बुवा :)

इन्दुसुता's picture

4 Jan 2013 - 10:30 pm | इन्दुसुता

कविता आवडली.

अवांतर : वपाडाव यांना अनेक शुभेच्छा :)

अभ्या..'s picture

5 Jan 2013 - 8:48 pm | अभ्या..

गुर्जी
हि अत्यंत आवडली आहे ;)

पक पक पक's picture

6 Jan 2013 - 8:27 am | पक पक पक

मस्त..... :) आवड्ली...

पाषाणभेद's picture

6 Jan 2013 - 4:18 pm | पाषाणभेद

नववर्षारंभी सुंदर रचना आहे बुवा!

नाखु's picture

7 Jan 2013 - 11:36 am | नाखु

छान... (विडंबनाचं) भूत जरा लांब ठेवा म्हणजे असा अस्सल (बुवा) आम्हाला लाभंल्..आणि हो "वपा" यांना जोर्दार शुभेच्च्छा....