जाता दुरदेशी सुख वाटे जीवा!
डॉलरे भेटता आनंदहोई !!१!!
या चलनाची उपमा नाही त्रिभुवनी!
करुन चाकरी इतर देशा !!२!!
ऐसा परदेश ऐसे देशोदेशी लोक !
ऐसे रहाणीमान दावा कोठें !!३!!
ऐसी उठाठेव ऐसा व्यवहार!
ऐसा N R I कोणी दावा !!४!!
ऐसे सरकार लावी करावर कर
आउट्सोअर्सिंग चालू येथे !!५!!
पैसा परी खुप केलीस भ्रमंती!
देशा परी सुख न मिळे जीवा !! ६!!
-------------------------------------------------------------------------
मुळ गाणे असे आहे -
जातां पंढरीस सुख वाटे जीवा ।
आनंदे केशवा भेटतांचि ॥१॥
या सुखाची उपमा नाहीं त्रिभुवनीं ।
पाहिली शोधोनी अवघी तीर्थे ॥२॥
ऐसा नामघोष ऐसे पताकांचे भार ।
ऐसे वैष्णव दिगंबर दावा कोठें ॥३॥
ऐसी चंद्रभागा ऐसा पुंडलीक ।
ऐसा वेणूनादीं कान्हा दावा ॥४॥
ऐसा विटेवरी उभा कटेवरी कर ।
ऐसें पाहतां निर्धार नाही कोठें ॥५॥
सेना म्हणे खूण सांगितली संती ।
या परती विश्रांती न मिळे जीवा ॥६॥
रचना - सेना महाराज
संगीत - राम फाटक
स्वर - पं. भीमसेन जोशी
प्रतिक्रिया
1 Jul 2008 - 12:12 pm | फटू
पैसा परी खुप केलीस भ्रमंती!
देशा परी सुख न मिळे जीवा
(अमेरिका निवासी)
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
1 Jul 2008 - 12:18 pm | कुंदन
पैसा परी खुप केलीस भ्रमंती!
देशा परी सुख न मिळे जीवा
पळुन यावेसे वाटतेय भारतात.
1 Jul 2008 - 12:28 pm | गिरिजा
पैसा परी खुप केलीस भ्रमंती!
देशा परी सुख न मिळे जीवा
छान!
--
गिरिजा..
लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग
-----------------------
1 Jul 2008 - 1:26 pm | विसोबा खेचर
पोटापाण्याच्या उद्योगाकरता परदेशी राहणार्या मंडळींची व्यथा चांगल्या रितीने मांडली आहे...
केळकरसाहेब, पुलेशु...
आपला,
(अण्णांचा भक्त) तात्या.
1 Jul 2008 - 2:02 pm | मदनबाण
पैसा परी खुप केलीस भ्रमंती!
देशा परी सुख न मिळे जीवा !! ६!!
हे १००% सत्य.....
मदनबाण.....
2 Jul 2008 - 2:57 pm | गणा मास्तर
पैसा परी खुप केलीस भ्रमंती!
देशा परी सुख न मिळे जीवा !
आपल्या गावापरीस सुख न्हाय बग गड्या
3 Jul 2008 - 10:27 am | अरुण मनोहर
या चलनाची उपमा नाही त्रिभुवनी!
डॉलरची घसरगुंडी पहाता वरील ओळ उलट्या अर्थाने पटते!
ऐसे सरकार लावी करावर कर
आउट्सोअर्सिंग चालू येथे !!५!!
वाचून असे वाटले, भारतात करांच्या द्र्ष्टीने नंदनवन आहे की काय?
---डॉलर घसरगुंडीने पोळलेला
3 Jul 2008 - 4:51 pm | वैशाली हसमनीस
''गाव आपुला गड्या बरा'' हेच शेवटी खरे! :T