देवा तुला शोधू कुठं ....................
नाही टिकत तू क्रीज वर ..............
नाही चुकवत तू योर्कर.................
नाही चालत बॅट तुझी आता............
निराश होती भक्त!
देवा तुला शोधू कुठं?
pavilion मध्ये तू सदाच दिसतोस
फार कमी क्रीज वर टिकतोस
क्रिकेट सोडून जाहिरातीत दिसतोस जास्त
परम देवभक्त ही झाला निस्तब्ध ...............
देवा तुला शोधू कुठं................................?
व्हावे रिटायर आता तरी देवा
सकल भक्तजन करीती धावा
होत नाहीत पूर्वीसारख्या धावा
थकलास आता तू चालली थकत ही बॅट.......
देवा तुला शोधू कुठं?
प्रतिक्रिया
14 Dec 2012 - 6:13 pm | दादा कोंडके
कुणाच्या तरी देवाला कसली तरी पूजा अशी कायशीशी म्हण आठवली. :)
14 Dec 2012 - 10:11 pm | अनिल तापकीर
छान
14 Dec 2012 - 10:36 pm | निरन्जन वहालेकर
देव ? ? ?
मोह, माया ह्यापासून अलिप्त तो देव. येथेतर तर माया जमवण्यासाठी म्हातारपण आले तरी तरुणान्चि सन्धि हिरावून खेळण्याचा सोस ! ! !
14 Dec 2012 - 10:38 pm | जेनी...
हे नक्कि काय आहे ???
14 Dec 2012 - 10:47 pm | निश
हे नक्की माणसाला देवासारख ठरवुन त्या देव्हघरात कोंडायचा प्रयत्न.
14 Dec 2012 - 10:49 pm | हारुन शेख
लाखातली एक प्रतिक्रिया
15 Dec 2012 - 8:40 am | ५० फक्त
आपिएल सुरु होउद्या, नीतावहिंनीनी प्रेमळ दम दिला की सगळं सुरळीत होईल.
15 Dec 2012 - 9:14 am | अमोल खरे
चला सचिनला जाऊन द्या एक वेळ. बाकीचे १० जण काय दिवे लावतायत ते तरी जरा सांगा. बाकी १० जण यॉर्कर चुकवतात का ? बाकी १० जण क्रिझ वर टिकतात का ? जर बाकी सगळे मजबुत खेळतायत आणि एकटा सचिन चुकतोय तर त्यावर बोलणं ठीक आहे. सचिनवर टिका करणं खुप सोप्प आहे हो. पण रन काढताना सचिन ह्या वयात ज्या जोराने धावतो तसं आपल्याला बसस्टॉप पर्यंत तरी धावता येते का ? तो आज कोट्याधीश / अब्जाधीश असुन इतक्या साधेपणाने बोलतो, तसं आपल्याला जमतं का ? विचार करुन बघा जमलं तर.
15 Dec 2012 - 9:28 am | श्री गावसेना प्रमुख
तुम्ही त्या शेवटच्या मुलीला ओळखतात का?नाही ना तसेच सचीनचे आहे,तो फोकस मध्ये असल्यावर बाकीचे झाकोळुन जातात.मग बाकींच्याच्या यश अपयश याच्याशी कोणालाही घेण नसत.