**
कधी कधी शब्दांपेक्षा सहवासाचा एक क्षणही पुरेसा असतो, मनातलं खूप काही बोलायला----------------------- मृदुंग
**
बस तुझ्या माझ्या आठवणींचा सुगंध छळतोय..............!
आठवणीतच पण माझ्या मनात दरवळतोय .................! ----------------------- मृदुंग
**
तू आहेस तर सगळंच आहे... तू नाहीस तर काहीच नाही...
क्षणभरचे पापण्यातले स्वप्नच... आता जगायला पुरेसे आहे... ------------ मृदुंग
**
प्रत्येक इछेची 'विलक्षण' इच्छा असते, सुरुवातीला नव्हे शेवटीच त्याचे लक्षण दिसते....------© मृदुंग
**
"लक्ष ' ण" कळायला लक्ष वेळा लिहिले, तरी सुद्धा सुरुवातीला लक्ष देऊन नाहीच पहिले..... ------------------------- © मृदुंग
**
गुणाकारा सोबतच आता, "ण" ला "क्ष" ने भागुनच घ्या म्हणजे झाले 'ण क्ष' ल'....------------------------- © मृदुंग
{अगदी मनासारखे}
**
हात जोडले म्हणजे देवाकडे काही तरी मागितलेच असे नसते,
श्रद्धेने, भक्तीने आणि कर्माने जे मिळाले त्यात आनंद सामावले असते ....... मृदुंग !
प्रतिक्रिया
3 Dec 2012 - 9:47 pm | दादा कोंडके
धाग्याच्या नावाला जागून ठरवलं होतं आधी, एक आणि एकच ओळ,
जिलब्या पाडता पाडता एकाच्या दोन होत गेल्या आणि झाला घोळ.........------------------© नगारा!
3 Dec 2012 - 10:21 pm | अत्रुप्त आत्मा
@© नगारा!>>>
अबाबाबाबा... लै बेक्कार.... 
4 Dec 2012 - 1:25 pm | सुहास झेले
हा हा हा .... =))
3 Dec 2012 - 10:33 pm | जेनी...
मिसळपाव वरच्या धाग्यांची बोळवण करायची संधी कशी सोडु??...............
एकाच ओळीत माझ्या मनातली ...माझी भावना _____________________________ पिपानी |
3 Dec 2012 - 11:14 pm | ठक
गुणाकारा सोबतच आता, "ण" ला "क्ष" ने भागुनच घ्या म्हणजे झाले 'ण क्ष' ल'...
मस्तच !!!!
3 Dec 2012 - 11:20 pm | लीलाधर
लीहून काढ नी बंध
मिपाच्या या बोर्डावर वाजतो मृदुंग ;)
4 Dec 2012 - 9:39 am | लीलाधर
4 Dec 2012 - 11:30 am | अनिल तापकीर
सुंदर
4 Dec 2012 - 11:35 am | निश
Piyush mrudung साहेब, वा मस्त
4 Dec 2012 - 11:35 am | गवि
प्रत्येक ओळीच्या शेवटी कॉपीराईट मृदुंग असे का लिहीले आहे..? कोणी चोप्य पस्ते, सॉरी, कॉपी पेस्ट करायचे ठरवलेच तर तेवढा भाग वगळूनही उचलू शकतातच.
4 Dec 2012 - 12:56 pm | Piyush mrudung
चालायचंच म्हंटले तर मार्ग बरेच असू शकतात, ठरवलेली दिशा आणि प्रतिभा ठरावीकच घडवू शकतात..........© मृदुंग
4 Dec 2012 - 4:51 pm | गवि
मला वाटलं
ठरवलेली दिशा आणि प्रतिभा ठरावीकच घडवू शकतात.......... © स.त. कुडचेडकर ("केतकी पिवळी पडली"चे ख्यातनाम लेखक)
4 Dec 2012 - 5:28 pm | हारुन शेख
तबला, पखवाज, ताशा , डफली वाद्ये अनेक असू शकतात , वेळ पडल्यास मिपाकर मृदंग पण बडवू शकतात .............© वादंग
7 Dec 2012 - 3:53 pm | बॅटमॅन
एक नंबर!
4 Dec 2012 - 1:21 pm | सर्वसाक्षी
<तू आहेस तर सगळंच आहे... तू नाहीस तर काहीच नाही...
क्षणभरचे पापण्यातले स्वप्नच... आता जगायला पुरेसे आहे.>
या ओळी पगारपत्रिकेला (सॅलरी स्लीप) ला उद्देशुन आहेत का?
<प्रत्येक इछेची 'विलक्षण' इच्छा असते, सुरुवातीला नव्हे शेवटीच त्याचे लक्षण दिसते>
ही ओळ मदिरापानाला उद्देशुन आहे का?
4 Dec 2012 - 1:22 pm | सर्वसाक्षी
प्रतिसादातील अनेक ओळी गायब आहे. हा काय प्रकार आहे?
4 Dec 2012 - 5:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रतिसादात काही चिन्ह टाकून केलेलं लेखन उमटत नाही.<<< >>>>>
च्या पेक्षा लहान आणि च्या पेक्षा मोठा या चिन्हांमधे केलेले लेखन उमटत नाही.
[लेस दॅन आणि ग्रेटर दॅन ]
-दिलीप बिरुटे
4 Dec 2012 - 1:35 pm | निवेदिता-ताई
छानच
4 Dec 2012 - 4:36 pm | परिकथेतील राजकुमार
जो झुंजार हो तयार वही सरदार सा लगे
हुड हुड मृदुंग मृदुंग मृदुंग मृदुंग.....
4 Dec 2012 - 5:10 pm | बॅटमॅन
गुणाकारा सोबतच आता, "य" ला "झ" ने भागुनच घ्या म्हणजे झाले 'ब य' झ'....------------------------- © निवडुंग.
{अगदी मनासारखे}
4 Dec 2012 - 5:13 pm | स्पा
श्री . मृदुंग वरील खुसपट प्रतिसादांकडे लक्ष देऊ नका
खूप चान लिहिता आहात .
अभिनंदन
4 Dec 2012 - 5:17 pm | बॅटमॅन
आपल्याबद्दलचा आदर वाढीस लागला आहे. ;)
आंडूशी पांडू.
4 Dec 2012 - 11:10 pm | अत्रुप्त आत्मा
@आंडूशी पांडू.>>>
6 Dec 2012 - 12:27 pm | लीलाधर
@आंडूशी पांडू = बंडू ;) :)
4 Dec 2012 - 5:22 pm | पैसा
इथली मंडळी जरा थट्टेखोर आहेत हो. घाबरू नका. लिहीत रहा.
4 Dec 2012 - 5:23 pm | परिकथेतील राजकुमार
हा प्रतिसाद प्रामाणिक आहे कशावरुन ?
4 Dec 2012 - 5:32 pm | पैसा
आम्हाला सगळ्याच सदस्यांची काळजी घ्यावी लागते!
4 Dec 2012 - 5:36 pm | परिकथेतील राजकुमार
मिपावरचे काळजीवाहू सरकारच तुम्ही. ;)
4 Dec 2012 - 5:38 pm | पैसा
काळजीवाहू सरकारची थोड्याच दिवसात उचलबांगडी होते.
4 Dec 2012 - 5:38 pm | जेनी...
घ्या!
पै बैं चा एकुलता ए. प्रामाणिक गोड्ड प्रतिसाद ..
माझ्याशी बै कध्धी कध्धी इतकं प्रेमाने बोलत नै :-/
4 Dec 2012 - 5:41 pm | पैसा
तुझ्याशी प्रेमाने बोलणारी लै मंडळी आहेत की. त्यात तू मला सासूबै म्हणतीस, मग नावाला जागायला नको?
4 Dec 2012 - 5:46 pm | जेनी...
इश्श्श्य :)
म्ह्नजे तुला मी सुन्बै म्हणुन कबूल हाय?? :)
4 Dec 2012 - 6:23 pm | पैसा
कुबुल कुबुल कुबुल असं मी कुठे कधी म्हटलं?
4 Dec 2012 - 11:16 pm | प्यारे१
बुकल बुकल बुकल....
5 Dec 2012 - 2:51 am | जेनी...
:-/
4 Dec 2012 - 10:30 pm | सुहास..
म्ह्नजे तुला मी सुन्बै म्हणुन कबूल हाय?? >>>
हिचे सगळे मिपाकर नातेवाईकच आहेत , कुणी आजोबा, कुणी सासुबाई तर कुणी भावजी ;)
वैनीसाहेबाचा दिर ;)
भेंडी गवार
;)
5 Dec 2012 - 2:50 am | जेनी...
इश्श्य सुवास भावजी ;)
कायतरीच हं तुमचं आपलं :-/
4 Dec 2012 - 5:28 pm | मूकवाचक
कधी कधी मिपावरच्या धाग्यापेक्षा रोजनिशीतले एक पानही पुरेसे असते, मनातले खूप काही लिहून काढायला ----------------------- © हलगी
4 Dec 2012 - 5:46 pm | Piyush mrudung
'आपल्या जिभेइतकी आवरण्यास कठीण अशी दुसरी कोणतीही गोष्ट जगात नाही.'
.
शुभांगी...
4 Dec 2012 - 6:03 pm | परिकथेतील राजकुमार
पुरुषांचे मत वेगळे असू शकते.
4 Dec 2012 - 6:16 pm | दादा कोंडके
सहमत!
उचलली 'ही' अन लावली 'ह्या'ला!
-दादा बारटक्के
7 Dec 2012 - 11:49 am | तिमा
'तुमच्या जिभेला काही हाड आहे का?' या वाक्याबद्दलही असू शकते.
7 Dec 2012 - 9:05 pm | इनिगोय
बरं. पण शुभांगी कोण आहे? मृदुंग तिचा आहे का?
5 Dec 2012 - 6:35 pm | नावात्_काय्_आहे
प्रतिकिया वाचुन जास्त मज्जा आली.
5 Dec 2012 - 6:35 pm | नावात्_काय्_आहे
प्रतिकिया वाचुन जास्त मज्जा आली.
6 Dec 2012 - 9:40 pm | स्मिता.
हा वाचनीय धागा कसा काय नजरेतून सुटला होता कोण जाणे! माझ्यासारख्या वेंधळ्यांकरता पुन्हा वर आणते...
6 Dec 2012 - 9:52 pm | सानिकास्वप्निल
सर्वांचे भन्नट प्रतिसाद वाचून मजा आली, हसू आवरेनासे झाले ;)
7 Dec 2012 - 11:43 am | ज्ञानराम
सर्वांचे भन्नट प्रतिसाद वाचून मजा आली, हसू आवरेनासे झाले >>>>>>>>>> ख्र्रच . :)
7 Dec 2012 - 3:45 pm | जयवी
प्रतिसादांची मिपावरची मज्जा...... :)
7 Dec 2012 - 10:12 pm | श्रीरंग_जोशी
मला तर आजवर अर्ध्या किंवा पाव ओळीचेही काव्य न सुचल्यामुळे मला तरी असा प्रयत्न करणे पटले...
10 Dec 2012 - 11:12 pm | Piyush mrudung
एक प्रेत चितेवर शांतपणे जळत होतं,शरीरावरची मळभ दूर करत होतं....© मृदुंग
11 Dec 2012 - 10:07 am | परिकथेतील राजकुमार
काही लोकांनी (माझ्यासारख्या ?) लिखाण थांबवले तर आंतरजालावरील मळभ देखील दूर होईल.
11 Dec 2012 - 12:48 am | Piyush mrudung
गालावर अश्रुंचा थेंब ढळत होतं, एक प्रेत चितेवर शांतपणे जळत होतं,....© मृदुंग
11 Dec 2012 - 1:00 am | जेनी...
शी बै :-/
आजकाल लोकं प्रेताला पण शांतपणे चितेवर जळु देत नैत :-/
त्यांना पण इथे एका ऑळीत आणुन जबरदस्ती बसवतात :-/ :-/
11 Dec 2012 - 7:45 am | ५० फक्त
मग चितेवर बसवण्यापेक्षा ओळीत बसवलेलं काय वाईट आहे ?
11 Dec 2012 - 10:31 am | शैलेन्द्र
छळ छळ छळ छळ छळ !!!!
नवकवींचा छळ छळ छळ छळ छळ !!!!
कवीतेची आलीय कळ कळ कळ कळ कळ !!!
नवकवीहो उघडा नळ नळ नळ नळ नळ नळ नळ !!!
सुटलेत आता, रसीका पळ पळ पळ पळ पळ पळ पळ पळ !!!! c फाटका ढोल
12 Dec 2012 - 12:22 am | Piyush mrudung
राख झालेल्या देहाला काही परत जाळत होते, एक प्रेत चितेवर शांतपणे जळत होते........© मृदुंग
12 Dec 2012 - 12:39 am | Piyush mrudung
शब्दांत लिहिलेले सगळे माझ्या आयुष्याशी काही जोडत होते, शब्दांनीच तर माझे आयुष्य मांडले होते........© मृदुंग
12 Dec 2012 - 12:42 am | संजय क्षीरसागर
© झाडू दे गं
12 Dec 2012 - 12:48 am | जेनी...
=))
संजय काका आता कूठे झाडु मारताय ?? ;)
12 Dec 2012 - 12:49 am | Piyush mrudung
झाडूच्या जोडीला केरसुणीही मागावी, जशी जमेल तशी आपली हाउस भागवावी........© मृदुंग
12 Dec 2012 - 12:52 am | जेनी...
झाडु जसा मारायला उपयोगी पडतो .. तशी केरसुनी फेकुन मारायला बरी पडते ------------ सुपली =))
12 Dec 2012 - 1:05 am | Piyush mrudung
तुला हातात मिळेल ते तू फेकून मारते, अशी वेड्यासारखी का नेहमी वागते........© मृदुंग
31 Jan 2013 - 3:40 pm | अधिराज
लई हौस होती मैफीलीत समद्याना जमवायची
हाय!पन येळ अशी आली येकेकाला गमवायचि.........अधिराज साहेब.
31 Jan 2013 - 9:51 pm | उर्जिता
अतिशय भन्नाट..!विशेशतह परीकथेतिल राजकुमाराचि कमेन्ट..!
12 Mar 2013 - 9:32 am | Piyush mrudung
विनोद समजायला बुद्धीची आवश्यक्ता नसते...........© मृदुंग