राजे संभाजी

अनिल तापकीर's picture
अनिल तापकीर in जे न देखे रवी...
29 Nov 2012 - 8:00 am

धगधगता अंगार होता
अतुलनीय वीर होता
वाघासारखा शूर होता
*****संभाजीराजा
जेवढा हळवा कवी होता
तेवढाच कणखर बाणा होता
रणांगणी धधडणारा वणवा होता
***** संभाजीराजा
धर्माचा अभिमानी होता
मराठा असण्याचा गर्व होता
शूर सिंहाचा छावा होता
***** संभाजीराजा
मातृपितृ भक्त होता
भवानीमातेचा दास होता
स्वराज्याचा प्राण होता
***** संभाजीराजा
राजे तुमचा आम्हाला अभिमान वाटतो अनिल तापकीर

कविता

प्रतिक्रिया

ज्ञानराम's picture

29 Nov 2012 - 10:05 am | ज्ञानराम

मानाचा मुजरा.......

श्री गावसेना प्रमुख's picture

29 Nov 2012 - 10:48 am | श्री गावसेना प्रमुख

किती आले किती गेले नाही त्यांची गणती,

जगामध्ये एकच झाले छत्रपती,

असे हे आपले संभाजी महाराज

महाराजांना मानाचा मुजरा.

परिकथेतील राजकुमार's picture

29 Nov 2012 - 11:02 am | परिकथेतील राजकुमार

तुमचा आम्हाला अभिमान वाटतो अनिल तापकीर

अनिल तापकीर's picture

29 Nov 2012 - 1:13 pm | अनिल तापकीर

धन्यवाद ज्ञानराम, श्री गावसेना प्रमुख, परिकथेतील राजकुमार

कवितानागेश's picture

29 Nov 2012 - 9:40 pm | कवितानागेश

त्या five stars ची गरज नाही.
कविता चांगली झालिये.

अनिल तापकीर's picture

29 Nov 2012 - 9:54 pm | अनिल तापकीर

धन्यवाद्,लीमाउजेट
त्या फाइवस्टारचा उद्देश काही नाही असेच दिलेत

अर्धवटराव's picture

29 Nov 2012 - 10:30 pm | अर्धवटराव

संभाजीचे राजकारणपटुत्व, सिव्हिल अ‍ॅड्मिनिस्ट्रेशन, मुत्सद्देगिरी... हे गुण इतर सर्व गुणांच्या वरचढ होते. त्याचा साधा उल्लेख देखील नाहि कवितेत...

अर्धवटराव

मदनबाण's picture

29 Nov 2012 - 10:54 pm | मदनबाण

मानाचा मुजरा !
http://www.youtube.com/watch?v=WXoBWupRO28

अत्रुप्त आत्मा's picture

29 Nov 2012 - 11:45 pm | अत्रुप्त आत्मा

+१

मालोजीराव's picture

30 Nov 2012 - 12:17 pm | मालोजीराव

हि कविता वाचून शंभू छत्रपतींनी लिहिलेल्या 'नायिकाभेद' ग्रंथातील हि सवैय्या टाकण्याचा मोह आवरत नाही...

पढई समुझार सहे सिनियों I कोड मारकेमें मिलती न कहा II
पलिका परलै उरलाइ लली I लपटातिमें ' शंभु ' लजाति महा II
घुघुरून को शोर सुने सकुचे पिय I होत ज्यों ज्यों अति लाल जहां II
तिय त्यों तिरीछि करै अँखियाँ I अनखाति महा अरुजाति हहा II

अर्थ : नव्या नवरीच्या पहिल्या रात्रीच्या मानसिकतेचे दर्शन या सवैय्यातुन होते...ती पहिल्या मिलनास आतुर पण आहे त्याचबरोबर तिच्या चेहऱ्यावर प्रचंड लज्जाभाव हि झळकत आहे.
शिकवून समजाऊन समयवस्कांनी दिलेली सूचना ती पळणार कि नाही? ;) पलंगावर दुसऱ्या बाजूस कूस करून नववधूने खूप लाजून आलिंगन दिले असे कवि शंभु म्हणतात, त्यावेळी पायाच्या घुंगरांचा ( पैंजणाचा ) आवाज ऐकून तिला प्रियकराचा संकोच वाटला यामुळे त्या त्या वेळी ( आवाजाच्या ) त्या त्या अनुराग ( लालरंग ) वाढला...तिचा चेहरा लाजेने चूर होऊन लालेलाल झाला...अशा वेळी नायिकेने तिरपे कटाक्ष करून लटका राग दर्शवित अधिकच उलझन पैदा करीत आनंद व्यक्त केला.

हे बरेचसे गाथासप्तशतीसारखेच दिसतेय.

श्रीमत's picture

30 Nov 2012 - 2:58 pm | श्रीमत

मस्त

अनिल तापकीर's picture

30 Nov 2012 - 3:46 pm | अनिल तापकीर

सर्वांना धन्यवाद

अनिल तापकीर's picture

30 Nov 2012 - 3:52 pm | अनिल तापकीर

अर्धवटरावजी, तसे पाहीले तर संभाजीराजांविषयी लिहायचे म्हट्ले तर एक महाकाव्य होईल
हि एक छोटी कविता आहे अजुन थोडी वाढवायला हवी होती

मालोजीराव's picture

30 Nov 2012 - 5:20 pm | मालोजीराव

संभाजीराजांविषयी लिहायचे म्हट्ले तर एक महाकाव्य होईल

शिवरायांचा राज्याभिषेक करणारे पंडित गागाभट्ट यांनी 'समयनय' हा काव्य (सुभाषितयुक्त) ग्रंथ संभाजी महाराजांना अर्पण केला आहे.त्यातही शंभूस्तुती आहे.

अर्धवटराव's picture

30 Nov 2012 - 8:01 pm | अर्धवटराव

>> तसे पाहीले तर संभाजीराजांविषयी लिहायचे म्हट्ले तर एक महाकाव्य होईल
-- येस्स. आणि शंभूचरित्र गायन, ते हि त्याच्या पूर्ण वैभवासकट, काळाची गरज आहे.
असो. तुमचा छोटेखानी प्रयत्न छान जमलाय.

अर्धवटराव

"छाव्या" ला त्रिवार मुजरा

अनिल तापकीर's picture

1 Dec 2012 - 1:21 pm | अनिल तापकीर

मालोजीराव्,रसायन्,नि अर्धवटराव धन्यवाद.
सध्या मि शिवाजी महराजांवर काव्य करायचा प्रयत्न करतोय.
त्यासठी चांगले एखादे सर्वमान्य शिवचरित्र सुचवा

अर्धवटराव's picture

1 Dec 2012 - 9:19 pm | अर्धवटराव

तारखेवार इतिहास तपशील पुरंदरेंच्या राजा शिवछत्रपती मध्ये मिळेल. रणजीत देसाईंचं श्रीमानयोगी चरित्र म्हणुन नाहि पण शिवचरित्राचा साहित्यीक आढावा म्हणता येईल.
कुरुंदकरांचं शिवाजीविषयी कुठलही साहित्य एकदा नजरेखालुन घालाच.

अर्धवटराव

अनिल तापकीर's picture

2 Dec 2012 - 8:27 am | अनिल तापकीर

धन्यवाद, अर्धवटरावजी
राजा शिवछत्रपती,नि श्रीमानयोगी वाचले आहे कुरुंदकरांचे पहायला हवे

गणेशा's picture

3 Dec 2012 - 9:02 pm | गणेशा

अनिल मस्त कविता..

पण आनखिन रुबाबदार आणि चित्तवेधक आणि प्रत्येकाच्या मनात एक पोलादी व्यक्तिमत्व ठसावे अशी कविता पाहिजे पुन्हा

अनिल तापकीर's picture

4 Dec 2012 - 11:25 am | अनिल तापकीर

गणेशा, धन्यवाद
आपल्या सुचनेचे स्वागत आहे

शिवप्रसाद's picture

15 Dec 2012 - 4:47 pm | शिवप्रसाद

भारिच दणकेबाज मस्त

अनिल तापकीर's picture

15 Dec 2012 - 7:21 pm | अनिल तापकीर

धन्यवाद शिवप्रसाद

अनन्न्या's picture

15 Dec 2012 - 7:24 pm | अनन्न्या

खरच कविता अप्रतिम!

बाबा पाटील's picture

15 Dec 2012 - 8:15 pm | बाबा पाटील

संभाजीराजे हे एकमेव राजे होते की जे सतत ९ वर्ष लढाया खेळुन अपराजित राहिले....

ऊंहूं. अपराजित राहण्याचा मान जातो तो थोरल्या बाजीराव पेशव्यांना.

अनिल तापकीर's picture

15 Dec 2012 - 10:29 pm | अनिल तापकीर

धन्यवाद पाटील्साहेब

पाषाणभेद's picture

16 Dec 2012 - 12:20 am | पाषाणभेद

संभाजीराजेंसारखीच खणखणीत कविता.

अनिल तापकीर's picture

16 Dec 2012 - 9:07 am | अनिल तापकीर

धन्यवाद, पाषाणभेदजी

बापू मामा's picture

16 Dec 2012 - 5:14 pm | बापू मामा

संभाजी राजे न होते तो सबकी सुन्नत होती.
हिंदू धर्म संरक्षक महाप्रतापी संभाजी राजांना त्रिवार मानाचा मुजरा.
तापकीरजी आता पुढल्या कवनाची आतुरतेने वाट पाहतो आहे.

बापू मामा's picture

16 Dec 2012 - 5:14 pm | बापू मामा

संभाजी राजे न होते तो सबकी सुन्नत होती.
हिंदू धर्म संरक्षक महाप्रतापी संभाजी राजांना त्रिवार मानाचा मुजरा.
तापकीरजी आता पुढल्या कवनाची आतुरतेने वाट पाहतो आहे.

अनिल तापकीर's picture

16 Dec 2012 - 8:33 pm | अनिल तापकीर

धन्यवाद्,बापु मामा
पोवाडा लिहायचा प्रयत्न करतोय

अनिल तापकीर's picture

20 Dec 2012 - 11:30 am | अनिल तापकीर

थोरल्या बाजीरावांच्या वेळी मराठी साम्राज्य घडी व्यवस्थीत बसलेली होती. पण शंभुराज्यांच्या वेळी प्रतिकुल परिस्थीती होती. आनि अश्या प्रतिकुल परिस्थितीतही राज्यांनी स्वराज्याची धुरा समर्थपणे पेलली
असे,मला वाटते.
अजुनही काही तज्ञांनी यावर आपली मते प्रकट करावी

मालोजीराव's picture

20 Dec 2012 - 12:28 pm | मालोजीराव

पण शंभुराज्यांच्या वेळी प्रतिकुल परिस्थीती होती. आनि अश्या प्रतिकुल परिस्थितीतही राज्यांनी स्वराज्याची धुरा समर्थपणे पेलली
असे,मला वाटते.
अजुनही काही तज्ञांनी यावर आपली मते प्रकट करावी

संभाजीराजांच्या वेळेस थोरल्या बाजीरावांपेक्षा संकटे जास्त होती- नक्कीच मान्य. पण थोरल्या बाजीरावांकडे राज्य सुखासुखी चालून आलेले नव्हते. त्यांची निम्मी एनर्जी बर्‍याच दबंग सरदारांना आवरण्यात, त्यांना चुचकारण्यात आणि प्रसंगी त्यांचा बीमोड करण्यात खर्च होत असे. कायम सातारा दरबारी चित्त लागलेले असायचे, कारण तेव्हा पेशव्यांची अ‍ॅथॉरिटी दृढमूल झालेली नव्हती आणि शाहूचा वचक अजून टिकून होता काही प्रमाणात का होईना.असो.

मालोजीराव म्हणतात त्याप्रमाणे वेगळा धागा काढल्यास उत्तम होईल. थोरल्या बाजीरावांचे एक उत्तम चरित्र व्ही.जी.दिघे यांनी लिहिलेले आहे, ते त्यांच्या पीएचडी थेसिसचे संक्षिप्त रूप आहे. १९४४ साली पब्लिश झालेले आहे. थोरल्या बाजीरावांसाठी या चरित्राइतके उत्तम आणि वस्तुनिष्ठ चरित्र दुसरे उपलब्ध नाही असेच म्हणावे लागेल. पण हे आहे इंग्रजीत, आणि नेहमीच्या पद्धतीने हे पुस्तक देखील काही लायब्रर्‍यांची शोभा वाढवीत धूळ खात बसलेय. ते नेटवर इथे मिळेल.

http://oudl.osmania.ac.in/bitstream/handle/OUDL/13175/216308_Peshwa_Baji...

अनिल तापकीर's picture

20 Dec 2012 - 12:48 pm | अनिल तापकीर

धन्यवाद्,मालोजीराजे(राव)

शिवप्रसाद's picture

20 Dec 2012 - 2:19 pm | शिवप्रसाद

शंभुराजे असो वा बाजीराव पेशवे दोन्हीही ग्रेटच

अनिल तापकीर's picture

20 Dec 2012 - 2:33 pm | अनिल तापकीर

बॅटमॅन,शिवप्रसाद धन्यवाद,
बॅटमॅनजी मी शंभुराजांविषयी बोलतोय म्हनजे बाजीरावांना कमी लेखतोय असे नव्हे मला दोघांविषयी नितांत आदर आहे .
आणि दोघेही थोरच आहे.
मला वाटते की उभारण्यापासुन जतन करणे नि पुढे भरभराटीस आणणे ह्या सर्वच गोष्टी महत्वाच्या आहेत