सल्ला हवा आहे.(मिपाकर आनंदाने फुकटात देउ शकतील अशी ही एक महत्वाची गोष्ट.)
बालंट आल्यावर काय करावं?
आम्ही तीन जण कथेतील पात्रे आहोत.मी, माझा मित्र महेंद्र आणि महेंद्रचा मित्र जग्या.
समजा महेंद्र ह्या माझ्या मित्राचे बायकोशी पटत नाही.
एक दिवस त्याने येउन मला सांगितलं की "जग्या काल बायकोशी का पटत नाही असे मला विचारत होता. तु जग्याला माझं बायकोशी पटत नाही असं का सांगितलस?"
.
वस्तुस्थिती:- जग्याशी माझी काहीही ओळखपाळख नाही. महेंद्रचा मित्र म्हणून फार तर "परिचित" इतकच म्हणू शकतो.
मागील कित्येक वर्षात माझा जग्याशी धड संपर्कही नाही.
मगः-
जग्यानं असं खरच सांगितलं असावं का? की महेंद्र गेम घेतोय?
महेंद्र खरे बोलत आहे.(जग्याने खरोखर माझे नाव घेउन काही खाजगी माहितीचा उल्लेख त्याच्यापाशी केला आहे;असे मानू). मग जग्याने माझे नाव का घेतले असावे?
अजून काय शक्यता असू शकतात?
महेंद्र नाराज होइल ह्या गोष्टीचं मी का टेन्शन घ्यावं? कै च्या कै कुणीही बोलू लागलं तर मी कुठे कुठे, कुणा कुणाला जाउन अडवू?
मुळात महेंद्रला माझ्यावर भरोसा नाही, नि तो मला ओळखू शकलाच नाही म्हणून तो मला कायमचा "gud bye" करणार असेल तर सरळ तसे होउन जाउ देउ का? मी ही सस्मित त्यास पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देउन "GUD BYE" म्हणावे काय?
.
अशा परिस्थितीत तुम्ही काय केलं असतत?
.
एखादी शक्यता माझ्या विचारातून सुटते आहे का? समस्या कशी हाताळावी?
व्य नि केलात नि सल्ला दिलात तरी चालेल. "गवि काकाचा सल्ला" अशा टाइअपचे सदर तुम्ही चालवत आहात असे समजा नि होउ द्या सल्ल्यांना सुरुवात.
--मनोबा
प्रतिक्रिया
22 Nov 2012 - 5:05 pm | गणपा
तुमच्या जागी असतो आणि महेंद्रची खाजगीतली गोष्ट खरच जग्याला सांगीतली नसती तर जग्याचा कान धरुन त्याला महेंद्र समोर उभा केला असता. हा सूर्य आणि हा जग्या.. काय सोक्षमोक्ष लावायचाय तो लावून टाक म्हणुन सांगीतले असते.
22 Nov 2012 - 5:07 pm | बॅटमॅन
एग्झॅक्टली हेच्च म्हण्णार होतो, काय तो एकदाचा कंडका पडून जाऊदे तेच्यायला, हा सूर्य अन हा जयद्रथ, हयगय नको उगंच.
22 Nov 2012 - 5:10 pm | मन१
जग्या वेगळ्या देशात आहे सध्या. शिवाय माझा त्याचा परिचय नाही.
मी त्याच्यावर वेळ खर्च करावा का? ते आवश्यक आहे का?
--मनोबा
22 Nov 2012 - 5:15 pm | गणपा
स्काईप वापर बे.
23 Nov 2012 - 12:52 am | जेनी...
हिहिहि ..पण वेळ खर्च करावा काय? ह्या प्रश्नाचं उत्तर कुठाय ? ;)
=))
22 Nov 2012 - 5:09 pm | ह भ प
22 Nov 2012 - 5:11 pm | श्री गावसेना प्रमुख
काही लोकांना असे वाटते की आपल्या विषयी हा आपल्या गैरहजेरीत काही तरी बोलतो म्हणुन ते असे गेम खेळतात् किंवा खेळत असावेत,जेणेकरुन आपला गोंधळ उडुन आपण तसे बोललो असलो तर आपन जे बोललो ते सांगुन टाकावे
जसा तुमच्या कथेतील मित्र महेन्द्र
किंवा तुमच्या मित्राचा मित्र जगु तुमच्या नावावर काहीच्या काही खपवण्याचा प्रयत्न करीत असावा.
किंवा जगु तुमच्या मैत्रीत अंतर पाडण्याचा प्रयत्न करीत असावा
काय करावःतुम्ही सगळे मित्र उपस्थित असतांना एकदाचे काय ते खरे खोटे ते करुन टाकावे
22 Nov 2012 - 5:14 pm | मन१
ते दोघे देशाबाहेर(ते दोघे कॅलिफोर्नियाला आहेत, मी भारतात आहे) आहेत.
--मनोबा
22 Nov 2012 - 5:33 pm | श्री गावसेना प्रमुख
त्यांच्याशी बोलने टाळा बेस्ट उपाय आहे हा.
23 Nov 2012 - 12:53 am | जेनी...
येस ..मी पण असच करते ...खोटं बोलत असेल समोरची व्यक्ती तर सरळ एकदा स्पष्टिकरण देऊन रस्ता बदलायचा .
डॉक्याला ताप नक्को च्यामारी :-/
23 Nov 2012 - 8:47 am | श्री गावसेना प्रमुख
.खोटं बोलत असेल समोरची व्यक्ती तर सरळ एकदा स्पष्टिकरण देऊन रस्ता बदलायचा .
आपण नाही ,त्येला सांगायच पतली गली पकड म्हणुन.shift+delete+enter
22 Nov 2012 - 5:17 pm | कपिलमुनी
जो भरोसा नही करते ... उन्हे दोस्त नही कहते !!
22 Nov 2012 - 5:31 pm | ५० फक्त
तुमचं लग्न झालंय का ?
22 Nov 2012 - 5:34 pm | मन१
बट, हाऊ डझ द्याट म्याटर?
22 Nov 2012 - 5:40 pm | श्री गावसेना प्रमुख
त्यांच्या म्हनन्यानुसार तुम्ही मित्र सोडुन बायकोत लक्ष घालाव मग असले प्रश्न पडनार नाहीत(म्हणुन म्हणतो लग्न करुन टाका मुली फार कमी आहेत आणी तुमचा प्रश्नही मिटतो)
22 Nov 2012 - 7:55 pm | मोदक
आणि एकदा लग्न झाले की पुढच्या खर्या खोट्या बालंटावर सल्ले द्यायला मिपाकर आहेतच. ;-)
(त्या भविष्यातील सल्ल्यांमध्ये "लग्न केले नसते तर असे झालेच्च नसते!" असाही सल्ला मिळायची शक्यता आहे हा मनोबा)
22 Nov 2012 - 5:44 pm | ५० फक्त
तुम्हाला ती आजी आणि चण्याची गोष्ट माहित आहे का ?
23 Nov 2012 - 12:54 am | जेनी...
मला नै मैत :(
प्लिझ सांगाणा पन्नास राव :(
22 Nov 2012 - 5:53 pm | चौकटराजा
समजा महेंद्र ह्या माझ्या मित्राचे बायकोशी पटत नाही.
कोणाच्या बायकोशी तुमच्या की जग्याच्या ?
खोटे बालंट म्हणजे काय ? खरे बालंट असते तरी कसे ?
( आमच्या माहितीनुसार जे बालंट असते ते बनावट- फॅब्रिकेटेडच असते )
22 Nov 2012 - 5:56 pm | सूड
मूळात प्रश्न आहे की महेंद्रचं खरोखरंच (त्याच्या) बायकोशी पटत नाही का ?
22 Nov 2012 - 6:05 pm | सोत्रि
महेंद्रचे अॅरेंज्ड मॅरेज असावे. कारण जर त्याने त्याच्या बायकोला पटवली असती तर त्यांचे पटले असते ही शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे मनोबा खोटं बालंट टाळण्यासाठी तु 'पटवून' लग्न करावे हे उत्तम! (रेवती आज्जीला उगा त्रास देऊ नकोस).
:D :D :D
- (पटलेला) सोकाजी
22 Nov 2012 - 6:13 pm | कपिलमुनी
हे कोणी सांगितला ?? आकडेवारीनुसार पटवलेल्यांचे फाटण्याचे प्रमाण जास्त आहे
22 Nov 2012 - 6:27 pm | सूड
याला पुरावा काय ?
23 Nov 2012 - 9:13 am | llपुण्याचे पेशवेll
याला पुरावा काय ?
पुरून टाका. :)
23 Nov 2012 - 9:40 am | जेनी...
हो खरच पूरुन टाका ....!
23 Nov 2012 - 1:44 pm | अमृत
पेशवे प्रश्नाची पुरती पुरेवाट लावलीत :-)
22 Nov 2012 - 6:28 pm | सूड
>>आकडेवारीनुसार पटवलेल्यांचे फाटण्याचे प्रमाण जास्त आहे
याला पुरावा काय असं विचाराचंय !!
स्वगतः स्वसंपादन कधी सुरु होणार देव जाणे !!
22 Nov 2012 - 11:23 pm | ५० फक्त
>>आकडेवारीनुसार पटवलेल्यांचे फाटण्याचे प्रमाण जास्त आहे
याला पुरावा काय असं विचाराचंय !! -
एवढं दचकुन विचारताय, कुणाला पटवायच्या किंवा कुणाकडुन पटायच्या शेवटच्या टप्प्यात आहात काय ?
23 Nov 2012 - 1:41 pm | अमृत
हेच म्हणतो...
23 Nov 2012 - 1:48 pm | सूड
तुम्हाला भारी चवकश्या !!
23 Nov 2012 - 2:08 pm | अमृत
आम्ही तर केवळ एक हलकसं अनुमोदन दीलं हो भौ !!
22 Nov 2012 - 11:31 pm | ५० फक्त
पटवलेल्या बायकोशी पटतं ??
तुमचं एखाद्या मुलीशी पटवुन घेता म्हणुन तुमचं एकमेकांशी पटतं आणि मग ती तुम्हाला पटते आणि मग तुमच्या आणि तिच्या घरच्यांना पटवुन तुम्ही लग्न करुन संसाराचा पट मांडता आणि ती तुमची बायको होते आता आधीच एवढी पटापट झाल्यावर पुन्हा बायकोबरोबर पटण्यासारखं काही उरत नाही हे तुम्हाला पटलं का नाही बोला.
23 Nov 2012 - 12:31 pm | बॅटमॅन
हे पटसंख्येचं गणित पटायच्या आत पटापट पळून गेलो :P
22 Nov 2012 - 6:01 pm | सोत्रि
खोटे बालंट टाळण्यासाठी खरं बालंट अंगावर घ्या!
हा का ना का.
- (मित्राच्या आणि त्याच्या बायकोच्या त्रांगड्यात न पडणारा) सोकाजी
22 Nov 2012 - 6:02 pm | गवि
चेहर्यावर (मित्र दूरदेशी असल्यास फोनवर आवाजात) अत्यंत आश्चर्य आणून महेंद्रला म्हणावं,"आँ? तुझं तुझ्या बायकोशी पटत नाही..? मला हे कधी खरंच वाटलं नव्हतं.. मला वाटायचं की तू गंमतीने बोलतोयस.. असं वाटायचं की संसारात खेळीमेळीत अशी गोड भांडण चालतातंच.. पण आता जग्यालाही कोणीतरी बोललं? ओह नो. खरंच काय प्रॉब्लेम आहे रे तुझ्या घरी..? आपण डिस्कस करुन तो सोडवू शकतो..चल आजच संध्याकाळी ये ऑनलाईन निवांत.."
22 Nov 2012 - 6:06 pm | पैसा
राजकपूरच्या अंदाज पिच्चरची इश्टोरी आहे काय हो?
22 Nov 2012 - 7:19 pm | राघव
दोघांशीही वेगवेगळे बोलून आधी निश्चित करावे की नक्की तुमचे नाव नक्की कोणत्या संदर्भात वापरले गेलेले आहे.
त्यानुसार ज्याला जसे समजावून सांगण्याची गरज आहे तसे करून बघावे. एकदा ऐकले नाही तर दुसर्यांदा समजावून पहावे. यानंतरही व्यक्ती समजून घेत नसेल तर स्वत:स विचारावे की आपण समजावण्याचे १००% प्रयत्न केलेत काय? उत्तर होकारार्थी आले तर सरळ आपल्या कामाला लागावे, विचार करत बसू नये. उगाच प्रत्येक मूर्खाला शहाणे करण्याचा मूर्खपणा करत बसू नये.
स्वत:हून संबंध तोडू नयेत, पण या कारणाने तुटत असतील तर जोडण्याचा वृथा प्रयत्नही करू नये.
[रोखठोक] राघव.
22 Nov 2012 - 7:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नै पण तुम्ही जग्याला सांगायलाच नको होतं, की महेंद्रचं त्याच्या बायकोशी पटत नाही. आता चुकलंच आहे तर गवि म्हणतात तसंच म्हणा जगभरात नवरा बायकोच्या टीकल्या वाजत असतात त्यात काय मोठं म्हणुन सहज बोललो.
मित्र असो की मैत्रीण, बायको असो की प्रेयसी, बॉस असो की शिपाई, काका असो की पुतण्या, कोणत्याही नात्यागोत्यात आणि गोतावळ्यात कोणालाही कोणाचं कसं पटतं आणि कोणाचं कसं नाही. याची चर्चा करु नये, हे बालंट जगभर फिरुन आपल्याच अंगावर येतं. आणि नसतं ओझं मनावर घेऊन फिरावं लागतं.
-दिलीप बिरुटे
22 Nov 2012 - 11:38 pm | मन१
गावात नाही झाड अनं म्हणे एरंड्याला आला पाड.
मी जग्याला काहीच बोललेलो नाही. त्याचा मला एकदाच पिंग आलेला तेव्हा त्याने हाय्-हेलो झाल्यावर
सहज विचारलं:
"काय चाल्लय? अशात काही महेंद्रची खबरबात?"
मी म्हत्लं " ह्म्म. त्याचं बरय. घराजवळच ऑफिस नि मनासारखं काम. मजेत आहे लेकाचा."
.
मी जग्याला ह्या व्यतिरिक्त महेंद्रबद्दल काहीही बोललेलो नाही.
--मनोबा
23 Nov 2012 - 10:01 am | इरसाल
हम्म ... इथे तुम्ही पॉझ घेतला, मोठा श्वास घेवुन तेव्हा त्याला शंका आली असावी.
घराजवळ ऑफिस नि मनासारखं (म्हणजे तुमच्या सारखं "काम" हे काम कोणते काम आहे ?).
मजेत आहे लेकाचा. .....म्हणजेच त्याच्या बायकोने त्याच्या बरोबर काम करणार्या काही ललनांना पाहिले असावे.आणी तुम्ही जग्याला त्या ललनांबद्द्ल असुयेने बोलले असाल म्हणुन जग्याने ते महेंद्रला सांगताना त्याच्या बायकोने ऐकले असावे व त्यावरुन त्यांच्या टिकल्या (साभार प्रॉ.डॉ) फुटल्या असाव्यात, मग जग्याने आपल्यावरचे बालंट टाळण्यासाठी तुमचे नाव आनंदीला सॉरी सॉरी (हा बालिकावधु आणी सारख सारख जग्या चा परिणाम) वहिनीला पोहचते केले आणी बालंट तुमच्यावर आले.
हे वरचे जर तुम्हाला व्यवस्थित समजले तर मलाही समजवावे.
23 Nov 2012 - 10:34 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गावात नाही झाड अनं म्हणे एरंड्याला आला पाड.
अहाहा, लै भारी. :)
-दिलीप बिरुटे
23 Nov 2012 - 1:03 pm | विश्वनाथ मेहेंदळे
कुंथलगिरीकर :- गावात नाही झाड अनं म्हणे एरंडाला आला पाड.
न्यायाधीश :- म्हणजे
कुंथलगिरीकर :- म्हंजे देअर इज नॉट अ शिंगल ट्री इन होल व्हिलेज एन्ड समबडी सेज... की एरंडाला आला पाड! हाऊ इज इट पॉशीबल ?
क्लासिक !!!
23 Nov 2012 - 1:06 pm | बॅटमॅन
एक नंबर!! काय द्याचं बोला ;)
23 Nov 2012 - 4:56 pm | विश्वनाथ मेहेंदळे
पुढचा भाग पण भारी आहे
न्यायाधीश :- कुंथलगिरीकर, जे काही बोलायचे ते मराठीत बोला बघू.
कुंथलगिरीकर :- इंग्लिशचा प्रोब्लेम नाही बरे आपल्याला.
न्यायाधीश :- नाही, तुम्हाला प्रोब्लेम नसेल, पण तुमच्या इंग्लिशचा मला प्रोब्लेम आहे.
23 Nov 2012 - 5:30 pm | बॅटमॅन
आणि माझं आडनाव सर्वांनी म्हणत राहिलं तर कसं बरं वाटतं बघा- "कुंथलगिरीकर, कुंथलगिरीकर!!!" :D :D
23 Nov 2012 - 6:04 pm | अमृत
क्या इस्माईल मिया सुना तुमे कुंथल कुंथल्के मारे - अंग्रेज चित्रपट :-)
22 Nov 2012 - 11:40 pm | खटासि खट
खोटे बालंट आले असता लौकी ( भोपळा) आणून त्याच्यावर यथोचित विधी करून हळद कुंकू वाहून एका फडक्यात गुंडाळून त्यास घराच्या चौकटीवर किंवा दर्शनी भागात टांगले जाते. साधारणपणे एक महिना ते तीन महिना या कालावधीत भोपळ्यातून लाल पाणी निघाले तर बालंट टळले असे समजले जाते. यानंतर हा भोपळा अमावस्येला स्मशानात नेऊन चितेवर ठेवून जाळावा लागतो.
विधीचे नाव - बालनलंपट विधी
फायदे - वर सांगितल्याप्रमाणे
धोके - भोपळ्यातून लाल पाणी निघालेच नाही तर धोका आहेच. शिवाय अमावस्येच्या रात्री स्मशानात तुम्हाला कुणी पाहील्यास नवेच बालन तुमच्यावर येऊ शकते.
22 Nov 2012 - 11:42 pm | सूड
बालन आल्यास काही हरकत नसावी असे वाटते. बालंट टाळायची चर्चा अपेक्षित आहे.
23 Nov 2012 - 12:07 am | बॅटमॅन
रेशमी स्मिता ;) मग तर भोपळाच काय, भोपळ्याचे वेलच्या वेल लावतो मग :P
23 Nov 2012 - 12:08 am | अभ्या..
शीsss डर्टी कुठले ;)
23 Nov 2012 - 12:14 am | बॅटमॅन
ऊलाला ऊलाला, ऊलाला ऊलाला, बालन सगळ्यांची फँटसी :D :P
23 Nov 2012 - 1:03 am | जेनी...
विद्या बालण काय रे?
;)
23 Nov 2012 - 10:26 am | बॅटमॅन
नव्हे गे रेशमी स्मिता खरी|| :D
(साभार रामजोशी).
23 Nov 2012 - 12:16 am | सुहास..
बेरोजगारीची लक्षणे ;)
23 Nov 2012 - 6:42 am | स्पंदना
ये!!
तूला लयी काम हायती?
23 Nov 2012 - 2:12 pm | मृत्युन्जय
तुझा मित्र जग्यावर विश्वास ठेवेल याबद्दल खात्री वाटते. च्यामारी कुठला मित्र अश्या माणसावर विश्वास ठेवेले जो मित्राचे बायकोशी पटत नाही हे आंजावर कंठरवाने सांगत फिरत असतो. ते सुद्धा नावानिशी. अच्रत बावलत,
23 Nov 2012 - 2:21 pm | सूड
=))
23 Nov 2012 - 4:34 pm | आनंद घारे
"मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे | मना बोलणे नीच सोशीत जावे ||"
असे समर्थ रामदासस्वामी 'मना'ला सांगून गेले आहेत म्हणे. मग ते बालंट असू दे नाहीतर आणखी काही.
23 Nov 2012 - 6:52 pm | गणपा
ठ्याँ..
घारे काकांची सिक्सर. :)