weekend दिवशी
चिमुकली तनुली
आईला म्हणाली
weekdays दिवशी
असता मी सकाळी उठलेली
पाहुन तुला घरात नसलेली
होई मी किंचीत अळकुळी
मग
घेई मज आज्जी जवळी
पाहुनी माझ्या डोळी
म्हणे मला ती
नको होवू तू अळकुळी
तुजसम तुझी आई असता
अशीच घेही मी पण
जवळी तिला त्यावेळी
पण जवळी असे मी
तिच्या वेळी अवेळी
पक्षिण उडे आकाशी
परी लक्ष असे पिल्लाशी
आहे ना मी तुझ्या जवळी
मग का होतेस तू अळकुळी
येइल तुझी आई संध्याकाळी
श्रीकृष्ण सामंत