मला वाट्ते लहानपणी नककीच मी डोक्यवर पड्लो,
झक मारली आणी एन्जीनीअरिन्ग्ला आलो........
सतत नाईलाज म्हणुन लिहाव्या लागतात असाइन्मेन्ट्स,
विसराव्या लागल्या स्वत:शी केलेल्या क्मीट्मेन्ट्स..
म्रुगजळामागे धावल्यामुळे "माझ्या" आनन्दाला मुकलो,
झक मारली आणी एन्जीनीअरिन्ग्ला आलो........
टयुटोरियल्सच्या नावाखाली आम्हाला दिला जातो मानसिक त्रास,
सहन करावा लागतो कारण व्हायच असत पास..
गुलामगिरी करावी लागते सर्रास,
नाहीतर शिक्शकच के टी लावतात हमखास....
माझ्या स्वप्नाला मी ह्याचमुळे हुकलो,
झक मारली आणी एन्जीनीअरिन्ग्ला आलो........
कॉलेजच्या नियमावलीत लिहिल असत, (*२)
तुम्हाला पन्चाहत्तर ट्क्के अट्टेन्ड करावी लागतील लेक्चर्स..
त्यासोबत साम्भाळावे लागेल स्वत:च स्ट्रक्च्रर,
पण काय सान्गु तुम्हाला मी अभ्यासामुळे झालो आहे पन्क्च्रर..
ह्याचमुळे हेल्दी असणारा मी बारीक झालो..
झक मारली आणी एन्जीनीअरिन्ग्ला आलो........
एच.ओ.डी. म्हणतात प्रत्येक सेम मधे मिळवावा लागेल फर्स्ट् क्लास,
नाहीतर तू नाही होणार कॅम्पस इन्ट्र्व्यूसाटी पास..
करावा लागेल त्यासाटी भरपुर अभ्यास,
मग तरी मी का धरु क्रिकेट्साटीची माझी आस..
ह्याचमुळे बनायला गेलेलो धोनी पण मॅक्स्वेल झालो,
झक मारली आणी एन्जीनीअरिन्ग्ला आलो........
नेह्मी म्हणतात "मुम्बई आहे स्वप्नान्ची नग्री",
प्रत्येक माणसाचे ती स्वप्न पुर्ण करी..
तेच स्वप्न मी गेलो तिकडे करुन कॅरी,
पण ते झाल मिस्कॅरी..
क्रिकेट्कीट अईवजी कॉलेजसॅकचे ओझे वाहु लागलो,
झक मारली आणी एन्जीनीअरिन्ग्ला आलो........
[ तु- काळ ,भाउ- नशीब]
"तु" मला म्ह्णालास,
"आपण प्रयत्न कर्तोच आहे न बाळा...चालु तेव अभ्यास सोबत खडु आणि फळा.."..
अरे! मी किती दिवस सोसु अभ्यासाच्या झळा..?,
तुला माहीत आहे मला क्रिकेट सोडुन नाही कशाचाही लळा..
नेह्मीच तुझ्या व तुझ्या भावापुडे झुकत गेलो,
झक मारली आणी एन्जीनीअरिन्ग्ला आलो........
नेह्मीच मी माझ्या पोझिटिव थिन्किन्गमुळे फसलो,
दु:खात असताना सुद्धा खोटा खोटा हसलो...
पण आत्ल्याआत स्वतःवर रुसलो,
उत्तम सनधीची वाट बघत बसलो..
झक मारली आणी एन्जीनीअरिन्ग्ला आलो........
सतत अभ्यासामुळे सडतय माझ क्रिकेट कीट,
रोजच्या द्मछाकीचा आला आहे मला विट..
माझ्या प्र्श्नान्ची उत्तर कोणी देइल का नीट..?,
खेळायच नसेल तर का टेवू मी स्वत:ला फीट.?..
कधीतरी माझ क्रिकेट चालू होईल अशी आशा बाळ्गत राहिलो,
झक मारली आणी एन्जीनीअरिन्ग्ला आलो........
सतत प्रयत्न करुन करुन आता मी थकलो,
"क्रिकेट" ह्या गोश्टीलाच मी मुळात विसरलो..
"तुझी" व "तुझ्या भावाची" इच्छा म्हणून एन्जीनीअरिन्ग् मधे मिसळ्लो,
बससससस्स....आता ह्याचा विचार करुन दमलो...
"झक मारली आणी एन्जीनीअरिन्ग्ला आलो....!!!!!! "..
प्रतिक्रिया
13 Nov 2012 - 3:34 pm | दादा कोंडके
कवितेच्या (किंवा जे काही आहे त्याच्या) पहिल्या ओळीशी सहमत!
14 Nov 2012 - 12:10 am | आनंदी गोपाळ
+१
14 Nov 2012 - 2:45 am | उपाशी बोका
कविता म्हणून छान आहे, पण आशा आहे की या तुमच्या खऱ्या भावना नाहीत.
If you think education is expensive, try ignorance.
(इथे expensive म्हणजे फक्त महाग असा अर्थ न्हवे.)
14 Nov 2012 - 11:12 am | निश
रणजीत देशमुख साहेब, अप्रतिम कविता आहे.
14 Nov 2012 - 5:55 pm | ५० फक्त
रणजित साहेब, अजुन देखिल वेळ गेली नाही पुढच्या वर्षी आर्टसला अॅडमिशन घेता का बघा ?
15 Nov 2012 - 12:22 pm | llपुण्याचे पेशवेll
हा हा हा. मस्त आहे कविता.
15 Nov 2012 - 3:16 pm | रणजीत देशमुख
धन्यवाद...!!
16 Nov 2012 - 3:51 pm | योगेश९८८१
नेह्मीच मी माझ्या पोझिटिव थिन्किन्गमुळे फसलो,
दु:खात असताना सुद्धा खोटा खोटा हसलो...
पण आत्ल्याआत स्वतःवर रुसलो...... वा वा वा
16 Nov 2012 - 5:32 pm | ह भ प
जी.टी. मारण्याबद्दल कुठे उल्लेख नाही राव.. छ्या.. चुकल्या चुकल्या सारखं वाटलं..
20 Dec 2012 - 11:03 pm | रणजीत देशमुख
धन्यवाद....मित्रहो...