संता आणी बंता

अमोल केळकर's picture
अमोल केळकर in जे न देखे रवी...
28 Jun 2008 - 11:45 am

सरदारजींवरचे आपण नेहमी विनोद ऐकतो इतरांना सांगतो. त्यात ही संता आणी बंता ही आपली आवडती पात्रे.
त्यांचा एक विनोद गाण्यातुन सांगण्याचा एक प्रयत्न. कसा वाटला हा प्रयोग ते अवश्य सांगा.

आमची प्रेरणा - सध्या माझ्या १ वर्षाच्या मुलीचे अतीशय आवडते बालगीत

ससा हो ससा जसा कापुस जसा त्याने कासवाशी पैज लाविली !
वेगे वेगे जाऊ नी डोंगरावर जाऊ ही शर्यत रे अपुली !! ससा -

---------------------------------------------------------------------------
संता रे संता त्याचा फसण्याचा धंदा, त्याने बंताशी गोष्ट बोलली !
काही तरी करु नि दुनियेला फसवू, सांग आयडिया एक छानशी ! संता --

कोणे एके दिवशी, दोघे थांबी रस्त्यावरती, अन न्याहाळती आकाशहे सारे !
चाहुल घेही बंता, किती झाली गर्दी जमा, मनोमनी संताही सुखावे !
लोकही थांबुन तेथे पाहती आकाश ,जैसे पाहती संता अन बंता !!!

झाली सांज वेळ तो गेला किती काळ की रस्त्यावरती दिवे लागले !!
संता पाही मागे खुदकन हसे, की फसवले आपण सर्वांना !
फिरुनी मागे देखे ओशाळले ते दोघे राहिले उभे फक्त सरदार !!!!!

संता न बंता -

विडंबन

प्रतिक्रिया

पक्या's picture

29 Jun 2008 - 1:35 am | पक्या

विनोद गाण्यातून सांगण्याचा प्रयत्न चांगला आहे. 'सख्या रे घामट मी तरूणी ' पेक्षा निश्वितच चांगला.