मलई कोफ्ता

Primary tabs

Mrunalini's picture
Mrunalini in अन्न हे पूर्णब्रह्म
31 Oct 2012 - 5:54 am

साहित्यः

पनीर - १/२ वाटी
खवा - १/२ वाटी
मिक्स ड्रायफ्रुट्स (काजु, बदाम, पिस्ता, मणुका) - २ चमचे
काळि मिरी पावडर - २ चमचे
कॉर्नफ्लॉवर - १ चमचा
२ कांदे
काळि मिरी - २-३
लवंगा - १-२
दालचिनी - १ इंच तुकडा
आले-लसुण पेस्ट - १ चमचा
काजु - १/२ वाटी (१ तास भिजवुन त्याची पेस्ट करुन घ्यावी)
क्रिम - २ चमचे
हिरवी मिरची - १
गरम मसाला पावडर - १ चमचा
तुप - १/२ चमचा
तेल तळण्यासाठी
मिठ चवीनुसार


कृती:

१. एका पॅन मधे १/२ चमचा तुप गरम करावे. त्यात १ चमचा मिक्स ड्रायफ्रुट्स, १/२ चमचा काळि मिरी पवडर व एकदम थोडे मिठ टाकुन १ मिनिट परतावे. ते परतल्यावर बाजुला काढुन ठेवावे. कोफ्त्यांमधे भरण्या साठी सारण तयार आहे.
२. २ कांदे पाण्यामधे १० मिनिटे शिजवुन घ्यावेत. हे शिजवताना त्यात खडा गरम मसाला टाकावा.
३. कांदे शिजल्यावर त्यातील खडा गरम मसाला काढुन टाकावा व नंतर त्यात १ हिरवी मिरची टाकुन त्याची पेस्ट करुन घ्यावी.
४. कोफ्ते बनवण्यासाठी एका ताटलीमधे पनीर, खवा, कॉर्नफ्लॉवर, काळि मिरी पावडर व मिठ एकत्र मळुन घ्यावे. त्याचे गोळे बनवल्यावर त्याचे smooth surface झाले पाहिजे.
५. त्या मिश्रणातील एक गोळा घ्यावा. त्या मधे आपण आधी तयार केलेले सारण भरावे.

stuffing

६. हा तयार केलेला गोळा कॉर्नफ्लॉवर मधे घोळुन बाजुला ठेवावा. अशा प्रकारे सर्व गोळे करुन घ्यावेत.
७. कढईत तेल गरम करण्यास ठेवावे. तेल थोडे तापल्यावर त्यात हे गोळे सोडावेत.
८. कोफ्ते हे एकदम मंद आचेवर व हलका गुलाबी रंग येईपर्यंत तळावेत. कोफ्ते तयार आहेत.

gole

९. ग्रेव्ही करण्यासाठी कढईत तेल गरम करावे. त्यात वरील कांदा व मिरची ह्याची केलेली पेस्ट टाकुन १-२ मिनिट परतावे.
१०. २ मिनिटांनी त्यात आले-लसुण पेस्ट टाकावी. ह्यास बाजुने तेल सुटायला लागल्यावर त्यात काजुची केलेली पेस्ट टाकुन परतावे.
११. काजुची पेस्ट करपण्याची शक्यता असते. त्यामुळे ग्रेव्ही सतत हलवत रहावी. बाजुने तेल सुटायला लागल्यावर त्यात पाणी व व टाकुन १-२ मिनिटे मंद आचेवर शिजवावे. त्यावर वरतुन २ चमचे क्रिम, चवीनुसार मिठ व गरम मसाला टाकुन मिक्स करावे. गॅस बंद करावा.
१२. मलई कोफ्ता serve करताना बाऊल मधे कोफ्ते ठेवावेत व त्यावर वरतुन हि ग्रेव्ही सोडावी. डाळिंबाचे दाणे, ड्रायफ्रुट्स व कोथिंबीरने सजवावे.

gravy

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

31 Oct 2012 - 5:57 am | श्रीरंग_जोशी

पाककृती व फोटोज दोन्हीही खासंच.

स्पंदना's picture

31 Oct 2012 - 6:14 am | स्पंदना

झकास! करुन पहाते.

रेवती's picture

31 Oct 2012 - 6:58 am | रेवती

या अल्लाऽऽऽ...
अश्या प्रकारचे मलई कोफ्ते पहिल्यांदाच पहात आहे. पाकृही करून पहता येईल अशी आहे.छानच!
मला माहित असलेली कृती इतकी भयानक खटपटीची आहे की एकदा ती केल्यावर हिरव्या मैत्रिणीने खाऊन पुन्हा एकदा करावयास सांगितले आणि मला कापरे भरल्याचे आठवते.
फोटू भारी भारी आणि भारी.

लई बेक्कार, आता हे करुन खायचं म्हणलं की डाएट प्लॅन अजुन थोडा पुढं ढकलावा लागेल.

प्रचेतस's picture

31 Oct 2012 - 8:20 am | प्रचेतस

जाम भारी दिसताहेत कोफ्ते.

मदनबाण's picture

31 Oct 2012 - 9:33 am | मदनबाण

खल्लास ! :)

इरसाल's picture

31 Oct 2012 - 9:39 am | इरसाल

नवर्‍याला चांगल खायला घालतोय असे आमिष दाखवुन चांगले चांगले अप्रतिम फोटो काढवुन घ्यायचे आणी सर्व स्तुती मात्र आपण लुटायची.

जबरदस्त फोटो काढणार्‍या नवर्‍याचा श्रेयअव्हेर केल्याबद्दल निषेध.(एवढी भारी पाकृ आहे. काय ते रोज रोज तारीफ करायची)

अत्रुप्त आत्मा's picture

31 Oct 2012 - 10:28 am | अत्रुप्त आत्मा

http://mimarathi.net/modules/smileys/packs/Example/smiley-shocked018.gifhttp://mimarathi.net/modules/smileys/packs/Example/smiley-shocked018.gifhttp://mimarathi.net/modules/smileys/packs/Example/smiley-shocked018.gif

कवितानागेश's picture

31 Oct 2012 - 11:58 am | कवितानागेश

बरीच सोपी केलेली आहे पाकृ. धन्यवाद.
इथली लग्नाळू पोरंसुद्धा सहज करु शकतील. :P

स्वाती दिनेश's picture

31 Oct 2012 - 12:56 pm | स्वाती दिनेश

मलाई कोफ्ता मस्तच ग!
आणि फोटो तर क्लासच!
स्वाती

फोटो पाहिल्यावर पदार्थाच नाव परत परत वाचुन खात्री केली की हे मलाई कोफ्तेच आहेत ना?
एखाद्या डेसर्ट्ला लाजवेल अशी पाककृती.
फोटु काढण्यार्‍याचंही कौतुक.

चिगो's picture

31 Oct 2012 - 2:26 pm | चिगो

हेच म्हणतो.. जबराट पाकृ आणि फोटो..

प्रभाकर पेठकर's picture

31 Oct 2012 - 2:38 pm | प्रभाकर पेठकर

वेळ मिळताच करून 'खाल्ली' पाहिजे. माहित नाही कधी..!

निव्वळ अप्रतिम.

आम्हालाही बोलवा

मंडळ आपले आभारी आहे. :)

जबरदस्त फोटो काढणार्‍या नवर्‍याचा श्रेयअव्हेर केल्याबद्दल निषेध.(एवढी भारी पाकृ आहे. काय ते रोज रोज तारीफ करायची)--->

नाही हो... मी फोटोचे पुर्ण श्रेय निशांतलाच देते.. ;)

इरसाल's picture

31 Oct 2012 - 2:47 pm | इरसाल

यक डोला तिरका करुनशिनी आगावु शंका :
कदी निशांतचा उल्लेख दिसला न्हाय त्यो ?

स्पंदना's picture

1 Nov 2012 - 11:32 am | स्पंदना

नाव वाचा इरसाल्..नि शां त.

इरसाल's picture

3 Nov 2012 - 4:15 pm | इरसाल

मी शांत.

अभिजितमोहोळकर's picture

31 Oct 2012 - 3:46 pm | अभिजितमोहोळकर

जबरदस्त!!!

मलई कोफ्ता हा प्रकार गोडसर असल्याने हाटिलात कधीही खायचं धाडस केलं नाही. गेल्या थर्टिफर्स्टला एका गुज्जु मित्राच्या आग्रहाखातर घेतलं खरं, पण हे डेझर्ट म्हणून मागवलं असतं तर बरं इतकं गोड होतं. आता मात्र पाकृ आणि फोटो बघून घरी करुन बघावसं वाटतंय.

पैसा's picture

31 Oct 2012 - 6:27 pm | पैसा

असल्या पाकृ करायच्या आणि वरनं फोटो टाकायचे म्हणजे दुष्टपणाचा कळस आहे! हा धागा उघडणार नाही असा निश्चय १० वेळा तरी केला असेल! गेला फुकट!

निवेदिता-ताई's picture

31 Oct 2012 - 6:41 pm | निवेदिता-ताई

खूपच छान.......मस्त मस्त...... :)

तिमा's picture

31 Oct 2012 - 7:12 pm | तिमा

मी उडप्याच्या हॉटेलात मिळणार्‍या डिशलाच मलई कोफ्ता समजत होतो. ही डिश तर भारीच आहे. बायकोला सक्तीने वाचायला लावण्यात येईल.

अनन्न्या's picture

31 Oct 2012 - 7:50 pm | अनन्न्या

फोटो पाहून तोंडाला पाणी सुटले, पण नुसते पहावे लागणार.

खादाड's picture

1 Nov 2012 - 12:08 pm | खादाड

फॉक्स ट्र्व्ह्लर मधल्या एखाद्या फ्रेन्च हॉटेलातली महागडी डीश दिसावि तशी exotic का काय म्ह्णतात तशी दिसते आहे !!

पियुशा's picture

1 Nov 2012 - 2:50 pm | पियुशा

सुपर्ब ....!!!!!!!!!!!!

कच्ची कैरी's picture

1 Nov 2012 - 5:03 pm | कच्ची कैरी

उत्कृष्ट पाककृती,उत्कृष्ट फोटो ,उत्कृष्ट सादरिकरण फुल्ल १० ऑन १० (नेहमीप्रमाणेच )
http://mejwani.in/

मी_आहे_ना's picture

1 Nov 2012 - 5:11 pm | मी_आहे_ना

मस्त पाकृ. आणि फोटो सुद्धा झकास.

स्मिता शितूत's picture

1 Nov 2012 - 5:23 pm | स्मिता शितूत

कालच करून बघितली खुपच छान .... अप्रतिम होटेलातील गोड असते पण आमच्या अहोना खुपच आवडली परत करण्याचा प्रस्ताव आला आहे. धन्यवाद छान पाकृ दाखवल्याबद्दल!!!!!

अरे वा... सही.... धन्यवाद :)

दुसर्‍या व तिसर्‍या प्रचिंची निवड मिपावरील काही सर्वोत्तम फूड फोटोग्राफ्स मध्ये करता येईल. माझ्या फूड फोटोग्राफीवरील आगामी लेखात या प्रचिंचा संदर्भ नक्की देईन.

Mrunalini's picture

3 Nov 2012 - 4:02 pm | Mrunalini

:)...धन्यवाद!!!

Mrunalini जी, एकदम भारी रेसिपी आहे.
मुळात आधीच असलेल माझ १००+ किलो वजन १२५+ पार करुन जाणार बहुतेक अशी ज्याम मस्त रेसिपी दिली आहेत तुम्ही,

सानिकास्वप्निल's picture

4 Nov 2012 - 12:27 pm | सानिकास्वप्निल

जबरदस्त!!

क्लास :)