मलई कोफ्ता
साहित्यः
पनीर - १/२ वाटी
खवा - १/२ वाटी
मिक्स ड्रायफ्रुट्स (काजु, बदाम, पिस्ता, मणुका) - २ चमचे
काळि मिरी पावडर - २ चमचे
कॉर्नफ्लॉवर - १ चमचा
२ कांदे
काळि मिरी - २-३
लवंगा - १-२
दालचिनी - १ इंच तुकडा
आले-लसुण पेस्ट - १ चमचा
काजु - १/२ वाटी (१ तास भिजवुन त्याची पेस्ट करुन घ्यावी)
क्रिम - २ चमचे
हिरवी मिरची - १
गरम मसाला पावडर - १ चमचा
तुप - १/२ चमचा
तेल तळण्यासाठी
मिठ चवीनुसार
कृती:
१. एका पॅन मधे १/२ चमचा तुप गरम करावे. त्यात १ चमचा मिक्स ड्रायफ्रुट्स, १/२ चमचा काळि मिरी पवडर व एकदम थोडे मिठ टाकुन १ मिनिट परतावे. ते परतल्यावर बाजुला काढुन ठेवावे. कोफ्त्यांमधे भरण्या साठी सारण तयार आहे.
२. २ कांदे पाण्यामधे १० मिनिटे शिजवुन घ्यावेत. हे शिजवताना त्यात खडा गरम मसाला टाकावा.
३. कांदे शिजल्यावर त्यातील खडा गरम मसाला काढुन टाकावा व नंतर त्यात १ हिरवी मिरची टाकुन त्याची पेस्ट करुन घ्यावी.
४. कोफ्ते बनवण्यासाठी एका ताटलीमधे पनीर, खवा, कॉर्नफ्लॉवर, काळि मिरी पावडर व मिठ एकत्र मळुन घ्यावे. त्याचे गोळे बनवल्यावर त्याचे smooth surface झाले पाहिजे.
५. त्या मिश्रणातील एक गोळा घ्यावा. त्या मधे आपण आधी तयार केलेले सारण भरावे.
६. हा तयार केलेला गोळा कॉर्नफ्लॉवर मधे घोळुन बाजुला ठेवावा. अशा प्रकारे सर्व गोळे करुन घ्यावेत.
७. कढईत तेल गरम करण्यास ठेवावे. तेल थोडे तापल्यावर त्यात हे गोळे सोडावेत.
८. कोफ्ते हे एकदम मंद आचेवर व हलका गुलाबी रंग येईपर्यंत तळावेत. कोफ्ते तयार आहेत.
९. ग्रेव्ही करण्यासाठी कढईत तेल गरम करावे. त्यात वरील कांदा व मिरची ह्याची केलेली पेस्ट टाकुन १-२ मिनिट परतावे.
१०. २ मिनिटांनी त्यात आले-लसुण पेस्ट टाकावी. ह्यास बाजुने तेल सुटायला लागल्यावर त्यात काजुची केलेली पेस्ट टाकुन परतावे.
११. काजुची पेस्ट करपण्याची शक्यता असते. त्यामुळे ग्रेव्ही सतत हलवत रहावी. बाजुने तेल सुटायला लागल्यावर त्यात पाणी व व टाकुन १-२ मिनिटे मंद आचेवर शिजवावे. त्यावर वरतुन २ चमचे क्रिम, चवीनुसार मिठ व गरम मसाला टाकुन मिक्स करावे. गॅस बंद करावा.
१२. मलई कोफ्ता serve करताना बाऊल मधे कोफ्ते ठेवावेत व त्यावर वरतुन हि ग्रेव्ही सोडावी. डाळिंबाचे दाणे, ड्रायफ्रुट्स व कोथिंबीरने सजवावे.

६. हा तयार केलेला गोळा कॉर्नफ्लॉवर मधे घोळुन बाजुला ठेवावा. अशा प्रकारे सर्व गोळे करुन घ्यावेत.
७. कढईत तेल गरम करण्यास ठेवावे. तेल थोडे तापल्यावर त्यात हे गोळे सोडावेत.
८. कोफ्ते हे एकदम मंद आचेवर व हलका गुलाबी रंग येईपर्यंत तळावेत. कोफ्ते तयार आहेत.
९. ग्रेव्ही करण्यासाठी कढईत तेल गरम करावे. त्यात वरील कांदा व मिरची ह्याची केलेली पेस्ट टाकुन १-२ मिनिट परतावे.
१०. २ मिनिटांनी त्यात आले-लसुण पेस्ट टाकावी. ह्यास बाजुने तेल सुटायला लागल्यावर त्यात काजुची केलेली पेस्ट टाकुन परतावे.
११. काजुची पेस्ट करपण्याची शक्यता असते. त्यामुळे ग्रेव्ही सतत हलवत रहावी. बाजुने तेल सुटायला लागल्यावर त्यात पाणी व व टाकुन १-२ मिनिटे मंद आचेवर शिजवावे. त्यावर वरतुन २ चमचे क्रिम, चवीनुसार मिठ व गरम मसाला टाकुन मिक्स करावे. गॅस बंद करावा.
१२. मलई कोफ्ता serve करताना बाऊल मधे कोफ्ते ठेवावेत व त्यावर वरतुन हि ग्रेव्ही सोडावी. डाळिंबाचे दाणे, ड्रायफ्रुट्स व कोथिंबीरने सजवावे.

वाचने
52091
वाचनखूण
प्रतिक्रिया
34
पाककृती व फोटोज दोन्हीही खासंच.
झकास! करुन पहाते.
या अल्लाऽऽऽ...
अश्या प्रकारचे मलई कोफ्ते पहिल्यांदाच पहात आहे. पाकृही करून पहता येईल अशी आहे.छानच!
मला माहित असलेली कृती इतकी भयानक खटपटीची आहे की एकदा ती केल्यावर हिरव्या मैत्रिणीने खाऊन पुन्हा एकदा करावयास सांगितले आणि मला कापरे भरल्याचे आठवते.
फोटू भारी भारी आणि भारी.
लई बेक्कार, आता हे करुन खायचं म्हणलं की डाएट प्लॅन अजुन थोडा पुढं ढकलावा लागेल.
जाम भारी दिसताहेत कोफ्ते.
खल्लास ! :)
नवर्याला चांगल खायला घालतोय असे आमिष दाखवुन चांगले चांगले अप्रतिम फोटो काढवुन घ्यायचे आणी सर्व स्तुती मात्र आपण लुटायची.
जबरदस्त फोटो काढणार्या नवर्याचा श्रेयअव्हेर केल्याबद्दल निषेध.(एवढी भारी पाकृ आहे. काय ते रोज रोज तारीफ करायची)

बरीच सोपी केलेली आहे पाकृ. धन्यवाद.
इथली लग्नाळू पोरंसुद्धा सहज करु शकतील. :P
मलाई कोफ्ता मस्तच ग!
आणि फोटो तर क्लासच!
स्वाती
फोटो पाहिल्यावर पदार्थाच नाव परत परत वाचुन खात्री केली की हे मलाई कोफ्तेच आहेत ना?
एखाद्या डेसर्ट्ला लाजवेल अशी पाककृती.
फोटु काढण्यार्याचंही कौतुक.
In reply to फोटो पाहिल्यावर पदार्थाच नाव by गणपा
हेच म्हणतो.. जबराट पाकृ आणि फोटो..
वेळ मिळताच करून 'खाल्ली' पाहिजे. माहित नाही कधी..!
निव्वळ अप्रतिम.
In reply to अप्रतिम. by प्रभाकर पेठकर
आम्हालाही बोलवा
मंडळ आपले आभारी आहे. :)
---नवर्याला चांगल खायला घालतोय असे आमिष दाखवुन चांगले चांगले अप्रतिम फोटो काढवुन घ्यायचे आणी सर्व स्तुती मात्र आपण लुटायची.
जबरदस्त फोटो काढणार्या नवर्याचा श्रेयअव्हेर केल्याबद्दल निषेध.(एवढी भारी पाकृ आहे. काय ते रोज रोज तारीफ करायची)--->
नाही हो... मी फोटोचे पुर्ण श्रेय निशांतलाच देते.. ;)
In reply to मंडळ आपले आभारी आहे. by Mrunalini
यक डोला तिरका करुनशिनी आगावु शंका :
कदी निशांतचा उल्लेख दिसला न्हाय त्यो ?
In reply to हुम्म्म्म by इरसाल
नाव वाचा इरसाल्..नि शां त.
In reply to नाव वाचा इरसाल्..नि शां त. by स्पंदना
मी शांत.
जबरदस्त!!!
मलई कोफ्ता हा प्रकार गोडसर असल्याने हाटिलात कधीही खायचं धाडस केलं नाही. गेल्या थर्टिफर्स्टला एका गुज्जु मित्राच्या आग्रहाखातर घेतलं खरं, पण हे डेझर्ट म्हणून मागवलं असतं तर बरं इतकं गोड होतं. आता मात्र पाकृ आणि फोटो बघून घरी करुन बघावसं वाटतंय.
असल्या पाकृ करायच्या आणि वरनं फोटो टाकायचे म्हणजे दुष्टपणाचा कळस आहे! हा धागा उघडणार नाही असा निश्चय १० वेळा तरी केला असेल! गेला फुकट!
खूपच छान.......मस्त मस्त...... :)
मी उडप्याच्या हॉटेलात मिळणार्या डिशलाच मलई कोफ्ता समजत होतो. ही डिश तर भारीच आहे. बायकोला सक्तीने वाचायला लावण्यात येईल.
फोटो पाहून तोंडाला पाणी सुटले, पण नुसते पहावे लागणार.
फॉक्स ट्र्व्ह्लर मधल्या एखाद्या फ्रेन्च हॉटेलातली महागडी डीश दिसावि तशी exotic का काय म्ह्णतात तशी दिसते आहे !!
सुपर्ब ....!!!!!!!!!!!!
उत्कृष्ट पाककृती,उत्कृष्ट फोटो ,उत्कृष्ट सादरिकरण फुल्ल १० ऑन १० (नेहमीप्रमाणेच )
http://mejwani.in/
मस्त पाकृ. आणि फोटो सुद्धा झकास.
कालच करून बघितली खुपच छान .... अप्रतिम होटेलातील गोड असते पण आमच्या अहोना खुपच आवडली परत करण्याचा प्रस्ताव आला आहे. धन्यवाद छान पाकृ दाखवल्याबद्दल!!!!!
In reply to भन्नाट!!!!!!! by स्मिता शितूत
अरे वा... सही.... धन्यवाद :)
दुसर्या व तिसर्या प्रचिंची निवड मिपावरील काही सर्वोत्तम फूड फोटोग्राफ्स मध्ये करता येईल. माझ्या फूड फोटोग्राफीवरील आगामी लेखात या प्रचिंचा संदर्भ नक्की देईन.
In reply to प्रकाशचित्रे अतिशय उत्तम आहेत. by एस
:)...धन्यवाद!!!
Mrunalini जी, एकदम भारी रेसिपी आहे.
मुळात आधीच असलेल माझ १००+ किलो वजन १२५+ पार करुन जाणार बहुतेक अशी ज्याम मस्त रेसिपी दिली आहेत तुम्ही,
जबरदस्त!!
क्लास :)
खासंच