विकसनासाठी आयडीयाची कल्पना द्या.

मितभाषी's picture
मितभाषी in काथ्याकूट
29 Oct 2012 - 4:32 pm
गाभा: 

नमस्कार मंडळी,
आमची ३५ एकर पडीक जमीन आहे. सोबत फोटो जोडले आहेत. सदरच्या जमीनीचे विकसनासाठी आपापल्या आयडीया कळवा.

लोकेशन :
ही जागा पुणे-नाशिक हायवेवर आहे. पुणे आणि नाशिकच्या मध्यावर आहे (अंदाजे १०० किमी अंतर).
पायथ्याशी पाण्याचा स्पॉट आहे. तिथून पाण्याची व्यवस्था करता येईल.

धन्यवाद.

.

.

प्रतिक्रिया

-पडीक म्हणजे नापीक असं गृहीत धरतो.
-भारतीय सिस्टीमनुसार अनलेस अदरवाईज स्पेसिफाईड, सर्व जमीन ही शेतजमीन असते या नियमानुसार ही शेतजमीनच आहे असं गृहीत धरतो.

आता नेमकी कुठे आहे जमीन यावर बाकी कल्पना अवलंबून. जिल्हा, तालुका इतक्या तपशिलाची तरी गरज लागेलच.

आता नेमकी कुठे आहे जमीन यावर बाकी कल्पना अवलंबून. जिल्हा, तालुका इतक्या तपशिलाची तरी गरज लागेलच.

सहमत.
एखाद रिसॉर्ट / वॉटर पार्क काढा.

कुंदन's picture

29 Oct 2012 - 4:39 pm | कुंदन

सागाची झाडे लावता येतील का?
रॉक क्लायंबिंग , रॅपलिंग सारखे साहसी खेळांची शिबीरे भरवता येतील का?

लवासा सारखे हिल स्टेशन विकसित करता येईल का?

मितभाषी's picture

29 Oct 2012 - 4:47 pm | मितभाषी

गवि डोंगरावर शेतं आहेत. आजोबांच्या काळात ती शेतजमीन कसली जायची. आम्ही सध्या पिकं घेत नाही. सध्या गुरे चरतात तिथे. त्यामुळे पडीक हा शब्द वापरला आहे. पायथ्याशी पाण्याचा स्पॉत आहे. तिथून पाण्याची व्यवस्था करता येईल. हा स्पॉट पुणे-नाशिक हायवेवर आहे. पुणे आणि नाशिकचा सेंतर पोईंट आहे (१०० किमी अंतर आहे).

गवि's picture

29 Oct 2012 - 4:52 pm | गवि

लोकेशन चांगलं आहे.

विकसन या शब्दामागे व्यावसायिक, मिळकतीसाठी, उद्योगधंदा म्हणून असा अर्थ अभिप्रेत आहे की सामाजिक, चॅरिटी, संस्था असं सोशल कॉज मनात आहे?

विकसन या शब्दामागे व्यावसायिक, मिळकतीसाठी, उद्योगधंदा म्हणून असा अर्थ अभिप्रेत आहे की सामाजिक, चॅरिटी, संस्था असं सोशल कॉज मनात आहे?

पहिला उद्देश ह्या पडीक जमीनीतून काही उत्पन्नाचे साधन तयार करणे आहे. त्यांनंतर सेकंड फेजमधे निसर्गपर्यटन्/मामाचा गाव अशी संकल्पना राबवणेचा विचार आहे.
संपूर्ण चॅरीटी किंवा पूर्णत: व्यवसायिक दृष्टीकोण नाही. तुमच्या संकल्पना सांगत चला त्यातुन माझाही दृष्टीकोण पक्का होण्यास मदत होईल. :)

एमूपालनाचा विचार अजिबात करु नका. ते एक फ्रॉड आहे असं हल्ली वाचण्यात आलं आहे. पडीक जमिनीत मार्केटिंगला भुलून अनेक एमू फार्म्स धडाधड चालू केली गेली आणि आता सत्याचा शोध लागायला लागला की मूळ कल्पना भरवून देणार्‍यांनी सांगितलेली बरीचशी माहिती चुकीची निघाली आहे. या पक्ष्याला अजिबात मागणी नाही. ते नीट शिजतही नाहीत. त्याला चव नाही. जगातल्या एमूच्या मूळ देशांसहित अन्य कोणत्याही देशात त्याचं मांस खाल्लं जात नाही. त्याचं अंडं १० हजाराला विकलं जातं अशी माहिती चुकीची आहे. त्या अंड्याला मागणी नाही.

आता अनेकांवर हॉटेलांमधे फिरुन फुकट सॅम्पल मटण वाटण्याची किंवा डोईजड झालेले ते बोजड पक्षी जंगलात सोडण्याची वेळ येते आहे. इत्यादि.

स्त्रोत : अनेक आहेत. नमुन्यासाठी काही:

http://www.business-standard.com/india/news/fraud-hit-emu-farming-indust...

http://articles.timesofindia.indiatimes.com/2012-08-09/coimbatore/331181...

एमूपालनाचा विचार अजिबात करु

नक्कीच नाही करणार. मी ७-८ वर्षापूर्वी नारायणगाव्-बारामती या ठिकाणी जावून सगळी माहीती गोळा केली होती. त्यावेलेस निर्णयस्वातंत्र्य नसल्यामुळे करता आले नाही (आता तेच योग्य झाले असे वाटते). माझ्या एका मित्राचे गावाजवळच इमू आहेत. त्यांची अवस्था वाईट आहे.

मी_आहे_ना's picture

29 Oct 2012 - 5:26 pm | मी_आहे_ना

डोंगर आहे तर एखाद्या किल्ल्याची प्रतिकृती 'कम' रिझॉर्ट छान होवू शकेल. (अर्थात, व्यावसायिक दृष्टीने विचार करता)

अन्या दातार's picture

29 Oct 2012 - 6:25 pm | अन्या दातार

देउळ बांधा. ;-)

प्रकाश घाटपांडे's picture

29 Oct 2012 - 7:02 pm | प्रकाश घाटपांडे

हे एकदम बेष्ट आन्सर हाये! लई कमवाल. एखादी मूर्ती जमीनीतून प्रकट झाली अशी आवई उठवा!

सूड's picture

29 Oct 2012 - 7:12 pm | सूड

अगदी अगदी !!

विलासराव's picture

29 Oct 2012 - 7:04 pm | विलासराव

अर्धी तरी जमीन (कमीत कमी) विपश्यना सेंटर चालु करण्यासाठी दान करा. कसं पीक येईल ते तर तुम्हाला माहीतच आहे. त्याची किंमतही तुम्हाला माहीत आहेच.
बाकीच्या अर्ध्यात काय करायचं ते तुमचं तुम्ही ठरवा.

पिंगू's picture

29 Oct 2012 - 7:59 pm | पिंगू

नविन आयडिया देतो.

गॅस सिलिंडरची शेती करा.

- पिंगू

बन्या बापु's picture

29 Oct 2012 - 9:31 pm | बन्या बापु

सर्वप्रथम खालील गोष्टींची खात्रीपूर्वक अंमलबजावणी करा:

१.
जमीन वडिलोपार्जित असल्यास आणि आपल्या नावावर नुकतीच झाली असल्यास सर्वप्रथम ७ /१२ चा उतारा काढून घ्या. स्थानिक वृत्तपत्रामध्ये जाहिरात देऊन मालकीहक्क प्रस्थापित करा.

२.

जमीन पडीक आहे असे म्हणता आहात म्हणून, जमिनीची मोजणी आणि आखणी करून घ्या. जमल्यास तारेचे कुंपण घालून त्यावर आपल्या मालकीहक्काची जाणीव करून देणारा फलक लावा. वहिवाटीचा हक्क कुणालाही देऊ नका, पाण्याचा स्पॉट आहे म्हणजे नक्की काय आहे ? विहीर आहे, झरा आहे ? त्यावर सार्वजनिक पाणवठा होणार नाही ह्याची काळजी घ्या.

आता व्यवसाय काय करायचा ते आपल्या स्वत:च्या वेळ, पैसा ह्याच्या investment वर सारे अवलंबून आहे. काही पर्याय:

१. शेती सुरु करा. एकदा ते जमले कि मग मामाचा गाव वैगेरे संकल्पना जमतील.
२. हॉटेल काढा / रिसोर्ट काढा.
३. प्लॉट पाडुन विकून मोकळे व्हा.

बाकी जाणकार प्रकाश टाकतीलच..

श्री. बन्याबापु, सध्याच्या परिस्थितीत सर्वात योग्य प्रतिसाद. फार उघड बोलतो राग मानु नका किंवा घाबरु नका पण वर बन्याबापुंनी सांगितलं आहे हे सगळं करुन पुढचं वर्ष पार पडलं की आणि त्यानंतर तुम्ही चर्चा करण्याच्या परिस्थितीत राहिलात किंवा संपुर्ण जमिन तुमचीच आहे हे निश्चित झालं तर मग पुढचा विचार करा , अर्थात हे आता केलेलं असेल तर भाग वेगळा.

कारण, तुम्ही सांगत आहात त्या पट्ट्यात डोंगराच्या आसपास ३०-३५ एकरचा पडीक,( वापरात किंवा मुळ मालकांचा फारसा वावर नसलेला तुकडा) म्हणजे कोळ्शाची खाण आहे.(आजकाल सोन्याची खाण म्हणणं डाउनमार्केट वाटतं). गेला बाजार २०० रु.स्के.फुट तरी भाव चालु असेल. म्हणजे ७५-९० लाख एका एकराला. आता या हिशोबानं ३०-३५ एकराची किंमत याचा विचार करा.आणि अशा जमिनिची मालकी, जमिन विकत न घेता इतर मार्गांनी मिळवणे हे फार स्वस्त आहे, आणि असे मार्ग माहित असणारे आणि अवलंबणारे देखील कमी नाहीत.

सर्वात महत्वाचे म्हणजे अतिशय सावध रहा, घाबरवत नाही पण डायरेक्ट जमिन व्यवहारांशी संबंध नसला तरी याच घंद्यात आहे म्हणुन सांगतो.

मी एक उत्तमशी निवासी शाळा काढण्याचा पर्याय सुचवत होतो. पण ते सर्व क्लिअर टायटल आणि शांततापूर्ण फिजिकल पझेशन आहे असं गृहीत धरुन. अजूनपर्यंत बराच काळ पडीक राहिलेली जमीन असेल तर तिच्यावर कोणी गिधाडं बसली नसतील ही शक्यता आजच्या काळात फार कमी.

फार काही बोलत नाही. पण ५०फक्तशी खेदपूर्वक सहमत असं व्यक्तिगत वेदनापूर्ण अनुभवामुळे म्हणावं लागतंय.

वसईचे किल्लेदार's picture

29 Oct 2012 - 9:32 pm | वसईचे किल्लेदार

विका

डीवी़'s picture

29 Oct 2012 - 10:49 pm | डीवी़

मिक्रो लवासा सित्य वसव

कवितानागेश's picture

30 Oct 2012 - 12:16 am | कवितानागेश

विकता का हो १-२ एकर? :P

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

30 Oct 2012 - 9:04 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

तुमच्याकडे भान्डवल असेल तर अन्न प्रक्रिया उद्योग सुरु करु शकता. नाशिक पासून जेमतेम १०० कि.मी. अन्तरावर आहे मग तुम्ही वायनरी सुद्धा सुरु करु शकता (अर्थात वीज, पाणी आणि मनुष्यबळ उपलब्ध असेल तरच). बाकीच्या फळान्ची उपलब्धी असेल तर जूस, ज्याम उद्योग सुरु करू शकता.

दुसरा पर्याय म्हणजे एखादे "भटक ठिकाण" सुरु करु शकता.

तिसरा पर्याय फूल शेती असा आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Nov 2012 - 3:12 pm | डॉ सुहास म्हात्रे

विकणे असल्यास व्यनि करावा.

swaraaj's picture

9 Nov 2012 - 4:24 pm | swaraaj

त्या जागेत ओर्गानिक म्हन्जे केमिकल फ्री फार्म आनि निसरगोप्चार केन्द् सुरु करा.सोलर विन्द आनि ह्य्द्रो एनर्जि वपरुन तेथे स्वयम्पुर्न गाव वसवता येइल.तुम्चि प्रक्रुति पन कायम निरोगि राहिल.अनेकान रोज्गार मिलेल.एकाच गोस्त्वर अवलुम्बन न रहाता एक्मेकना पुरक व्यवसाय करा.जो जास्त चालेल आनि तुम्च्या मनाला समाधान देइल त्यावर नन्तर जास्त लक्श्य केन्द्रित करा.शेवति जनाचे ऐका आनि मनाला पतेल ते करा. बेस्त ओफ लक