कताई शास्त्रात गणिताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सुताचे नंबरिंग अजूनही भारतात FPS system मध्येच जास्त प्रचलित आहे.
त्याला ईंग्लिश नंबरिंग सिस्टीम असे म्हणतात व त्याचे युनिट काउंट अथवा ईंग्लिश नंबर हे आहे ( Ne) .
जर ८४० यार्ड सुताचे वजन १ पौंड (४५४.५ ग्राम) भरले तर त्या सुतास १ काउंटचे ( 1 Ne or 1s) सुत म्हणतात. (सुता आधीच्या प्रक्रियेतील मालास हँक (Hank) असे म्हणतात, व्याख्या तिच )
याच प्रमाणे २० काउंट चे सुत म्हणजे २० x ८४० एवढ्या लांबीचे, वजनात १ पौंड भरणारे सुत, अथवा ३४ काउंट चे सुत म्हणजे ३४ x ८४० एवढ्या लांबीचे वजनात १ पौंड भरणारे सुत.
वरिल उदाहरणावरुन आपल्याला लक्षात आलेच असेल कि जितक्या जास्त काउंटचे सुत तितके ते बारीक अथवा तलम होते.
सर्वसाधारणपणे १४ ते २४ काऊट चे सुत चादरी, टॉवेल्,बेडशीट वगैरे जाड कापडास व ४० ते १०० नंबरचे धोतरे, पातळे,
वगैरे तलम कापडास वापरतात.
पुढील प्रक्रिया म्हणजे ड्रॉईंग
कार्डींग मध्ये कापसाचे स्वतंत्रीकरण ( individualization / fiber to fiber separation) होते हे आपण मागील भागात पाहिले.
परंतू कार्डिंगमधून विलग झालेले तंतू वाकडॅतिकडे असतात (crisscrossed), ते एकमेकांशी समांतर नसतात. सुताच्या निर्मितीसाठी हे तंतू समांतर ( parallel) करणे आवश्यक असते. तसेच त्याचे प्रती एकक लांबी वजन ( weight per unit length) सुधारण्याचे महत्त्वाचे कार्य पुढील प्रक्रियेत होते. त्यासाठी कापसाचे तंतू दोन ग्रिप मध्ये पकडून त्यांना ओढले जाते
त्यामुळे ते समांतर होतात. म्हणून त्या मशिनला ड्रॉ फ्रेम (draw frame) असे नाव आहे.
ड्रॉ फ्रेम मध्ये मागिल बाजूस कार्डिंगचे ६ ते ८ पेळू ( sliver) फिड केले जातात. ते ३ किंवा ४ पोलादी व रेषा असलेल्या
( fluted) रोलर्स मधून पास करतात. या फ्लुटेड बॉटम रोलर्स मधील मागील दोन रोलर्स साधारण ३० मि.मि. व्यासाचे तर पुढील रोलर ४० ते ४५ मि.मि. व्यासाचा असतो. या रोलर्स वर रबरी आच्छादन असलेले तीन, चार अथवा ५ टॉप रोलर्स असतात
टॉप रोलर्सना दोन्ही टोकांना स्प्रींग अथवा हवेच्या दाबाने बॉटम रोलर्स वर बसवितात. जेणेकरून स्लायव्हर तीन ठिकाणी ग्रिप मध्ये पकडला जातो. बॉटम रोलर्स पैकी पुढील रोलरचा सरफेस स्पीड ,मागिल रोलर पेक्षा जास्त असतो. त्यामुळे कापसाचे तंतू ओढले जाउन सरळ होतात. ही ओढ ( ड्राफ्ट) साधारणपणे जितके स्लायव्हर फीड केले तितकी असते.
म्हणजेच ६ ते ८ पट असते. अर्थात हा नियम नसून गरजेप्रमाणे कमी जास्त होते.
सर्वसाधारणपणे ड्रॉईंगचे २ पॅसेज दिले जातात्,म्हणजे कार्डिंगचा पेळू दोन वेळा ड्रॉ फ्रेम मशिनमधून पास केला जातो.मागील मशिनला ब्रेकर ड्रॉ फ्रेम व पुढील मशिनला फिनिशर ड्रॉ फ्रेम म्हणतात. बहुतेक वेळा फिनिशर ड्रॉ फ्रेम ऑटो लेव्हलर
बसविलेली असते.
ड्रॉ फ्रेमचे दुसरे व मुख्य कार्य म्हणजे वेट पर युनिट लेंग्थ सारखे करणे. त्यासाठी अत्याधुनिक डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर करून अक्षरशः ०.८ मि.मि. एवढ्या कमी लांबीचे देखील स्कॅनिंग करुन लेव्हलिंग केले जाते. त्यामुळे सारखेपणा
(even ness) वाढतो. त्याचे मापन (unevenness% or U%) ने केले जाते.
तसेच ड्रॉ फ्रेम स्लायव्हरचे ठराविक लांबीच्या सँपल्स् चे वजन घेउन त्याचे C.V.% तपासले जाते.
ऑटोलेव्हल्ड ड्रॉ फ्रेमला ठरविलेल्या स्लायव्हरपेक्षा एक कमी व एक जास्त स्लायव्हर मुद्दाम फीड करून तो निघालेला स्लायव्हर बरोब्बर त्याच वजनाचा देतो का याचेही कठोर परिक्षण केले जाते, कारण U% कमी करणारी ही शेवटची प्रोसेस
आहे.
सर्वसाधारणपणे ड्रॉ फ्रेम स्लायव्हर चा हँक ०.०९ ते ०.२५० पर्यंत ठेवतात( म्हणजे समजा ०.१२० हँकच्या स्लायव्हर चे
५ यार्ड चे सँपल मोजले तर ते ४.५ ग्राम भरेल,व्याख्येनुसार ०.१२० *८४० एवढ्या लांबीचे वजन १ पौंड भरेल )
क्रमशः
प्रतिक्रिया
17 Oct 2012 - 5:05 pm | बापू मामा
परत मदत करा.