मिसळपाव दिवाळी अंक

नीलकांत's picture
नीलकांत in घोषणा
13 Oct 2012 - 11:11 am

नमस्कार,

या वर्षी मिसळपावचा दिवाळी अंक काढावा असे ठरले आहे. त्यासाठी सदस्यांकडून लेख, कथा, कविता, पाककृती, भटकंती, कलादालन अश्या मिपावरील सर्व साहित्यप्रकारातील साहित्य आमंत्रीत आहे.

दिवाळी अंकासाठी आपले साहित्य येत्या २५ तारखेपर्यंत पाठवायचे आहे. तसेच हे साहित्य दिवाळी अंक या खात्यावर पाठवायचे आहे. दिवाळी अंकाविषयी अन्य काही शंका किंवा प्रश्न येथे या धाग्यावर विचारू शकता किंवा दिवाळी अंक या खात्यावर संदेश पाठवू शकता.

तसेच काही सदस्यांना दिवाळी अंकासाठीच्या टीम मध्ये सहभागी व्हायचे असल्यास त्यांचे स्वागतच आहे.

- नीलकांत

प्रतिक्रिया

चित्रा's picture

17 Oct 2012 - 4:01 am | चित्रा

मिपाच्या पहिल्या दिवाळी अंकासाठी शुभेच्छा!

श्रीराजे's picture

17 Oct 2012 - 6:37 pm | श्रीराजे

मिपाच्या पहिल्या दिवाळी अंकासाठी अनेक शुभेच्छा...!

कृपया अंक कधी प्रकाशित होणार आहे, कुठे उपलब्ध असेल व ई-आवृत्ती विकत घेता येईल काय ही माहिती द्यावी.
अंकास शुभेच्छा.

इथच मिपावर अंक असेल, विकत घेता येणार नाही कारण तो मोफत असेल. ;) अंक प्रकाशित होण्याची तारीख मिपामालक कळवतील.

नीलकांत's picture

19 Oct 2012 - 6:34 am | नीलकांत

दिवाळीअंकासाठीचे लेख, कविता, पाककृती, भटकंती आदी सर्व वर दिलेल्या दिवाळी अंक नावाच्या आयडीवर पाठवावेत किंवा गवि यांना पाठवावेत. रामदास काका व गवि मिपाच्या दिवाळी अंकाची मुख्य जवाबदारी सांभाळताहेत.

लेख प्रकाशित करू नये. व्यक्तिगत निरोप करून पाठवावा.

- नीलकांत

लेखन पाठवण्यासाठी केवळ व्यनि वापरावा.

दिवाळी अंक या आयडी सोबतच मला आणि रामदास काकांना एकत्रच व्यनि करावा.

एकुजाधव's picture

19 Oct 2012 - 10:59 am | एकुजाधव

काय करायचे हे कळाले तर मलाही सहभाग घ्यायला आवडेल.

रेवती's picture

19 Oct 2012 - 7:20 pm | रेवती

आपण आपले लेख, कविता, पाकृ किंवा काय असेल ते गवि आणि रामदास यांना व्यक्तिगत निरोपाद्वारे पाठवावेत. जर निवडले गेले तर दिवाळी अंकात लेखन प्रसिद्ध होईल.

डावखुरा's picture

19 Oct 2012 - 5:14 pm | डावखुरा

व्यनि पाठवलाय..रिप्लाय करा.. :)

सूड's picture

19 Oct 2012 - 5:36 pm | सूड

पहिल्यावहिल्या अंकास शुभेच्छा!!

जैतापकराचा प्रशांत's picture

25 Oct 2012 - 5:01 pm | जैतापकराचा प्रशांत

मिपाच्या पहिल्या वहिल्या दिवाळी अंकाला शुभेचा.

माम्लेदारचा पन्खा's picture

25 Oct 2012 - 9:33 pm | माम्लेदारचा पन्खा

इतके सिद्धहस्त लेखक मिपा वर उपलब्ध असताना काय बिशाद आहे की अंक चांगला होणार नाही..........
अनेक शुभेच्छा........

सुमीत भातखंडे's picture

26 Oct 2012 - 10:55 am | सुमीत भातखंडे

पहिल्या वहिल्या दिवाळी अंकास मनापासून शुभेच्छा!!

नितिन काळदेवकर's picture

26 Oct 2012 - 2:21 pm | नितिन काळदेवकर

आम्ही आतुरतेने वाट पाहत आहे

गवि's picture

26 Oct 2012 - 2:29 pm | गवि

दिवाळी अंकासाठी लेखनाची मूळ मर्यादा २५ ऑक्टोबर वाढवून आता ३१ ऑक्टोबरपर्यंत आलेल्या लेखनाचा विचार दिवाळी अंकासाठी केला जाईल. कृपया साहित्य "दिवाळी अंक", "गवि" आणि "रामदास" या तीन आयडींना व्यनिने पाठवावे.

श्रद्धा शैलेश's picture

26 Oct 2012 - 6:44 pm | श्रद्धा शैलेश

मिसळपाव दिवाळी अंकाला हार्दिक शुभेच्छा!

prasadbm's picture

26 Oct 2012 - 8:08 pm | prasadbm

मला आजच मिसळपाववर प्रवेश मिळालाय.
आणि अंकासाठी साहित्य पाठवण्याची मुदत कालपर्यंत होती.
त्यामुळे साहित्य पाठवायचा असूनही, पहिला अंक फक्त वाचक म्हणूनच एन्जॉय करावा लागेल, असंच दिसतंय,.!

पहिल्या वहिल्या दिवाळी अंकाला हार्दिक शुभेच्छा !!

निवेदिता-ताई's picture

3 Nov 2012 - 8:20 pm | निवेदिता-ताई

मिपाच्या पहिल्या दिवाळी अंकासाठी खुप खुप शुभेच्छा... :)

दिपक.कुवेत's picture

8 Nov 2012 - 6:34 pm | दिपक.कुवेत

मनापासुन दिवाळी अंकास शुभेच्छा! एक विभाग 'अंडे न घालता' पाकक्रुती ह्या करिता राखुन ठेवणे. क्रुपया प्रतीसाद हलका घेणे.

अंडे घातल्यावर प्रतिसाद किंवा पदार्थ हलका होतो. अंडे न घालता जड होतो. ;)

प्रिया_पुनेकर's picture

9 Nov 2012 - 7:55 am | प्रिया_पुनेकर

नमस्कर मि.पा.करानो... मि मिपा चि नविन सदस्य आहे....मिपा च्य परिवारामधिल हिस्सा बनायाला खुप आवडेल.

लाल टोपी's picture

9 Nov 2012 - 10:18 am | लाल टोपी

उत्सुकता ताणली गेली आहे प्रकाशनाची तारीख जाहिर करावी ही विनंती

भटक्य आणि उनाड's picture

9 Nov 2012 - 9:17 pm | भटक्य आणि उनाड

वा वा! मिपाच्या पहिल्या दिवाळी अंकासाठी अनेकोत्तम शुभेच्छा!