Skip to main content

मिसळपाव दिवाळी अंक

लेखक नीलकांत यांनी शनिवार, 13/10/2012 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, या वर्षी मिसळपावचा दिवाळी अंक काढावा असे ठरले आहे. त्यासाठी सदस्यांकडून लेख, कथा, कविता, पाककृती, भटकंती, कलादालन अश्या मिपावरील सर्व साहित्यप्रकारातील साहित्य आमंत्रीत आहे. दिवाळी अंकासाठी आपले साहित्य येत्या २५ तारखेपर्यंत पाठवायचे आहे. तसेच हे साहित्य दिवाळी अंक या खात्यावर पाठवायचे आहे. दिवाळी अंकाविषयी अन्य काही शंका किंवा प्रश्न येथे या धाग्यावर विचारू शकता किंवा दिवाळी अंक या खात्यावर संदेश पाठवू शकता. तसेच काही सदस्यांना दिवाळी अंकासाठीच्या टीम मध्ये सहभागी व्हायचे असल्यास त्यांचे स्वागतच आहे. - नीलकांत

वाचने 38402
प्रतिक्रिया 74

प्रतिक्रिया

मिपाच्या पहिल्यावहिल्या दिवाळी अंकासाठी मनापासून शुभेच्छा. यानिमित्ताने अनेक उत्तमोत्तम लेख वाचायला मिळतील.

काही सदस्यांना दिवाळी अंकासाठीच्या टीम मध्ये सहभागी व्हायचे असल्यास त्यांचे स्वागतच आहे. >> शामील केल्यास आनंदच असेल ! ( आंजावर व्यवस्थापनाचा अनुभव असलेला ) सुहास..

In reply to by लीलाधर

अरेरे! काय हा आगाऊपणा..! दिवाळी सुरू होईपर्यंत थांबायचे नं..!

काय करायचे हे कळाले तर मलाही सहभाग घ्यायला आवडेल. त्याचप्रमाणे हे ही विचारु इच्छितो की लेखन मिपावरच पुर्वप्रसिद्ध असेल तर या अंकासाठी पाठवु शकतो का. या अंकाची थीम काय असेल हे ही जाणुन घेण्यास उत्सुक आहे.

या अंकाची थीम काय असेल हे ही जाणुन घेण्यास उत्सुक आहे
मृत्युन्जयाशी सहमत. काहीतरी थीम असल्यास उत्तम -(दिवाळी अंकासाठी एक कॉ़कृ तयार ठेवलेला) सोकाजी

In reply to by सोत्रि

काहीतरी थीम असल्यास उत्तम
'मद्यपानाचं उदात्तीकरण न करता समाजात होणारं वैचारीक प्रदुषण कमी करणं, एक काळाची गरज" ही थीम म्हणून कशी वाटते? ;)

In reply to by दादा कोंडके

मुळात, तीन पेग रिचविल्याशिवाय, थीम नक्की काय आहे हेच कळणार नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

आरे प्रभा मला तर चार पेग रेचव्ल्य्शिवाय काही कळणार नाही आणि तुझ्या वाक्याशी सहमत

In reply to by सूड

जाऊ दे रे. स्वत:ला establish करायचे प्रकार आहेत हे. चांगले लेख लिहून establish होण्यापेक्षा हे सोपे. एक तर कुणाची चूक झालीच तर एकवेळ प्रभाकर म्हणेल?, पण थेट प्रभा?? एक तर काकांच्या प्रोफाईल वरून त्यांच्या वयाचा सहज अंदाज करता येतो. तरीही हे म्हणजे कठीण आहे. बघू, कळेलच काही दिवसात, जैतापकर दादरच्या देवरुखकरांचे कुणी लागतात का ते:-) तसे नसेल तर आनंदच आहे.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

अगदी अगदी !! दादरचे देवरुखकर बरेच दिवस दिसले नाहीयेत, आयडी बदलून घेतलंनीत का काय ते बघायला हवं एकदा.

In reply to by सूड

' दादरचे देवरुखकर' म्हणजे अनेक देवरुखकर किंवा पुरुष देवरुखकर असा अर्थ होतो ना? इथं चर्चा चालली आहे ते देवरुखकर त्या आहेत ना ? (शेवटचे वाक्य 'दादा ते आले ना ?' या चालीवर आले वाचावे}

In reply to by ५० फक्त

इथं चर्चा चालली आहे ते देवरुखकर त्या आहेत ना ?
असं त्यांना मनापासून वाटत असावं असा अंदाज आहे ;-)

In reply to by ५० फक्त

इथं चर्चा चालली आहे त्या देवरुखकर 'त्या'असाव्यात असे निदान वाटते आहे. खरं खोटं कोणास ठाऊक ? हल्ली स्त्री डुआयडी घ्यायची फ्याशन आहे म्हणे. ;)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

रेवती, सूड, विश्वनाथ मेहेंदळे धन्यवाद. पण माझ्या मनांत राग नाही. ईश्वराला आपण अरे-तुरेच करतो.

मिसळपाव वर आधीच प्रसिद्ध झालेले साहित्य - दिवाळी अंकासाठी पाठवता यील का ?

मिपाच्या पहिल्या-वहिल्या दिवाळी अंकासाठी हार्दिक शुभेच्छा हो आणि theme नक्की कळवा

माझ्या मते एक बांधील थीम अशी नसावी. रांगोळीच्या विवध रंगासारखा वा दिवाळीच्य फराळासारखा सर्व प्रकारच्या साहित्याने नटललेला अंक असावा.

In reply to by गणपा

ह्येच बोलतो.... जमेल ती मदत करायला मी तयार आहे.... आणि हो अंकाला शुभेच्छा :) :)

मिपाच्या पहिल्या वाहिल्या दिवाळी अंकासाठी शुभेच्छा. मिपाचं वैविध्यपूर्ण अशा प्रवासात हे आणखी एक दमदार पाऊल. अंकाची जवाबदारी उचलणार्‍या मंडळींना, मालकांना, आणि तांत्रिक काम सांभाळणार्‍या सर्वांना शुभेच्छा. चुटकुले, सुविचार आणि आरोग्यविषयक सदर आणि व्यंगचित्र आणि माहितीपूर्ण लेख यांचाही समावेश करावा या सुचनेशी सहमत. पहिल्या वहिल्या अंकात कै ना कै आलं पाहिजे, यासाठी दोन चार ओळी खरडेन म्हणतो. बाकी, आपण सांगाल त्या कामांसाठी आम्ही आपल्या सोबत आहोतच. -दिलीप बिरुटे

मिपाच्या पहिल्यावहिल्या दिवाळी अंकाची वाट बघतोय, दिवाळीत रुचकर फराळासोबत मिपावरच्या दिग्गज लेखकांच्या खुसखुषीत लेखांची मेजवानीही मिळेल ह्याची खात्री आहे. अंकास मनापासुन शुभेच्छा आणि सर्व संबंधितांचे अभिनंदन. - छोटा डॉन

अंकासाठी काहीतरी करायची फार ईच्छा आहे हो पण, तुम्ही मुदत खूप कमी दिलीय. जरा वाढवून नाही का मिळणार? तयार असे काहीच नाही म्हणून विनंती करतोय.

मिपाच्या पहिल्या दिवाळी अंकास शुभेच्छा :) मला ही ह्यात सहभाग घ्यायला नक्की आवडेल

In reply to by मस्त कलंदर

अहो मिपाचा अङ्क आहे हो हा ;) :D :P (मार खायच्या आत पळतोच कसा इथून आता )

हे वाचून मनापासून आनंद झालाय. दिवाळी अंकाच्या या उपक्रमासाठी मनापासून शुभेच्छा!! यात सहभागी होण्याचा पूर्ण प्रयत्न करेन.

थीम नसावी असे माझे सुद्धा मत आहे- साहित्यातील सर्व प्रकारांचा समावेश असणारे लेखन असणारा अंक असावा.

दिवाळीचा आनंद वाढवणारी बातमी. मिपाच्या पहिल्यावहिल्या दिवाळी अंकाला खुप खुप शुभेच्छा.

दिवाळीचा आनंद वाढवणारी बातमी. मिपाच्या पहिल्यावहिल्या दिवाळी अंकाला खुप खुप शुभेच्छा. +१

दिवाळीचा आनंद वाढवणारी बातमी. मिपाच्या पहिल्यावहिल्या दिवाळी अंकाला खुप खुप शुभेच्छा. +१

कृपया अंक कधी प्रकाशित होणार आहे, कुठे उपलब्ध असेल व ई-आवृत्ती विकत घेता येईल काय ही माहिती द्यावी. अंकास शुभेच्छा.

In reply to by सस्नेह

इथच मिपावर अंक असेल, विकत घेता येणार नाही कारण तो मोफत असेल. ;) अंक प्रकाशित होण्याची तारीख मिपामालक कळवतील.

दिवाळीअंकासाठीचे लेख, कविता, पाककृती, भटकंती आदी सर्व वर दिलेल्या दिवाळी अंक नावाच्या आयडीवर पाठवावेत किंवा गवि यांना पाठवावेत. रामदास काका व गवि मिपाच्या दिवाळी अंकाची मुख्य जवाबदारी सांभाळताहेत. लेख प्रकाशित करू नये. व्यक्तिगत निरोप करून पाठवावा. - नीलकांत

In reply to by नीलकांत

लेखन पाठवण्यासाठी केवळ व्यनि वापरावा. दिवाळी अंक या आयडी सोबतच मला आणि रामदास काकांना एकत्रच व्यनि करावा.

In reply to by एकुजाधव

आपण आपले लेख, कविता, पाकृ किंवा काय असेल ते गवि आणि रामदास यांना व्यक्तिगत निरोपाद्वारे पाठवावेत. जर निवडले गेले तर दिवाळी अंकात लेखन प्रसिद्ध होईल.

इतके सिद्धहस्त लेखक मिपा वर उपलब्ध असताना काय बिशाद आहे की अंक चांगला होणार नाही.......... अनेक शुभेच्छा........

दिवाळी अंकासाठी लेखनाची मूळ मर्यादा २५ ऑक्टोबर वाढवून आता ३१ ऑक्टोबरपर्यंत आलेल्या लेखनाचा विचार दिवाळी अंकासाठी केला जाईल. कृपया साहित्य "दिवाळी अंक", "गवि" आणि "रामदास" या तीन आयडींना व्यनिने पाठवावे.

मला आजच मिसळपाववर प्रवेश मिळालाय. आणि अंकासाठी साहित्य पाठवण्याची मुदत कालपर्यंत होती. त्यामुळे साहित्य पाठवायचा असूनही, पहिला अंक फक्त वाचक म्हणूनच एन्जॉय करावा लागेल, असंच दिसतंय,.!

मनापासुन दिवाळी अंकास शुभेच्छा! एक विभाग 'अंडे न घालता' पाकक्रुती ह्या करिता राखुन ठेवणे. क्रुपया प्रतीसाद हलका घेणे.