मी खोडकर ..माझी बडबड ..माझे प्रेम ..माझी गडबड
तू खेळकर .. तुझी धडपड ..तुझा हट्ट ...तुझी तडफड..
मी हळवी .. माझी स्वप्न ...माझा रुसवा ..माझी तगमग
तू जिद्दी .. तुझी नजर ..तुझा रुतबा .. तुझी झगमग..
मी चंचल.. माझे लाजणे.. माझी भीती... माझा चंद्र
तू खंबीर.. तुझे हसणे.. तू धाडसी .. तुझी रात्र
मी स्तब्ध.. तू लुब्ध .. माझे मौन ... तुझी प्रीती..
माझे भांडण..तुझी मिठी.. माझे हास्य.. तुझे आयुष्य
प्रतिक्रिया
10 Oct 2012 - 12:50 pm | गोमटेश पाटिल
khup chaan.....
10 Oct 2012 - 2:23 pm | ज्ञानराम
तुमची कविता ..तुमची तडफड..
आमची रसिकता ... प्रतिसादाची धडपड.....
10 Oct 2012 - 2:45 pm | सस्नेह
ला-जवाब जवाब !
10 Oct 2012 - 4:54 pm | ज्ञानराम