जिव्हाळा आसक्ती
द्वंद मनामधे
मन झाले मिंधे
हतबल
कुढत बसणे
त्यांचा न स्वभाव
उरातला घाव
साहतो मी
कळे ना मजसी
ऐसे कैसे झाले
प्रश्नांची वादळे
घोंगावती
मीही ठरविले
नाही रडणार
सांडती अपार
अश्रू परी
सुटता सुटता
सुटेना हे कोडे
झालो आम्ही वेडे
जनांसाठी
बुडवली गाथा
पुन्हा इंदायणी
वाचुनीया कोणी
संत झाला....???
प्रतिक्रिया
6 Oct 2012 - 10:37 pm | प्रचेतस
अप्रतिम
6 Oct 2012 - 10:38 pm | जेनी...
झक्कास .
6 Oct 2012 - 10:44 pm | अभ्या..
सुरे़खच
आवडली.
6 Oct 2012 - 10:51 pm | अत्रुप्त आत्मा
छान हाय... :-)
7 Oct 2012 - 3:06 pm | ज्ञानराम
सुंदर ...