कताई शास्त्र ७

बापू मामा's picture
बापू मामा in जनातलं, मनातलं
27 Sep 2012 - 11:48 pm

प्राचीन व मध्ययुगीन काळात कताई हा एक कुटिरोद्योग होता. कापूस उत्पादक शेतकरी, लोकर उत्पादक धनगर, स्वतः सूत कातत्,व विणकर कोष्ट्यांना देत. विणकर त्यांचे कापड विणून परत देत. हा सर्व व्यवहार बलुत्यावर चाले.त्या काळी कताई तकली वर चाले,व सायंकाळी घरोघरी हा उद्योग चाले.
महात्मा गांधींना अशा प्रकारची स्वयंपूर्ण खेडी अभिप्रेत होती. त्या मुळे, एकाच यांत्रिक कारखान्यात कापड बनवून विकणे त्यांच्या कल्पनेत बसत नव्हते. त्यांनी त्या साठी चरख्याचा प्रसार केला, व लोकांना चरख्यावर सुत कताई करुन स्वयंपूर्ण होण्याचा नुसता संदेशच दिला नाही, तर " बोले तैसा चाले " या तुकोबांच्या उक्तीप्रमाणे स्वतः चरख्यावर सुत कताई करत गेले. महात्माजींची अगदी त्यांना भेट देणार्‍या अभ्यागतांशी चर्चा करताना देखील सुत कताई अहर्निश चालू असे. त्या काळी हाताने सूत काढण्याच्या विविध साधनांचा विकास झाला.
अंबर चरखा हा त्या पैकीच एक. रिंग फ्रेम या सुत कातायच्या यंत्राची छोटी आवृत्ती ( २ ते २४ चात्यांच्या क्षमतेची) हँडलच्या साह्याने फिरवून सुत कातायचे म्हणजे अंबर चरखा. लक्षावधी भारतीयांनी महात्माजींमुळे प्रेरित होवून सूत कताई व खादीचा अंगिकार केला."चरखा चला चला के लेंगे स्वराज लेंगे" हा त्या काळाचा महामंत्र होता

.
http://static.binscorner.com/l/life-in-pictures-mahatma-gandhi/ATT00031....

.त्या महात्म्यास शतःशः प्रणाम करुन मूळ विषयाकडे वळू या.

ब्लो रुम मध्ये कापसाचे ओपनींग होवून त्याचे अंदाजे २ ते ५ घन मि.मि.आकाराचे पुंजके (lumps) ब्लो रुमच्या लॅपपर्यंत होतात. परंतु
प्रत्येक तंतू सुटा/विलग होत नाही. हे अत्यंत महत्त्वाचे कार्य कार्डिंग या पुढील खात्यात होते. कार्डिंग या मशिनची मुख्य कामे म्हणजे
प्रत्येक तंतू सुटा करणे (individualisation of fibres), अवशिष्ट कचरा काढणे, गुठळ्या काढणे ( nep removal), व अनावश्यक आखुड तंतू काढून , चांगल्या तंतुजालाचे पेळू (sliver) तयार करुन तो कॉयलर च्या साह्याने कॅन मध्ये भरणे.

.
http://asiancotton.com/files/images/common/trutzschler_tc03carding.jpg

सोबत एका कार्डिंग मशिनची आकृती दिली आहे

.
http://www.freepatentsonline.com/6584651-0-large.jpg
या मधे दाखविल्या प्रमाणे च्यूट फिड (३०) मधुन ब्लो रुम मधील रुई लॅप म्हणून कार्डिंगमधील फिड रोलर(१) ला दिली जाते.फिड रोलर मधून लॅप शिट एक किंवा तीन लिकर ईन (३) ला दिली जाते.लिकर ईन हे २५० मि.मि. व्यासाचे पृष्ठ्भागावर करवतीच्या आकाराचे ५ मि.मि. ऊंचीचे दात असलेले एक किंवा तीन सिलेंडर असतात. येथे कापसातील अवशिष्ट कचरा काढला जाऊन त्याचे प्री ओपनींग होते.
लिकर ईन झोन नंतर कापूस मेन सिलेंडर(४) कडे येतो. मेन सिलेंडर हे ५०" व्यासाचे ४०० ते ५०० आर पी एम वेगाने फिरणारे असून त्यावर देखील करवतीच्या दातासारखे २ मि.मि. ऊंचीचे व ८०० ते १००० दात प्रती वर्ग ईंच घनतेचे आवरण (clothing) असते.त्यावर अंदाजे ८ ते १६"/मिनिट वेगाने फिरणार्‍या
रिव्हॉल्व्हींग फ्लॅटस(१४) या दातेरी पट्ट्यांची शृंखला असते . कापसाचे तंतुंचे विलगीकरण (individualisation) याच भागात होते.
या नंतर मेन सिलेंडर वरिल तंतूजाल डॉफर(५)या २७" व्यासाच्या सिलेंडर ने विलग करून ते वेब डॉफिंग झोन मधून एका नरसाळ्याच्या
(ट्रंपेटच्या) आकारातून एकत्र करुन त्याचा बनलेला पेळू कॉयलर द्वारे कॅन मध्ये भरला जातो.
सर्व कताई प्रक्रियेमध्ये कर्डिंग ही अत्यंत महत्त्वाची व अत्यंत सुक्ष्म अंतरे असलेली मशिन आहे.
कार्डिंग मध्ये अंदाजे ७% वाया कापूस निघतो.
क्रमशः

तंत्रमाहिती

प्रतिक्रिया

तर्री's picture

28 Sep 2012 - 1:21 pm | तर्री

वाचतो आहे आणि आवडल्याचे परत सांगतो आहे .
( च्यूट ऐवजी शूट असा वेगळा उच्चार भारतीय करतात व देवनागरीत तसाच लिहावा ही वि. )