बालुशाही

Mrunalini's picture
Mrunalini in अन्न हे पूर्णब्रह्म
26 Sep 2012 - 2:52 am

साहित्यः

मैदा - दिड वाटी
तुप - २ चमचे
दही - २ चमचे
साखर - १ वाटी
बेकिंग पावडर - १/४ चमचा
मिठ - १/४ चमचा
केशर - १/२ चमचा
वेलची पवडर - १/४ चमचा
तुप तळण्यासाठी

कृती :

१. एका भांड्यामधे मैदा व बेकिंग पावडर चाळुन घ्यावे. त्यात २ चमचे तुप टाकुन निट मिक्स करावे. त्यातच २ चमचे दही घालावे व एकत्र करावे.
२. ह्या मिश्रणाचा गोळा होई पर्यंत एकत्र करावे. थोडे पाणी लागल्यास, एकदम गार पाणी वापरावे. पण ह्याची मळलेली कणिक जास्त मळु नये. कणिक अगदी हलक्या हाताने मळावी व २०-२५ मिनिटे झाकुन ठेवावी.
३. तो पर्यंत पाक करुन घ्यावा. एका पातेल्यात साखर व साखर बुडेल एवढेच पाणी टाकावे. हे मिश्रण गॅसवर ठेवुन उकळु द्यावे. त्यात थोडी वेलची पावडर व केशर टाकावे. ह्याचा एकतारी पाक करुन घ्यावा.
४. कढईमधे बालुशाही तळण्यासाठी तेल गरम करावे.
५. आता मळलेल्या कणकेचे छोटे गोळे करुन घ्यावे. हे करताना देखील कणिक जास्त मळु नये. हे गोळे हाताने थोडे चपटे करुन, त्याच्या मधोमध अंगठ्याने दाबावे. त्यामुळे त्याला बालुशाहीचा आकार येईल.
६. ह्या बालुशाही तळताना, त्यांचा आकार दुपट्टीने वाढतो. त्यामुळे त्या करतानाच लहान आकारात कराव्यात.
७. तेल गरम झाल्यावर त्यात ह्या बालुशाही सोडाव्यात. बालुशाही ह्या एकदम मंद आचेवर तळायला लागतात, त्यामुळे त्या आतुन कच्च्या रहात नाहीत.
८. बालुशाही तेलावर तरंगायला लागल्यावर, त्या पलटाव्यात. अशा प्रकारे सर्व बालुशाही golden रंग येईपर्यंत तळुन घ्याव्यात.
९. बालुशाही तळल्यावर, बाहेर काढुन थोड्यावेळ गार होउन द्याव्यात व नंतर पाकात टाकाव्यात. त्यामुळे बालुशाही कडक राह्तात.
१०. ५ मिनिटे पाकात ठेवुन, त्या बाहेर काढाव्यात. त्या एका प्लेट्मधे ठेवुन, त्यावर पिस्त्याचे काप, केशर ह्यानी सजवावे. असेच २-३ तास ठेवावे. बालुशाही खाण्यासाठी तयार आहे.
११. बालुशाही आज करुन दुसर्‍या दिवशी खाल्ल्यास, त्याची जास्त छान चव लागते.

balushahi

balushahi2

प्रतिक्रिया

मस्तच दिसतिये बालुशाहि :)
धन्यवाद म्रुनालिनि .

कौशी's picture

26 Sep 2012 - 3:10 am | कौशी

आवडली.

किसन शिंदे's picture

26 Sep 2012 - 3:14 am | किसन शिंदे

व्वा!!

अच्छा हे बालूशाही आहे होय. मी हा प्रकार ख्वाजा या नावाने खाल्ला होता. :)

इरसाल's picture

26 Sep 2012 - 9:16 am | इरसाल

"खाजा" हेच नाव आहे अलिबाग्,कर्जतकडे
मारवाडी लोक याला बालुशाही म्हणतात.
लागतो मस्त पण सध्या कॅलरी कॅलरी खेळताना जरा कंट्रोल करावा लागतो इतकेच.

किष्ण्या लेका .. ख्वाजा नाहीरे खाजा...
लिही पाहू १० वेळा खाजा... ;)

बाकी पाक्रु आवड्लीच

सानिकास्वप्निल's picture

26 Sep 2012 - 4:27 am | सानिकास्वप्निल

अहाहा !!! बालूशाही एकदम झकास दिसत आहे :)
खूप आवडली गं

व्वा!! मस्त फोटो आणि पाकृही. माझा आवडता पदार्थ आहे.
मंद आचेवर तळणे व पाकात घालण्याआधी थोडावेळ बाहेर ठेवणे हे महत्वाचे.

प्रभाकर पेठकर's picture

26 Sep 2012 - 10:11 am | प्रभाकर पेठकर

खुसखुशीत बालुशाही हां हां म्हणता संपते. मस्तच झालेली आहे बालुशाही. अभिनंदन.

सूड's picture

26 Sep 2012 - 1:02 pm | सूड

अतिशय अनवट पाकृ !!

पिंगू's picture

26 Sep 2012 - 2:25 pm | पिंगू

कधी बेत करतोयेस रे? मी पण यावे म्हणतो. हादडायला.. ;)

गणपा's picture

26 Sep 2012 - 1:12 pm | गणपा

हलवायाच्या दुकानातल्या बालुशाहीच्या कानाखाली जाळ काढील अशी दिसतेय ही बालुशाही.

प्रचेतस's picture

26 Sep 2012 - 1:35 pm | प्रचेतस

मस्त

पिंगू's picture

26 Sep 2012 - 2:26 pm | पिंगू

मस्त झाल्या आहेत. मी तर ह्यांना खाजा म्हणतो.

तर्री's picture

26 Sep 2012 - 3:14 pm | तर्री

बालुशाही मस्त !
तळ कोकणात "खाजा" नावाचा बालुशाही च्या जवळचा पदार्थ मिळतो. त्याची ही पाकृ द्यावी !

मंडळ आपले आभारी आहे.. :) बहुतेक खाजा हा वेगळा असतो. त्याचा आकार पण वेगळा असतो. त्या मधे सारण भरलेले असते. मला नक्की माहित नाही.

प्रभाकर पेठकर's picture

27 Sep 2012 - 1:14 am | प्रभाकर पेठकर

माझ्या मते खाजा हा आकाराने मोठा असतो. बालुशाही चवीला गोड असते तर खाजावर अक्षरशः साखरेचे आवरण असते. त्यात सारण वगैरे काही नसते. बालुशाही बंगाली मिठाई आहे आणि केशर वगैरे टाकून ती जरा उच्चभ्रू बनली आहे. खाजा बिचारा गरीब आणि फारातफार मध्यम वर्गीय आहे.

गुगलून पाहीले असता, पट्टी स्वरूपाचे खाजाही पाहायला मिळतात. हे असे, दक्षीण भारतात आणि बांगला देशात बनवितात असा माझा अंदाज आहे.

सस्नेह's picture

28 Sep 2012 - 8:56 pm | सस्नेह

https://lh5.googleusercontent.com/-V2kzkJjxnbc/UGW_-6oMQEI/AAAAAAAAAK0/9...
हा पहा . आमच्या कडे याला खाजा म्हणतात.
इथे फोटो का दिसत नाही ?
मदत प्लीज.

अभ्या..'s picture

27 Sep 2012 - 1:46 am | अभ्या..

@पेठकर काका
>>>>माझ्या मते खाजा हा आकाराने मोठा असतो.
बालुशाही पण बर्‍याच आकारात मिळते. मी बघितलेला खाजा साधारण बालुशाही एवढाच होता. (मिरज येथे पाहिला, खाल्ला होता. कॉलिंग बॅटमॅन प्लीज)
https://lh3.googleusercontent.com/-Y6G5DQ53aPw/UGNgTi7d2pI/AAAAAAAAAFs/c...

>>>>बालुशाही चवीला गोड असते तर खाजावर अक्षरशः साखरेचे आवरण असते.
आवरण नव्हते. अगदी पाकाची चमक फक्त.

>>>>त्यात सारण वगैरे काही नसते.
अगदी बरोबर.
बादवे मालवणी खाजा नावाचे एक सदर सा. मार्मिक मध्ये प्रभाकर भोगले चालवायचे. मालवणी खाजा म्हणजे अजून काय?

सानिकास्वप्निल's picture

27 Sep 2012 - 3:08 am | सानिकास्वप्निल

मालवणी खाजा बेसन -गुळापासून बनवतात . त्यात सुंठ ही घातलेली असते

http://www.karuppaswamygeneralstores.com/full-images/malvani-khaja-86356...

चित्र आंजावरुन

प्रभाकर पेठकर's picture

27 Sep 2012 - 9:37 am | प्रभाकर पेठकर

अच्छा हा आहे होय मालवणी खाजा. ह्याला लहानपणी आम्ही 'गोडी शेव' म्हणायचो. दहिसरला मंडपेश्वरच्या जत्रेत लावलेल्या स्टॉल्सवर मोठ्या थाळ्यात ह्या शेवेचा (मालवणी खाजाचा) डोंगर रचून वरून त्याला रंगीत जिलेटीन पेपर लावलेला असायचा.

प्रभाकर पेठकर's picture

3 Oct 2012 - 1:26 am | प्रभाकर पेठकर

रंग वेगळा असला तरी पदार्थ एकच दिसतो आहे.

अभिजित, खाजा गड्ड्यावर पोलिस चौकीच्या समोर जे उत्तर प्रदेशी हलवायाचं दुकान असतं तिथं मिळतो पुढच्या वर्षी दोघं जण जाउ आपण.

तिथं खाजा खाल्यावर गुढी पाडव्याच्या दिवशी गळ्यात साखरेचा हार पडेपर्यंत काही गोड खाल्लं नाही तरी चालतं. डायबेटीसवाल्याला विनापुरावा मारायचा अतिशय सोपा उपाय आहे हा खाजा.

Pearl's picture

27 Sep 2012 - 7:42 am | Pearl

मस्त दिसते आहे बालूशाही.

पियुशा's picture

27 Sep 2012 - 3:03 pm | पियुशा

मस्त :)

राही's picture

27 Sep 2012 - 3:12 pm | राही

तूप आणि मैदा फेसून त्याचा साठा लावलेल्या चार (कणकेच्या) पोळ्या एकावर एक ठेवून त्यांची गुंडाळी करून ती एकेक इंचावर आडवी कापल्यावर पडलेल्या गोळ्या पुरीसारख्याच पण हलकेच लाटून तुपात तळल्यावर निघालेल्या चिरोटासदृश आकृतीवर गरम असतानाच पिठीसाखर भुरभुरवून अथवा साखरेच्या पाकात टाकून निथळवलेल्या पदार्थास खाजा म्हटलेले काही घरांत पाहिलेले आहे.

आम्ही त्याला चिरोटे म्हणतो. :)

पैसा's picture

28 Sep 2012 - 8:17 am | पैसा

मस्त!

प्राजु's picture

2 Oct 2012 - 2:24 pm | प्राजु

सुरेख!!
मिपाने आता... संजीव कपूर च्या 'खाना खजाना' सारखे मिपाचे स्वतःचे असे पाककृतींना समर्पित संकेतस्थळ चालू करावे... मिपाखाद्य संस्कृती... नावाचे. :)

जाई.'s picture

2 Oct 2012 - 8:56 pm | जाई.

तोंपासू

ही पाककृती मला दिसत का नाही? :-(
प्रतिक्रिया दिसताहेत फक्त, त्यासुद्धा ठराविक.

डावखुरा's picture

21 Oct 2012 - 9:55 pm | डावखुरा

:)'

संतोषएकांडे's picture

21 Oct 2012 - 10:31 pm | संतोषएकांडे

बालुसाही हा खाजा नसुन सुतरफेणी च्या जवळचा प्रकार आहे.
खाजा हा उत्तर गुजराथ,
सुतरफेणी हा सौराष्ट्र,
आणी बालुसाही हा राजस्थान चा पदार्थ आहे.
त्याला बालुशाही नाही तर 'बालुसाही' म्हणतात.

Princess's picture

22 Oct 2012 - 4:23 pm | Princess

अतिशय सुरेख दिसत आहेत!!

दीपा माने's picture

2 Dec 2012 - 6:41 am | दीपा माने

खुपच आवडली.

गौरीबाई गोवेकर's picture

25 Dec 2012 - 8:02 pm | गौरीबाई गोवेकर

छान दिसतेय, लागतेही छान. ईंदौर मधे छान मिळते.