बालुशाही
साहित्यः
मैदा - दिड वाटी
तुप - २ चमचे
दही - २ चमचे
साखर - १ वाटी
बेकिंग पावडर - १/४ चमचा
मिठ - १/४ चमचा
केशर - १/२ चमचा
वेलची पवडर - १/४ चमचा
तुप तळण्यासाठी
कृती :
१. एका भांड्यामधे मैदा व बेकिंग पावडर चाळुन घ्यावे. त्यात २ चमचे तुप टाकुन निट मिक्स करावे. त्यातच २ चमचे दही घालावे व एकत्र करावे.
२. ह्या मिश्रणाचा गोळा होई पर्यंत एकत्र करावे. थोडे पाणी लागल्यास, एकदम गार पाणी वापरावे. पण ह्याची मळलेली कणिक जास्त मळु नये. कणिक अगदी हलक्या हाताने मळावी व २०-२५ मिनिटे झाकुन ठेवावी.
३. तो पर्यंत पाक करुन घ्यावा. एका पातेल्यात साखर व साखर बुडेल एवढेच पाणी टाकावे. हे मिश्रण गॅसवर ठेवुन उकळु द्यावे. त्यात थोडी वेलची पावडर व केशर टाकावे. ह्याचा एकतारी पाक करुन घ्यावा.
४. कढईमधे बालुशाही तळण्यासाठी तेल गरम करावे.
५. आता मळलेल्या कणकेचे छोटे गोळे करुन घ्यावे. हे करताना देखील कणिक जास्त मळु नये. हे गोळे हाताने थोडे चपटे करुन, त्याच्या मधोमध अंगठ्याने दाबावे. त्यामुळे त्याला बालुशाहीचा आकार येईल.
६. ह्या बालुशाही तळताना, त्यांचा आकार दुपट्टीने वाढतो. त्यामुळे त्या करतानाच लहान आकारात कराव्यात.
७. तेल गरम झाल्यावर त्यात ह्या बालुशाही सोडाव्यात. बालुशाही ह्या एकदम मंद आचेवर तळायला लागतात, त्यामुळे त्या आतुन कच्च्या रहात नाहीत.
८. बालुशाही तेलावर तरंगायला लागल्यावर, त्या पलटाव्यात. अशा प्रकारे सर्व बालुशाही golden रंग येईपर्यंत तळुन घ्याव्यात.
९. बालुशाही तळल्यावर, बाहेर काढुन थोड्यावेळ गार होउन द्याव्यात व नंतर पाकात टाकाव्यात. त्यामुळे बालुशाही कडक राह्तात.
१०. ५ मिनिटे पाकात ठेवुन, त्या बाहेर काढाव्यात. त्या एका प्लेट्मधे ठेवुन, त्यावर पिस्त्याचे काप, केशर ह्यानी सजवावे. असेच २-३ तास ठेवावे. बालुशाही खाण्यासाठी तयार आहे.
११. बालुशाही आज करुन दुसर्या दिवशी खाल्ल्यास, त्याची जास्त छान चव लागते.


वाचने
60729
वाचनखूण
प्रतिक्रिया
36
मस्तच दिसतिये बालुशाहि
मस्तच बनली बालुशाही..
फोटो पुन्हा अपलोड केले आहेत.
In reply to फोटो पुन्हा अपलोड केले आहेत. by किसन शिंदे
बरोबर
In reply to फोटो पुन्हा अपलोड केले आहेत. by किसन शिंदे
किष्ण्या लेका .. ख्वाजा
अहाहा !!! बालूशाही एकदम झकास
व्वा!! मस्त फोटो आणि पाकृही.
खुसखुशीत बालुशाही.
अतिशय अनवट पाकृ !!
In reply to अतिशय अनवट पाकृ !! by सूड
कधी बेत करतोयेस रे? मी पण
वल्ला लाजवाब !!!
मस्त
मस्त झाल्या आहेत. मी तर
आवडली.
मंडळ आपले आभारी आहे.. :)
In reply to मंडळ आपले आभारी आहे.. :) by Mrunalini
बालुशाही आणि खाजा.
In reply to बालुशाही आणि खाजा. by प्रभाकर पेठकर
https://lh5.googleusercontent
बालुशाही आणि खाजा
In reply to बालुशाही आणि खाजा by अभ्या..
मालवणी खाजा
In reply to मालवणी खाजा by सानिकास्वप्निल
गोड शेव.
In reply to गोड शेव. by प्रभाकर पेठकर
गोडी शेव याला म्हणतात ना?
In reply to गोडी शेव याला म्हणतात ना? by बहुगुणी
रंग माझा वेगळा.....
In reply to बालुशाही आणि खाजा by अभ्या..
अभिजित, खाजा गड्ड्यावर पोलिस
बालूशाही.... मस्त
मस्त
खाजा
In reply to खाजा by राही
आम्ही त्याला चिरोटे म्हणतो. :
मस्त!
सुरेख!!
तोंपासू
ही पाककृती मला दिसत का नाही?
'
बालुसाही हा खाजा नसुन
सुरेखच!!
खुपच आवडली.
छान दिसतेय, लागतेही छान.