पेंटर नावाचे सॉफ्टवेअर आहे. खास चित्रकारांसाठीचे. त्यात कॅनव्हास, हँडमेड पेपर इत्यादी पर्याय निवडता येतात. त्याचप्रमाणे माध्यम, ब्रश / नाइफ / चारकोल / पेन्सिली इत्यादीही निवडता येतात. प्रश्न माऊसवर आपली कमांड किती आहे याचा असतो. मुळात आपण चित्रकार असू तर चित्रकलेतील प्राथमिक गोष्टी माहीत असतात, त्यांचा इथे मोठा उपयोग होतो. मी एरवी प्रामुख्याने कॅनव्हासवर तैलरंगात चित्रं रंगवते. मोठ्या प्रवासात असताना संगणकावर असे उद्योग करता येतात गंमत म्हणून. सरावासाठी ते चांगले असते. ड्रॉइंगपॅड संगणकाला जोडून त्यावर पेनमाऊस ने काम करता येते. ते अर्थात पसार्यामुळे घरीच करावे लागते. टॅबलेटवर मोठी सॉफ्टवेअर्स लोड होत नाहीत, त्यामुळे तिथे किरकोळ टिवल्याबावल्या करता येतात. आता ज्याच्या स्क्रीनवर काम थेट काम करता येईल असा संगणक आलाय, पण त्याची किंमत इथे ९०,००० ते १,७०,००० आहे... तरी घेईन तो कधीतरी असे म्हणतेय. :-).
पण कोरेल, फोटोशॉप वगैरे मध्ये एखादी इमेज इम्पोर्ट करून त्यात नॉईज अॅड करून, ब्लर इफेक्ट देउन, त्याची दिशा शुन्य डिग्री किंवा होरीझाँटल ठेउन. पाच-सहा काड्या रंगवल्या सारख्या वाटतात. पण पेंट ब्रश मध्ये केलं असेल तर थोडसं वेळखाउ प्रकरण आहे.
प्रयत्न मस्त आहे...
मागच चित्र छान जमलंय, फक्त समोर जे काही दांड्या दाखवल्या आहेत (ग्रील दाखवायचा प्रयत्न दिसतोय) त्यामुळे चित्राची मजा गेलीये, ते नीट जमल नाहीये ते..
असं काहीस दाखवताना कॅमेरा फोकसिंग च्या तंत्राचा रेफरन्स समोर ठेवावा, म्हणजे जर मागील चित्र स्पष्ट दाखवलंय तर समोरील ऑब्जेक्ट जरा ब्लर्र दाखवावे...
तुमची सूचना चांगली आहे. फक्त प्रत्येकाचा काम करताना काही विचार असतो, त्यामुळे फरक पडतो. हे नुसते गज नाहीत, तर वाकवण्याचा प्रयत्न केलेले गज आहेत. त्यांना गजाचा रंग वा थ्रीडी इफेक्ट नाहीये. त्यामुळे ते रिअॅलिस्टिक नाही. ते नकोच होते. कारण खूप बंधनं किंवा कैद काल्पनिक पातळीवर असते. तिच्यातून स्वतःचे विचार बदलूनच बाहेर पडता येतं आणि मोकळ्या - काव्यात्म - रोमँटिक भासणार्या गोष्टींकडे वळता येतं.... असं काहीसं तेव्हा मनात होतं. त्यामुळे ब्रशच्या अगदी एकरंगी व साध्या रेषा कोणताही इफेक्ट न देता मी वापरल्या आहेत.
ट्रिगर नको.
चित्राचं आकलन प्रेक्षकाच्या बुद्धीवर सोडावं.
जो तुम्हाला मारूती वाटेल तो मला गणपती वाटेल.
नेमकं महाजनबाईंनी ते चित्र माणसाचं म्हणून काढलं असेल.
:)
बरं. पटतंय. विशेषतः गणपती-मारूती-माणूस हे अगदी पटलं. कारण तुला माहिती आहेच आता. :-)
कविता, ट्रिगर नका देऊ.
चित्रांच्या आस्वादाविषयी त्यांनी स्वतंत्र लिहिलं तर चालेल ना, साते? :-)
प्रतिक्रिया
23 Sep 2012 - 8:51 am | माझीही शॅम्पेन
वाह काय सुरेख चित्र आहे ...डोळ्याचे पारणे फिटले :)
23 Sep 2012 - 1:37 pm | श्रावण मोडक
सुरेख! आणखी येऊ द्या... :-)
23 Sep 2012 - 2:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सुरेख! आणखी येऊ द्या..
23 Sep 2012 - 2:45 pm | प्रभाकर पेठकर
सुरेख! आणखी येऊ द्या..
23 Sep 2012 - 4:09 pm | जाई.
सुंदर!!!
23 Sep 2012 - 4:18 pm | बिपिन कार्यकर्ते
सुरेख!
23 Sep 2012 - 4:18 pm | पैसा
छानच जमलंय. पण तो ऑईल पेस्टल्सचा परिणाम कसा आणलात जरा सांगा ना!
24 Sep 2012 - 12:16 pm | Kavita Mahajan
आपण भेटलो की करून दाखवेन. हे सांगणार कसे? :-).
मी गोव्यात येतेय ९/१० नोव्हेंबरला.
23 Sep 2012 - 4:44 pm | कवितानागेश
हे संगणकावर केल्यासारखे वाटत नाहीये. कॅनव्हास चा फील कसा काय आणला?
24 Sep 2012 - 12:25 pm | Kavita Mahajan
पेंटर नावाचे सॉफ्टवेअर आहे. खास चित्रकारांसाठीचे. त्यात कॅनव्हास, हँडमेड पेपर इत्यादी पर्याय निवडता येतात. त्याचप्रमाणे माध्यम, ब्रश / नाइफ / चारकोल / पेन्सिली इत्यादीही निवडता येतात. प्रश्न माऊसवर आपली कमांड किती आहे याचा असतो. मुळात आपण चित्रकार असू तर चित्रकलेतील प्राथमिक गोष्टी माहीत असतात, त्यांचा इथे मोठा उपयोग होतो. मी एरवी प्रामुख्याने कॅनव्हासवर तैलरंगात चित्रं रंगवते. मोठ्या प्रवासात असताना संगणकावर असे उद्योग करता येतात गंमत म्हणून. सरावासाठी ते चांगले असते. ड्रॉइंगपॅड संगणकाला जोडून त्यावर पेनमाऊस ने काम करता येते. ते अर्थात पसार्यामुळे घरीच करावे लागते. टॅबलेटवर मोठी सॉफ्टवेअर्स लोड होत नाहीत, त्यामुळे तिथे किरकोळ टिवल्याबावल्या करता येतात. आता ज्याच्या स्क्रीनवर काम थेट काम करता येईल असा संगणक आलाय, पण त्याची किंमत इथे ९०,००० ते १,७०,००० आहे... तरी घेईन तो कधीतरी असे म्हणतेय. :-).
24 Sep 2012 - 1:32 pm | कवितानागेश
सॉफ्टवेअर च्या माहितीबद्दल धन्यवाद. :)
खर्या कॅनव्हासचा खर्च फार होतो.
23 Sep 2012 - 5:49 pm | दादा कोंडके
पण कोरेल, फोटोशॉप वगैरे मध्ये एखादी इमेज इम्पोर्ट करून त्यात नॉईज अॅड करून, ब्लर इफेक्ट देउन, त्याची दिशा शुन्य डिग्री किंवा होरीझाँटल ठेउन. पाच-सहा काड्या रंगवल्या सारख्या वाटतात. पण पेंट ब्रश मध्ये केलं असेल तर थोडसं वेळखाउ प्रकरण आहे.
24 Sep 2012 - 12:01 pm | सौरभ उप्स
प्रयत्न मस्त आहे...
मागच चित्र छान जमलंय, फक्त समोर जे काही दांड्या दाखवल्या आहेत (ग्रील दाखवायचा प्रयत्न दिसतोय) त्यामुळे चित्राची मजा गेलीये, ते नीट जमल नाहीये ते..
असं काहीस दाखवताना कॅमेरा फोकसिंग च्या तंत्राचा रेफरन्स समोर ठेवावा, म्हणजे जर मागील चित्र स्पष्ट दाखवलंय तर समोरील ऑब्जेक्ट जरा ब्लर्र दाखवावे...
24 Sep 2012 - 12:36 pm | Kavita Mahajan
तुमची सूचना चांगली आहे. फक्त प्रत्येकाचा काम करताना काही विचार असतो, त्यामुळे फरक पडतो. हे नुसते गज नाहीत, तर वाकवण्याचा प्रयत्न केलेले गज आहेत. त्यांना गजाचा रंग वा थ्रीडी इफेक्ट नाहीये. त्यामुळे ते रिअॅलिस्टिक नाही. ते नकोच होते. कारण खूप बंधनं किंवा कैद काल्पनिक पातळीवर असते. तिच्यातून स्वतःचे विचार बदलूनच बाहेर पडता येतं आणि मोकळ्या - काव्यात्म - रोमँटिक भासणार्या गोष्टींकडे वळता येतं.... असं काहीसं तेव्हा मनात होतं. त्यामुळे ब्रशच्या अगदी एकरंगी व साध्या रेषा कोणताही इफेक्ट न देता मी वापरल्या आहेत.
24 Sep 2012 - 2:09 pm | पैसा
वाकवलेले गज पाहिले तेव्हा असंच काहीसं डोक्यात आलं होतं. परफेक्ट शब्दात पकडलंत!
24 Sep 2012 - 12:46 pm | परिकथेतील राजकुमार
झकास जमले आहे.
आमचे जुने संपादक देवबाप्पा अशीच काही अवर्णनीय चित्रे काढून अधे मध्ये चेपु वरती टाकत असतात त्याची आठवण झाली.
24 Sep 2012 - 6:18 pm | नाना चेंगट
अगदी अगदी
24 Sep 2012 - 2:43 pm | श्रावण मोडक
कविताताई,
चित्रांविषयी हे असं तुटक लिहिण्यापेक्षा चित्रासोबतच लिहित जा. चित्रांचा आस्वाद घेण्यासाठीचे ट्रिगर त्यातून मिळू शकतात. :-)
27 Sep 2012 - 11:21 pm | साती
ट्रिगर नको.
चित्राचं आकलन प्रेक्षकाच्या बुद्धीवर सोडावं.
जो तुम्हाला मारूती वाटेल तो मला गणपती वाटेल.
नेमकं महाजनबाईंनी ते चित्र माणसाचं म्हणून काढलं असेल.
:)
28 Sep 2012 - 12:16 am | श्रावण मोडक
बरं. पटतंय. विशेषतः गणपती-मारूती-माणूस हे अगदी पटलं. कारण तुला माहिती आहेच आता. :-)
कविता, ट्रिगर नका देऊ.
चित्रांच्या आस्वादाविषयी त्यांनी स्वतंत्र लिहिलं तर चालेल ना, साते? :-)
28 Sep 2012 - 6:40 am | साती
स्वतंत्र लिहा नक्कीच.
चित्रासोबत टेक्निकल पॉईंट किंवा माध्यमा विषयी लिहिलं तर नक्की चालेल पण आस्वाद मात्र प्रत्येकाला यथामति घेऊ द्यावा.