जेव्हा आपण कपडे वापरतो तेव्हा आपल्याला माहिती देखिल नसते की त्याला बनवताना किती जणांचे हात लागले आहेत.
सर्व प्रथम मान जातो तो बळीराजाला.महाराष्ट्रात कापसाचे पीक विदर्भ, मराठवाडा, खानदेश व माणदेशात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. कापूस हे खरीपाचे पीक असून त्याची पेरणी जून -जुलै मध्ये केली जाते. साधारण ९० दिवसात पहिली
वेचणी होवून, पुढे ३-४ महिने क्रमाक्रमाने वेचण्या होतात. परदेशात यंत्रांच्या साहाय्याने वेचणी केली जाते. परंतु यंत्रवेचणी पेक्षा हातवेचणीचा कापूस जास्त स्वच्छ असतो, यांत्रिक वेचणीच्या कापसातजास्तट्रॅश(कचरा)असतो. यांत्रिक वेचणी
यांत्रिक वेचणी
सध्या परदेशात विशेषतः युरोपात जैविक (म्हणजे कोणतेही रासायनिक खत अथवा कीटकनाशक न वापरून उत्पादित) कापसाला प्रचंड मागणी आहे. त्या साठी जास्त दाम मोजायलाही ते तयार आहेत.
वेचणी नंतर कापूस बाजारात येतो. महाराष्ट्र शासनाने कास्तकारांची पिळवणूक होवू नये म्हणून एकाधिकार कापूस खरेदी योजना राबवली, व भाव किमान पातळीच्या खाली गेल्यास शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्यापासून बऱ्याच अंशी वाचवले̱ गेल्या चार वर्षांपासून मात्र बाजारभाव किमान पातळीच्या वर असल्याने कास्तकार तिकडे फिरकत नाहीत.
या पुढील महत्त्वाची प्रक्रिया म्हणजे जिनिंग व प्रेसिंग.
जिनींग मध्ये कापसाच्या बोंडातील सरकी (बीज) तंतूंपासून वेगळी केली जाते
सोबत डबल नाइफ रोलर जिनचे छायाचित्र दिले आहे.
प्रतिक्रिया
14 Sep 2012 - 4:44 pm | मदनबाण
मामा, जरा मोठे भाग लिवा की ! :)
क्रमशः दिसले नाही ! लेखमाला संपली की काय ?
14 Sep 2012 - 7:38 pm | रेवती
सगळे भाग वाचणारच आहे.
तुम्ही लिहा मामा!