हिरवं झालं रानं

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
9 Sep 2012 - 1:06 pm

हिरवं झालं रानं

हिरवं झालं रानं
हिरवं झालं रानं
तिथंच गाठलं त्यानं
ग बाई
तिथंच गाठलं त्यानं ||धृ||

पायवाट नागमोडी
पांधीतून जायी गाडी
शेतावर सावरूनी
चालले बांधावरूनी
एकल्याच नारंला
तिथंच गाठलं त्यानं ||१||

मोठी झुंबड तिथं झाली
आधाराला नाही सावली
व्दाड वारा पदराशी
खेळला, पाडला पायाशी
सावरू तरी मी कशी
त्यानं ठरवलं झोंबणं ||२||

आधी जरा घाबरले बावरले
पण मी मला नाही सावरले
त्याला अंगाशी ओढले
त्याच्यामधीच भिजले
अस्सा तस्सा आला बरसून
गेला तन चिंब भिजवूनं ||३||

हिरवं झालं रानं
हिरवं झालं रानं ||धृ||

- पाषाणभेद
(पुर्वप्रकाशीत)

कविता

प्रतिक्रिया

पैसा's picture

9 Sep 2012 - 2:37 pm | पैसा

गाणं छान आहे. यातली कल्पना आणि गावातल्या स्त्रीगीतांचा बाज आवडला.

प्रचेतस's picture

9 Sep 2012 - 8:04 pm | प्रचेतस

मस्त हो पाभे.
बर्‍याच दिवसांनी आलात.
येऊ द्यात आता फर्मास लावण्या.

चित्रगुप्त's picture

9 Sep 2012 - 10:58 pm | चित्रगुप्त

झोंबाझोंबी आवडली...
शिव शिव...

प्रभाकर पेठकर's picture

10 Sep 2012 - 12:51 am | प्रभाकर पेठकर

आवडलं..आवडलं.. रानाचं हिरवं होणं आवडलं. नेहमी असेच घडून रान कायम हिरवेगार राहू दे.

स्पंदना's picture

10 Sep 2012 - 9:07 am | स्पंदना

हो ना!
धरती माय भिजु दे!

पाभे भारी.

अत्रुप्त आत्मा's picture

10 Sep 2012 - 10:41 am | अत्रुप्त आत्मा

:)

मदनबाण's picture

10 Sep 2012 - 8:08 pm | मदनबाण

मस्त... :)
काय हो दफोराव इतक दिवस व्हता कुटं ?