मुर्ग मुमताज महल

प्रभाकर पेठकर's picture
प्रभाकर पेठकर in पाककृती
27 Aug 2012 - 1:10 pm

Murgh-Mumtaz-Mahal

साहित्यः

चिकन अर्धा किलो.
तुप ७५ ग्रॅम
कांदे २ नग
आलं २ इंच
खवा अर्धी वाटी
लाल तिखट १ लहान चमचा (टी स्पून)
धणे पावडर १ मोठा चमचा (टे. स्पून)
आख्खे जीरे १ लहान चमचा
दही १ वाटी
काजू १ मूठ
वेलची पावडर १/२ लहान चमचा
केवडा वॉटर १ मोठा चमचा
लिंबू रस १ मोठा चमचा
केशर चिमुटभर
मीठ चवी नुसार

तयारी:
चिकनचे तुकडे करून घ्या.
कांदे आणि आलं लांब लांब आकारात चिरून बदामी रंगावर तळून घ्या आणि मिक्सरवर वाटून बाजूला ठेवून द्या.
खवा थोडे पाणी घालून मिक्सर मधून फिरवून घ्या.
दही फेटून घ्या.
काजू अर्धातास पाण्यात भिजवून मिक्सर मधून वाटून घ्या.
केशर किंचित गरम तव्यावर कोरडेच भाजून (थोडेसेच, जास्त भाजावयास नको) बोटांनी चुरुन गरम पाण्यात घालून ठेवा.

कृती.

चिकन, खवा, लाल तिखट, धणे पावडर, आख्खे जीरे, दही एकत्र करून घ्या.

पातेल्यात तुप तापवा. तुप तापले की त्यावर चिकन (मसाल्या सहित) टाकून परतुन घ्या. नीट परतले गेले की वाटीभर पाणी घालून, झाकण ठेवून, मंद आंचेवर शिजायला ठेवा.

चिकन शिजलं की कांद्याची पेस्ट, काजू पेस्ट, वेलची पावडर, केवडा पाणी, लिंबू रस, केशर आणि मीठ घालून मिसळा. झाकण ठेवून दोन मिनिटे उकळा आणि गॅस बंद करा.

किंचित कोथिंबीर आणि केशराच्या काड्या टाकुन सजवा.

हे मोघलाई प्रकारातील चिकन आहे. नान, रोटी किंवा भाताबरोबर मस्त लागते.

मी डालडा तुप वापरले आहे पण साजुक तुप वापरावयास हरकत नाही.

चिकन मंद आंचेवर शिजवणे महत्त्वाचे आहे.

शुभेच्छा...!

प्रतिक्रिया

शिल्पा ब's picture

27 Aug 2012 - 1:13 pm | शिल्पा ब

नुसताच फटु की पाकृ पण देणार?

पेठकरकाका, श्रावणात दाबून ठेवलेल्या सगळ्या ईच्छा-आकांक्षा जोरदार उफाळून आलेल्या दिसताहेत. :)

(पा कृ सोबत गवतखाऊ पा कृ देखील द्या)

नंदन's picture

27 Aug 2012 - 1:25 pm | नंदन

हे विधान आता कोट करायलाही काही काळ धजावणार नाही :)

मी_आहे_ना's picture

27 Aug 2012 - 1:45 pm | मी_आहे_ना

फोटो दिसत नाही, पण नावावरून आणि कृतीवरून नक्कीच मुमताज-इतकेच आकर्षक असणार ह्याबद्द्दल शंका नाही :)

गणपा's picture

27 Aug 2012 - 1:56 pm | गणपा

खवा, काजु, केसर आणि काय काय....
नावा प्रमाणेच एकदम राजेशाही.

कपिलमुनी's picture

27 Aug 2012 - 2:03 pm | कपिलमुनी

दिल खुश हो गया !!

नगरीनिरंजन's picture

27 Aug 2012 - 2:20 pm | नगरीनिरंजन

पाकृ वेगळी आणि गणपाभौ म्हणतात तशी राजेशाही दिसतेय!
खवा नसल्यास 'कंडेन्स्ड मिल्क' वापरता येईल काय?

सानिकास्वप्निल's picture

27 Aug 2012 - 2:30 pm | सानिकास्वप्निल

मस्तचं!!
मला मोघलई प्रकारातील चिकन खूप आवडतं :)
एकदम रिच पाकृ आहे :)

मुर्ग मुमताज महल असे नाव का दिले असेल या पाक्रु.ला
शहाजहानच्या प्रिय पत्नीची प्रिय डिश होती का ही ? ;)

चिकन भारिये पण :)

मन१'s picture

27 Aug 2012 - 3:55 pm | मन१

दोन मिनिटांचं मौन आणि श्रद्धांजली.

नेहमीच्या चिकन पाकृंपेक्षा वेगळी पाकृ.
बहुतेक या मसाल्यातही आम्हाला बटाटा वापरावा लागणार.

ज्योति प्रकाश's picture

27 Aug 2012 - 5:58 pm | ज्योति प्रकाश

फोटो दिसत नाही.तरी पाककृती बेश्टच असनार यात वाद नाही.

पैसा's picture

27 Aug 2012 - 8:36 pm | पैसा

सध्या काय कुक्कुट सप्ताह का? पाकृ छान दिसतेय.

जाई.'s picture

27 Aug 2012 - 9:06 pm | जाई.

_/\_

सुहास झेले's picture

27 Aug 2012 - 9:21 pm | सुहास झेले

एकदम राजेशाही पाककृती :) :)

चित्रगुप्त's picture

27 Aug 2012 - 9:41 pm | चित्रगुप्त

छान.
ही एक वैदिक पाककृती असून तिचे नाव 'मृग मम तेजोमहाआलय' असे आहे.

अकबर, जहांगीर इत्यादिंनी रामायण, महाभारत इ. चे फारसी अनुवाद करून घेतले होते. उदाहरणार्थ खालील चित्रे बघा:

त्याचप्रमाणे निमत-नामा' हा वैदिक पाककृतींवरील फारसी ग्रंथही माळव्याचा सुलतान घियासुद्दिन खिलजी (१४६९-१५००) याच्या कारकीर्दीत तयार केला गेला होता. त्यातून ही पाककृती शहाजहान व मुमताज ला मिळाली होती, असा आम्हास साक्षात्कार झालेला आहे.
निमत नामा:

...ये साक्षात्कार का मामला है... :)

अभ्या..'s picture

28 Aug 2012 - 1:36 am | अभ्या..

@ चित्रगुप्त
काय हे? लघुचित्रातून एवढा दिर्घ साक्षात्कार? ;-)
मृग मम तेजोमहाआलय पु ना ओक ईनका मामला है. ;-) (ह.घेणे)
@ पेठकर काका,
पाककृती - ई - खास.

कच्ची कैरी's picture

28 Aug 2012 - 3:16 pm | कच्ची कैरी

पाककृती मस्तच आहे येत्य रविवारी करुन बघेल .

अर्धवटराव's picture

29 Aug 2012 - 2:41 am | अर्धवटराव

शुक्रवार संध्याकाळ असावी... आमचे गप्पीष्ट बोलबचन मित्रमंडळ घरी यावे.. येताना "पिण्याची" सर्व सोय करुन यावी. मध्यरात्रीपर्यंत गप्पांचा फड जमावा... आणि मग अश्या स्वादीष्ट चिकन डीश वर तुटुन पडावे.. सुख सुख म्हणुन वेगळे काय असते.
लाजवाब हो काका.

अर्धवटराव

कॉमन मॅन's picture

29 Aug 2012 - 1:25 pm | कॉमन मॅन

सुरेख..

शुचि's picture

29 Aug 2012 - 6:45 pm | शुचि

मस्त!! केशरकाड्यांची सजावट तर क्या केहेने.

प्रभाकर पेठकर's picture

29 Aug 2012 - 8:22 pm | प्रभाकर पेठकर

sagarpdy, नंदन, मी_आहे_ना, गणपा, कपिलमुनी, नगरीनिरंजन, सानिकास्वप्निल, पियुशा, मन१, रेवती, ज्योति प्रकाश, पैसा, जाई., सुहास झेले, चित्रगुप्त, अभिजीत मी नाही, कच्ची कैरी, अर्धवटराव, कॉमन मॅन सर्वांचे प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

sagarpdy,

नाही हो. मुळात, मी श्रावण्-बिवण पाळत नाही. पण जे पाळतात त्यांच्या तपस्येचा भंग होऊ नये म्हणून हात आखडता घेतला होता.

मी_आहे_ना,

छायाचित्रं का बरे दिसत नाहीए? कांही तांत्रीक गोची असावी. कुणा तज्ञाचा सल्ला घ्यावा.

नगरीनिरंजन,
खवा नसल्यास 'कंडेन्स्ड मिल्क' वापरता येईल काय?

त्यापेक्षा बाष्पीभूत दूध (इव्हॅपोरेटेड मिल्क) वापरावे.

सानिकास्वप्निल,

मला मोघलई प्रकारातील चिकन खूप आवडतं
एकदम रिच पाकृ आहे

होय, रिच असल्या मुळेच जरा सांभाळून हौस-मौज करून घ्यावी, नाहीतर 'वजन विल रीच डेंजर लाईन.'

पियुशा,

शहाजहानच्या प्रिय पत्नीची प्रिय डिश होती का ही ?

शहाजहान आणि माझ्या भेटी दरम्यान हा विषय निघाला नाही. पण, असेलही.

रेवती,

बहुतेक या मसाल्यातही आम्हाला बटाटा वापरावा लागणार.

नाही रेवती, बटाटा तिखट पाककृतीत चांगला लागतो. ही सौम्य चवीची राजेशाही पाककृती आहे (बटाटा, गरिब बिच्चारा). ह्यात बटाट्यापेक्षा, उच्चभ्रू कुळातील, 'पनीर' वापरावे.

पैसा,
सध्या काय कुक्कुट सप्ताह का?

नाही हो. गेल्या खेपेस चांगली बोकडाची पाककृती टाकली होती की ह्या बामनाने.

अर्धवटराव,

थोडी आमची भर,
आमचे गप्पीष्ट बोलबचन मित्रमंडळ घरी यावे.. येताना "पिण्याची" सर्व सोय करुन यावी. मध्यरात्रीपर्यंत गप्पांचा फड जमावा... आणि मग अश्या स्वादीष्ट चिकन डीश वर तुटुन पडावे..आणि शनिवारी उशीरा सकाळी, ढुंगणावर उन्हे ताड ताड वाजेपर्यंत निवांत पडून राहावे सुख सुख म्हणुन वेगळे काय असते.

इरसाल's picture

31 Aug 2012 - 12:55 pm | इरसाल

मिपावरील सगळ्या गवताहारी लोकांना मांसाहारी करायचा चंग बांधलाय जणु !!!!!!!!

ग्रेव्ही काय भन्नाट दिसत आहे. तितकीच ती "रिच" असणार ह्याची खात्री.

काका पोटावर टायर असणार्‍यांसाठी तुप चालेल काय ?

;) (हे माझ्या साठी नाही याची नोंद घ्यावी)

प्रभाकर पेठकर's picture

31 Aug 2012 - 1:51 pm | प्रभाकर पेठकर

काका पोटावर टायर असणार्‍यांसाठी तुप चालेल काय ?

(म्हणून मी माझे पूर्णाकृती छायाचित्र कोणाला देत/दाखवत नाही. )

पोटावर टायर असणार्‍यांनी (तुमच्यासाठी नाही ह्याची नोंद घेतली आहे.) नुसते तुपच काय पण वरील आख्खी पाककृतीच नजरेआड करावी.

चिकन, तुप, दही, खवा, काजू वगळून केल्यास हरकत नाही.

इरसाल's picture

31 Aug 2012 - 5:15 pm | इरसाल

:D

धमाल मुलगा's picture

31 Aug 2012 - 2:38 pm | धमाल मुलगा

फोटो पाहूनच आम्ही हाय खाऊन अंतरुण धरले. त्यात आणि कृतीतला मालमसाला वाचून तर संपलोच. आता पिंअदानाला ही डिश अन् साजुक तुपात निथळलेला नान ठेवा म्हणजे आमची मुक्ती कनफरम :-D

जियो काका जियो! मझा आला स्साला :-)