मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मुर्ग मुमताज महल

प्रभाकर पेठकर · · पाककृती
Murgh-Mumtaz-Mahal
साहित्यः चिकन अर्धा किलो. तुप ७५ ग्रॅम कांदे २ नग आलं २ इंच खवा अर्धी वाटी लाल तिखट १ लहान चमचा (टी स्पून) धणे पावडर १ मोठा चमचा (टे. स्पून) आख्खे जीरे १ लहान चमचा दही १ वाटी काजू १ मूठ वेलची पावडर १/२ लहान चमचा केवडा वॉटर १ मोठा चमचा लिंबू रस १ मोठा चमचा केशर चिमुटभर मीठ चवी नुसार तयारी: चिकनचे तुकडे करून घ्या. कांदे आणि आलं लांब लांब आकारात चिरून बदामी रंगावर तळून घ्या आणि मिक्सरवर वाटून बाजूला ठेवून द्या. खवा थोडे पाणी घालून मिक्सर मधून फिरवून घ्या. दही फेटून घ्या. काजू अर्धातास पाण्यात भिजवून मिक्सर मधून वाटून घ्या. केशर किंचित गरम तव्यावर कोरडेच भाजून (थोडेसेच, जास्त भाजावयास नको) बोटांनी चुरुन गरम पाण्यात घालून ठेवा. कृती. चिकन, खवा, लाल तिखट, धणे पावडर, आख्खे जीरे, दही एकत्र करून घ्या. पातेल्यात तुप तापवा. तुप तापले की त्यावर चिकन (मसाल्या सहित) टाकून परतुन घ्या. नीट परतले गेले की वाटीभर पाणी घालून, झाकण ठेवून, मंद आंचेवर शिजायला ठेवा. चिकन शिजलं की कांद्याची पेस्ट, काजू पेस्ट, वेलची पावडर, केवडा पाणी, लिंबू रस, केशर आणि मीठ घालून मिसळा. झाकण ठेवून दोन मिनिटे उकळा आणि गॅस बंद करा. किंचित कोथिंबीर आणि केशराच्या काड्या टाकुन सजवा. हे मोघलाई प्रकारातील चिकन आहे. नान, रोटी किंवा भाताबरोबर मस्त लागते. मी डालडा तुप वापरले आहे पण साजुक तुप वापरावयास हरकत नाही. चिकन मंद आंचेवर शिजवणे महत्त्वाचे आहे. शुभेच्छा...!

वाचन 8999 प्रतिक्रिया 0