परि तुज सम आहेस तूच

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जे न देखे रवी...
24 Jun 2008 - 11:57 pm

लाख पाहिल्या मी सुंदऱ्या अश्या
परि तुज सम आहेस तूच

वहा रे! ते नजर फेकणे
वहा रे! ते नखरेल चालणे
कसा सावरू सांग माझे भूलणे

हा केशभार की काळे घन समजू
हे नयन तुझे की लख्ख बिजली समजू
कुणा कुणाला देशिल असली सजा
लाख पाहिल्या मी सुंदऱ्या अश्या
परि तुज सम आहेस तूच

तुही सुंदर ऋतु ही सुंदर असे
माझे मन माझ्या काबूत नसे
शांत परिसर करितो माझी दुर्दशा
पिण्या वाचून चढली मला नशा
लाख पाहिल्या मी सुंदऱ्या अश्या
परि तुज सम आहेस तूच

अबोल झालीस तू जर सजणे
टाळिन माझे मीच मरणे
आहेस जरी तू परी वा सुंदरी
कशास ठेविसी अशी मगरूरी
दाखविशील का किंचीत जरूरी
लाख पाहिल्या मी सुंदऱ्या अश्या
परि तुज सम आहेस तूच

श्रीकृष्ण सामंत

कविता

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

25 Jun 2008 - 11:18 am | विसोबा खेचर

क्या केहेने..!

आपला,
(अनुष्काप्रेमी) तात्या.

प्राजु's picture

25 Jun 2008 - 11:24 am | प्राजु

मस्त एकदम..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

बेसनलाडू's picture

25 Jun 2008 - 12:56 pm | बेसनलाडू

यूं तो हमने लाख हसीं देखे हैं,तुमसा नही देखा या रफी साहेबांच्या गाण्याचा हा मराठी भावानुवाद आहे ना/का?
(पृच्छक)बेसनलाडू

श्रीकृष्ण सामंत's picture

25 Jun 2008 - 9:46 pm | श्रीकृष्ण सामंत

होय! अगदी शंभर टक्के बरोबर
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

विसोबा खेचर's picture

26 Jun 2008 - 5:58 am | विसोबा खेचर

होय! अगदी शंभर टक्के बरोबर

सामंतसाहेब, बेसनलाडूने शंका विचारेस्तोवर निदान माझ्यातरी ही गोष्ट लक्षात आली नव्हती.

असो,

कृपया यापुढे भाषांतर/अनुवाद असल्यास तसा उल्लेख अवश्य करावा, म्हणजे मूळ कवीवर अन्याय होणार नाही. मूळ कविता त्याने लिहिली असल्यामुळे त्याचाही नामोल्लेख हवा, त्यालाही नामश्रेय मिळायलाच हवे!

आपला,
(न्यायमूर्ती) तात्या.

श्रीकृष्ण सामंत's picture

26 Jun 2008 - 9:14 am | श्रीकृष्ण सामंत

नमस्कार न्यायमुर्तिजी (तात्या),
माझ्या मूळ ब्लॉगवर माझ्या अनुवादीत कविता मी "अनुवादीत"असंच आणि माझ्या स्वलिखित कविता "कविता" असंच लिहित आलो आहे.त्या माझ्या ब्लॉगवर "कॅटॅगरी" आपल्या आपण लिहून निवडता येते.इथे मी "लेखन विषय" आणि "लेखन प्रकार" ह्या सोयी खाली "अनुवादीत" किंवा तत्सम अर्थाचा शब्द दोन्ही सोयीत न मिळाल्यामुळे "कविता" असंच लिहिलं. तत्सम शब्द असल्यास कृपया मार्गदर्शन करावं. नंतर माझ्या लक्षांत आलं की यापुढे अशी "अनुवादीत" कविता माझ्या कविताच्या मुळ ड्राफ्टमधेच लिहावं.आणि मी तसं करीत जाईन.
मी स्वतः माझ्या कविता करीत असल्याने मूळ कविचा "नामोल्लेख हवा" ह्या आपल्या म्हणण्याशी मी पुर्ण सहमत आहे.
न्यायमुर्तिजी,दुसऱ्याची कविता माझ्या नावावर लिहिण्याचं पाप मला दुरान्वये पण करायचं नव्हतं म्हणूनची बेसनलाडूनी शंका विचारल्यावर
"होय! अगदी शंभर टक्के बरोबर"
असं लिहून कळवलं ह्याची न्यायमुर्तिनी कृपया नोंद घ्यावी एव्हडंच.

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Jun 2008 - 9:24 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सामंत साहेब,
अनुवाद आवडला आणि संस्थळाच्या मालकासाठी वापरलेला 'न्यायमुर्तीजी' हा शब्दही आवडला ;)

-दिलीप बिरुटे
(न्यायमुर्तीचा आवडता वकील)

श्रीकृष्ण सामंत's picture

26 Jun 2008 - 11:53 am | श्रीकृष्ण सामंत

डॉ.दिलीपजी,
आपण न्यायमुर्तींचे आवडते वकील आहात हे वाचून न्यायमुर्तीं बद्दल आणि आपल्या बद्दल आमचा आदर द्विगुणीत होतो.
आपल्या सारख्या वकीलाला ईव्हन माझ्या सारख्या अशिलालापण वकीलपत्र द्दायला आवडेल.
आपल्याला माझ्या कवितेचा अनुवाद आवडला हे वाचून आनंद झाला.आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

विसोबा खेचर's picture

26 Jun 2008 - 9:56 am | विसोबा खेचर

न्यायमुर्तिजी,दुसऱ्याची कविता माझ्या नावावर लिहिण्याचं पाप मला दुरान्वये पण करायचं नव्हतं

त्याबद्दल कोर्टाची खात्री होतीच..

"होय! अगदी शंभर टक्के बरोबर"
असं लिहून कळवलं ह्याची न्यायमुर्तिनी कृपया नोंद घ्यावी एव्हडंच.

यातील प्रांजळपणा अन् निष्पापपणा कोर्टाच्या ध्यानात आला होताच, कोर्टाने फक्त, कविता अनुवादीत असेल तर तसा उल्लेख आवर्जून करावा इतकंच सांगितलं आहे.

आपल्या हेतूबद्दल कोर्टाला कोणतीही शंका नाही/नव्हती त्यामुळे आपण आरोपीच्या पिंजर्‍यात कधीच उभे नव्हतात. तसेच कुठलाही दिवाणी दावाही कोर्टात उभा राहिलेला नव्हता. कोर्टाने फक्त भविष्यातही असा दावा उभा राहू नये म्हणून एक लहानसा अध्यादेश काढला इतकंच! :)

इतकंच निवेदन देऊन कोर्ट आपल्याला बाईज्जत बरी करत आहे! :)

आपला,
(न्यायमूर्ती) तात्या.

श्रीकृष्ण सामंत's picture

26 Jun 2008 - 12:29 pm | श्रीकृष्ण सामंत

न्यायमुर्तीजी,
"जस्टीस डिलेड इज जस्टीस डिनाईड"
ह्या उक्तिची आठवण ठेवून,अपराधाच्या हेतू बद्दल सारासार विचार करून एखाद्दास निर्दोष समजून
बाईज्ज्त बरी करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आभार.
साहित्य जगतात लेखनचौऱ्याचा सुळसुळाट होत असताना बेसनलाडू सारखे तत्पर आणि चलाख व्यक्तिंचा सहभाग असताना आपले संस्थळ आदर्श ठेवून सेवा करण्यात यशस्वी न झाले तरच नवल.
अशा संस्थळावर लेखन करायला स्फुर्ती येते.

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com