तुला समजलो, आणि समजली तुझी स्वच्छता

केशवसुमार's picture
केशवसुमार in जे न देखे रवी...
23 Jun 2008 - 6:33 pm

आमची प्रेरणा कविवर्य अनंत ढवळे यांची नितांत सुंदर, अप्रतिम गझल तुला समजलो, कुठे समजली तुझी सहजता श्वास श्वास मळमळून यावा तुला बिलगता खूप दूरवर दिसते आहे तुझी मलिनता वासाभवती फिरत राहिलो खूपवेळ मी तुला समजलो,  आणि समजली तुझी स्वच्छता किती दूरवर आल्यावरती बरे वाटते? मैलभराचा प्रवास निघतो मोजू बघता.. तुझ्याप्रमाणे जगेन मी ही, तुझ्या सवे पण खरेच का येईल मला हे स्वच्छ राहता..? विचार करतो कुठे कुठे बदलेन शब्द मी विडंबनासाठी एखादे काव्य निवडता.....! केशवसुमार

विडंबन

प्रतिक्रिया

फटू's picture

24 Jun 2008 - 6:57 am | फटू

विचार करतो कुठे कुठे बदलेन शब्द मी
विडंबनासाठी एखादे काव्य निवडता.....!

पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

सर्किट's picture

24 Jun 2008 - 7:35 am | सर्किट (not verified)

नाही नाही नाही !

त्रिवार नाही !

इतक्या दिवसांनी येथे यायचे, आणि अशासाठी ?

नकॉ केशवसुमार, प्लीज..

ह्यासाठी इथे आम्हास बोलवू नका पुन्हा, प्लीज !!

- सर्किट

केशवसुमार's picture

24 Jun 2008 - 7:57 pm | केशवसुमार

आपण आलात आणि स्वच्छ प्रतिक्रिया दिलीत ह्या बद्दल धन्यवाद..
(स्वच्छ आभारी) केशवसुमार

विजुभाऊ's picture

24 Jun 2008 - 3:43 pm | विजुभाऊ

दारु बायको बॉस सोडुन विडम्बन...........
हा अट्टहास का?

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

केशवसुमार's picture

24 Jun 2008 - 7:59 pm | केशवसुमार

वाजवा दोन्ही बाजूने.. अस ही बोंबला आणि तस ही बोंबला..

केशवसुमार's picture

24 Jun 2008 - 8:01 pm | केशवसुमार

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या ( ह्या वेळेस ही माणसे जास्त आहेत ;)) सर्व वाचकांचे मनापासून आभार..
(आभारी) केशवसुमार