मधुची गाडी-एक खाद्यसेवा...!

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जनातलं, मनातलं
18 Jul 2012 - 2:27 pm

ही गाडी आम्च्या एस.पी कॉलेज पोस्ट ऑफिसच्या जवळ आहे,,,हा झाला पत्ता सांगण्याच्या जनरितिचा भाग..पण मधुची गाडी हे एस.पी.पोश्ट हापिसचच एक अंग आहे,इतकी ही गाडी त्या पोश्टं नावच्या मानवी आघाडीत तिथे मिसळलेली असते.
अता विस/एक वर्ष होत आली ही गाडी इथे आहे. आणी पहिल्यापासुन ह्याच नावानी फेमस आहे,मधुची गाडी.

श्रमिक,भुकेले,टाइमपासी,खवैय्ये, असे नाना तर्‍हेचे लोक इथे येत असतात. मधुची गाडीही अगदी सक्काळी ७ ला रेड्डी असते....डेक्कनक्विन सारखी. हो...हे रोजचं टाइम आहे,चुकत नाही कधी. सकाळी सात ते दुपारी ३/४ वाजे पर्यंत...हे रोजचं गाडीचं टाइम. सुट्टी अशी इथे नाहीच. अहो खायच्या कामाला सुट्टी कशाला..? सातही वार खाण्याचे आणी तसाच इथला मेनुही.म्हणजे आंम्हा नेहमीच्यांना तो असा पाठ झालाय... बालगिताच्या बोलीवर...( बाकी जगात बालगिताच्या इतकी,समजायला आणी डोक्यात उतरायला सोप्पी बोली असताना,बाकिच्या विद्वान बोल्यांचा जन्मच कशाला झाला? हा आमचा प्रश्न...! )

सोमवार गुरवार शनिवार... साबुदाणाखिचडी इडलीसांबार
रविवार आणी बुधवार... भजी मिसळीवर शांम्पलची धार* (*रव्याच्या भाषेत,पहिल्या धारेचं शांम्पल ;-) )
मंगळवार आणी शुक्रवार... मटार ऊसळ/ब्रेड बदाम शिर्‍याचा मार(म्हणजे या शिर्‍यात ''बदाम कुटून घातलाय...'' इति---मधुशेट...!)
हे येक नंबरी इडली सांबार.... विठ्ठल/रखुमाय सारखं एकजीव

ही मटार ऊसळ/पाव/ हाप-भजी :-)

सांबार....

तर्रीदार मटार ऊसळ

भजीत भजी गोल भजी...(मटार ऊसळीबरोबर लै कातिल लागतात)

आणी या सगळ्याच्या जोडीला,पोहे+सांबार+शेव+दही, भजी/हाप भजी+कट छ्छा!(हे चहाचं पुणेरी रूप आहे....''छ्छा.!''), हे रोजचे पाशिंजर असतातच.

इथले सगळे पदार्थ...म्हणजे आमच्या लेखी ए-१... पण तरी ए-१ म्हणायला नको.त्या मेल्या सँडविच वाल्या सगळ्यांनी या उपमेतलं वैशिष्ठ्य त्यांच्या कर्तबगारिनी ठ्ठार मारलय. व्यावहारिकपणेच वर्णन करायचं झालं तर मधुची गाडी हा काँटिटी/क्वालिटी या दोन व्यावसायिक मुल्यांचा संगम आहे. आणी आमच्या मते हेच इथलं वैशिष्ठ्य आहे. माझा इथला सगळ्यात अवडता पदार्थ म्हणजे इडली सांबारशेव... इथली इडली म्हणजे सांबाराशी जन्मोजन्मीचं नातं असलेली,पटकन त्यात मुरणारी अशी असते.आणी सांबारही त्यात शिरताना आपपरभाव करत नाही. हे इडली सांबार मेड फॉर इच अदर आहे अगदी. चव तर इतकी कातिल असते. की कधी कधी मी दोन/दोन प्लेट हाणुन...परत तेवढ्याच पार्सल सुद्धा घेतो... (उरलेला दिवस घरी निवांत असेल तर ;-) )

अनुक्रमे....पहिला रव्या...--^--^--^-- आणी मधुशेट

पोश्ट हापिस-खातं ;-)

ताजा गरम भज्जी पॉइंट

मस्त फिक्कट चविचा-छ्छा.!

पुन्हा इथे काय आहे,की सांबार असो,मिसळीचं शांम्पल असो,किंवा मटार उसळीचा रस्सा असो... तो हवा तेवढा प्लेटमधे अधुन मधुन येऊन पडत असतो. शेवंही भगवंताची कृपा घडल्या सारखी मधुन मधुन पडत असते. आणी इडली सांबार असो,किंवा मटार उसळ असो,त्या शेवेमुळे असा काही चविचा फ्लेवर तयार होतो,की एखाद दिवस शेव नसली (असं कधी होतच नाही म्हणा..!) किंवा वेगळ्या प्रकारची आलेली असली,तर आवडता मास्तर जाऊन कंटाळवाण्या सरांच्या हातात ''वर्ग'' किंवा तास पडल्या सारखी आमची अवस्था होते... मधुन मधुन मधु शेटचं ते ''मिर्ची फ्री'' हे संगीत ऐकू यावं लागतं,तेंव्हा या साळं'ची मज्जा येते. त्या महान ढगलबाज रव्या'ची बोली हा मधुशेटच्या गाडीवरचा असाच एक टेसदार प्रकार आहे. म्हणायला हा माणुस मधुशेटचा हेल्पर असेल,पण आमच्या लेखी हे पात्र-परिचय झाल्याखेरीज न उलगडणार एक स्वतंत्र नाटक आहे. हा माणुस शांम्पल असो,उसळीचा रस्सा असो,सांबार असो...कुठल्याही द्रवं-रूपा बद्दल बोलायला लागला की मदिराक्ष शास्त्रात शिरतोच... म्हणजे संबार वगैरे देताना ''(90) नैंटी टाकू का..?'' अशी भाषा...! सांबार उसळीतला फ्लॉवर बटाटा येऊ द्यायचा असेल तर,,, ''लेग-पीस असू दे का..?'' अशी गिर्‍हाइकाची केलेली विचारणा+संभावना..! तर्री देताना...'' कॉटर का हाप..?'' अशी एकंदरीतच,नवख्या आणी अजाण गिर्‍हाइकाची माप काढायची पेशल पद्धत!...असं सगळं तिथे आजुबाजुनी आणी जोडि/जोडिनी चाल्लेलं असतं.
शांपल देऊ का...? मिर्ची फ्री एsss.... इति...मधुशेट....

नाईंटी टाकताना...रव्या... ;-)

त्यात मधुशेटंही गिर्‍हाइकांची...कधी गिर्‍हाइकं त्यांची कळ काढत असतात. पोश्ट ऑफिस/एस.पी.कॉलेजातले शिपाई प्रोफेसर/ आजुबाजुच्या कार्यालय कचेर्‍यां मधली रोजची येणारी लोकं...काही महिला मंडळं इ. इ. सर्व इथे नेमानी येत असतात. शिवाय अगदी राजकीय क्षेत्रापासून ते सिने/नाट्य क्षेत्रातल्याही लोकांची मधुची गाडी हे फेवरिट ठिकाण आहे...

इथला कुठचाही पदार्थ घ्या...त्याचं पहिलं वैशिष्ठ्य म्हणजे त्याला असणारी पहिली चव मधुच्या गाडीची...मग ते आमचं अवडतं इडली सांबार असो,मटार उसळ असो,मिसळ असो,अथवा सगळ्या उपवासांना पुरुन उरणारी टेश्टी उपासाची मिसळ असो... इथले पदार्थ इथलेच...असे' दुसरीकडे मिळणार नाहीत. शेवटी या अश्या ठिकाणांचं थोडसं तीर्थक्षेत्रां सारखं असतं... जे तिथे आहे ते दुसरीकडे नाही,आणी दुसरीकडच्या सारखं इथे नाही...ते पहायला आणी शोधायला जाऊही नये. लॉर्ड्स'ला लॉर्ड्स सारखंच असू द्यावं,त्यात वानखेडेची मज्जा शोधायला जाऊ नये. आणी वानखेडेवर लॉर्ड्सची स्वप्न पाहू नये हेच खरं.
आंम्ही या श्टेडियमवरचे नेहमीचे हौशी प्लेयर आहोत,तुंम्हिही कधी आलात टिळक रोडला(पुणें येंथें ;-) )..तर या इथे आणी खेळून जा एक/दोन डाव...!

संस्कृती

प्रतिक्रिया

चित्रगुप्त's picture

18 Jul 2012 - 2:36 pm | चित्रगुप्त

असं काही बघून, वाचून तोंडाला असं पाणी सुटतं .... आणि आपण पुण्यापासून दूर दूर असल्याची खंत पण दाटून येते ...
पुढल्या वेळी पुण्याला आल्याबरोबर मधुची गाडी गाठणार.

मृत्युन्जय's picture

18 Jul 2012 - 2:37 pm | मृत्युन्जय

बेष. सालं एकडाव भेट द्यालाच हवी.

बॅटमॅन's picture

18 Jul 2012 - 2:43 pm | बॅटमॅन

बाडिस.

जेवून तास नाही झाला तोवर भूक लागली महाराज...!

गवि's picture

18 Jul 2012 - 2:49 pm | गवि

अशा ठिकाणांची माहिती पोचवल्याबद्दल तुमचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत. पुण्यात स्थायिक होण्याची वर्षानुवर्षांची इच्छा परत उसळून आली.

बुवांच्या पुण्यभूतल्या अशा खाद्य तथा अमृततुल्य स्थानांची एकदा त्यांच्याबरोबरच वारी घडलेली असल्याने क्वॉलिटीबद्दलची शंका घेण्यासही जागा नाही. क्वाँटिटीसाठी पुढल्या पुणे भेटीच्यावेळी फोनवतो बुवा, चालेल ना?

मधुची गाडी त्यातल्या पदार्थांच्या सकट 'लाईक' करण्यात आलेली आहे.

मस्त फोटो, झकास माहिती नि आटोपशीर स्मायल्यांचं लिखाण.....

बात जम गयी, गुर्जी! :-)

अत्रुप्त आत्मा's picture

18 Jul 2012 - 3:03 pm | अत्रुप्त आत्मा

@फोनवतो बुवा, चालेल ना?>>> येस स्सर!

@आटोपशीर स्मायल्यांचं लिखाण.....>>> :-)

अवांतर- एक/दोन तरी मधु-कर सापडतील अशी लिहितांना खात्री होतीच>>>>

<<<<प्रेषक मधुमती Wed, 18/07/2012 - 14:54.

मस्त...मधुची खिचडी काकडी म्हणजे एकदम भारी!!!
सग्गळे फोटो आणि लेख सह्ही!>>>>>>>> +१

पप्पुपेजर's picture

18 Jul 2012 - 2:53 pm | पप्पुपेजर

खरच पुणे मिस करतो आहे आता !!!
लै बेस!!!

अस्मी's picture

18 Jul 2012 - 2:54 pm | अस्मी

मस्त...मधुची खिचडी काकडी म्हणजे एकदम भारी!!!
सग्गळे फोटो आणि लेख सह्ही!

इरसाल's picture

18 Jul 2012 - 3:00 pm | इरसाल

आवडले सगळे.

पण ते इडली-सांभारात शेव ???????????????????? :~ (संदर्भ . व.ति.फो.)

स्मिता.'s picture

18 Jul 2012 - 3:57 pm | स्मिता.

काय दांडगा अभ्यास आहे गुरुजींचा! _/\_
फोटो बघून तोंपासु.

प्रभाकर पेठकर's picture

18 Jul 2012 - 5:13 pm | प्रभाकर पेठकर

इडली सांबारावर शेव आवडत नाही पण छायाचित्र पाहून एकदा 'ट्राय मारला पाहिजे' ह्या निर्णयाप्रत येऊन पोहोचलो आहे.

इड्ली सांबारासारख्या चांगल्या पदार्थाचं काय वाटोळं केलंय रे, शेव या प्रकाराची लायकी तरी आहे का इडली सांबाराच्या आसपास जाण्याची,

आणि गाडीवाले व आजुबाजुच्या स्वच्छतेच्या बाबतीत काही लिहिलं नाहीत ते... ज्या भिंतीला ती गाडी लावलेली असते तिच्या मागच्या बाजुला काय काय नसतं.

असो, माझ्या इथल्या नवेपणाच्या काळात मा.श्री.प्र.परा यांनी दिलेल्या एका प्रतिसादाची आठवण झाली...

अत्रुप्त आत्मा's picture

18 Jul 2012 - 6:24 pm | अत्रुप्त आत्मा

इड्ली सांबारासारख्या चांगल्या पदार्थाचं काय वाटोळं केलंय रे, शेव या प्रकाराची लायकी तरी आहे का इडली सांबाराच्या आसपास जाण्याची>>> मधुकडच्या इडलीसांभारात शेवेजवळ जायची लायकी नक्कीच आहे,शेवेतंही चव देण्याची पात्रता आहे,आपण एकदा चव घेऊन हाच प्रतिसाद देऊन दाखवा. मग मानलं अपल्याला !

बॅटमॅन's picture

18 Jul 2012 - 6:40 pm | बॅटमॅन

तेच ना चायला...गॉड "सेव" द इडली असे म्हणावे वाटते आहे.

श्रीरंग's picture

18 Jul 2012 - 7:13 pm | श्रीरंग

आप्पाचे कँटीन - डेक्कन जिमखाना क्लब येथेही इडली-सांबार-शेव खाऊन पहाच! केवळ अप्रतीम!

गणामास्तर's picture

18 Jul 2012 - 7:35 pm | गणामास्तर

>>>इड्ली सांबारासारख्या चांगल्या पदार्थाचं काय वाटोळं केलंय रे, शेव या प्रकाराची लायकी तरी आहे का इडली सांबाराच्या आसपास जाण्याची

५० राव पहिल्यांदा हा प्रकार पाहिला तेव्हा मला सुद्धा हाच प्रश्न पडला होता पण डेक्कन ला अप्पा कडे
शेव घालून इडली सांबर खाल्ल्यावर आमचे मत बदललेय.
येत्या रविवारी जमायचं का मग तिथे?

>>>येत्या रविवारी जमायचं का मग तिथे?

ऑ :-o

चिंतामणी's picture

20 Jul 2012 - 12:57 pm | चिंतामणी

रवीवारी येणार असला तर सांगा. मी असतोच तीथे.

त्यासाठी ८.३० ते ९.००चे दरम्यान आले पाहीजे. कारण त्यावेळी सगळ्यात उत्तम मिळते.

पुर्वी फारच उत्तम दर्जा असायचा. आता थोडासा खालावला आहे असे माझे म्हणणे आहे. तरी सुध्दा अनेक ठिकाणांपेक्षा चांगला आहे.

खिचडी-काकडी बद्दलसुद्धा हेच सांगता येइल.

(४० वर्षे डे.जी.चा सभासद असलेला) चिंतामणी.

मृत्युन्जय's picture

19 Jul 2012 - 10:46 am | मृत्युन्जय

अरेरे. तुम्ही इडली सांबारावर शेव घालुन खाल्लेली नाही. छे छे. जीव वाया गेला तुमचा. वाटल्यास त्याला पुणेरी इडली सांबार म्हणा. पण खाउन बघाच एकदा. आम्ही तर फरसाण घालुन पण खातो.

आणि स्वच्छतेच्या बाबतीत तुम्ही कधीपासुन विचार करायला लागला? अमेरिकेत जाउन राहिला लागलाय काय हो? ;)

आमच्या इथे पाणीपुरी, कच्छी दाबेली, भेळपुरी, मिसळ, भजी, कटिंग चा असले पदार्थ अश्या ठिकाणी खाणे अब्राह्मण्य समजले जात नाही हो. हे असले स्वच्छतेचे मुद्दे एका भारतीयाने अस्सल भारतीय पदार्थांच्या गाडीबद्दल उपस्थित केलेले पाहुन आश्चर्य वाटले ;)

हे म्हणजे मिसळ मध्ये पोहे खाण्यासारखे च ना?

चौकटराजा's picture

18 Jul 2012 - 6:36 pm | चौकटराजा

बुवा, हे काय चाललं आहे ? .इथे पाउस पडायला लागलाय .थंडावा येत चाललाय ! कालपर्यंत चालणारे पंखे
आता १ वर ठेवलेत . त्यात तुम्हाला गरम गरम मिसळ. सांबार , गोल भजी हे विषय आणण्याची अवदसा
कोठून सुचली ? हॅट ! फार लांब आहे हो ! यनी वे ! लेख पुलदे ष्टाईल झालाय ! येत्या भेटीत एस पी च्या च्या बाजूला चक्कर मारणेत येईल .

सुहास झेले's picture

18 Jul 2012 - 6:38 pm | सुहास झेले

एकदम धम्माल....नक्की भेट देणार :) :)

पैसा's picture

18 Jul 2012 - 6:58 pm | पैसा

झकास खाद्ययात्रा! पण सांबाराबरोबर शेव कशी लागत असेल देव जाणे! माझ्या एका चुलतबहिणीला पोहे, उपमा, चिवडा सगळ्याबरोबर दही/ताक आवडतं. तसं वाटलं!

चित्रगुप्त's picture

18 Jul 2012 - 9:56 pm | चित्रगुप्त

शेव अगदी वाट्टेल त्या पदार्थावर घालून खातो आम्ही (इन्दौरवाले)....
मात्र ती खास "रतलामी" वा गेला बाजार 'इन्दौरी' शेव असावी....
आणि अगदीच काही नसले, तर (खास करून ब्याचलर मंडळी) या शेवेची भाजी बनवून मिटक्या मारत खातात.
........ शेवकरी गरमागरम शेवेचे ढिगारेच्या ढिगारे लीलया तळून काढत असताना तिथल्या तिथे घेऊन खाणे, हा तर खासच अनुभव.
पुण्यात इंदौरच्या 'प्रकाश' वा 'आकाश' कंपनीची रतलामी शेव मिळत असावी. अर्थात ती शिळी असणार, तरी कुणीतरी म्हटलेच आहे, "काहीतरी आहे बेहत्तर, पेक्षा नसण्याच्या काहीच" ( चिं.वि. जोशींना स्मरून)
हे मधुसेठ मुळात रतलाम-इन्दौरचे तर नाहीत? विचारा जरा.
जय रतलामी सेव मैय्याकी...

५० फक्त's picture

19 Jul 2012 - 11:04 am | ५० फक्त

राईट्ट सर, नुसती शेव हा प्रकार जबराच आहे, पण त्याचं स्थान वेगळं आणि त्याचं मिक्सप करणं वेगळं,

लग्नानंतर पहिल्यांदाच सासरी जतला, यल्लमाच्या जत्रेत जमिनित खड्डा करुन लावलेल्या चुलीवर केलेली शेव आणि बाजुच्या चुलीवर केलेले गुलाबजामुन एवढे खाल्ले होते की बायकोला वाटलं होतं की तिचं आयुष्य आता फक्त स्वयंपाक करण्यातच जाणार आहे.

गणामास्तर's picture

18 Jul 2012 - 7:24 pm | गणामास्तर

आज सकाळी जमले नाही, शुक्रवारी सकाळी भेटूया मटार ऊसळ खायला..
अजून असेचं लेख येऊद्या..

मजा वाटली हा धागा पाहून.
इथं भेट देणं मात्र सोसवणार नाही असं फोटूवरून वाटतय.
घरच्याघरी इडली सांबारावर शेव व उसळ केल्यानंतर त्यात भजी घालण्याचा प्रयोग मात्र करू शकीन. ;)

प्यारे१'s picture

19 Jul 2012 - 10:17 am | प्यारे१

>>> सोसवणार नाही

अजूनही आम्हाला 'लव्ह' चित्रपटातली रेवती आठवते नी तुमच्या तोंडी ही भाषा??????

रेवती's picture

19 Jul 2012 - 6:58 pm | रेवती

बरं झालं आठवण करून दिलीत.
रेवती मला आवडायची म्हणून तर हे नाव घेतले आणि तिचा एकही शिनेमा पाहिलेला नाही.
आता पाहणारच. :)

प्रचेतस's picture

18 Jul 2012 - 10:18 pm | प्रचेतस

एकदम झकास बुवा.

मधुच्या गाडीबद्दल तुमच्याकडून बरंच ऐकलंही होतंच. आज फोटोसहित वर्णन पाहून पुढचा आपला खादाडी कट्टा तिकडेच होणार यात काहीच शंका नाही.

आता ते रास्ता पेठेतलं सौथिंडियन खादाडीबद्दलही लवकर लिहाच.

मिश्रित रसग्रहण केले.... चला अता जेव्हा येईन ना तेव्हा पहिल्यांदा आपला मोर्चा मधुच्याच गाडीवर घेउन जायचा कसे .... ;) अप्रतिम आवडेश बुवा लय भारी

सानिकास्वप्निल's picture

19 Jul 2012 - 11:55 am | सानिकास्वप्निल

तोंडाला पाणी सुटले फोटो पाहून
लेख ही मस्त जमला आहे :)

झकास, खरच तोंडाला पाणी सुटले.

कान्होबा's picture

19 Jul 2012 - 7:17 pm | कान्होबा

मग बुवा कधी बेत करायचा

क्या बात ! क्या बात !

येकदम लगेच तेथे जावं आणि सार खाव अस वाटतय राव

स्पा's picture

20 Jul 2012 - 12:15 pm | स्पा

आहाहाहा
__/\__
खपल्या गेलो आहे

तर्री's picture

20 Jul 2012 - 2:48 pm | तर्री

पुण्यात यावे > सदशिवात राहावे >मधुकडे नाष्टा > बादशाही मध्ये दुपारी जेवावे > गिरिजात रात्री जेवावे आणि बुवा आयस्क्रीम वर मस्तानी घेवोन झोपावे !
गेले ते दिवस !

मधूच्या गाडीचा लाईफ मेंबर !

" पुण्यात यावे > सदशिवात राहावे >मधुकडे नाष्टा > बादशाही मध्ये दुपारी जेवावे > गिरिजात रात्री जेवावे आणि बुवा आयस्क्रीम वर मस्तानी घेवोन झोपावे !"

अगदि परफेक्ट ... पण पान राहुन गेलं ! :) .. एखादा अमृततुल्य पण हवाच ! :)

समोरच्याच मॉडर्न बेकरीच्या आणि अमृततुल्य हॉटेलच्या मध्ये पानाची टपरी आहे. एकदा मी आणि पिताश्री चुकून या टपरीवर भेटलो होतो. मालक पिताश्रींचा वर्गमित्र आहे, हे त्याने "हा बाप काय रे तुझा!" असं विचारल्यावर समजलं. :) पुढे काय कुटाणा झाला तो उगाळण्यात अर्थ नाही!

फादर्स डेच्या निमित्ताने ही कमाल आठवण आली!

मोदक's picture

17 Jun 2013 - 2:07 am | मोदक

:-)) :-)) :-)) :-)) :-)) :-)) :-)) :-)) :-)) :-)) :-)) :-))

बॅटमॅन's picture

17 Jun 2013 - 2:36 am | बॅटमॅन

मर्यादेयं विराजते ||

खरंच!!!! लिमिटच झाली ही तर =)) =)) =)) =))

जॅक डनियल्स's picture

17 Jun 2013 - 5:06 am | जॅक डनियल्स

तुमचे फादर कुठल्या कुठल्या पान टपऱ्यांवर तुला भेटले याचा हिशोब ठेवला तर १०० पाणी वही भरेल. फक्त तुमचे फादर होते म्हणून तुम्ही वाचला..हा रेकॉर्ड कोणी तोडेल असे वाटत नाही मला...;)

मधुच्या गाडिला भेट देण्यात आली .. त्याच्या कडे चहा हि चांगला आहे .. पण तरी हि "अमृततुल्य" मधे जाणे आलेच.. टिळक रोड वर शक्ति स्पोर्ट्स//बादशाहि जवळ ची दोनीहि अमृततुल्ये उत्तम !
मधुकडची अजुन एक चांगली डिश म्हणजे गोड-शीरा ! अननस युक्त !

मैत्र's picture

20 Jul 2012 - 8:11 pm | मैत्र

पुण्यात येणं होणार नाही त्यात मधुची गाडी लांबच :(
असो.. इतरांचेही आत्मे अतृप्त करण्याचा प्रयत्न :(

इडली सांबार किंवा मटार उसळीवर शेव ? - पुण्यात केव्हाही..
आप्पांकडे काय झक्कास ताजी कुरकुरीत शेव (बिस्कीटाच्या पत्र्याच्या डब्यात ठेवलेली) मटार उसळीवर काय लागते !!
गेले ते दिवस ..
श्री, बेडेकर, रामनाथ, 'तिलक', आप्पा, गिरिजा, टिळक रोडचा ज्युस (सुवर्ण पाशी), १०-१५ वर्षापूर्वीचं एस एस (अष्टांग आयुर्वेद समोरचं), प्रबोधिनी समोरचा 'जिवाला खा' साग्रसंगीत सामोसा दोन चटण्या आणि शेवे बरोबर नटून येणारा, नारायण पेठेतला भजी / वडापाव वाला आप्पा -- खेळीया समोरच्या चौपाटीची आद्य गाडी.. किती नावं घ्यावीत .. अगदी नुकत्याच हरवलेल्या 'काटा किर्र' पर्यंत ... :(

अवांतरः काटा किर्र चं पुढे कुठे स्थलांतर झालं का गायब आहे ?

प्रभाकर पेठकर's picture

20 Jul 2012 - 8:45 pm | प्रभाकर पेठकर

काटा किर्रर्र .. राजाराम पुलाकडून कमिन्स कॉलेज कडे येणार्‍या रस्त्यावर आहे.

जॅक डनियल्स's picture

17 Jun 2013 - 5:02 am | जॅक डनियल्स

फोटो बघूनच आत्मा तृप्त ...सांबर-इडली-शेव खाल्ल्यावर तर मोक्षाच मिळेल बहुतेक.
पुण्यात ईमान उतरल्या-उतरल्या मधूची गाडी गाठण्यात येईल.

अनिरुद्ध प's picture

21 Jun 2013 - 12:14 pm | अनिरुद्ध प

पुण्यास येणे झाल्यास जरुर भेट देवु.