इशारा..

स्पंदना's picture
स्पंदना in जे न देखे रवी...
16 Jul 2012 - 10:14 am

सोकावालास का रे?
अलिशान मंदिरात राहून?
डॉलबी आरत्यांच्या गजरान
कानाचे पडदेही फाटले असावेत.
बहिरा झालायस का?

सांजसकाळच्या छप्पन भोगांनी
अ-पचन झाली असावीत
अन धुपादिपांच्या आडून
काही दिसतही नसाव

आधी बरा होतास
चार तुळ्यांनी कसबस पेललेल शिखर
आत्ता पडतय की मग
तुला चांगला जागृत ठेवत होत.

एखादा गुळाचा खडा
अन अधीमधी चव पालटिला
चार फुटाणे
बरचस चलाख ठेवत असावेत तुला

कधी उमलली तर दिसणारी
गुलबक्षिचि फुल
तरतरी आणून जायची
कापऱ्या आवाजातल्या स्तोत्रांना
भुकेला होतास तेंव्हा

चल उठ
चल परत माळरानावर
कुठेतरी शेताच्या बांधाला
बस पुन्हा शेंदूर फासून
अन त्यावर रेखलेले डोळे रोखून

पहा
कुठ आलंय जग ते
तुझाच फाफट पसारा न हा?
की अंगावरच्या दागिन्यांच्या पल्याड
नजर नाही उरली तुला?

आवंदा तुझ्या कृपेन पिकल
म्हणून बांधलेलं राउळ
तुझा आब राखून होतं.
पुढल्या पिकावर त्याच देऊळ करण
फक्त तुलाच शक्य होत..

आजच्या गाद्यागीरद्यात
तुला कैद करून
तुझे दलाल तुला कधिचा
विकून मोकळे झाले
अन सुखलोलुपतेच्या नशेत
गांज्याखसासारखा
झुलतोयस तू

उठ
अन दाखव मला
तुझी ती
आवाज नसणारी काठी
कर मर्दन पुन्हा
ह्या दैत्यांच

नाहीतर

तुझंच काही

खर नाही

देवा !

__/\__

अपर्णा

समाज

प्रतिक्रिया

शैलेन्द्र's picture

16 Jul 2012 - 11:27 am | शैलेन्द्र

मस्तं... आवडली.. नामदेव संप्रदायातली कविता..

जेनी...'s picture

16 Jul 2012 - 11:34 am | जेनी...

:(

प्यारे१'s picture

16 Jul 2012 - 12:45 pm | प्यारे१

पोच.
:)

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

16 Jul 2012 - 3:42 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

रचना. आवडली.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Jul 2012 - 5:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडली कविता.

-दिलीप बिरुटे

michmadhura's picture

16 Jul 2012 - 6:23 pm | michmadhura

कविता आवडली.

कविता आवडली.
मला विचाराल तर ती आवाज नसणारी काठी आपण आपल्या हातात घ्यावी. पुढे तिचा आपल्या आधारासाठी उपयोग करुन घ्यायचा की दैत्यांना सडकून काढण्यासाठी त्याची बुद्धी देव आपल्याला आपोआप देतो.