गुवाहाटी आणि बागपत

पुण्याचे वटवाघूळ's picture
पुण्याचे वटवाघूळ in काथ्याकूट
14 Jul 2012 - 6:33 pm
गाभा: 

गेल्या काही दिवसात आपल्याच देशात अशा काही घटना घडल्या आहेत ज्यामुळे कोणाही सुसंस्कृत भारतीयाची मान शरमेने खाली जाईल आणि संतापाचे अंगार दाटून येतील.आणि दुर्दैवाने आपण त्याविषयी काहीही करू शकत नाही म्हणून हळहळ व्यक्त करण्याशिवाय फारसे काही करू शकणार नाही.

घटना १: स्थळ: गुवाहाटी. एक १५-१६ वर्षांची मुलगी तिच्या मैत्रिणीचा वाढदिवस एका पबमध्ये साजरा करून बाहेर पडत असताना तिची काही माणसांबरोबर वादावादी झाली.त्यानंतर १५-२० जणांनी त्या मुलीचे केस ओढून तिला रस्त्यावर पाडले.त्या मुलीचे कपडे फाडायचा प्रयत्न करण्य़ापर्यंत या हैवानांची मजल गेली.आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे हा सगळा प्रकार रेकॉर्ड होत होता आणि तो व्हिडिओ इंटरनेटवर आला आहे.त्या २० जणांची छायाचित्रे (त्या व्हिडिओतून घेतलेली) फेसबुक आणि इतर अनेक ठिकाणी आली आहेत.त्यांच्या चेहऱ्यांवर आपण करत आहोत ते कृत्य चुकीचे आहे असा पुसटसाही भाव नाही.यातील ३ जणांना पोलिसांनी पकडले आहे पण उरलेले अजूनही सापडलेले नाहीत.

जर का रस्त्यावरून जाणाऱ्या मुलीला अशा पध्दतीने वागविले जात असेल, तिचे कपडे फाडायचा प्रयत्न होत असेल तर आपण आपल्याला सुसंस्कृत का म्हणवावे?

काही वर्षांपूर्वी मुंबईत सुनील मोरे नामक पोलिस हवालदाराने मरीन लाइन्समधील पोलिस चौकीत एका १५-१६ वर्षीय मुलीवर बलात्कार केला होता.त्याच्या पुढच्या वर्षी ३१ डिसेंबरला रात्री गेटवे ऑफ इंडियावर नववर्षाचे स्वागत करत असलेल्या जमावाने दोन मुलींचे कपडे फाडले होते आणि ते कृत्य करणाऱ्यांचे हिंदुस्थान टाइम्समध्ये फोटोही आले होते.नशीबाने या मुलींना त्यांच्याबरोबर असलेल्या तरूणांनी त्यांना वेळीच गाडीतून त्यांच्या घरी नेऊन सोडले.समजा त्यांच्याबरोबर असे कोणी नसते तर त्यांची काय अवस्था झाली असती? अशा घटना घडल्यानंतर नेहमीप्रमाणे स्वयंघोषित नैतिक पोलिसांचे ’मॉरल पोलिसिंग’ चालू झाले. (अजून गुवाहाटीच्या प्रकरणात ते कसे चालू झाले नाही याचेच आश्चर्य वाटते).दरवेळी मुलींनी तोकडे कपडे घातल्यामुळे/दारू प्यायल्यामुळे या प्रसंगांना सामोरे जायची वेळ त्यांच्यावर येते अशाप्रकारचे ठेवणीतले डायलॉग झोडले जातात. इतरांनी काय करावे (तोकडे कपडे घालावे की घालू नये, दारू प्यावी की पिऊ नये) हे सांगायचा अधिकार अशा मॉरल पोलिसांना कोणी दिला?दुसरे म्हणजे मुलींनी तोकडे कपडे घातले हे त्यांच्या अंगाला हात लावायचे समर्थन कसे होऊ शकते?तिसरे म्हणजे तोकडे कपडे म्हणजे नक्की काय?अशा बुरसटलेल्या लोकांना नऊवारी साडीसोडून इतर सर्व काही तोकडेच वाटेल.गेट वे ऑफ इंडियाप्रकरणी हिंदुस्तान टाइम्स मध्ये आलेले फोटो मी पण बघितले होते.गुडघ्याइतक्या लांबीचा स्कर्ट आणि खांदे झाकणारा टॉप असा पेहराव त्या मुलींनी केला होता.याला तोकडे कपडे का म्हणावे?कामानिमित्त मी युरोप आणि ऑस्ट्रेलियात अनेकदा गेलो आहे.तिथे त्यापेक्षाही कितीतरी तोकडे कपडे घातलेल्या मुली असतात.तरीही भर रस्त्यावर त्यांच्या अंगाला हात लावून घाणेरडी कृत्ये होत नाहीत.

दृश्य क्रमांक २: राजधानी दिल्लीपासून ५०-६० किलोमीटर अंतरावरील बागपतजवळच्या एका गावातील खाप पंचायतीने ४० पेक्षा कमी वयाच्या स्त्रियांना बाजारात खरेदीसाठी जाऊ नये, मोबाइल फोन वापरू नयेत अशा स्वरूपाची बंधने घातली आहेत आणि प्रेमविवाहाला बंदी घातली आहे.आणि धक्कादायक बातमी म्हणजे उत्तर प्रदेशचे मंत्री आझम खान यांनी ’प्रत्येकाला आपले विचार मांडायचे स्वातंत्र्य आहे’ असे म्हणत एका पध्दतीने या खाप पंचायतीचे समर्थन केले आहे. अफगाणिस्तानमधील तालिबानला का नावे ठेवा?असे तालिबान आपल्या देशातच आहेत आणि तेही राजधानीपासून इतक्या जवळ बिनदिक्कतपणे आपले बुरसटलेले विचार मांडतात आणि इतकेच नव्हे तर त्याची सक्ती करतात.मागे हरियाणातील जिंद जिल्ह्यात जातीबाहेर प्रेम केल्याच्या ’गुन्ह्याबद्दल’ एका युगुलाला ठार मारले होते आणि ते कृत्य केल्याचा कसलाही पश्चात्ताप त्या लोकांना नव्हता याची आठवण आली.त्यांच्या जीवनपध्दतीत प्रेमविवाहाला स्थान नाही असे समर्थन या खाप पंचायतीच्या लोकांनी केले होते.त्यांच्या जीवनपध्दतीत प्रेमविवाहाला स्थान नसले तर त्यांनी स्वत: प्रेमविवाह करू नयेत.पण ज्यांच्या जीवनपध्दतीत प्रेमविवाहाला स्थान आहे अशांचा हक्क हिरावून घ्यायचा अधिकार त्यांना कोणी दिला?आणि त्याउपर त्यांना ’आमच्या जीवनपध्दतीच्या’ नावावर ठार मारायचा अधिकार त्यांना कोणी दिला?

अशा घटना वाचल्या की खूप व्यथित व्हायला होते.एक समाज म्हणून आपल्याला सुसंस्कृत म्हणवून घ्यायचा अधिकारच नाही असे वाटते.या सगळ्याला जबाबदार कोण आहे?प्रत्येकाला आपले आयुष्य आपल्या मर्जीने जगायचा अधिकार आहे आणि आपल्याला ते मान्य नाही म्हणून (किंवा अन्य कोणत्याही कारणाने) अशी कृत्ये करायचा कोणालाच अधिकार नाही हे आपला समाज कधी शिकणार?आणि अशा बातम्या वाचून दु:ख व्यक्त करण्याशिवाय आपण काय करू शकतो?मला पाच वर्षांचा एक मुलगा आणि दोन वर्षांची मुलगी आहे.या सगळ्या गोष्टी समजण्याइतकी ही मुलं मोठी नाहीत.पण ती जशीजशी मोठी होतील त्याप्रमाणे मला त्यांना या सगळ्या गोष्टी समजावून सांगायच्या आहेत म्हणजे मोठे झाल्यावर माझी मुले अशा कृत्यांपासून दूर राहतील आणि तोपर्यंत अशा प्रकारांविरूध्द काही चळवळ उभी राहिली असेल तर त्यात पुढाकार घेतील.याव्यतिरिक्त आपण काही करू शकतो का?तुमची काय मते आहेत?

(रात्रीच्या वेळी झाडावर उलटे लटकणारे) पुण्याचे वटवाघूळ
मी "ऐसी अक्षरे" संकेतस्थळावर "पिसाळलेला हत्ती" नावाने वावरतो
मी "उपक्रम" संकेतस्थळावर "आयाळ वाढलेला सिंह" नावाने वावरतो
मी "मायबोली" संकेतस्थळावर "जिभल्या चाटणारा बोका" नावाने वावरतो

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Jul 2012 - 7:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गुहाटीच्या तरुणीच्या बातम्या वाचनात येत होत्या. युट्युबवर आत्ताच व्हिडियो बघितला. तरुणीशी छेडछाड चाललेली असतांना त्यांना तसे करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न कोणी करतांना दिसला नाही. शेवटी पोलिसांनी तिला सुरक्षितपणे तेथुन घेऊन गेलेले दिसले. [बातमी आणि तरुणीची मुलाखत]व्हिडियोत अशी कृत्य करणार्‍यांचे चेहरे स्पष्ट दिसत आहेत. आरोपींना पकडणं तसं काहीच अवघड नाही. साल्यांना पोलिसांनी असा शिष्टीमॅटीक धु धु धुतला पाहिजे की आयुष्यात त्याचा त्यांना कधी विसर पडु नये.

चाळीशीच्या आतल्या स्त्रियांनी खरेदीला जायचं नाही आणि मुलींनी रस्त्यावर मोबाईल वापरायचा नाही. खाप पंचायतीबद्दल तर बोलायचं काम नाही. च्यायला, आपला प्रवास कोणत्या दिशेला चालु आहे, काही कळायला मार्ग नाही.

-दिलीप बिरुटे
(हताश)

छोटा डॉन's picture

15 Jul 2012 - 10:26 pm | छोटा डॉन

लेख आणि त्याच्या अनुषंगाने चाललेल्या चर्चेत वाद-प्रतिवाद करणारे उत्तम प्रतिसाद वाचतोय.

ह्यानिमित्ताने मी इथे अजुन एक मुद्दा उपस्थित करु इच्छितो तो म्हणजे जमावाची मानसिकता.
खवळलेला, बिथरलेला किंवा कुठल्याशा कैफात झिंगलेला आणि जमावाच्या ताकदीचा अंदाज असणारा समूह एखाद्या वादात समोर कोण आहे ह्याची कधीच काळजी करत नाही. उपरोक्त घटनेत त्या बिचार्‍या मुलीचे केस ओढुन, कपडे वगैरे फाडुन मारहाण झाली हे वाचले (व्हिडिओ पाहण्याची इच्छा नाही). पण समजा त्या मुलीच्या जागी कोणता मुलगा असता किंवा एखादी गृहस्थ असते किंवा त्यापुढे जाऊन एखादे आजोबाही असते आणि त्यांनी काही ठिकाणी म्हटल्याप्रमाणे अशा बेफाम जमावाशी वाद घातला असता तर त्यांनाही अशीच कपडे फाडून मारहाण झाली असती असे वाटते.
रोजच्या जीवनातही क्षुल्लक कारणावरुन जमावाने एकट्यादुकट्या किंवा संख्येने कमी असलेला ग्रुपला आपल्या संख्येच्या ताकदीच्या जोरावर असेच निर्वस्त्र करुन धु धु धुतल्याची उदाहरणे कमी नाहीत. इनफॅक्ट रस्त्यावर मारामारी सुरु झाली की त्या प्रकाराशी अजिबात संबंध नसलेले लोकल लोकही आपल्या स्थानिकतेचा बडेजाव मिरवण्यासाठी उगाच ह्यात घुसतात आणि जी बाजु कमजोर आहे त्याच्यावर हात साफ करुन घेतात असा अनुभव आहे. बेदम मारणे,कपडे फाडणे, गलिच्छ आणि अश्लिल शिवीगाळ करणे ह्या प्रकारात समोर कोण आहे ह्याचा जमावाला अजिबात फरक पडत नाही असे माझे ठाम मत आहे (खाली मस्त कलंदरने अशा प्रकाराचा विरोध करताना खून झालेल्या मुंबईच्या २ दुर्दैवी मुलांचे उदाहरण दिलेच आहे).
त्या मुलीच्या दुर्दैवाने ती ह्यांच्या तावडीत सापडली व त्यापुढे ही दुर्दैवी घटना घडली हे सर्व खेदजनकच आहे.

आता एखाद्या भांडणात जमावाला समोर कोण आहे ह्याचाच फरक पडत नसेल तर त्या मुलीने दारु पिली आहे का किंवा तिने कसे कपडे घातले आहेत हे जमावाच्या दृष्टीने दुय्यम आहे. समजा त्या मुलीने अगदी नऊवारी नेसुनही त्यांच्याशी वाद घालता असता किंवा त्या मुलीच्या जागी दुसरा एखादा एकटादुकटा किंवा असहाय्य मुलगा असता किंवा त्यापुढे जाऊन एखादे वयस्कर गृहस्थ असते तरीही थोड्याफार फरकाने हाच प्रकार घडला असते असे नमुद करु वाटते.
अर्थात इतरांच्या तुलनेत ह्या घटनेचा व्हिक्टिम एक अल्पवयीन मुलगी आहे हे जमेस धरुन ह्या प्रसंगाचे गांभिर्य इतरांच्या तुलनेत जास्त आहे व त्यामुळे त्याच्या अनुषंगाने कायद्याची इतर कलमे वापरुन अधिकाधिक कठोर शिक्षा होणे जरुरीचे आहे व तेच योग्य आहे ह्यात दुमत नाही.

माझ्या ह्या मुद्याच्या अनुषंगाने मला एवढेच म्हणायचे आहे की मुलीच्या वर्तनाबद्दल व त्याच्या अनुषंगाने जमावाला मिळणार्‍या चिथवणीबद्दल जी चर्चा चालली आहे त्यापेक्षा इथे जमावाच्या मानसिकतेला लक्षात घेणे जास्त महत्वाचे आहे व त्यावर उपाय शोधला पाहिले. सदर घटनेतुन झुंडशाहीने वागणार्‍या अशा बेलगाम समुहाला योग्य शिक्षा होणार असेल तर ह्याच्यावरुन धडा घेऊन पुढेमागे होऊ शकणार्‍या अशा घटनात त्रास होऊ शकणार्‍या कित्येक मुली, मुले, पुरुष किंवा सर्वच असहाय्य आणि एकट्यादुकट्या लोकांना ह्यातुन १००% संरक्षणाची अगदी हमी जरी नसली तरी किमान काही दिलासा मिळेल.

- छोटा डॉन

पु. व.
खरंच गुवाहटी, गेटवे ऑफ इंडिया च्या घटना, रेप केपिटल आणि दररोज पेपर मधे येणार्या अजुनही बर्याच काही बातम्या अगदी frustrate करतात...
आणि मिपा वर च येणार्या असल्या कंमेट्स www.misalpav.com/node/22214#comment-412321 काय बोलणार अशा लोकांशी...
molestation, rape n sexual harrassment ची सद्यस्थितीतली टक्केवारी काढली असल्याप्रमाणे 'चित्र बदलते आहे' असा दावा केलाय... आणि अजुन पुढे जाऊन 'स्त्रियांना आपले प्रायवेट पार्ट कितपत प्रायवेट ठेवायचे आहेत' अशी comment...
थोडा जरी sense मुलांमधे असला तर प्रत्येकाने स्वतःला प्रश्न विचारुन पहावा कि 'how many times i have stared at/commented n laughed about/touched private parts of some un/known gal आणि तेच how many times i was at receiving end of this kind of behaviour from gals' म्हणजे खरचं चित्रं किती बदललं आहे ते कळेल.

प्रभाकर पेठकर's picture

14 Jul 2012 - 8:24 pm | प्रभाकर पेठकर

एक १५-१६ वर्षांची मुलगी तिच्या मैत्रिणीचा वाढदिवस एका पबमध्ये साजरा करून बाहेर पडत असताना...........
हल्ली भारतात १५-१६ वर्षाच्या मुली एकट्यादुकट्या, रात्रीबेरात्री पब मध्ये जातात?

तिची काही माणसांबरोबर वादावादी झाली.

घ्या.... त्यानंतर एकटी मुलगी १५-२० जणांबरोबर वादही घालते? ऐकावे ते नवलच.

जर का रस्त्यावरून जाणाऱ्या मुलीला अशा पध्दतीने वागविले जात असेल, तिचे कपडे फाडायचा प्रयत्न होत असेल तर आपण आपल्याला सुसंस्कृत का म्हणवावे?

कुणा एखाद्या टोळक्याने गैरवर्तुणूक केली म्हणून आख्खा समाज असंस्कृत कसा होतो? भारताच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अशा घटनांचे प्रमाण किती आहे? जगातील सर्व समाजांमध्ये खून, दरोडे, बलात्कार, फसवणूक, मारामार्‍या होतच असतात म्हणून तर जगात असा एकही देश नाही जिथे पोलीस, कोर्ट इ. अस्तित्वातच नाही.

काही वर्षांपूर्वी मुंबईत सुनील मोरे नामक पोलिस हवालदाराने मरीन लाइन्समधील पोलिस चौकीत एका १५-१६ वर्षीय मुलीवर बलात्कार केला होता.त्याच्या पुढच्या वर्षी ३१ डिसेंबरला रात्री गेटवे ऑफ इंडियावर नववर्षाचे स्वागत करत असलेल्या जमावाने दोन मुलींचे कपडे फाडले होते

स्त्रियांनी आणि मुलींनीच नाही तर स्वसंरक्षण करू न शकणार्‍या सर्व व्यक्तींनी अशा वेळा, अशी ठिकाणं, असे प्रसंग टाळावेत. हा कॉमन सेन्स घरच्या संस्कारातून सर्वांनाच शिकविला जातो.

अशा घटना घडल्यानंतर नेहमीप्रमाणे स्वयंघोषित नैतिक पोलिसांचे ’मॉरल पोलिसिंग’ चालू झाले.

म्हणजे चार चांगल्या गोष्टी कोणी सांगितल्या की स्वयंघोषित नैतिक पोलीस म्हणून हिणवायचे आणि अशा घटना घडल्या की वरतून आपणच विचारायचे, 'ह्या बाबत काय करता येईल?' नैतिक पोलीसांचे ऐकलेच पाहिजे असे नाही. पण मग येणार्‍या प्रसंगांना आपणच तोंड द्यायचं. सिव्हील पोलीसांकडे जा, कोर्टात जा, गुंडांचा सामना करा.

इतरांनी काय करावे (तोकडे कपडे घालावे की घालू नये, दारू प्यावी की पिऊ नये) हे सांगायचा अधिकार अशा मॉरल पोलिसांना कोणी दिला?

मत प्रदर्शनाचा अधिकार 'लोकशाही' पद्धतीच्या राजवटीने दिला. असेही, समाजाला (आपल्या भाषेत मॉरल पोलीसांना...) काही सांगण्याचा अधिकार नसेल तर बलात्कार, खून करणार्‍यालाही 'असे वागू नकोस, हे गैर आहे' हे सांगण्याचा कोणाला अधिकार उरत नाही. तेही म्हणतील, 'आम्ही बलात्कार करावा की नाही हा आमचा प्रश्न आहे.तुम्ही कोण आम्हाला शहाणपणा शिकविणार?'

अशा बुरसटलेल्या लोकांना नऊवारी साडीसोडून इतर सर्व काही तोकडेच वाटेल.

खरंच? चार चांगल्या गोष्टी सांगणारी माणसे म्हणजे बुरसटलेल्या विचारांची? मग पुढारलेल्या विचारांचे कोणाला म्हणावे? बलात्कार करणार्‍याला? की तोकडे कपडे घालून, रेव्हपार्ट्यातून नशापाणी करून, रस्त्यावर अचकट विचकट अंग विक्षेप करीत जाणार्‍या तरूणींना?

मी युरोप आणि ऑस्ट्रेलियात अनेकदा गेलो आहे.तिथे त्यापेक्षाही कितीतरी तोकडे कपडे घातलेल्या मुली असतात.तरीही भर रस्त्यावर त्यांच्या अंगाला हात लावून घाणेरडी कृत्ये होत नाहीत.

युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलियात बलात्कार, अपहरण, खून होतच नाहीत? पहिल्यांदाच ऐकतो आहे.

खाप पंचायतीच्या मुद्यावर तुमच्याशी सहमत आहे.

कुठल्याच गुन्ह्याला नैतिक अधिष्ठान नसतं. कुठलाच गुन्हा समर्थनिय नाही. पण त्याच बरोबर बाहेरच्या जगात वावरताना सुरक्षेची काही बंधने सर्व स्त्री-पुरुषांना पाळाविच लागतात. आणि जर ती पाळली नाहीत तर अशा एखाद्या घटनेचे आपण बळी ठरू शकतो, हे कायम लक्षात ठेवले पाहिजे. हे मी 'बुरसटलेल्या विचारांचा नैतिक पोलीस' ह्या आरोपाची शक्यता स्विकारून सांगू इच्छितो.

आपण दिलेल्या आणि आपल्या सर्वांच्याच माहितीच्या कक्षेबाहेरीलही सर्व अनैतिक आणि अमानुष घटनांचा मी धिक्कारच करतो.

मन१'s picture

14 Jul 2012 - 8:44 pm | मन१

बाकी सर्व मुद्द्यांवर सहमत्.स्वसंरक्षण करता येत नसेल तर आजही जुनी माणसे "रात्री बेरात्री जाउ नकोस, चोर- चिलटाचं भय फार " असे काळ्जीनं सांगतात, ते चूक वाटत नाही.

कुणा एखाद्या टोळक्याने गैरवर्तुणूक केली म्हणून आख्खा समाज असंस्कृत कसा होतो? भारताच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अशा घटनांचे प्रमाण किती आहे? जगातील सर्व समाजांमध्ये खून, दरोडे, बलात्कार, फसवणूक, मारामार्‍या होतच असतात म्हणून तर जगात असा एकही देश नाही जिथे पोलीस, कोर्ट इ. अस्तित्वातच नाही.

समाज असंस्कृत असणे सोडून दिले तर एक मुद्दा महत्वाचा. इतरत्र चोरी, दरवडेखोरी , विशेष्तः बलात्कार आणि लाच देणे-घेणे केल्यास जबरदस्त शिक्षा होते. ह्याला "काय्दा-सुव्यवस्था" चांगली असणे असे म्हणतत.
भारतात फाशी कुणाला द्यायची हे ठरवायला दोन्-पाच्-दहा कितीही वर्षे लागू शकतात. थोडीफारही सत्ता(किंवा पुरेसा पैसा) हाती असेल तर कुणीही सामान्याचे काय वाट्टेल ते दिवसाढवळ्या करु शकतो.
भरदिवसा शहराच्या मुख्य हमरस्त्यावर मुडदे पडलेत आणि एकही साक्षीदार मिळत नाही हे चित्रही वारंवर दिसते.
न्यायालयांची गती बोंबलली आहे. पोलिसांचा गुंडाना धाक वाटायला हवा आणि सामान्यांना आपलेपण.
इथे चित्र उलटे होते की काय असे खाजगी गप्पांतून जाण्वते.

पुण्याचे वटवाघूळ's picture

14 Jul 2012 - 9:27 pm | पुण्याचे वटवाघूळ

हल्ली भारतात १५-१६ वर्षाच्या मुली एकट्यादुकट्या, रात्रीबेरात्री पब मध्ये जातात?

वाटलेच होते. ती मुलगी पबमध्ये गेली म्हणून हा प्रकार घडला असे कोणीच म्हटले कसे नाही!! अहो असे प्रकार दिवसाढवळ्या शाळेतून घरी परतत असलेल्या मुलींबरोबरपण होतात.मागे रिंकू पाटील या मुलीला ती दहावीची परीक्षा देत असताना भर वर्गात घुसून जाळले होते.म्हणजे आता मुलींनी दहावीची परीक्षा पण देऊ नये का?आणि शहरात जर पब असतील तर त्या ठिकाणी जायचा त्या मुलीला का अधिकार असू नये?पबमध्ये जाणे चुकीचे आहे असे वाटत असेल तर ते त्या मुलीने आणि तिच्या आई-वडिलांनी बघून घ्यावे.पण जोपर्यंत ती इतरांबरोबर काही वावगे करत नाही तोपर्यंत इतरांना याविषयी काही बोलायचे कारण नाही.आता या वयाच्या मुलीला पबमध्ये प्रवेश कसा दिला असेल?इथे कायद्याचे उल्लंघन झाले आहे का?तसे झाले आहे असे वाटते आणि त्याबद्दल पबवरही कारवाई व्हायला हवी.पण त्या मुलीचे कपडे फाडायचे समर्थन कसे होऊ शकेल?

कुणा एखाद्या टोळक्याने गैरवर्तुणूक केली म्हणून आख्खा समाज असंस्कृत कसा होतो? भारताच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अशा घटनांचे प्रमाण किती आहे?

यात केवळ intensity चा फरक आहे. कोणत्याही स्त्रीला बसमधून जातानाचे तिचे अनुभव विचारा.त्यांच्यावर बलात्कार होत नसेल पण त्यांच्या अंगप्रत्यांगांना गर्दीचा गैरफायदा घेऊन हात लावणाऱ्यांच्या मानसिकतेत आणि बलात्काऱ्यांच्या मानसिकतेत फार फरक आहे असे वाटत नाही.बहुदा कायदा/पोलिस/समाजाचा धाक म्हणून असे लोक बलात्कार करायला धजावत नसतील.पण तो धाक नसता तर तेही त्यांनी केलेच असते असे म्हणायला नक्कीच जागा आहे.

स्त्रियांनी आणि मुलींनीच नाही तर स्वसंरक्षण करू न शकणार्‍या सर्व व्यक्तींनी अशा वेळा, अशी ठिकाणं, असे प्रसंग टाळावेत. हा कॉमन सेन्स घरच्या संस्कारातून सर्वांनाच शिकविला जातो.

ठिक आहे.पण म्हणून अशी कृत्ये समर्थनीय/कमी निषेधार्ह कशी ठरतात?मी बाहेर जाताना माझ्या घराला कुलूप लावायला विसरलो तर चोराला घरी घुसून चोरी करायचा अधिकार प्राप्त होतो का?

समाजाला (आपल्या भाषेत मॉरल पोलीसांना...) काही सांगण्याचा अधिकार नसेल तर बलात्कार, खून करणार्‍यालाही 'असे वागू नकोस, हे गैर आहे' हे सांगण्याचा कोणाला अधिकार उरत नाही.

अत्यंत हास्यास्पद नव्हे अत्यंत हिन पातळीवरचे आणि निषेधार्ह विधान आहे हे.बलात्कार/खून करणारे इतरांना कोणत्या तरी प्रकारे हानी पोहोचवत असतात.ती मुलगी जर दारू पिऊन गाडी चालवायला निघाली असती तर तिला अडवायचा इतरांना नक्कीच अधिकार आहे.पण जर तिच्या कृतीने इतरांना कसलीही हानी पोहोचत नसेल तर त्या मुलीला ’तू अमुक कर तमुक करू नको’ हे इतरांनी सांगायचे काही काम नाही.

चार चांगल्या गोष्टी सांगणारी माणसे म्हणजे बुरसटलेल्या विचारांची? मग पुढारलेल्या विचारांचे कोणाला म्हणावे? बलात्कार करणार्‍याला? की तोकडे कपडे घालून, रेव्हपार्ट्यातून नशापाणी करून, रस्त्यावर अचकट विचकट अंग विक्षेप करीत जाणार्‍या तरूणींना?

याचे उत्तर तुम्हीच दिले आहे आणि ते म्हणजे तुमच्यासारखा विचार करणाऱ्यांना मात्र नक्कीच पुढारलेल्या विचारांचे समजू नये.अहो हे ’मॉरल पोलिस’ चार चांगल्या गोष्टी सांगतात हा जावईशोध तुम्हाला कुठून लागला?यांच्या मते स्त्रियांनी अमुक एका प्रकारचे वागणे ठेवावे अशी अपेक्षा असते. आणि पूर्ण न केल्यास यांचा इगो दुखावला जातो आणि यातून हे ’मॉरल पोलिसिंग’ जन्माला येते.हे नैतिक पोलिस सद्गुणांचे पुतळे असतात का?स्त्रियांनी कोणत्या पध्दतीचे कपडे घालावे हे सांगणारे हे धोतर-सदरा घालून का नसतात?त्यांनी सुरवातीला स्वत:मध्ये सुधारणा करावी आणि मग जगाला उपदेशांचे डोस पाजावेत.

युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलियात बलात्कार, अपहरण, खून होतच नाहीत? पहिल्यांदाच ऐकतो आहे.

याला उत्तर वरीलप्रमाणेच. लंडनमधील बस आणि ट्रेनमध्येही खूप गर्दी असते.पण भारतात जसे स्त्रिया आणि मुलींच्या अंगलट यायचे प्रकार चालतात त्याच्या एक शतांशही तिथे चालत नाहीत हे मी स्वत: बघितले आहे.

जेनी...'s picture

14 Jul 2012 - 9:32 pm | जेनी...

मस्त प्रतिसाद ...
वटवाघुळ

एमी's picture

14 Jul 2012 - 9:37 pm | एमी

+१

प्रभाकर पेठकर's picture

15 Jul 2012 - 4:02 am | प्रभाकर पेठकर

अहो असे प्रकार दिवसाढवळ्या शाळेतून घरी परतत असलेल्या मुलींबरोबरपण होतात.

आपण उपस्थित केलेली घटना पब मधून बाहेर पडलेल्या मुली बद्दल आहे. बाकी, भारतात कशा कशा परिस्थितीत बलात्कार होतात हे मलाही ठाऊक आहे. पण, चर्चेत एक विशिष्ट घटना तुम्ही घेतलेली आहे. त्या बद्दल मी लिहीले आहे.

म्हणजे आता मुलींनी दहावीची परीक्षा पण देऊ नये का?

दहावीची परिक्षा देणे आणि रात्रीच्या वेळी पब मध्ये जाणे हे मी तरी एक मानत नाही.

शहरात जर पब असतील तर त्या ठिकाणी जायचा त्या मुलीला का अधिकार असू नये?

शहरात कुंटणखानेही असतात, जुगारांचे अड्डे असतात, तिथे जायचा अधिकारही आपल्या मुलांना असतोच. पण आपली मुले तिथे गेली आणि त्यांना कोणी ज्येष्ठांनी हटकलं तर मला तरी त्यात ज्येष्ठांची काही चुक आहे असे वाटणार नाही.

जोपर्यंत ती इतरांबरोबर काही वावगे करत नाही तोपर्यंत इतरांना याविषयी काही बोलायचे कारण नाही

तुमची काय मते आहेत? हा प्रश्न तुम्हीच तुमच्या चर्चा प्रस्तावात विचारला आहे.

त्या मुलीचे कपडे फाडायचे समर्थन कसे होऊ शकेल?

कपडे फाडायचे समर्थन कोणी केले आहे? माझा प्रतिसाद नीट पुन्हा वाचावा ही नम्र विनंती.

वैयक्तिक पातळीवर न उतरता विधानं केलीत तर चर्चा पुढे चालू शकेल.

बहुदा कायदा/पोलिस/समाजाचा धाक म्हणून असे लोक बलात्कार करायला धजावत नसतील..पण तो धाक नसता तर तेही त्यांनी केलेच असते असे म्हणायला नक्कीच जागा आहे

म्हणजे समाजाचा धाक आवश्यक आहे हे तुम्हीच सिद्ध करता आहात. वर पुन्हा, बुरसटलेल्या विचारांचे, नैतिक पोलीस वगैरे दूषणेही लावणार.

अशी कृत्ये समर्थनीय/कमी निषेधार्ह कशी ठरतात?

पुन्हा तेच. समर्थन कोणी केले आहे? माझा प्रतिसाद नीट पुन्हा वाचावा, अशी पुन्हा एकदा नम्र विनंती.

अत्यंत हास्यास्पद नव्हे अत्यंत हिन पातळीवरचे आणि निषेधार्ह विधान आहे हे.

का बरे? पिडीताने कसेही स्वैराचारी वागले तरी त्याला बोलायचे नाही. तर पिडणार्‍याला तरी का बोलायचे?

बलात्कार/खून करणारे इतरांना कोणत्या तरी प्रकारे हानी पोहोचवत असतात.

१५-१६ वर्षाची मुलगी रात्रीबेरात्री पब मधून दारू पिऊन बाहेर पडत असेल तर ती तिच्या वयाच्या अनेक इतर मुलींसमोर चुकीचा आदर्श ठेवत आहे. अशाने हळू हळू आख्खी तरूणपिढी बरबाद होऊन, समाज पोखरला जाईल. तरूण पिढी ही देशाचे भवितव्य असते. तिच बाह्यात्कारी झाली तर देशाचं भवितव्य मातीमोल होण्यास वेळ लागणार नाही.

तू अमुक कर तमुक करू नको’ हे इतरांनी सांगायचे काही काम नाही.

जन्मलेल्या मुलावर संस्कार घडवून एक सुजाण नागरीक घडविला जातो. असे सुजाण नागरीक देशाची जमापुंजी असते. संस्कार कसे कसे होत जातात? घरात आई-वडील, शाळेत शिक्षक, बाहेरच्या जगात समाज, पुस्तके अशा अनेक गोष्टी मुलांवर संस्कार करीत असतात. म्हणजेच एक सुजाण नागरिक घडविण्यात पालक आणि शिक्षकांइतकाच समाजाचाही सिंहाचा वाटा असतो. आपल्या मुलांनी वाईट संगतीत राहू नये असे पालकांना का वाटत असते? मुलांवर चुकीचे संस्कार होतील ह्या भितीपोटीच नं!

तुमच्यासारखा विचार करणाऱ्यांना मात्र नक्कीच पुढारलेल्या विचारांचे समजू नये.

शक्य आहे. तुमच्या विचारसरणीच्या मोजपट्टीवर मी पुढारलेला नसेनही. मला त्याचे दु:ख नाही. 'स्वातंत्र्य' आणि 'स्वैराचार' ह्यात मी फरक मानतो. 'स्वातंत्र्या'बरोबर जबाबादारी येते. बेजबाबदारपणे फक्त 'स्वैराचार' होतो.

स्त्रियांनी कोणत्या पध्दतीचे कपडे घालावे हे सांगणारे हे धोतर-सदरा घालून का नसतात?

मी अशा समाजात वाढलो आहे जिथे पुरुषांनाही शर्टाचे वरचे बटन उघडे टाकायला बंदी होती. केसांची झुल्फे वाढवून नाक्यावर उभं राहायला बंदी होती. शीटीवर गाणे म्हणायला बंदी होती. पँटच्या मागच्या खिशात कंगवा ठेवायला बंदी होती. अशी अनेक बंधनं पुरुषांनाही होती/आहेत. ही कायद्याची बंधनं नाहित, नैतिकतेची आहेत.

लंडनमधील बस आणि ट्रेनमध्येही खूप गर्दी असते.पण भारतात जसे स्त्रिया आणि मुलींच्या अंगलट यायचे प्रकार चालतात त्याच्या एक शतांशही तिथे चालत नाहीत हे मी स्वत: बघितले आहे.

लंडन मधील बस मध्ये आणि रेल्वेत भारतातील बस आणि रेल्वे इतकी गर्दी मी तरी पाहिली नाही. असो. दोन देशांची संस्कृती वेगवेगळी आहे. तिथे कोणी कोणाच्या अंगचटीला येत नाही कारण संमतीने सर्व मिळत असताना जबरदस्ती अंगचटीला येण्याचे कारण काय? त्यांच्या संस्कृतीत शरीर संबंधाचा आपल्या इतका बाऊ केला जात नाही. १२-१३ वर्षाच्या मुलींच्या पर्स मध्ये आईच निरोध ठेवते असे वाचले आहे. तसेच, १३ वर्षीही माता झालेल्या केसेस पेपरात वाचल्या आहेत. लंडनमध्ये सार्वजनिक ठिकाणी, ट्यूब रेल्वेच्या, खच्चून भरलेल्या, सरकत्या जिन्यावर दीर्घ चुंबन घेणारी युगुलं मी ही पाहिली आहेत. आयफेल टॉवरच्या, पर्यटकांनी भरलेल्या परीसरात दोन मुलींना एकमेकींचे चुंबन घेत बसलेले मीही पाहिले आहे. विमानात प्रियकराच्या हाफ चड्डीत.... जाऊदे मी तर लिहूही शकत नाही. जिथे शरीरसुख एवढ्या मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे तिथे अनोळखी मुलींच्या अंगचटीला येण्याची गरजच काय? तरीही, तिथेही बलात्कार होताहेत.

ह्या संस्कृतीचे दुष्परीणाम त्यांनाही जाणवत आहेतच. लग्ना आधीच शरीरसुखाचा एवढा अतिरेक झाल्यावर, संसारसुखाची मुल्ये हरविलेली अनेक जोडपी लवकरच विभक्त होताना, नविन जोडीदारा बरोबर पाट लावताना, पुन्हा विभक्त होताना दिसतात. हेच संस्कार त्यांच्या मुलांवर होतात.

पुण्याचे वटवाघूळ साहेब,

माझ्या मनातील सर्व मुद्दे मी मांडले आहेत. अजून जास्त काही मनात बाकी नाही. आपल्याला माझी मते पटत नसतील तर ती पटवून घ्या असा माझा आग्रह नाही. प्रत्येक दोन व्यक्तींमध्ये मतभिन्नता असतेच असते. त्यामुळे तशी आपल्यात राहिल्याने मला किंवा आपल्याला काहीच फरक पडत नाही. असो.

शिल्पा ब's picture

15 Jul 2012 - 12:13 pm | शिल्पा ब

समाजाचा धाक फक्त मुलींना असावा अशा पद्धतीचं तुम्ही लिहिताय.
उलट आपापल्या मुलांना मुलींना नीट वागवायला शिकवणं हा एक समाजाचा धाक म्हणता येईल.

इथे चोर सोडुन संन्याशालाच फाशीचं समर्थन होतंय.

कुंटणखाना अन पब यातला फरक माहीती नसेल बोलु नका...पण वाट्टेल ती तुलना कशाला?

<<१५-१६ वर्षाची मुलगी रात्रीबेरात्री पब मधून दारू पिऊन बाहेर पडत असेल तर ती तिच्या वयाच्या अनेक इतर मुलींसमोर चुकीचा आदर्श ठेवत आहे. अशाने हळू हळू आख्खी तरूणपिढी बरबाद होऊन, समाज पोखरला जाईल. तरूण पिढी ही देशाचे भवितव्य असते. तिच बाह्यात्कारी झाली तर देशाचं भवितव्य मातीमोल होण्यास वेळ लागणार नाही.

हास्यास्पद याखेरीज काहीही नाही. तालिबानी मेंटॅलिटी ती हिच असावी.

भारतात अल्पवयीन माता नाहीत असं म्हणायचं असेल तर दंडवत!! इथे बोलबाला होत नाही, मुलं गटारात टाकुन दिली जातात म्हणुन समजत नाही..माझ्यासमोरच एक - दोन उदा. आहेत.

<<का बरे? पिडीताने कसेही स्वैराचारी वागले तरी त्याला बोलायचे नाही. तर पिडणार्‍याला तरी का बोलायचे?

या विशिष्ट उदा. संताप आणणारं विधान...पब मधे जाणं म्हणजे स्वैराचार? अन म्हणुन कोण लोकं लगेच मुलींचे कपडे फाडणार? अन तुम्ही त्याचं समर्थन करताय?

तुमच्याबद्दल जो काही आदर होता तो आता अजिबात नाही हे फक्त नमुद करते.

बाकी तुमच्याशी या विषयावर काही बोलुन काहीही उपयोग नाही.

असो.

प्रभाकर पेठकर's picture

15 Jul 2012 - 3:34 pm | प्रभाकर पेठकर

माझ्या ह्या मूळ प्रतिसादातील 'आपण दिलेल्या आणि आपल्या सर्वांच्याच माहितीच्या कक्षेबाहेरीलही सर्व अनैतिक आणि अमानुष घटनांचा मी धिक्कारच करतो.' हे वाक्य तुम्ही वाचलेच नाही किंवा वाचूनही त्याचा अर्थच तुम्हाला समजला नाही, असे आपल्या प्रतिसादावरून वाटते आहे.

तुमच्याबद्दल जो काही आदर होता तो आता अजिबात नाही हे फक्त नमुद करते.

माझ्यासाठी हे दुर्दैवी आहे परंतु हरकत नाही. माझे मुद्दे समजले नाहीत म्हणून आपण असे म्हंटले आहे. पण म्हणून माझे मुद्दे गैरलागू होत नाहीत. आणि प्रतिसाद न वाचताच, मुद्दे समजावून न घेता केलेला प्रतिवाद मला तरी नुसताच 'भडकाऊ' स्वरुपाचा वाटतो. त्या पलीकडे त्यात काही 'दम' नाही.

बाकी तुमच्याशी या विषयावर काही बोलुन काहीही उपयोग नाही.

खरं आहे. मलाही अगदी तेच वाटते आहे.

जेनी...'s picture

15 Jul 2012 - 7:14 pm | जेनी...

मी लहान आहे तुमच्यापेक्षा ..पण एक सांगेन ..
सद्ध्याच्या परिस्थितितुन आम्ही मुली बर्‍याच वावरतो ,अनुभवतो ..
कि व्यवस्थित अंग झाकलेले कपडे घातले तरि त्रास होतो .
तुमच्या प्रतिक्रिया वाचुन खरच गोंधळायला होतय .मला वाटत तुम्हाला जे म्हणायचय ते जास्त प्रमाणात स्पष्ट होत नाहिये ..उलट वेगळेच अर्थ निघुन चिडचिड होतेय ...
रागवु नका काका :(

...फक्त आम्ही मुलीनी काळजी घेऊन काही होणार नाही ,तर अश्या प्रवुत्तिला खतपाणी घरुनच ( त्यांच्या ) दिलं जातं
त्यांच्यात ही प्रव्रुत्ती निर्मान का होते?
त्यांच्यातल्या ह्या अमानवी प्रव्रुत्तीमुळे देशातल्या स्त्रियानी घाबरुन रहावे का?....

शिल्पा ब's picture

15 Jul 2012 - 10:24 pm | शिल्पा ब

डार्क केलेलं वाक्य लिहिलं म्हणुन बाकीच्या प्रतिसादाकडे दुर्लक्ष करावं म्हणत असाल तर पुढे बोलण्यात अर्थ नाही. तुम्हाला प्रतिवाद भडकाउ वाटत असेल तर तुम्ही प्रतिवाद पुन्हा वाचावा. असो.

तुमचे प्रतिसाद वाचले अन माझ्याकडुन धन्यवाद.

पैसा's picture

15 Jul 2012 - 3:47 pm | पैसा

मला कोणी बुरसटलेली म्हटलं तरी चालेल. माझा तुम्हाला पाठिंबा आहे. उगीच वाद घालण्यासाठी वाद घालणार्‍यांना माझी एवढी विनंती आहे की कृपया कोणाच्या व्यक्तिगत नातेवाईकांचा उल्लेख इथे करू नये. मतांबद्दल विरोध असू शकतो, तो मतापर्यंत मर्यादित ठेवा.

माझ्या दृष्टीने इथे २ मुद्दे आहेत. एक तर पेठकर काका एखाद्या अनुभवी माणसाच्या दृष्टीकोनातून काय व्यवहार्य ते सांगत आहेत. घरातले एखादे काका मामा याच शब्दात बोलतील. असल्या वाईट घटनांचं ते कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाहीयेत किंवा "कोणी असे कपडे घातले म्हणून असं झालं" असंही म्हणत नाहीयेत. इतर कोणत्याही चर्चेत त्यांची मते या भूमिकेशी नेहमी सुसंगत अशीच असतात. स्त्रियांना त्रास देणार्‍याला विरोध करावा हे बरोबरच आहे. पण काळ वेळ परिस्थिती पाहून काय तो निर्णय घेतला गेला पाहिजे. उगीच हुतात्मा होण्यात काही मतलब नाही.

दुसरा मुद्दा म्हणजे १५//१६ वर्षाच्या मुलीचा. आपल्या देशात १५//१६ वर्षाच्या मुलीना (म्हणजे त्या कायद्याने सज्ञान नसताना) दारू प्यायची परवानगी आहे का? अशा अज्ञान मुलींना पबमध्ये एकट्याने किंवा ग्रुपमधून जायची मोकळीक कायद्याने दिली आहे का? तिच्या पालकांच्या माहितीशिवाय तिला (१५//१६ वर्षाच्या मुलीला) पबमधे नेणारा माणूस जास्त गुन्हेगार आहे. तिच्या वयाचा मित्र असेल तर तोही बालगुन्हेगार कक्षेत येईल का नाही? आणि अशा अज्ञान मुलांना दारू विकणारा दुकानदार गुन्हेगार आहे का नाही?

कुंदन's picture

15 Jul 2012 - 4:48 pm | कुंदन

१५//१६ वर्षाची मुले दारु पेयाला लागली हे आर्थिक सुबत्तेचे लक्षण मानावे का?
कसं काय परवडतं ब्वॉ या लोकांना काही समजत नाही....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Jul 2012 - 4:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

१५//१६ वर्षाची मुले दारु पेयाला लागली हे आर्थिक सुबत्तेचे लक्षण मानावे का?

व्वा. काय मुद्दा समोर आलाय. मुलं-मुली वय वर्ष सोळाला झिंगायला लागतात.
जगण्याचं निर्भळ आणि निर्भय स्वातंत्र्य, आधुनिकता, वगैरे काही असेल ?
जाणकारांच्या मतांची लैच उत्सुकता लागली आहे.

-दिलीप बिरुटे
(वाचक)

प्रभाकर पेठकर's picture

15 Jul 2012 - 5:34 pm | प्रभाकर पेठकर

धन्यवाद, पैसा.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Jul 2012 - 10:27 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आत्ता पुन्हा एकदा पासपोर्ट काढून पाहिला. अगदी दर्शनी पानावर Republic of India असं लिहीलेलं आहे. रिपब्लिक आणि डेमॉक्रसी या शब्दांमधला फरक फार लांबचा राहिला! आपली वाटचाल Democratic republic असं मिरवणार्‍या दडपशाही देशांकडे (उदा: चीन, कॉंगो) सुरू झाली आहे का अशी भीती आजकाल वाटते. अलिकडच्याच एका कायद्यामुळे असे अनेक लोकं भारतात आता अस्तित्त्वात आहेत ज्यांना देशाचा नेता निवडण्याचं स्वातंत्र्य आहे पण दारू पिण्याचं स्वातंत्र्य नाही. आख्ख्या देशाची वाट लावू शकणारे नेते निवडू शकता, पण स्वतःचंच यकृत बरबाद करण्यासाठी दारू नाही पिता येत!

आपल्या देशात १५//१६ वर्षाच्या मुलीना (म्हणजे त्या कायद्याने सज्ञान नसताना) दारू प्यायची परवानगी आहे का?

आपल्या देशात अजूनही बिन्डोक आणि/किंवा १७व्या शतकातल्या ब्रिटीश, (पर्यायाने ख्रिश्चन) जीवनपद्धतीवर अनुसरलेले कायदे नाहीतच असं वाटतं का? तरी बरं, आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा सविनय कायदेभंग अजूनही शाळांत शिकवला जातो.

हो, हो, मुलीने वासरू मारलं (असेल/नसेल) म्हणून बाकीचे सरसावले लगेच गाय कापायला! आणि गाय कापण्याचं समर्थन नसेल तर वासरू मारण्याचा उल्लेखच का? संबंधच काय दोन गोष्टींचा?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Jul 2012 - 8:54 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

जन्मलेल्या मुलावर संस्कार घडवून एक सुजाण नागरीक घडविला जातो. असे सुजाण नागरीक देशाची जमापुंजी असते. संस्कार कसे कसे होत जातात? घरात आई-वडील, शाळेत शिक्षक, बाहेरच्या जगात समाज, पुस्तके अशा अनेक गोष्टी मुलांवर संस्कार करीत असतात. म्हणजेच एक सुजाण नागरिक घडविण्यात पालक आणि शिक्षकांइतकाच समाजाचाही सिंहाचा वाटा असतो. आपल्या मुलांनी वाईट संगतीत राहू नये असे पालकांना का वाटत असते? मुलांवर चुकीचे संस्कार होतील ह्या भितीपोटीच नं!

मग हाच समाज या बलात्कारी, मॉलस्टर्सवर, गर्दीच्या ठिकाणी अंगचटीला येणार्‍या, हपापलेल्या नजरेने तरूण मुलींकडे बघणार्‍या तरूण, मध्यवयीन आणि म्हातार्‍याही पुरूषांवर संस्कार करण्यात का बरं कमी पडला असावा?

लंडनमध्ये सार्वजनिक ठिकाणी, ट्यूब रेल्वेच्या, खच्चून भरलेल्या, सरकत्या जिन्यावर दीर्घ चुंबन घेणारी युगुलं मी ही पाहिली आहेत. आयफेल टॉवरच्या, पर्यटकांनी भरलेल्या परीसरात दोन मुलींना एकमेकींचे चुंबन घेत बसलेले मीही पाहिले आहे. विमानात प्रियकराच्या हाफ चड्डीत.... जाऊदे मी तर लिहूही शकत नाही. जिथे शरीरसुख एवढ्या मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे तिथे अनोळखी मुलींच्या अंगचटीला येण्याची गरजच काय? तरीही, तिथेही बलात्कार होताहेत.

बलात्कार ही विकृती आहे, प्रेम, वासना सर्व प्राणीमात्रांसाठी नैसर्गिक आहेत. दोन्हींची तुलना करणं हेच मुळात हास्यास्पद आहे. मुन्नाभाईने निदान आपुलकीने गळाभेट घेण्यालातरी काही प्रमाणात समाजमान्यता मिळवून दिली आहे.

पाश्चात्य चित्रपटात प्रेमाचं खुल्लमखुल्ला चित्रण असतं, हिंदी चित्रपटात बलात्काराचं!

विश्वनाथ मेहेंदळे's picture

16 Jul 2012 - 10:32 pm | विश्वनाथ मेहेंदळे

पाश्चात्य चित्रपटात प्रेमाचं खुल्लमखुल्ला चित्रण असतं, हिंदी चित्रपटात बलात्काराचं!

अरे वा !! कळफलक नाही चिमुकल्या वाशिंग्टन ची कुऱ्हाडच जणू . आपण जे लिहितो आहोत ते खरे आहे की नाही याचा काही विचार? पाश्चात्य चित्रपटात बलात्काराचे यथासांग चित्रण असते आणि गेल्या काही वर्षात आपल्याकडे प्रेमाचं खुल्लमखुल्ला चित्रण असते.
गरजूंनी संदर्भ मागू नयेत. युट्युब वर जा, रग्गड संदर्भ मिळतील.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Jul 2012 - 10:38 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

उद्धृत वाक्याच्या आधीचं एक वाक्य वाचलंत तर तिथे हिंदी चित्रपटासंदर्भातच गौरवोद्गार दिसतील. सिलेक्टीव्ह रीडींगचा प्रश्न सर्वसामान्य आहेच. असो.

शिल्पा ब's picture

16 Jul 2012 - 10:42 pm | शिल्पा ब

घोड्याच्या डोळ्यावर झापड लावल्यावर फक्त समोरचंच दिसणार यात दोष कोणाचा!

विश्वनाथ मेहेंदळे's picture

16 Jul 2012 - 11:13 pm | विश्वनाथ मेहेंदळे

उद्धृत वाक्याच्या आधीचं एक वाक्य वाचलंत तर तिथे हिंदी चित्रपटासंदर्भातच गौरवोद्गार दिसतील.

हे छान झाले. एका हिंदी चित्रपटाच्या एका कन्सेप्ट बद्दल एक वाक्य लिहिले की मग धादांत असत्य blanket statement करायचे परमिटच मिळते, हे माहित नव्हते. बरे झाले सांगितलेत.
बाकी तुमच्या मूळ वाक्याचे काही justification दिले असतेत तर बरे वाटले असते. पण असो, ते जमले असते तर फाटे का फोडले असतेत ?

सिलेक्टीव्ह रीडींगचा प्रश्न सर्वसामान्य आहेच.

व्वा !! याला म्हणतात सेल्फ अवेरनेस !!!

असो.

असोच. बाकी या निमित्ताने व्यक्त झालात हे पाहून बरे वाटले. यामुळे पुढील ८ मार्च पर्यंतचा विदा थोडा अजून बरा असेल नै. ;-)

अवांतर नको म्हणून या मुद्द्यावर शेवटचा प्रतिसाद. खव/व्यनी आहेच.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

29 Jul 2012 - 2:33 am | निनाद मुक्काम प...

@लंडनमध्ये सार्वजनिक ठिकाणी, ट्यूब रेल्वेच्या, खच्चून भरलेल्या, सरकत्या जिन्यावर दीर्घ चुंबन घेणारी युगुलं मी ही पाहिली आहेत. आयफेल टॉवरच्या, पर्यटकांनी भरलेल्या परीसरात दोन मुलींना एकमेकींचे चुंबन घेत बसलेले मीही पाहिले आहे. विमानात प्रियकराच्या हाफ चड्डीत.... जाऊदे मी तर लिहूही शकत नाही. जिथे शरीरसुख एवढ्या मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे तिथे अनोळखी मुलींच्या अंगचटीला येण्याची गरजच काय? तरीही, तिथेही बलात्कार होताहेत.

परदेशातून आलेल्या पब संस्कृती मुळे तेथील प्रगत समाजात सुद्धा अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.व जनहितार्थ तेथे सरकारव व सेवाभावी संस्थांना
जाहिराती कराव्या लागत आहेत. उदा झेपेल इतकी प्या व व सुरक्षित घरी जा.
त्या भारतात निर्माण करण्यासाठी आपण एवढे कटीबध्द का आहोत हेच कळत नाही.

परदेशात सुद्धा प्रगत शहरात काही भाग असे असतात तेथे रात्रीचे बाहेर पडलो की लुटणार हमखास आणि मार मोफत मिळतो. निदान लंडन मध्ये असे अनेक विभाग आहेत. पब्स व क्लब येथे होणाऱ्या अतिरंजित मारामाऱ्या ह्या परदेशात ह्या शेत्रांशी मी निगडित असल्याने खूप वेळा पहिल्या आहेत. रात्रीच्या वेळी स्त्री मद्यधुंद अवस्थेत रस्त्यावर फिरत असेल तर तिच्या सुरक्षेची हमी कोणत्याही शहरात जगाच्या पाठीवर देता येत नाही.

शाळेत किंवा कॉलेजात जाणारा आपला पाल्य अमली पदार्थ , मद्य किंवा सिगारेट आणि लहान वयात शरीर संबंध ह्या सर्व गोष्टी तेथील कायद्यानुसार गुन्हा ठरत असल्या तरी बिनदिक्कत प्रमाणात घडत ांना आढळतात. व पालक हे सर्व उघड्या डोळ्यांनी पाहूनही ह्या बाबत काहीही करू शकत नाही.
तेथील तरुणाई शिकतांना स्वतःचा पोकेट मनी स्वतः कमवते अश्या गोष्टींकडे सोयीस्कर रीत्या पाठ फिरवून नको त्या गोष्टींचे अंधानुकरण करण्यात आपल्याकडे अहमहमिका
का करत आहेत ?

परदेशात बलात्कारी दृश्य व त्या अनुषंगाने अंगावर काटा आणणारे कथानक असणाऱ्या सिनेमांची ही यादी

तू नळीवर इरीवर्सेबल ह्या सिनेमात मोनिका बुलेस्की च्या बलात्काराचे दृश्य कोणीच पाहू शकत नाही, त्या मानाने हिंदी सिनेमातील दृश्ये म्हणजे
परदेशात हिंदी सिनेमा हा कौटुंबिक नाट्य,रंगीबेरंगी पोशाख , आणि नृत्य ह्यासाठी ओळखला जातो.
आदिती म्हणते तो बलात्कारी हिंदी सिनेमाचा काळ आता भूतकाळ झाला.
आता कॉकटेल सिनेमांची आणि त्यातील नायिकेला नायक का आवडतो ह्या बाबतीत रोखठोक मत व्यक्त करण्याचा आहे.

.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Jul 2012 - 8:28 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कोणीही असो आणि कोणाबद्दलही असो, चर्चा करतांना एखाद्या अनुभवासाठी व्यक्तिगत रोखावर चर्चा घेऊन जाण्यापेक्षा मुळ विषयावर चर्चा केली असती तर बरे वाटले असते.

-दिलीप बिरुटे

एमी's picture

15 Jul 2012 - 10:40 am | एमी

निषेधाचा निषेध...
Victim bashing करणार्या प्रत्येकाने आपण स्वतः/आपल्या सुसंस्कृत घरातल्या स्त्रिया सुद्धा कधीही 'गुवाहटी मॉब मेँटेलिटी' चे बळी ठरु शकतो हे लक्षात ठेवायला हवे.
संमतीने शरीरसुख मुबलक प्रमाणात उपलब्ध असणे आणि जबरदस्ती अनोळखी मुलीच्या अंगचटीला येणे या दोन्हीत जास्त वाईट संस्कृती कुठली आणि जास्त निषेध कोणत्या प्रवृत्तीचा केला पाहिजे??

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Jul 2012 - 3:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बै साहेब, जबरदस्तीने अनोळखी मुलीच्या अंगचटीला जाणं हे वाईटच, ते कोणत्याही आणि कोणाच्याही संस्कृतीत बसणार नाही. पण सार्वजनिक ठिकाणी चर्चा करतांना मत मतांतरे असतील तेव्हा, व्यक्तिगत रोखाची टीका टाळावी असं मी म्हणत होतो.

मला अजुनही वाटतं की कोणीही अशा अंगचटीला जाण्याच्या प्रवृत्तीचं समर्थन केलेलं नाही, असं का होतं त्याची कारणं मला इतर प्रतिसादात दिसत आहेत.

बाकी, तुमचं चालु द्या.

-दिलीप बिरुटे

शिल्पा ब's picture

15 Jul 2012 - 12:01 pm | शिल्पा ब

+१००%

पेठकरांच्या विचारांशी पुर्णपणे असहमत.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Jul 2012 - 8:47 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

हल्ली भारतात १५-१६ वर्षाच्या मुली एकट्यादुकट्या, रात्रीबेरात्री पब मध्ये जातात?

होय. आणि हल्ली कशाला? मी कॉलेजात असताना, दहा-बारा वर्षांपूर्वीही माझ्या ओळखीतल्या मुली पबमधे जात. एकट्याच जात असं नव्हे, पण एक मुलगी आणि तिचे चार-सहा मित्र अशा जात असत. पबसारख्या ठिकाणी लोकं शक्यतोवर घोळक्यात जातात कारण तसे गेल्यास मजा अधिक येते असं बहुतेक पब-गोअर्सचं म्हणणं असतं. अन्यथा मुलींनी एकटं का जाऊ नये?

घ्या.... त्यानंतर एकटी मुलगी १५-२० जणांबरोबर वादही घालते? ऐकावे ते नवलच.

होय. असे प्रकार अगदी लहान वयापासून मी पाहिलेले आहेत. या मुली/स्त्रिया पबमधून निघालेल्या नव्हत्या पण त्याने काय फरक पडावा? मासळीबाजार, देशी दारूच्या गुत्त्याबाहेर अशी अनेक दृष्य पाहिलेली आहेत किंवा घरच्या लोकांनी पाहिल्याचं ऐकलेलं आहे. निम्न उत्पन्न गटातल्या स्त्रियांमधे असणारं हे धैर्य पबमधे जाणार्‍या वर्गातल्या मुलीमधेही आलं याचा मला आनंद झाला.

चार चांगल्या गोष्टी कोणी सांगितल्या की स्वयंघोषित नैतिक पोलीस म्हणून हिणवायचे

बरं या चार "चांगल्या" गोष्टी पीडीत व्यक्तीला सांगायच्या यात काय शहाणपण? मॉलस्ट करणार्‍यांनी शारीरिक दहशतवाद केला, "चांगल्या" गोष्टी सांगणारे बौद्धीक धाक, दहशत दाखवत आहेत. गुन्हा केला कोणी आणि डोस मिळताहेत कोणाला!
मॉरल पोलिसिंग हा शब्द डाचत असेल तर १५-१६ वर्षाच्या मुलींनी पबमधे जाऊ नये, १५-२० पुरूषांबरोबर वाद घालू नये हे आपली स्वत:ची, कायद्याने अज्ञान मुलं (मुलगेही!) सोडून इतरांना सांगणं, सुचवणं हे ही मॉरल पोलिसिंगच आहे. असली पोलिसगिरी दाखवण्यासाठी काही लोकं रस्त्यावर उभे रहातात, छेड काढतात, मारहाण करतात, मुलींना मॉलस्ट करतात, काही लेखणी चालवतात. लेखणी चालवणार्‍यांना सामान्यतः अधिक घातक समजलं जातं.

... पण मग येणार्‍या प्रसंगांना आपणच तोंड द्यायचं. सिव्हील पोलीसांकडे जा, कोर्टात जा, गुंडांचा सामना करा.

मग वेगळं काय होतंय? त्याच्याच जोडीला फक्त सामान्य लोकं "आम्हाला असे प्रकार पसंत नाहीत" असं खुलेआम म्हणत आहेत. कसाब हा पण गुन्हेगारच आहे, त्या प्रसंगाबद्दल कोणी हात मोकळा सोडला तर "... मग येणार्‍या प्रसंगांना आपणच तोंड द्यायचं. सिव्हील पोलीसांकडे जा, कोर्टात जा, दहशतवाद्यांचा सामना करा." अशा प्रतिक्रिया का बरं येत नाहीत? (बाय द वे, सिव्हील पोलिस म्हणजे काय? कायदा दिवाणी, फौजदारी वगैरे असतो, पोलिस नव्हे!)

युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलियात बलात्कार, अपहरण, खून होतच नाहीत? पहिल्यांदाच ऐकतो आहे.

सामान्य लोकांच्या आयुष्यात स्त्रीदाक्षिण्य दाखवण्याची वेळ येऊ नये अशा अनेक सोयीसुविधा असतात ("तुमचं सामान उचलायला मदत करू का?" इ.). तिथे ९११ ला फोन केल्यावर पाच-दहा मिनीटात हव्या त्या प्रकारची मदत हजर होते. हे झालं व्यवस्थेच्या पातळीवर.
सामान्य माणसांच्या पातळीवर, तिथे समाजाने योनीशुचितेसारख्या भोंगळ गोष्टींना कोणे एकेकाळीच भंगारात टाकलं आहे. सामान्य स्त्रियांनी वरपासून खालपर्यंत कपडे घातलेले असू देत वा नसोत, गर्दीच्या ठिकाणीही गैरफायदा घेत इथे-तिथे हात लावण्याचे प्रकार होते नाहीत, जे आपल्याकडे सर्रास होतात. कोणा मुलीने कमी कपडे घातले आहेत किंवा एखादी पुरूषांशी मैत्रीपूर्ण वागत-बोलत असेल तर "आता ही आपल्याला पटलीच" किंवा "चवचालच आहे ती!" अशा प्रकारे इतर पुरूष तिच्याशी वागत नाहीत. भारतीय पुरूषांबद्दल भारतीय आणि अभारतीय सर्व प्रकारच्या मुली/स्त्रिया सरसकटीकरण करताना 'वखवखलेले' अशा शब्द जरूर वापरतील. अगदी स्त्रियाच का, अनेक पुरूषही हे मान्य करतील, करतात. आणि हे फक्त माझेच अनुभव आहेत असं नाही, वास्तववादी चित्रपट, कादंबर्‍या, नाटकं, रिआलिटी शोज, प्रत्यक्ष माणसांच्या मुलाखती या सगळ्यांमधून दिसतं.
यामुळे आपला समाज अजूनही असंस्कृत आहे असं विधान फार चूक आहे असं मला म्हणवत नाही.

डोळे बंद करून मॉरल पोलिसींग करणं तसंही बेकायदा नाहीच, लिहीणार्‍यांचे हात तसेही धरता येत नाहीत. चालू द्यात.

प्रभाकर पेठकर's picture

16 Jul 2012 - 9:06 pm | प्रभाकर पेठकर

आत्ताच अंड्यातून बाहेर पडून, मोठ्या चकित नजरेने, ह्या नव्या दुनियेकडे पाहतो आहे.

बाकि, अदिती,

काही लोकं रस्त्यावर उभे रहातात, छेड काढतात, मारहाण करतात, मुलींना मॉलस्ट करतात ह्यांच्याच बरोबरीत मलाही बसवलंस (काही लेखणी चालवतात) ह्याने बाकी हृदयात बारिकशी कळ आली. असो.

_/\_ काही लिहिण्याबोलण्याचा मुडंच राहिला नाही.

धन्यवाद.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Jul 2012 - 9:37 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अरूंधती रॉय बंदूका चालवणार्‍या दहशतवाद्यांपेक्षा अधिक घातक समजली जाते.

शिल्पा ब's picture

16 Jul 2012 - 9:15 pm | शिल्पा ब

+१
बहुदा पश्चिमात्य देशात सगळेच जण शारीरीक सुख कोणालाही देतात ही मानसिकता असण्यामुळे की काय एका पाश्चिमात्य युवतीवर ४-५ जणांनी बलात्कार करुन कसली ती प्रेग्नंट न होण्याची गोळी दिल्याची केस फार जुनी नाही.

बाकी मुली पबात जातात, स्कर्ट घालतात, त्रास देणार्‍यांशी वाद घालतात म्हणजे शांतम पापम!! झेपलं नाही अन उपरोधिक झालं.

स्वत:च्या मुलांवर - मुलींवर दुसर्‍याचा आदर करा हे शिकवताना आपणही तसंच वागलं तर मुलांवर तसे संस्कार होतात...घरातच लोकं आईला , बहीणीला, काकुला वगैरे कसं वागवतात हे पाहील्यावर पुढे काय संदेश जाणार?

मन१'s picture

14 Jul 2012 - 9:03 pm | मन१

पोट फुटॅस्तोवर हसतोय.
काही गोश्टींना असं ग्लॅमर का मिळतं, त्यांची बातमी का होते हे आजवर न उमगलेले कोडे आहे.
भारतात दिवसाला काही हजार बलात्कार होतात.(अंदाजपंचे बोलत नाही, सरकारी आणि युनो वगैरेची आकडेवारी प्रसिद्ध होत असते, त्यात लिहिलय.)
त्यातले एक्-दोनच असे पेपरात का गाजतात हे कुणी सांगेल का.
साधारणतः नगरसेवकापासून पुढे आमदार, खासदार वगैरे मंडळी आणि त्यांची प्रभावळ ही धुतल्या तांदळाची आहे का असे कुणालाही विचारले तर तो
"अजिबात धुतल्या तांदळाची नाही", "सगळे एकजात हरामखोर" वगैरे वगैरे म्हणतो. शिवाय आपण खाजगी गप्पांत बोलतानाही ह्यानं अमुक मंत्रालय सोडून तमुक घेतलं म्हणजे त्याचं "यश/ प्रगती" आहे म्हणतो. त्यानं काय खरोखर त्या खात्याचा कारभार चालवायला घेतलय असं आपल्याला वाटतं का? अजिब्बात नाही. तरीही मग जेव्हा एखादे स्टींग ऑपरेशन होते तेव्हा आपण तेवढ्यापुरते दचकल्यासारखे का करतो?
किंवाभारतात दिवसाला काही शेकड्यांच्या घरात हत्या होतात. पण अचानक एखादीच जेसिका लाल वगैरे केस पाहून "हिला न्याय मिळालाच पाहीजे" वगैरे म्हणून का बोंबलतो. इतरांबद्दल का बोंबलत नाही? आरुषीचा खून झाला ; वाईट झालं, पण तसेच खून आख्ख्या भारतात काही शेकड्यांच्या घरानं पडाताहेत, कित्येकदा खुद्द व्यवस्थेच्या आशिर्वादानं हे मुडदे पडताहेत; त्यांची आपण का दखल घेत नाही? जेसिका लाल हिला मारलं म्हणून आख्ख्या मिडियानं रान उभं केलं; इथं बीडमध्ये दोनेक दशकापासून एक व्यक्ती इतकी प्रभावशाली आहे की वर्दितल्या पोलिसांचा भरदिवसा खून होतोय, त्याबद्दल कुणीच कसं बोलत नाही? बरं, ही गोष्ट बीडचीच नाही, बिदरचीही आहे तशीच ती बिकानेर अन बैतूल ह्या भारतातल्याच इतर ठिकाणांचीही आहे.
एका निवडणुकित काँग्रेस व भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार अनुक्रमे जुदेव व अजित जोगी हे होते. दोघांवरही लागोपाठच्या दिवसात स्टिंग होउन टीव्हीवर ही संतमंडळी नोटांच्या गड्ड्या उचलताना दिसली. दोघेही आपापल्या ठिकाणाहून निवडूनही आले नंतर! पब्लिकनं नंतर सगळं सोडून दिलं.
.
.
.
ह्या घटना रोज घडातातच. त्यांचे पुढे काहीही होत नाही हे ही ठाउक आहे. उगाच नाटाके कशाला.
२६नोवेंबर २००८ला हल्ला झाला, आणि सगळी मंडळी एकदम "आता काहीतरी केलेच पाहीजे" वगैरे बडबडू लागली.
वस्तुतः भारत ह्यापुढे सुरक्षित नाही, कायम हे असेच होत राहणार आहे, हे कुठंतरी सगळ्यांनी मनोमन स्वीकरले आहे, आणि जणू काहीच घडले नाही असे सगळे जण वागताहेत, ..... पुढल्या हल्ल्यापर्यंत.

हे आपण असे विचित्र कसे?
राजीव गांधींच्या काळातही आउटलुक का कुठल्यातरी मासिकावर पहिल्या पानावर एका ओडिसामधील स्त्रीचे छायाचित्र होते. ती बाई पाचेकशे रुपयांसाठी आपल्या ५ वर्षांच्या मुलीला विकायला निघाली होती. आणि लोकांना म्हणे ह्यात धक्का वगैरे बसला.
मला सांगा, रस्त्यात डोळे फुटलेले, भीक मागणारे, हिजडे बनलेले* किती जण बघतो आपण,? प्रत्येक शहरात जवळपास शेकडो.बरोबर?
ह्यापैकी किती जण जन्मांध वगैरे होते? जवळपास कुणीही नाही. ह्यातले बहुतांश जणांना लहानपणीच कुणीतरी पळवून आणले,त्यांचे डोळे फोडून, हात पाय तोडून भीक मागायला बसवले. बरं, हे मी नवीन बोल्तोय असेही नाही,hippocrat भारतीयांना हे सर्वच ठाउक आहे. हे असे दिवसाला काही शे पोरांचे डोळे फोडले जातात, अनाथाश्रमातील बालके ही अघोरी संभोगासाठीच असतात, असे सर्वांनी जणू मान्यच केले आहे.
तरीही होतं काय, दिवसाला शेकडो बकर्‍यांचा असा बळी जात असताना चुकून एखादा सुटून, पळून जाण्यात यशस्वी होतो आणि अचानक आपण चिंतित , व्यथित वगैरे होतो.
कित्येक वेळेस तर बलात्कार स्वतः स्त्रीचे कुटुंबीयच दाबतात. कारण त्रास त्या कुटुंबियांनाच होइल अशी व्यवस्था भारतात आहे. तेव्हा आपण का शंख करत नाही?
हे म्हणजे एखाद्या कत्तलखान्यात जाउन "अग बाई,ई ई ई...
त्या कोंबडीचा पाय कापला हो चांडाळानं"
असं किंचाळण्यासारखं आहे.
स्त्री(किंवा खरे तर कुणीही दुर्बल) ही इथे ज्बरदस्त रगडली जाते हे वास्तव आहे. भारतात काही मध्यमवर्गीय व उच्च मध्यमवर्गीय चौकटी सोडल्या तर सर्वत्र नृशंस "जंगलराज"च आहे. चौकटितही ते आहे, पण तुलनेने फारच कमी.
भारत हा एक कत्तलखाना आहे. मध्यमवर्गीयंना मारून त्यांना खाणे हे सोपे + चविष्ट नाही म्हणून म्हणून त्यांना सोडून देण्यात आले आहे. कत्तलखान्याच्या आसपासची कुत्री आपण. कुत्र्यांना कुणी खाउ इच्छित नाही इकडे म्हणून ती जिवंत असतात.

तस्मात् संवेदनशील, विचारी व्यक्तीने आपापल्या जाणिवांची पुंगळी करुन घ्यावी हेच उत्तम.
कशाकशाचा त्रास करुन घेणार.

*कित्येक पुरुष हे व्यवसायापुरते हिजड्यांचे कपडे घालतात हे ठीक. पण भारतात जबरदस्तीने शिश्न कापून वगैरे अघोरीप्रकारे कित्येक हिजडे "पैदा" केले जातात. काही स्वयंसेवी संघटनांचा ह्यावरही बराच खल सुरु आहे.

+१००००००००००००००००००००००००.

हेच्च खरं!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

जेनी...'s picture

14 Jul 2012 - 8:54 pm | जेनी...

अक्ख्या मुंबईत रात्रि अकरा / बारा पर्यंत एकटीने प्रवास केला
पण इतक्या घाणेरड्या प्रव्रुत्तीची लोकं तिही इतक्या घोळक्याने
एकत्र कधीच कुठेच पाहिलि नाहित .
रात्री अपरात्री मुलीनी बाहेर फिरण चुकिच नाहि
पण असं मद्यपाण करुन फिरण चुकिचं वाटतं.
अजुन एक म्हणजे जर ती प्यायलेली नसती तर असं झालं
नसतं का?
इतका मोठा घोळका कुठल्याहि मुलिच्या पूढे आला असता तर ती
प्रतिकार करु शकली असती का??
जर त्या घोळक्याला त्यावेळी असं नीच काम करायची हुक्की आलीच असेल
तर त्याना तीच काय राह चलते कुठलीहि मुलगी चालली असती.
मग तिच्या पिन्याचा इश्यु करुन त्या प्रव्रुत्तीला समर्थण देणारे
थोड्याफार प्रमाणात त्याच विचारांचे वाटतात.
रात्री सात च्या आत घरात येण शिफ्ट मध्ये जॉब करणार्‍या मुलिना
नाहि जमत . ऑफिशअल पार्‍टीझ असल्या तर फारच उशिर होतो
अशा घटणामुळे मग मुलीनी एन्जोयमेन्ट्ला मुकावं का??
मागे पूण्यात एका सॉफ्टवेअर इन्जिनीअर वर बलात्कार करुन
तीचा खुन करण्यात आला , एका विवाहित स्त्रीवर जी बाहेरुन पून्यात
परिक्षेसाठी आली असताना तिच्यावर बलात्कार करुन
तिच्याथांबलेल्या ठिकाणी आनुन फेकुन देन्यात आले , त्या पिलेल्या
होत्या का??
मग जे घडलं त्यात खरच चुक कोणाची??

पुण्यात फक्त एक नाही बर्याच रेप &/ मर्डर केसेस झालेल्यात आणि त्या सगळ्या ऑफिसला जात किँवा परत येत असताना... ओळखीतल्या/अनोळखी लोकांनी केलेल्या... ज्योति कुमारी चौधरी, नयना पाठक पुजारी, खुशबु मिश्रा, श्रद्धा छाजेड...
आणि रात्री १० वाजता बार मधुन बाहेर पडणं तर दुर ची गोष्ट राहिली दिवसाढवळ्या भर दुपारी गजबजलेल्या JM n टिळक रोडवर पण gropping n eve teasing अनुभवलय...ते सुद्धा सगळं शरिर झाकणारे कपडे घातलेले असताना...
परत वर आहेतच काळजी करुन घरात बसुन रहा म्हणणारे पेठकर काकांसारखे लोकं...

अर्धवटराव's picture

15 Jul 2012 - 10:17 am | अर्धवटराव

>>परत वर आहेतच काळजी करुन घरात बसुन रहा म्हणणारे पेठकर काकांसारखे लोकं...
-- मला वाटतं पेठकरकाकांचं म्हणणं थोडं वेगळं आहे. थोडक्यात सांगायचं तर पेट्रोल ने काडिपेटीपासुन दूर राहावे... हे कुठलं मॉरल पोलीसींग वगैरे नाहिए, तर कॉमनसेन्स आहे. चिकन खाण्याची एंजोयमेण्ट जरुर भोगा पण ते बर्ड फ्लु वगैरे सुरु असेल, पावसाळ्यातले दिवस असतील तर तेथे संयम दाखवणे उचीत.
वर मन१ म्हणतोय, तसं आपल्या भोवती व्दिपाद प्राण्यांचे जंगल आहे. ते तसं का आहे वगैरे मुद्दा वेगळा, पण आपण जंगलात आहोत याचे भान विसरणे परवडणारे नाहि. असो.

अर्धवटराव

अरा, मला सांगा पेट्रोल ने काडी पासुन दुर म्हणजे नक्की काय?? JM/टिळक रोडवर दुपारी बसची वाट पहात थांबणे म्हणजे पावसाळ्यात चिकन खाणे आहे का?? जर तिथेही सर्रास molestation होत असेल तर 'काळजी करणारे' लोक घराबाहेर पडूच नको म्हणतील...

अर्धवटराव's picture

15 Jul 2012 - 11:13 am | अर्धवटराव

मोलेस्टेशन हमखास होण्याचे चान्सेस असलेले ठिकाण/प्रसंग टाळणे, ते टाळण्यासाठी प्रिकॉशन्स, झालच तर प्रत्युत्तर देण्याची तयारी, अतितटीच्या प्रसंगी पळ काढायची सावधानता... समाजात (आणि घरात सुद्धा :( ) वावरताना या सर्व बाबींचा विचार एक स्त्रि जास्त व्यवस्थित करु शकते/तिने तसं करावं. पेट्रोल ने काडि पासुन दूर रहावे म्हणजे नक्की काय हे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त व्यवस्थीत कळतं पाहुणेतै.

काळजी करणारे लोक जर मदत करण्याच्या बाबतीत हतबल असतील तर ते घराबाहेर न पडण्याचा सल्ला निश्चित देतील. साखळी चोरांच्या भितीने आजोबांनी आजीला पहाटे बागेत फिरायला जाण्यापेक्षा पार्कींग एरियामध्येच चकरा मारायला सांगितलं तर त्यात चुक काय ?

मॉलेस्टेशनच्या केसेस जनरलाइझ्ड नाहिच करता येत. पण जेव्हढं टाळता येईल तेव्हढं टाळायलाच हवं.

अर्धवटराव

ते काळजी बिळजी ठाऊक हाय वो पण...
पूण्यातलीच अजुन एक केस ३ वर्षाँच्या मुलीला शाळेच्या बस ड्रायवर कंडक्टर ने molest केला मग काय बस वापरु नका म्हणाल? बरं शाळेत नेऊन सोडलं तरी तिथं पण प्युन असतात शिक्षक असतात मग काय मुलीँनी शाळेत पण जाऊ नाय म्हणाल??
बेसिक लोच्या लहानपणापासुन अंगात वारं भरल्याप्रमाणे वागणार्या मुलांना जास्त ढिल देणे आणि आधीच शरीराने आणि मनाने weak असणार्या मुलीँना अजुनच restrict करणे यानेच होत असेल... आणि खुशबु, श्रद्धा सारख्या केस मधे नकार पचवायची क्षमता नसलेली frustru मुलं...
मी तर पु. व., आत्मशुन्य, मनोबा सारखे विचार करणारे पुरुष असतील ही आशाच सोडुन दिली होती (अजुनही doubt आहेच की हे फक्त दाखवायचे दात तर नसतील... पण तरी हे ही नसे थोडके)
मग माझं pessimist मन म्हणतं 'त्या female foeticide होणार्या मुली नशीबवानच जन्मायच्या आधीच गेल्या'
आणि माझं cruel मन म्हणत 'देवबाप्पा जास्तिजास्त मुलांना गे बनव म्हणजे बाकीच्या स्ट्रेट मुलांना कळेल molestation काय असतं.. बघुन घेतील त्यांचत्यांच... उगाच आम्हा मुलीँना त्रास नगं' : - )

मन१'s picture

15 Jul 2012 - 4:09 pm | मन१

(अजुनही doubt आहेच की हे फक्त दाखवायचे दात तर नसतील... पण तरी हे ही नसे थोडके)

ह्यातल्या हे फक्त दाखवायचे दात तर नसतील पुन्हा एकदा हसून घेतले.

ए मनोबा ..किती हसणार रे \(

वाइस कन्ट्रोल कर की जरा \(

अजुनही doubt आहेच की हे फक्त दाखवायचे दात तर नसतील... पण तरी हे ही नसे थोडके

होय हे फक्त दाखवायचे दात आहेत. आणी तेही नसे थोडके हेही माहीत आहे.

बॅटमॅन's picture

15 Jul 2012 - 6:24 pm | बॅटमॅन

मी तर पु. व., आत्मशुन्य, मनोबा सारखे विचार करणारे पुरुष असतील ही आशाच सोडुन दिली होती (अजुनही doubt आहेच की हे फक्त दाखवायचे दात तर नसतील... पण तरी हे ही नसे थोडके)

होय हो दाखवायचेच दात आहेत सगळे. बाकी पुरुष म्हणजे तसे एकजात हरामखोरच नाही का? असे म्हटल्याशिवाय अशा प्रसंगी बोलण्याचे सार्थक होत नाही म्हणा.

:-) पुरुष म्हणजे एकजात हरामखोर नाय वो वाल्गुदेय...
काही पुरुष गुवाहटी मॉब वाले, काही बागपत खाप वाले, काही काळजी करणारे आणि बाकी बरेच सारे बघे...

अर्धवटराव's picture

15 Jul 2012 - 8:15 pm | अर्धवटराव

>>ते काळजी बिळजी ठाऊक हाय वो
-- ते खरच असावं अशी आशा करतो.

>>पूण्यातलीच अजुन एक केस ३ वर्षाँच्या मुलीला शाळेच्या बस ड्रायवर कंडक्टर ने molest केला मग काय बस वापरु नका म्हणाल? बरं शाळेत नेऊन सोडलं तरी तिथं पण प्युन असतात शिक्षक असतात मग काय मुलीँनी शाळेत पण जाऊ नाय म्हणाल?
-- असं कुणी म्हटल्याचं मला तरी दिसलं नाहि.

>>बेसिक लोच्या लहानपणापासुन अंगात वारं भरल्याप्रमाणे वागणार्या मुलांना जास्त ढिल देणे आणि आधीच शरीराने आणि मनाने weak असणार्या मुलीँना अजुनच restrict करणे यानेच होत असेल...
-- ह्म्म. मग तर इतर कुठलीच काळजी घेण्याचं कारणच नाहि. अश्या अंगात वारं भरलेल्या बैलंची एक समग्र लिस्ट, त्यांच्या फोटोसकट लक्षात ठेवायची.
>>आणि खुशबु, श्रद्धा सारख्या केस मधे नकार पचवायची क्षमता नसलेली frustru मुलं...
-- त्यांना पण लिस्ट मध्ये अ‍ॅड करावे. ही लिस्ट पोलीस, मानोपचार तज्ञांकडे सोपवायची. या मुलांचे समुपदेशन करायचे, शिक्षा द्यायच्या. प्रोब्लेम खतम :)

>>...माझं cruel मन म्हणत 'देवबाप्पा जास्तिजास्त मुलांना गे बनव म्हणजे बाकीच्या स्ट्रेट मुलांना कळेल molestation काय असतं.. बघुन घेतील त्यांचत्यांच... उगाच आम्हा मुलीँना त्रास नगं'
--- अम्म्म्म्म्म्म... देवबाप्पा देखील पुरुष हो. गे कारखाना सुरु झाला कि लेस्बियन प्रोडक्शन पण सुरु करेल तो.... बॅलन्स, यु सी.

अर्धवटराव

लईच हुशार की वो तुमी अरा : - )
रेडि टु थिँक आणि एवररेडि विथ सोल्युशन टु प्रोब्लेम : - )

अर्धवटराव's picture

15 Jul 2012 - 8:54 pm | अर्धवटराव

:)
तुमच्या सारख्या थोरामोठ्यांशी चार शब्द बोलुन थोडं ज्ञान संपादन केलं, बाकी काहि नाहि :P

अर्धवटराव

मोलेस्टेशन हमखास होण्याचे चान्सेस असलेले ठिकाण/प्रसंग टाळणे, ते टाळण्यासाठी प्रिकॉशन्स, झालच तर प्रत्युत्तर देण्याची तयारी, अतितटीच्या प्रसंगी पळ काढायची सावधानता
_________________________________________________

दिल्लीत ..रस्त्यावरुन आपल्या पालकांसोबत चालणार्‍या मुलीला ...काहि बावळट लोकानी कार मधुन पळवण्याचा प्रयत्न केला ..
मग अजुन कुठलं ठिकाण टाळायचं ??

मन१'s picture

15 Jul 2012 - 7:13 pm | मन१

त्याबद्दल दिल्ली वाल्यांकडूनच काही सुरस कहाण्या ऐकल्यात इथं दोनेक महिने राहताना.
भोसडीचे आपल्या २०-२२ वर्षाच्या पोरीसोबत बसमधून फिरत असतानाही गर्दिचा फायदा घेउन कुठं शाळकरी नववी-दहावीच्या पोरिंच्या अंगाशिच ये, वरती बारला धरलेला हात सटकल्यासारखं करून "चुकुन" शाळकरी पोरीच्या भलत्याच ठिकाणी टाक असले उद्योग करतात.
आता बोला.

अर्धवटराव's picture

15 Jul 2012 - 8:19 pm | अर्धवटराव

आमच्या अपार्ट्मेण्टमध्ये, कॉलनीमध्ये, सिक्युरीटी सिस्टीम वगैरे असताना देखील चोरी झाली ... त्या दिवसापासुन आम्हि घराला कुलुप लावणं बंद केलं... काय फायदा कुलुपं लाऊन... तसंही चोरी होतेच.

अर्धवटराव

विश्वनाथ मेहेंदळे's picture

15 Jul 2012 - 1:19 pm | विश्वनाथ मेहेंदळे

पाहुणे ताई, एक थोडा अवांतर प्रश्न विचारतो.

JM/टिळक रोडवर भर दुपारी बसथांब्यावर तुम्हाला कुणी सहेतुक स्पर्श, अंगचटीला येणे किंवा "gropping n eve teasing" मध्ये जे काही येऊ शकते ते केले आणि त्यावर तुम्ही काय केलेत ? तुम्हाला खात्री असेल की जे झाले ते सहेतुक होते तर एक कानफटात ठेऊन द्यायची होतीत किंवा किमान थोडा आरडाओरडा करायचा होतात*. चार माणसांनी जमून त्याची कणिक नसती तिम्बली? निदान पुण्यात आणि ते ही उपरोल्लेखित ठिकाणी हा उपाय करायला हरकत नव्हती .

*महिलावर्गाने या प्रकारचा उपयोग थोडा जपून करावा असे मत आहे. कधी कधी गर्दीत खरेच चुकून धक्का लागतो. किंवा कधी कधी मुलींचाच धक्का लागतो आणि वरून खुन्नस पण देतात. मुलींनी अंग चोरणे वगैरे प्रकार किमान मुंबईत तरी खूप कमी होऊ लागले आहेत. रस्त्यावर पण महिलांचा समान हक्क आहे म्हणून असेल कदाचित. पण "तुमचा धक्का लागला तर विनयभंग आणि आमचा लागला तर मेहेरबानी " हा दृष्टीकोन जाणवतो कधी कधी :-)

एमी's picture

15 Jul 2012 - 3:05 pm | एमी

विमे grop चा अर्थ dictionary त बघा म्हणजे चुकुन धक्का लागणे व gropping मधला फरक कळेल. मागुन अचानक येतात आणि शॉक मधुन recover होईपर्यँत गर्दीत मिसळुन ही गेलेले असतात... किँवा बस मधे चढताना उतरताना असे प्रकार होतात... आणि ते आरडाओरडा करुन कणिक तिँबणे वगैरे I doubt...भारतीय शक्यतो बघ्यांमधेच असतात...पण एकदा एका मुलाच्या घोट्यावर जोरदार लाथ मारलेली : - )

विश्वनाथ मेहेंदळे's picture

17 Jul 2012 - 12:55 am | विश्वनाथ मेहेंदळे

विमे grop चा अर्थ dictionary त बघा म्हणजे चुकुन धक्का लागणे व gropping मधला फरक कळेल.

मला या शब्दाचा अर्थ माहित नसेल आणि तरीही मी कुठेही अर्थ न बघता प्रतिसाद दिला असेल असे गृहीत धरण्याच्या तुमच्या कसबाला सलाम.त्रिवार सलाम. असो, शब्दांचा अर्थ शब्दकोशात बघता येतो. बेसिक रीडिंग कॉम्प्रेहेन्शन* मात्र शाळेत जाऊन शिकावे लागेल.

मागुन अचानक येतात आणि शॉक मधुन recover होईपर्यँत गर्दीत मिसळुन ही गेलेले असतात... किँवा बस मधे चढताना उतरताना असे प्रकार होतात...

तुम्हाला असे म्हणायचे आहे की आजवर (खालील एक प्रसंग सोडला तर) एकदाही तुम्हाला पक्के खात्रीनिशी माहित नव्हते कुणी हा प्रकार केला आहे ते ??

आणि ते आरडाओरडा करुन कणिक तिँबणे वगैरे I doubt...भारतीय शक्यतो बघ्यांमधेच असतात...पण एकदा एका मुलाच्या घोट्यावर जोरदार लाथ मारलेली : - )

इथे जोरदार असहमती. कधी कधी तर पब्लिक हात साफ करायला इतकी उत्सुक असते की नक्की काय झाले हे समजून घेण्याची पण वाट बघत नाहीत. खाली पियुषा आणि मकीमावशी ने दिलेली उदाहरणे परत वाचा तिथे जमावाने पिडीत महिलेला पाठींबा दिला आहे .
दुर्दैवाने असा प्रकार परत घडला तर किमान कॉलर धरायची हिम्मत दाखवा (अर्थात स्थळ, वेळ, काळ बघून), आणि मग अनुभव सांगा. आणि तशी हिम्मत नसेल तर सहन करीत राहणे आणि मग जालावर येऊन उद्वेग व्यक्त करणे इतकेच हाती राहील. तुम्ही केलीत हिम्मत आणि नाही कुणी पाठीशी उभे राहिले तर मग "भारतीय शक्यतो बघ्यांमधेच असतात" असे हक्काने म्हणू शकता. (इतर वेळेला आपण पण त्याच बघ्यांमध्ये असतो हा भाग वेगळा)

*या शब्दाचा अर्थ पण असेल हो शब्दकोशात. जालावर पण माहिती मिळेल.

विमे,
'तुम्हाला खात्री असेल की ते सहेतुक होते' आणि '*च्या पुढील वाक्यांमुळे', 'gropping हे सहेतुकच असते आणि gropping व चुकुन लागलेल्या धक्क्यांमधे फरक लगेच कळतो' हे माहीत नसेल असे वाटले, म्हणुन dictionary बघायला सांगीतले. असो, तुम्हाला अर्थ माहीत होता/आहे, तरीही तुम्ही ती वाक्ये लिहीलीत म्हणुन तुम्हाला सलाम...
नाही, मला २ जणांबद्दल शंका होती पण त्यातला नक्की कोण हे नसते सांगता आले.
खाली पियुशा व मकं (उदा.१) यांनी दिलेली उदा. तुम्ही परत वाचा म्हणजे तुम्हाला कळेल की त्या उदाहरणांत अंगचटीला येणे/gropping दररोज एकाच रुटच्या प्रवासात होत होतं. मकं च्या उदा.१ चा पहीला पेराग्राफ परत वाचा. त्या मुली पाळतीवर राहील्या होत्या हेही परत वाचा. मकं ची बाकी उदा (३,४,५), aparna akshay यांचा अनुभव ही वाचा. त्यावरुन तुमच्या लक्षात येईल की नेहमीच अशा माणसांना पकडुन चोप देणे शक्य नसतं.
मला त्या अनुभवांबद्दल डिटेल बोलायला आवडत नाही...
डिटेल माहीत नसताना ही तुम्ही बरेच काही गृहित धरले आहे त्यामुळे तुमच्या 'इथे जोरदार असहमती.... हा भाग वेगळा)' या jumping to conclusion वाक्यांसाठी तुम्हाला परत एकदा सलाम.

आपण पण त्याच बघ्यांमधे असतो याबद्दल थोडेसे: इथेही जास्त डिटेल सांगणार नाही. पण माझ्या bmi १८/१९ नुसार मी दोनदा जेवढं शक्य होईल तेवढं intervene केलेलं आहे. आणि एकदा मेणबत्त्यांवाल्या CEO ला मुर्ख कंपनी पॉलिसीज् बदलायला लावल्या आहेत. आता त्याचे effects n side effects काय झाले तो वेगळा मुद्दा.
अवांतर: 'माझं cruel मन म्हणतं देवबाप्पा जास्तिजास्त मुलांना गे बनव म्हणजे बाकीच्या स्ट्रेट मुलांना कळेल molestation काय असतं' या वाक्यात मुलांना गे बनव हे cruel नसुन, molestation काय असतं हे मुलांना समजावं यासाठी त्यांना कोणीतरी molest करावं हा विचार cruel आहे...

पियुशा's picture

15 Jul 2012 - 3:04 pm | पियुशा

@ वि.मे .
तुमचा मुद्दा पटला पण काही गोष्टि वेळेच अन काळाच बंधन ठेवुन कराव्या लागतात
माझ्या समोर घडलेला किस्सा आहे
कॉलेजला असताना सीटी बस मधुन प्रवास करायचो बस हमखास फुल्ल असायची , एक स्टॉप असल्याने सर्व चेहरे परिचयाचे होते ,त्यात एक मुलगी होती बहुतेक ती जॉब करत असावी रोज ती आमच्याबरोबर असायची ,एकदा बसमध्ये खच्चुन गर्दी होती , आम्ही सगळ्या उभ्या होतो , स्याकमधुन पास काढायची घाइ होती तेव्ह्ड्यात बसच्या मागच्या साइडला काहितरी गोंधळ अन बाचाबाची झाली कंडक्टर मध्ये पड्ला , आमच्या बरोबर रोज प्रवास करण्यार्या त्या युवतीने एकाच्या श्रीमुखात भडकवली होती , तो नेहमी तीच्या मागे उभा राहुन अंगलटीला जाण्याचा प्रयत्न करायचा , असे तीने एकदा पाहिले दोनदा पाहिले तिनदा पाहिले रोज रोज इतकी गर्दी नसताना देखील हे प्रकार वरचेवर होउ लागल्याने तीचा संयम संपला अन तीने सणसनीत उत्तर दिले , कंड्क्टर अन बाकिच्या इतर प्रवाश्यांनी त्याला फैलावर घेतले अन बसमधुन खाली उतरवले
थोडा वेळाने ती युवती उतरौन गेली
नंतर च्या चर्चा ऐका
एक ज्येष्ट सदस्य : " बसमध्ये त्रास होतो तर सरळ सरळ स्वतःची गाडी घेउन टाकावी " उगा दुसर्यांचा वेळ कशाला वाया घालवायचा ?
दुसरा : हो ना १५ मिनिट लेट झालोय राव ऑफिसला .
एक महीला : काय नाय हो ,मला तर ती मुलगीच फालतु वाटते , धक्का लागला म्हणुन सरळ कानामागे ? अतीच झाल हे ,
दुसरी : एव्हढा मेक अप काय ,काय ती स्टाइल , अन काय ते परफ्युम ,म्हणजे " आ बैल मुझे मार टाइप "
शिकल्या तेव्ह्ढ्या हुकल्यात हल्लीच्या मुली .

आता बोला

प्रभाकर पेठकर's picture

15 Jul 2012 - 3:14 pm | प्रभाकर पेठकर

त्या पिडित मुलीचे कौतुक आणि अभिनंदन.

एक ज्येष्ट सदस्य : " बसमध्ये त्रास होतो तर सरळ सरळ स्वतःची गाडी घेउन टाकावी " उगा दुसर्यांचा वेळ कशाला वाया घालवायचा ?
दुसरा : हो ना १५ मिनिट लेट झालोय राव ऑफिसला .
एक महीला : काय नाय हो ,मला तर ती मुलगीच फालतु वाटते , धक्का लागला म्हणुन सरळ कानामागे ? अतीच झाल हे ,
दुसरी : एव्हढा मेक अप काय ,काय ती स्टाइल , अन काय ते परफ्युम ,म्हणजे " आ बैल मुझे मार टाइप "
शिकल्या तेव्ह्ढ्या हुकल्यात हल्लीच्या मुली .

पियुशा, ही वक्तव्ये एकूणातच उथळ आणि संतापजनक आहेत. पण त्या बस मध्ये त्या मुलीच्या बाजूने बोलणारा/बोलणारी एकही पुरुष/स्त्री नव्हती? हे जास्त खेदजनक आहे.

पियुशा's picture

15 Jul 2012 - 3:26 pm | पियुशा

@ पे. काका
तिच्या साइडने बोलणारे अगदी वर वर बोलत होते वेळ मारुन न्यावी असे
पण तुम्हाला सांगु का मुलींनी अशी कार्यवाही केली तर तिची पाठ थोपटुन शाबसाकी देन्यापेक्षा तीला घाबरवणारे अन दुषणे लावणारेच अधिक ! " आता हीच काही खर नाही ,तो मुलगा आता ह्या अपमानाचा बदला घेइल तिच्यावर पाळत ठॅवील ,
डु़ख धरेन हीने कशाला जास्तीचा शहाणपणा करायचा नसता ?
वरतुन "मुलीची जात" , भावाला नै तर पप्पांना सोबत घेउन जाणे वैग्रे वैग्रे लेक्चर आहेच ,

प्रभाकर पेठकर's picture

15 Jul 2012 - 4:55 pm | प्रभाकर पेठकर

पियुशा,

तिच्या साइडने बोलणारे अगदी वर वर बोलत होते वेळ मारुन न्यावी असे

म्हणजेच त्या ज्येष्ठांच्या बेजबाबदार आणि उथळ वक्तव्याबद्दल, पर्यायाने त्या मुलीवर होणार्‍या अन्यायावर, कोणालाही मनापासून चीड वाटत नव्हती. त्या गुंडाला प्रतिकार करणे जाउदे, त्यासाठी वेगळे धाडस आणि शारीरिक बळ लागते, पण त्या निरुपद्रवी ज्येष्ठांनाही तुम्ही प्रतिकार करू शकला नाही? ही लाजिरवाणी गोष्ट आहे.

तो मुलगा आता ह्या अपमानाचा बदला घेइल तिच्यावर पाळत ठॅवील ,
डु़ख धरेन हीने कशाला जास्तीचा शहाणपणा करायचा नसता ?

खरं आहे. आजकाल राजकिय वरदहस्त, पोलिसांशी असणारे साटेलोटे इत्यादींमुळे बेताल तरूण बोकाळले आहेत. त्यांचा त्रास फक्त स्त्रियांनाच आहे असे नाही तर पुरुषांना ही आहे. मिपावर तावातावाने लिहिणारे सुद्धा तलवारी, चॉपर, गावठी कट्टे ह्यांचा सामना करू शकत नाहीत. त्यामुळे असे प्रसंग टाळावेत. हं..स्वतःचा, स्वतःच्या कुटुंबाचा जीव मातीमोल असेल तर जरूर भिडावे. पेपरला नांव येईल आणि घरचे तुमचे दहावे-बारावे उरकत नाहीत त्याआधीच 'समाज' त्याच्या दिनक्रमात गुंतलेला असेल.

तरूणपणी अंगात रग होती तेंव्हा अनेक अनोळखी लोकांच्या भांडणात पडून न्यायाची बाजू घेतली आहे. प्रसंगी ४-६ जणांशी दोन हातही केले आहेत.पण, त्या काळी तलवारी, चॉपर आणि गावठी कट्टे, सुपार्‍या एवढ्या बोकाळल्या नव्हत्या. आता ह्या वयात शारीरीक लढा जमत नाही. खात्री वाटत नाही. पण मनात अन्यायाची चिड ठासून भरली आहे. आवका पाहून दोन हात करायलाही पुढे होतो पण बायको-मुलगा ओढून दूर नेतात. असो.

मन१'s picture

15 Jul 2012 - 4:23 pm | मन१

कालेजात असताना आम्ही एक तक्रार घेउन पोलिसात गेलो होतो.
मुलगी सुंदर ,(खास भारतीयांना भुलवेल अशी) गोरीपान होती.
व जीन्स - (स्लीवलेस) टॉप असा काहीसा ड्रेस होता. ह्या अवतारात त्रास झाल्याचे समजताच पोलिसात तक्रार करायला
गेल्यावर त्यानेच उलट गलिच्छ नजरेने स्कॅन करून वर (स्लीवलेस घातल्याबद्दल) "अन्न उघडे ठेवले तर माशा बसणारच" असं सुनावलं. आता बोला!

कायदा राखणार्‍या मंडळींची ही मानसिकता समाजाची प्रतिनिधित्व नक्कीच म्हणता यावी.
पोरींच्या पिण्याबद्दलः- पंधराएक वर्‍षांची पोरगी दारु पीत असेल तर कायद्यानं शिक्षेची तरतूद आहे, बलात्कार वगैरे करणं हरामखोरी आहे. माजी अध्यक्ष जॉर्ज बुश ह्यांच्या अध्यक्षीय कारकिर्दीत त्यांच्या अल्पवयीन पोरीने दारु पिल्याबद्दल दिला कायद्यानुसार् शिक्षा झाली होती, तशीच शिक्षा आक्षेप असणार्‍यांनी गुन्हा सिद्ध झाल्यास करावी.
"दारु पितेस काय, थांब करतोच बलात्कार" असला काहीसा टोन (बेंगलोरला पब फोडणार्‍या) श्रीराम सेनेसारख्या गुंडांचा दिसतो. दुर्दैवाने ह्यांचे कुणी काही झाट वाकडे करु शकत नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Jul 2012 - 4:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पोलिसांकडे तक्रार करायला मुलगी किंवा स्त्री जर गेली तर पोलिंसाचं आणि तत्त्पर अधिकार्‍यांच वर्तन सालं लै बेक्कार असतं. तरुणीकडे, स्त्रीकडे असं पाहतात आणि असं बोलतात की पुढल्या वेळी तीच स्त्री, तरुणी पुन्हा पोलिस स्टेशनला कधी पाय ठेवणार नाही. कदाचित चांगली उदाहरणंही असतील पण क्वचितच असावीत असेही वाटते. (विदा खरंच कोणी गोळा केला पाहिजे)

-दिलीप बिरुटे

प्रभाकर पेठकर's picture

15 Jul 2012 - 5:01 pm | प्रभाकर पेठकर

मध्यंतरी फक्त महिलांसाठी आणि महिलांनी चालविलेली पोलीस स्टेशन्स अस्तित्वात आली होती. तसे पेपर आणि दूरचित्रवाणीद्वारे समजले होते. ती पोलीस स्टेशन्स कुठे आहेत हे शोधून ठेवले पाहीजे.

llपुण्याचे पेशवेll's picture

31 Jul 2012 - 1:55 pm | llपुण्याचे पेशवेll

पाहूणे अतिरेक करीत आहेत असे वाटते. त्यांच्या म्हणण्यानुसारचे जंगली महाराज रोड (JM) टिळक रोड वगैरे ठीकाणाहून आम्हीही अनेकवेळा फिरत असतो. आमच्या पाहण्यात तरी असे आलेले नाही. सदर प्रतिसादांनंतर आमच्या मैत्रिणींकडून सदर २ रस्ते आणि या व्यतिरिक्त ३-४ रस्ते इथे असा अनुभव आला आहे का असे विचारून खात्री करून घेत होतो की त्याना असा अनुभव आला आहे का. त्यांच्याकरुन नकारार्थी उत्तर आल्यामुळे सदर रस्ते पुण्यातले जे आहेत त्या बद्दलच पाहुणे बोलत आहेत का असे विचारु इच्छीत आहे.

खेडूत's picture

14 Jul 2012 - 9:13 pm | खेडूत

पेठकर काका आणि मन१ यांच्याशी सहमत!

ही व्यथा/ संताप वगैरे काही कोटी लोकांचा होतो, पण ज्यांचा होत नाही असे जवळपास शंभर कोटी असतील! त्याची कारणे काहीही असतील..(विदा मागू नये!)
नुसते शिक्षण काही कामाचे नाही, संस्कार त्याहून महत्वाचे. पण ते होऊ नयेत याचा मागच्या शतकात पुरा बंदोबस्त झाला आहे. त्या-त्या लोकांच्या दृष्टीने पाहिले तर त्यांचं गाव, जात, कोणत्याही मार्गाने मिळालेला पैसा जमवणे, आणि हितसंबंध यापलीकडे त्याना समाज किंवा भारताशी काही घेणे नाही. आणि त्यांचे कुणी वाकडं करू शकत नाही. त्यांचं खात्रीनं आणि त्वरित वाकडं होण्याची व्यवस्था आली पाहिजे इतकंच..

सुसंस्कृत घरातली मुले यापासून दूर असतातच.पण काहीच न करणे हा यावर उपाय नक्कीच नाही. ज्याला समाजसुधारणा म्हणावे अशी उदाहरणे नगण्य होत आहेत. कारण सर्व समाज स्वीकारेल असे नेतृत्व पण नाही. काही लोकाना हुकुमशाही हाच पर्याय वाटतो. कारण ते उथळ आहेत म्हणून नाही, तर त्यांचा व्यवस्थेवरचा विश्वास संपलाय म्हणून.
हे सरकार बदलावे असे फारच थोड्यांना वाटते. तशी शक्यता पण दिसत नाही. क्रांती व्हावी असेही काहींना वाटते पण म्हणजे काय आणि कशी माहीत नाही. अण्णा किंवा बाबा अशा लोकाना पुरेसा लोकाश्रय नाही. समजा मिळालाच, तर पुढे नवे सरकार कोण सांभाळेल? वेगळे दिसणारे पण आतून तसेच असलेले लोक.

सध्या तरी विचार करू शकणारे लोक स्वतः चा विचार करत आहेत. आपल्याला झळ बसू नये इतकी काळजी घेणे सामान्यांच्या हातात आहे.

आता वरील घटनांमध्ये कारणं बघितली तर गुन्हेगार कायद्याच्या एक पाउल आधीच पुढे असल्याचे दिसते. किंवा कायद्याचं रक्षण करणारेच गुन्हेगारांचं रक्षण करतायत. ही अवस्था फक्त मागास राज्यांमध्ये नसून वेगळ्या स्वरूपात सर्व राज्यांत आहेच. बाकी वाढदिवसाची पार्टी पब मध्ये करणे, मित्रांबरोबर मुलीने रात्री उशीरा बाहेर जाणे, हे सुसंस्कृत पणाचे लक्षण नाहीच म्हणता येत.

बागपत आणि गुवाहाटी ची तुलना युरोपाशी कुठं करता राव!
तिथल्याच काय पण पुण्या-मुंबईतल्या लोकांनी पण सावधच असायला पाहिजे. आपल्याकडे काय वेगळं आहे?

आत्मशून्य's picture

14 Jul 2012 - 9:16 pm | आत्मशून्य

पुरुषी अहंकार डिवचला गेला की कशी एखाद्या संतापजनक वा घ्रूणास्पद घटनेची निर्मिती होते याचं गुवाहाटी प्रकरण एक उत्तम उदाहरण ठरावं. इथं मुलीला तिचं वागणं वाइट, दारुपिते, तोकडे कपडे घालते म्हणुन न्हवे (तशा त्या पब बाहेर बर्‍याच मुली तोकड्या कपड्यात आणी दरुच्या नशेत येजा करत असाव्यात उगाच का तिथे चित्रीकरण चालु होतं ?) तर इतक्या लोकांसमोर तिनं व तिच्या मित्रानं त्यांच्या व्हिडीओ चित्रीकरणाला विरोध करण्यांच धारीष्ट्य दाखवलं म्हणुन अशा अपमानास्पद परीस्थीतीला सामोरं जावे लागले. आणी त्याही परीस्थीतीत ती ज्या त्वेशाने लोकांना म्हणत होती की माझ्या अब्रुशी खेळु नका तुम्हालाही बहीण आहे I feel damn proud about her, She faught extremely well.

मन१'s picture

15 Jul 2012 - 11:20 am | मन१

बोल्ड टाइप मधल्या वाक्यांशी भयंकर सहमत.
दारु पिते म्हणून public property आहे, असे कुणीही समजू नये.
एखाद्या स्त्री दारु प्यायली म्हणून बलात्कार करणे हा आख्ख्या समजाचा हक्क आहे; असे काहीसे
आपल्याकडे पसरत चालले आहे, ते चूक आहे.
महाभारतातल्या द्यूत प्रसंगाची आठवण होते. राजसभेत आणलेल्या पूर्वीच्या राणीला :-
"तशीही पाच जणांसोबत झोपतेसच, आमच्यासमोर उघडी हो, मांडीवर बस." असलं काही म्हणणं हिडिस आहे.
आपण लगेच ती पतिव्रता वगैरे म्हणून समर्थन करतो तिचं; मुळात असंही समर्थन करायची गरजच पडू नये.
कुणाच्याही(अगदि वेश्येच्याही) वस्त्राला इतर कुणाही व्यक्तीने नागवायच्या हीन उद्देशाने, जबरदस्तीने हात घालणे
गलिच्छ आहे.
हात "कुणावर" टाकला हे का पाहिले जावे? "कुठल्या" उद्देशाने टाकला हे पहावे.
भारतातली मानसिकता :- समजा एखादी कुमारिका पोलिसांत अन नंतर कोर्टात तक्रार घेउन आली की अमुक अमुक व्यक्तीनं माझ्याशी गैरवर्तन केलं> तर लागलीच हे सिद्ध करायचा प्रयत्न होतो की तशीही ही साली कसली बदफैली आहे.
आधीच हीचे इतर कुणाशी कसे विवाह्पूर्व संबंध आहेत वगैरे वगैरे.
आणि अचानक तिच्याबद्दलचा सगळ्यांचाच दृष्टीकोन बदलतो. एकदा तिचे कुठे संबंध आहेत असा वास जरी आला, तर तिच्यासोबत काय वाटेल ते केले तरी हरकत नाही, असा सुप्त आवाज त्यात असतो.
अरे काय हे? असेल ती बागेत फिरत तिच्या मर्जीने कुणासोबत. पब्लिकला काय त्रास आहे? किंवा ती बागेत फिरते म्हनून आख्ख्या शहराने रोज रात्री आळीपाळीने तिच्यासोबत जबरदस्ती करावी काय? भिकारचोट साले.

वस्तुतः "अशा चारित्र्याची आहे म्हणून बलात्कारणीय आहे" असे म्हणणे हे १००% एखाद्या सिगारेटप्रेमीला "सिगारेट पितोस तर तुझा गळा कापला पाहीजे " असे म्हणण्यासारखेच आहे. तुम्हाला सिगारेट पिणे चूक वाटते, तुमची मर्जी. गळा कापण्याचाही अधिकार तुम्हाला नाही, आणि बलात्कार करण्याचा हक्कही.
Alas भारतात कायदे योग्य असले तरी अंमलबजावणी शून्य आहे.कायदा -सुव्यवस्था सर्वत्र समान, हवी तेवढी सशक्त नाही.
कुणी कुणासोबत काय करावं किंवा काय प्यावं हे ठरवायचा अधिकार दिला कुणी तिच्यायला इतर पब्लिकला?

अवांतर :- मला लंडनला कित्येकदा रात्रपाळीत घरी सोडायला येणार्‍या कॅब ड्रायव्हर स्त्रिया असत. रात्री दोन- तीन्-चार कधीही त्या येत. नेमके असेच भारतात होउ शकते का? रात्री निव्वळ एक जॉब, "रोजगार" म्हणून एखादी स्त्री ह्या वेळेस फिरु लागली तर असली मंडळी तिच्यासोबत झुंडीने काय काय करतील देव जाणे.

जेनी...'s picture

15 Jul 2012 - 6:58 pm | जेनी...

हो अगदी सहमत आत्मशुन्य ..
खाली पियुशाने दिलेलं उदाहरनासव किस्सा ...
मुलीना विरोधाचा परिणाम भोगावा लागतो ...वेळ ,काळ आणि ठिकाण बघुन प्रतिक्रिया द्यावि लागते .
मुंबईत जसं ,अंधेरी स्टेशनवर काही झालं तर प्रतिकार करण एकवेळ सेफ पण तेच कुर्ला स्टेशनवर अतिशय घातक .
तिथे गप्प बसणच जास्त योग्य वाटतं .:(

शिल्पा ब's picture

15 Jul 2012 - 12:27 pm | शिल्पा ब

भयानक व्हीडीओ आहे.
त्या १५-१६ वर्षाच्या मुलीला ५-२५ पुरुष केसाने ओढताहे, तिच्या छातीला, कमरेखालच्या अंगाला हात लाउन हसताहेत, मजा घेताहेत अन त्याचं समर्थन करणार सुद्धा आहेतच.

हरामखोरांना जेलातच घातलं पाहीजे तिथे त्यांना त्यांना आडवं पाडुन जो प्रसाद मिळेल तो सुद्धा कमीच..
नीचपणा नुसता...नालायक लोकं!!

क्लिंटन's picture

15 Jul 2012 - 6:50 pm | क्लिंटन

एकूणच चर्चा वाचली.चर्चेचा सूर on expected lines आहे.

मुलींनी/स्त्रियांनी वेडावाकडा प्रसंग होईल याची शक्यता असलेली ठिकाणे टाळावी हे म्हणणे theoretically ठिक आहे.पण असे प्रकार करणारे भर रस्त्यात/बसमध्ये किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी असतील तर मुलींनी अशी किती ठिकाणे टाळणे अपेक्षित आहे?की त्यांनी काही न करता घरी बसणे ही "बुरसटलेली" प्रवृती आहे का?

दुसरे म्हणजे मुलींनी अशी ठिकाणे टाळावीत असे म्हणणे हे घरातील लोक काळजीपोटी सांगत असतात यात अजिबात शंका नाही. मुलींनी अशी ठिकाणे त्यांच्या सुरक्षिततेसाठी टाळावी असे म्हणणे म्हणजे थोडेसे सुरक्षित प्रवासासाठी दुचाकी चालवत असताना हेल्मेट वापरावे अशा सल्ल्यासारखे आहे.समजा हेल्मेट न वापरल्यामुळे अपघाताच्या वेळी काही वाईट झाले तर ती चूक हेल्मेट न वापरणाऱ्याची असे म्हणता येईल.पण तो रस्त्यावरचा दुचाकीवाला हेल्मेट न घालता चालला आहे म्हणून त्याच्या डोक्यात दगड घालायचा अधिकार इतरांना कसा मिळाला?इतकेच नव्हे तर हेल्मेट न घालून दुचाकी चालविल्यामुळे दुसऱ्या कोणाला त्याने त्याच्या डोक्यात दगड घालायला प्रवृत्त केले असे म्हणता येईल का?त्याचप्रमाणे एखादी मुलगी अशा ठिकाणी नको त्या वेळी समजा गेली तरी तिच्या अंगाला हात लावून काही वावगा प्रकार करायचा अधिकार इतरांना कसा मिळाला?तसेच मुली "तोकडे कपडे" घालून मुलांना चाळवतात आणि त्यातूनच अशा घटना घडतात (म्हणजे एका परीने तोकडे कपडे घालून मुली बलात्कार करायला प्रवृत्त करतात) अशा पध्दतीचे विधान अनेकदा केले जाते.म्हणजे वरील उदाहरणाप्रमाणे हेल्मेट न घालून दुचाकी चालवणारे इतरांना डोक्यात दगड घालायला प्रवृत्त करतात असे म्हणण्याप्रमाणे झाले.

तेव्हा झाल्या प्रकाराबद्दल (गुवाहाटी/गेट वे ऑफ इंडिया/मरीन लाईन्समधील चौकी किंवा अन्य शेकडो ठिकाणी घडलेल्या घटनांबद्दल) मुलींना जबाबदार ठरविणे म्हणजे victim लाच शिक्षा देण्यासारखे आहे जे माझ्या मते सर्वथैव अयोग्य आहे.

या संदर्भात पेठकर काकांसारख्या ज्येष्ठ मिपाकराने " पिडीताने कसेही स्वैराचारी वागले तरी त्याला बोलायचे नाही. तर पिडणार्‍याला तरी का बोलायचे?" असे विधान करावे याचे खरोखरच सखेद आश्चर्य वाटले.यात स्वैराचार म्हणजे नक्की काय?दारू पिणे हा?की अल्पवयीन व्यक्तीने दारू पिणे हा?की मुलीने दारू पिणे हा?या particular उदाहरणात ती मुलगी अल्पवयीन आहे आणि तरीही तिने दारू प्यायली असेल तर कायद्याप्रमाणे तिला समज (किंवा इतर काही असेल ते) आणि त्या पबने अल्पवयीन व्यक्तीला (मुलगा किंवा मुलगी) दारू देऊन कायद्याचे उल्लंघन केले म्हणून त्यावर त्या पबचे लायसेन्स जप्त करण्यासारखी कारवाई व्हायला हवी यात शंका नाही.पण ती मुलगी अल्पवयीन असल्यावर भर देऊन आपण मुख्य मुद्द्याला बगल कशी देऊ शकतो?समजा ती मुलगी १५ नाही २५ वर्षांची असती तर तिने किंवा पबने कोणत्याही कायद्याचे उल्लंघन केले नसते.मग तिच्याबाबत झालेला प्रकार कमी घृणास्पद ठरला असता का?

दुसरे म्हणजे दारू पिणे हा वाटतो तितका वाईट प्रकार नाही.मी अमेरिकेतला माझ्याच बाबतीत घडलेला एक किस्सा सांगतो.मी तिथे एक अत्यंत बथ्थड पी.एच.डी विद्यार्थी होतो आणि पी.एच.डी मला झेपली नव्हती हे मी यापूर्वीच मिसळपाववर स्पष्ट केले आहे.त्या दरम्यान एका conference साठी मी फ्लोरिडातील एका शहरात गेलो होतो.Conference तीन दिवसांची होती आणि दुसऱ्या दिवशी रात्रीचे जेवण करायला आम्ही भारतीय विद्यार्थी जवळच्या एका Restaurant मध्ये गेलो होतो.तिथे काही गोरे विद्यार्थीही आले होते.त्यातील एकाने अगदी टल्ली होण्याइतकी नाही पण बऱ्यापैकी दारू प्यायली हे कोणालाही सहजपणे समजून यावे.स्वत:ला अतिशहाणे समजणारे आम्ही "सोवळे" भारतीय विद्यार्थी "या अशा लोकांमुळे अमेरिकेची ही गत झाली आहे" अशा प्रकारचे डायलॉग (अर्थातच हिंदीतून) मारत होतो.आणि आश्चर्य म्हणजे conference च्या शेवटच्या दिवशी (या घटनेच्या नंतरच्या दिवशी) नेमक्या त्याच गोऱ्याचा पेपर best paper म्हणून निवडला गेला आणि त्याला त्याबद्दल बक्षिस मिळाले.तो गोरा Stanford University मध्ये होता ही पण माहिती तेव्हाच कळली.अर्थातच आमचे चेहरे शालजोडीतले मारल्याप्रमाणे बघण्यासारखे झाले होते हे सांगणे न लागे.तेव्हा दारू पिणे हे वाईट आहे असे कोणी म्हणू नये.त्याचा अतिरेक केल्यास त्याचे दुष्परिणाम होतील ही गोष्ट खरी आहे (पण त्याचप्रमाणे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केल्यास त्याचेही दुष्परिणामच होतील तेव्हा याबाबत दारूला single out करायची काही गरज नाही). अमेरिकेचे अशा लोकांमुळे नुकसान होत आहे की नाही हे मला माहित नाही आणि मला ते शोधून काढण्यात काडीमात्र रसही नाही.पण आम्हीच कसे लई-शहाणे, आमचीच जीवनपध्दती कशी सर्वश्रेष्ठ,जगातील सर्व morals चे repository केवळ आम्हीच असे समजायच्या smug प्रवृत्तींमुळे भारताचे मात्र अपरिमित नुकसान झाले आहे हे मात्र मला त्या दिवशी प्रकर्षाने जाणवले.

तेव्हा झालेल्या प्रकारात स्वैराचार झाला असे वाटत असेल तर दारू मुलीने प्यायली हेच असे वाटण्यामागचे कारण होते असे म्हणावेसे वाटते.आपण कसेही वागले तरी स्त्रिया/मुलींनी अगदी आदर्श वागले पाहिजे अशी अनेकांची अपेक्षा असते.म्हणजे स्वत: दारू पित असले तरी मुलींनी ती प्यायला नको, स्वत: भारतीय पेहराव करत नसले तरी मुलींनी मात्र भारतीय पेहराव करावा अशी अपेक्षा असणे हा याचाच (moral policing) चा भाग आहेत.पुलंनी १९८७ साली न्यू जर्सी मध्ये बृहन्महाराष्ट्र अधिवेशनात भाषण केले होते.त्यात त्यांनी म्हटले होते की काळ बदलला त्याप्रमाणे अनेक गोष्टी बदलल्या.दळायची जाती जाऊन पिठाच्या चक्क्या आल्या त्याप्रमाणे पिठ दळतानाच्या ओव्याही जवळपास नामशेष झाल्या.आता आपल्या संस्कृतीचा हा ठेवा नाहिसा झाला म्हणून स्त्रियांनी त्यांची कंबर मोडेपर्यंत जाती दळायची अपेक्षा करणे कसे योग्य ठरेल?त्यापुढे मी म्हणतो की जर कोणाला संस्कृतीची इतकीच पडली असेल तर त्यांनी त्यांची कामे करताना ओव्या म्हणाव्यात.तुम्ही अमुक करा आणि तमुक करा अशा उंटावरून शेळ्या हाकणे सर्वथैव असमर्थनीय आहे. तेव्हा कोणा मुलीला (किंवा मुलालाही) दुष्परिणाम होणार नाही इतकी दारू प्यावीशी वाटली (आणि ती/तो त्यानंतर गाडी चालवणार नसेल किंवा अन्य कोणत्याही प्रकारे इतरांना इजा पोहोचवत नसेल) तर त्यात आक्षेप घेण्यासारखे मला तरी काहीही वाटत नाही.

मुलामुलींना असे (सर्वसामान्य संकेतांविरूध्द वर्तन) का करावेसे वाटते याचाही विचार होणे गरजेचे आहे. प्रचंड प्रमाणावर सामाजिक स्थित्यंतरे होत असलेल्या सध्याच्या काळात पालकांची जबाबदारी बदलली आहे.अगदी २०१२ च्या काळातही मुलांच्या प्रत्येक लहानसहान गोष्टीत पालकांचा नको तितका हस्तक्षेप होत असल्याची किमान पाच उदाहरणे माझ्याच अगदी जवळच्या नात्यात मी बघितली आहेत. इतर ठिकाणी परिस्थिती काय आहे याची कल्पना नाही.पण असा प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप होत असेल तर मुले मोठी झाल्यानंतर त्याच्या अगदी विरूध्द (कदाचित टोकाची) प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक आहे (उदाहरणार्थ लहानपणी देवपूजेची सक्ती झाल्यास मोठेपणी तिच मुले त्याविरूध्द प्रतिक्रिया उमटून पूर्णपणे नास्तिक बनतात हे अनेक ठिकाणी बघायला मिळते). माझी मुले मला वचकून (खरं म्हणजे दहशतीत) असणे ही ego satisfying urge या पालकांमध्ये मला बघायला मिळाली आहे.माझ्या मते हा प्रकार सर्वथैव चुकीचा आहे.मुलांच्या प्रत्येक गोष्टीत पालकांनी इतका हस्तक्षेप करू नये तर मुलांना चांगले काय आणि वाईट काय याचा स्वतंत्रपणे निवाडा करण्याइतके सक्षम बनविण्यापुरतेच पालकांचे काम मर्यादित असावे.पुढे यशस्वी झाल्यानंतर "मी आज जो काही आहे तो माझ्या पालकांमुळेच आहे" असे मुलांनी म्हणणे हा त्या पालकांना सर्वात मोठा tribute झाला पण "माझी मुले मला वचकून आहेत" ही ego satisfying urge म्हणजे एक मृगजळ आहे. मुले लहान आहेत तोपर्यंत कुरकुर करत का होईना ती हे सहन करतील पण संधी मिळताच मोठे झाल्यावर त्याविरूध्द बंड करतील हे नक्कीच. सध्याच्या काळात इंटरनेट आणि इतर अनेक गोष्टींमुळे याविरूध्द बंड करायचे अनेक मार्ग मुलांना उपलब्ध आहेत आणि त्या मार्गांचा संधी मिळताच ती मुले अवलंब करतील यात शंका नाही. (म्हणजे मला कायम दहशतीत ठेवलेत काय?मग बघाच--म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टीचा तिटकारा आहे उदाहरणार्थ दारू-- नेमकी तीच गोष्ट मी करेन अशी प्रवृत्ती बनणे) आणि या सगळ्याचे avenues सध्याच्या काळात पूर्वीपेक्षा जास्त उपलब्ध असल्यामुळे हा धोका सध्याच्या काळात जास्त आहे. तेव्हा सांगायचा मुद्दा म्हणजे सतत "तू असे करू नकोस तू तसे करू नकोस" अशा प्रकारचे moral policing केल्यास जो परिणाम अपेक्षित आहे त्याच्या नेमका विरूध्द परिणाम बघायला मिळायची शक्यता बरीच जास्त आहे.तेव्हा योग्य/अयोग्य काय याचा निवाडा करायला मुलांना समर्थ न बनविता नुसतीच लेक्चरबाजी करून हे घरातले आणि समाजातलेही विविध गोष्टींसाठीचे moral police खूप हानी करत आहेत हे नक्कीच.

असो.गुवाहाटीतला प्रकार अत्यंत अश्लाघ्य आहे आणि त्याबद्दल हा प्रकार करणाऱ्यांना कडक शिक्षा व्हायलाच हवी.आणि या (आणि अशा अनेक) घटनांबद्दल मुलींना जबाबदार धरणे अजिबात योग्य नाही.आणि एकतर्फी moral policing चालते ते पण माझ्या दृष्टीने अजिबात योग्य नाही.वरकरणी ते हिताचे आहे असा देखावा उभा केला जात असला तरी पुरूषी अहंकार दुखावला जाणे हेच त्यामागचे कारण आहे असेही मला स्पष्ट म्हणायचे आहे.

मन१'s picture

15 Jul 2012 - 7:36 pm | मन१

यात स्वैराचार म्हणजे नक्की काय?दारू पिणे हा?की अल्पवयीन व्यक्तीने दारू पिणे हा?की मुलीने दारू पिणे हा?या particular उदाहरणात ती मुलगी अल्पवयीन आहे आणि तरीही तिने दारू प्यायली असेल तर कायद्याप्रमाणे तिला समज (किंवा इतर काही असेल ते) आणि त्या पबने अल्पवयीन व्यक्तीला (मुलगा किंवा मुलगी) दारू देऊन कायद्याचे उल्लंघन केले म्हणून त्यावर त्या पबचे लायसेन्स जप्त करण्यासारखी कारवाई व्हायला हवी यात शंका नाही.
+१

तेव्हा कोणा मुलीला (किंवा मुलालाही) दुष्परिणाम होणार नाही इतकी दारू प्यावीशी वाटली (आणि ती/तो त्यानंतर गाडी चालवणार नसेल किंवा अन्य कोणत्याही प्रकारे इतरांना इजा पोहोचवत नसेल) तर त्यात आक्षेप घेण्यासारखे मला तरी काहीही वाटत नाही.
स्वच्छ सांगतो. मी पीत नाही. मुलींनी पिलेले मला आवडत नाही. पण "दारु पिलीस तर आख्खे गाव उठसूट बलात्कार करेल" हे असले लॉजिक गलिच्छच आहे. दारु पीत नसलेल्या मुलीसोबतही गैरप्रकार केले तरी त्याचे समर्थन करणार्‍यांची इथे कमी नाही. माझेच वरचे बोल quote करतोयः-
भारतातली मानसिकता :- समजा एखादी कुमारिका पोलिसांत अन नंतर कोर्टात तक्रार घेउन आली की अमुक अमुक व्यक्तीनं माझ्याशी गैरवर्तन केलं तर लागलीच हे सिद्ध करायचा प्रयत्न होतो की तशीही ही साली कसली बदफैली आहे.
आधीच हीचे इतर कुणाशी कसे विवाह्पूर्व संबंध आहेत वगैरे वगैरे.
आणि अचानक तिच्याबद्दलचा सगळ्यांचाच दृष्टीकोन बदलतो. एकदा तिचे कुठे संबंध आहेत असा वास जरी आला, तर तिच्यासोबत काय वाटेल ते केले तरी हरकत नाही, असा सुप्त आवाज त्यात असतो.
अरे काय हे? असेल ती बागेत फिरत तिच्या मर्जीने कुणासोबत. पब्लिकला काय त्रास आहे? किंवा ती बागेत फिरते म्हणून आख्ख्या शहराने रोज रात्री आळीपाळीने तिच्यासोबत जबरदस्ती करावी काय?

"दारु पितेस काय, थांब करतोच बलात्कार" असला काहीसा टोन (बेंगलोरला पब फोडणार्‍या) श्रीराम सेनेसारख्या गुंडांचा दिसतो. दुर्दैवाने ह्यांचे कुणी काही झाट वाकडे करु शकत नाही.

गुवाहाटीतला प्रकार अत्यंत अश्लाघ्य आहे आणि त्याबद्दल हा प्रकार करणाऱ्यांना कडक शिक्षा व्हायलाच हवी.
जर गुन्हेगाराकडे पुरेशी सत्ता किंवा पैसा असेल तर शिक्षा होणे भारतात rarest of rare शक्यता वाटते.
शाबित करणार कोण? शोध घेणार कोण? तेच जर http://www.misalpav.com/node/22254#comment-412944 दिल्यासारखे विचारु लागले तर काय घंटा तपास होणार आहे?

आणि या (आणि अशा अनेक) घटनांबद्दल मुलींना जबाबदार धरणे अजिबात योग्य नाही.
पुन्हा +१ पण

आणि एकतर्फी moral policing चालते ते पण माझ्या दृष्टीने अजिबात योग्य नाही.वरकरणी ते हिताचे आहे असा देखावा उभा केला जात असला तरी पुरूषी अहंकार दुखावला जाणे हेच त्यामागचे कारण आहे असेही मला स्पष्ट म्हणायचे आहे.
अडचण अशी की गैरप्रकराला भारतात शासन/शिक्षा मिळेलच ह्याची शाश्वती नाही. म्हणून (सभ्य म्हणवल्या जाणार्‍या घरातील )पब्लिकला असे वचकून रहावे लागते. कायद्याचा धाक योग्य त्या व्यक्तींना बसल्यास बाकी गोष्टी आपोआप सरळ होतील. सध्या सभ्य लोकांना पोलिसांची भीती वाटते, गुंडांना आपल्याला काय वाटेल ते "मॅनेज" करता येइल हा भरोसा आहे. हे चित्र चूक आहे. सभ्य लोकांना पोलिसांबद्द्ल आपुलकी वाटली पाहिजे.

मनोबा आणी क्लिंटन यांच्याशी सहमत.

अनेक सदस्यांचे प्रतिसाद वाचुन संताप्/खेद/किव अस बरंच काहि वाटुन गेलं. इथं वावरणार्‍या सदस्यांचे विचार असे असु शकतात तर मग खाप मंडळींचे काय घेउन बसलात.

का कुणास ठावुक पण मार्टिन ल्युथर किंग चे हे वाक्य डोळ्यासमोर आले.

"History will have to record that the greatest tragedy of this period of social transition was not the strident clamor of the bad people, but the appalling silence of the good people."

--Martin Luther King, Jr.

मस्त कलंदर's picture

15 Jul 2012 - 7:34 pm | मस्त कलंदर

गुवाहाटीच्या घट्नेबद्दल बोलायचं, तर प्रत्येक वर्तमानपत्र आणि चॅनेलची बातमी वेगळी आहे. तिचं वय १५-१६ ते २० असं सांगितलं जातंय.कुठे तो पब होता तर कुठे बार-कम रेस्तरॉ आहे असं लिहिलंय. एकेठिकाणी त्या वाढदिवसाच्या पार्टीत त्या ग्रुपमधलं एटीएम कार्ड हरवल्यामुळे त्यांना तिथून बाहेर हाकललं असं म्हटलंय तर कुठे तिला उद्देशून काही अश्लाघ्य बोलल्यामुळे तिने भांडण काढलं आणि परिणिती म्हणून त्या गटालाच बाहेर हाकललं असं म्हटलंय. त्यामुळे तिचं वागणं चूक की बरोबर याबाबत आपण उहापोह करून उपयोग नाही, आणि जरी ती पूर्णतः चुकीची वागली असली तरी तिच्यासोबत असं घडणं नक्कीच न्याय्य नाही.

आता अशा घटना घडताना मुली काय करतात, आरडाओरडा/प्रतिकार करतात का हा प्रश्न आहे. वानगीदाखल खाली काही प्रसंग लिहितेय.
१. काळ १९९६ ते २०००. स्थळ सांगली बसस्थानक. सिनीयर मुलींनी बसमध्ये चढताना कोणत्याही परिस्थितीत सॅक छातीशी घट्ट धरायला सांगितले होते. पायर्‍या चढताना आपसूक दोन्ही हातांनी पुढचे बार धरले जातात, अशा वेळेस एक-दोन माणसांच्या पाठीमागे उभे राहून फक्त हात पुढे आणून ग्रोपिंग केले जायचे. हाताच्या बाह्या मागे दुमडल्यामुळे कपड्यांवरूनही हात ओळखू यायचे नाहीत आणि पायर्‍या चढून वरती जाईतो त्या माणसाने हात काढून घेतल्यामुळे कुणी केलं असेल हे कळायचे देखील नाही. माझ्या वेळच्या दोन मुलींनी बसने येणे जाणे याप्रकारामुळे बंद केले. आता इथे तर जंगली महाराज रोडपेक्षा जास्त लोक असूनही काही करता आले असते का?

आमच्यातल्या एकीला असा अनुभव आल्यावर आम्ही पाळतीवर राहून एकाचा अंगावर आलेला हात तसाच पकडून ठेवला आणि त्या हाताला एकदम चक्क कचाकचा चावलो. त्या हाताच्या मालकामध्ये आणि आमच्यात तीन माणसे होती आणि तो कसाबसा आमच्यापर्यंत पोचला होता. बसमध्ये आमच्याच ओळखीचे रोजचे येणारे जाणारे असल्याने बाकीच्यांनी त्या माणसाला बुकलून काढले, पण म्हणून असले प्रकार पूर्णपणे बंदही झाले नाहीत.

२. साधारण २००४ साली कुर्ल्याचा प्लॅटफॉर्म क्र. ८ चा एका बाजूचा जिना बंद केला गेला होता. तेव्हा जिन्यावर मुद्दाम गर्दी करून हे असलेच प्रकार चालायचे.

३. आझाद मैदानाकडून सीएसटी स्टेशनाकडे येणारा रस्ता. तिथे हे विकृत लोक कानाला फोन लावून एकट्या जाणार्‍या मुलीच्या बरोबरीने चालतात आणि घाणेरड्या शद्बांत बोलत राहतात (रेट सांग म्हणणे ही त्यांची सगळ्यात वरची पातळी असेल तर पुढचं काय असेल हा विचार करा). न राहवून काही बोलले तर "मी फोनवर बोलत होतो आणि बहुतेक तुलाच इच्छा दिसतेय, तु फुकट आलीस तरी कुणी नेणार नाही.... आणि यापलिकडचे बोलले जाते" आणि हे सगळं संध्याकाळी सात वाजताही घडतं.

४. प्रवासात दोन ट्रेन समोरासमोर आल्यावर एकाने झेप घेऊन समोरच्या ट्रेनमधल्या मुलीला इतक्या अमानुषपणे ग्रोप केले की तिच्या डोळ्यांत टचकन पाणी आले. पुढचा प्रवास त्या मुलीने सुन्नपणे केला. तिला कसे समजवावे हे न समजून आम्हीदेखील गप्पच होतो.

५. चुकून जनरल डब्यात चढल्यावर उतरताना माझ्या मैत्रिणीला एकदा पाठीमागून खेचले गेले, ट्रेन चालू झाली होती पण नशीबाने ती वाचली. ओढण्याचा जोर इतका होता की तिच्या कुर्त्याची मागची बाजून त्या लोकांकडेच राहिली. नुकतीच केलेली खरेदी सोबत असल्याने किमान पुढचा अप्रिय प्रसंग टळला.

६. ठाणे-पनवेल लोकलसेवा नवीन असताना रात्री ११ वाजता ठाण्याहून शेवटची लोकल गेल्याचं कळलं, म्हणून आम्ही (दोन बहिणी-त्यांचे नवरे-माझी आई) नवी मुंबई बसस्थानकाकडे चाललो होतो. मी चारेक पावलं पुढे चालत असेन. समोरून येणार्‍याला आम्ही सगळे एकत्र असावेत असं वाटलं नसावं. आधी दुरून चालणार्‍या त्या माणसानं अचानक जवळ येत हातातल्या सिगारेटचा मांडीला चटका देण्याचा प्रयत्न केला. मी चपळाईने दूर झाले, प्रतिक्षिप्त क्रियेमुळे जोरात किंचाळले, घरचे-आजूबाजूचे धावून आले आणि तो मनुष्य पळून गेला..

७. ग्रुपमधल्या मुलींना अपशब्द वापरल्याचा प्रतिकार केल्याबद्दल दोन मुलांना अंधेरीमध्ये ठेचून मारले गेले याला एक वर्षही पूर्ण झालेले नाही.

नेहमीच सगळीकडे आपली आपण काळजी घ्यावी असं म्हटलं जातं आणि येऊन जाऊन सगळे मुलींच्या कपड्यांवर घसरतात. गुवाहाटीतली मुलगी काय आणि अगदी सांगली पासून मुंबईच्या मुलींपर्यंत जीन्स-टॉप किंवा पंजाबी ड्रेस हा बहुतकरून असलेला पोषाख असतो आणि मी वरती लिहिलेल्या ठिकाणी अशाच कपड्यांतल्या मुली असाव्यात, हे मुंबईत वावरलेल्यांना वेगळे सांगायला नको. तरी देखील दोन वर्षे वयाच्या चिमुरडीपासून ते पंच्याहात्तर वर्षे वयाच्या वृद्धेपर्यंत कुणावरही बलात्कार होतोच ना? हे वरती लिहिलेले सगळे प्रसंग मी स्वतः किंवा माझ्या अगदी जिवलग असलेल्या स्त्रियांनी अनुभवलेले आहेत. गप्प न बसण्याला 'एवढीच मिजास असेल तर स्वतःच्या बापाचा रस्ता वापरा" हे सांगणं म्हणजे काहीच वाटू नये इतकं घाणेरड्या शब्दांत बोललं जातं. चालत असताना कधी कुणाचा हात कसा येईल हे माहित नसतं, त्यामुळे गर्दीतून चालेली मुलगी पहा, तिचे हात नेहमी अ‍ॅलर्ट आणि क्रॉसमध्ये असलेले दिसतील. आम्ही बिचार्‍या नाही, पावलोपावली स्कॅन करणार्‍या नजरा आणि संधीसाधू धक्के मारणारे लोक असतील तरी मुली घरात बसत नाहीत. पण मग वर उल्लेखलेल्यासारखी घटना पाहिली-ऐकली की त्रास होतो, खरंच खूप जास्त त्रास होतो.

तो येशू एका गोष्टीत म्हणतो, "ज्याने आजवर एकही पाप केले नाहीय त्या माणसाने पहिला दगड मारावा". मला त्याच धर्तीवर म्हणावंसं वाटतंय की "अशी एक मुलगी आणून दाखवा की जिला आजवर असल्या प्रकारचा एकदाही त्रास झाला नाहीय." घरातल्या मुलींकडे एकदा सहज चौकशी करा, कळेत काय उत्तर आहे ते.

एमी's picture

15 Jul 2012 - 7:49 pm | एमी

: - (

रेवती's picture

15 Jul 2012 - 8:32 pm | रेवती

भयानक.
येऊन जाऊन सगळे मुलींच्या कपड्यांवर घसरतात
मी नवव्या यत्तेत असताना शाळेचा युनिफॉर्म अंगावर असताना दोन मैत्रिणींच्याबरोबर बसस्टॉपकडे निघाले असताना (कसल्यातरी सरावामुळे शाळेनंतर अर्ध्यातासाने, म्हणून गर्दी ओसरली होती पण दुपारीच) एका मनुष्याने अश्लील वर्तन करण्यास सुरुवात केली. आम्ही बधत नाही म्हटल्यावर त्याने त्याच्या अंगावरचे सगळे कपडे उतरवले. घाबरून, जीव मुठीत धरून बेभान पळत सुटलो आम्ही. बसमधला प्रवास तर वेदनादायीच असतो. किती अनुभव सांगावेत आणि किती नाही. अंगावर पूर्ण कपडा असला तरी नजरेनी होणारी चिरफाड थांबवणे केवळ अशक्य. अर्धवट वयातील मुले करणार नाहीत अशी कृत्ये सत्तरीतले आजोबा करताना अनुभवले आहे. स्त्रियांनी रात्री सुरक्षितपणे फिरावे ही स्थिती येण्यापासून आपण बरेच दूर आहोत.

शिल्पा ब's picture

15 Jul 2012 - 10:06 pm | शिल्पा ब

:(

दुर्दैव हे की जर प्रतिकार केलाच तर मुलीलाच आपला समाज दोष देउन मोकळा...त्यातही बायका आल्याच. पुन्हा त्यांनाच अशा प्रकारांना सामोरं जावं लागलं की लागले टाहो फोडायला.

+१ मस्तकलंदर.

घाणेरडी भाषा हा तर अगदी हाताला नाही लागली तरी शब्दानी भोगण्याचा प्रकार झाला.
मुंबईची लोकल तर असल्या बेवारशी कुत्र्यांचा एक उकीरडाच! एक एक स्व्तःवरचाच प्रसंग सांगितला तर पान पुरायची नाहित संतापान लिहिताना.
पण मला वाईट वाटत ते या गोष्टीच की अश्यावेळी बाकिच्या स्त्रीया किंवा ज्या मध्यमवयीन बायका असतात त्या का नाही पुढं होउन विरोध करत? एकिच्या माग जर अश्यावेळी प्रत्यक्ष पहाणार्‍या दोन जरी स्त्रीया उभारल्या तरी खुप मदत होइल.

पांथस्थ's picture

17 Jul 2012 - 1:49 am | पांथस्थ

दोन आठवड्यापुर्वीचा प्रसंग -

कनकपुरा रोड, बेंगळुर
वेळ: १९:३० - २०:००

खचाखच भरलेली BMTC. बसमधे एका बारला धरुन मी आणी एक ५०-६० चा गॄहस्थ उभे होतो. बाजुच्या सीट्वर एक महिला मुलाला बाजुला घेउन बसली होती. पुढच्या बसथांब्यावर एक तरुणी पुढच्या दाराने बसमधे चढली. आमच्या बाजुच्या सीट्वरील महिलेने मुलाला उचलुन मांडीवर घेतले आणी त्या तरुणीला बसायला जागा करुन दिली. तिला बसायला जागा देण्यासाठी मी बाजुला झालो, त्या गृहस्थाने पण जागा दिल्या सारखे केले. ती तरुणी बसणार तेव्हढ्यात त्याने त्याचा उजवा हात त्या तरुणीच्या पृष्ठ्भागावर जोरात दाबला. ती तरुणी शॉक झाली आणी काहि न बोलता खाली बसली.

मला बघुनहि मदत करता नाहि आली. कारण जर पीडीत महिला काहि बोलली नाहि तर मदत करणे अवघड होते. त्यान कन्नड - बिगर-कन्नड मामला. असो.

एकिच्या माग जर अश्यावेळी प्रत्यक्ष पहाणार्‍या दोन जरी स्त्रीया उभारल्या तरी खुप मदत होइल.

सहमत.

अश्या विषयांचे धागे आले की वाईट वाटते.
सातच्या आत घरात हा सिनेमा पाहिल्यावर बर्‍यांचजणांना/जणींना उत्तर मिळेल.
वयात आलेल्या तरूण, तरूणींनी ठराविक वेळेपेक्षा घराबाहेर राहू नये.
हे भारतातच असे नाही तर कुठेही.
रात्रीच्या नोकर्‍या करणार्‍यांच्या येण्याजाण्याच्या सोयी कशा आणि कितपत सुरक्षित असतात याबद्दल कल्पना नाही.

बाकी लहान मुलांशी विकृत चाळे करणार्‍यांबाबत एवढ्यात बरेच बोलून झाले आहे.

प्रभाकर पेठकर's picture

15 Jul 2012 - 8:48 pm | प्रभाकर पेठकर

रेवती,

सातच्या आत घरात हा सिनेमा पाहिल्यावर बर्‍यांचजणांना/जणींना उत्तर मिळेल.

'सातच्या आंत घरात' चित्रपटा नंतर पेपरात एक बातमी आली होती. सात वाजेपर्यंत आपली मुले बाहेर काय करतात? हा ही ज्वलंत प्रश्न आहे. कात्रज घाटात कुठेतरी एक टपरी आहे. अनेक कॉलेज कुमार-कन्यका तिथे सकाळ पासून संध्याकाळी ५-६ पर्यंत असतात. तिथे काही पैसे घेऊन काही बंदिस्त जागा उपलब्ध करुन दिल्या जातात. संध्याकाळ पर्यंत अनेक जोड्या त्या बंदिस्त जागेचा पुरेपुर उपयोग करून संध्याकाळी तृप्त मनाने आणि देहाने ७च्या आंत घरी पोहोचतात. आई खुश. 'आमची मुलगी/मुलगा नाही हो 'तसली'/'तसला'. आमचे घरचे संस्कार आहेत. ७च्या आंत घरांत. बिचारा/बिचारी सकाळ पासून कॉलेजात होता/होती चल, हातपाय धू, देवाला नमस्कार कर, मी पोहे करून आणते हं!'

रात्रीच्या नोकर्‍या करणार्‍यांच्या येण्याजाण्याच्या सोयी कशा आणि कितपत सुरक्षित असतात याबद्दल कल्पना नाही.

मध्यंतरी कॉलसेंटरला नोकरी करणार्‍या मुलींवर त्यांच्या गाडीच्या चालकाने आणि त्याच्या मित्रानी मिळून बलात्कार केला. तेंव्हा रात्री बेरात्री स्त्री कर्मचार्‍याला एकटे पाठविले जायचे नाही. बस मध्यल्या शेवटच्या स्त्री सदस्याने सुखरूप घरी पोहोचल्याशिवाय एका तरी पुरुष कर्मचार्‍याने बस सोडायची नाही असे पत्रक काढले होते. माझा मुलगा कॉलसेंटरला नोकरी करत होता. रात्री दोन वाजता तो घरी आला तेंव्हा बस मध्ये ड्रायव्हर व्यतिरिक्त तो आणि एक मुलगी होती. ह्याच्या लक्षात न राहून स्वतःचं घर आल्यावर हा उतरून गेला. ती मुलगीही काही बोलली नाही. बस निघून गेली. घरी आल्यावर ह्याच्या लक्षात आली चूक. मग घाबरला. मला उठवलं, म्हणाला असं असं झालं काय करू? म्हंटलं, 'त्या मुलीला फोन कर आणि ती सुरक्षित आहे की नाही ह्याचा अंदाज घे. तर ह्याच्या कडे तिचा फोन नंबर नव्हता. पण बस ड्रायव्हरचा होता त्याला फोन लावला आणि त्या मुलीला द्यायला सांगितला. ती नुकतीच तिच्या घरासमोर उतरत होती. सुरक्षित होती. तिला सांगितलं, 'घरात पोहोचलीस की ह्याच नंबरावर फोन कर.' त्या प्रमाणे तिने फोन केला.

सांगायचा उद्देश, काही काही कंपन्या काळजी घेत आहेत.

पुण्याचे वटवाघूळ's picture

15 Jul 2012 - 8:50 pm | पुण्याचे वटवाघूळ

एकूणच काय तर जे काही झाले त्यात त्या मुलीचीच चूक.रात्री अशी घटना घडल्यास ती रात्री घराबाहेर पडली म्हणून तिला दोष द्या.ती पबमध्ये गेली तर मुळात ती दारू प्यायलाच कशी गेली म्हणून तिला दोष द्या.जर दिवसाढवळ्या भर रस्त्यावर असे प्रकार घडले तर काही नाही तर तिच्या कपड्यांवर घसरा. इतर कोणतेही कारण मिळाले नाही तर कपड्यांवरून तिला दोष देणे किती सोपे आहे नाही?अशा स्वयंघोषित नैतिकतेच्या पुरस्कर्त्यांना नऊवारी साडी सोडून इतर सगळेच कपडे तोकडे वाटत असावेत.आणि सध्याच्या काळात तसे कपडे वापरणे कोणाही मुलीला शक्य/सोयीस्कर नाही तेव्हा सगळ्याच मुली ’तोकडे’ कपडे घालून वावरत असल्यामुळे मुलांचे लक्ष चाळवले जाणार कसे नाही?एकूण काय तर काहीही झाले तरी दोष मुलीचाच.आणि वर "पिडित जर स्वैराचार करत असेल तर पिडणाऱ्याला का दोष द्या" असे एका पध्दतीने अशा अश्लाघ्य प्रकारांना पाठिशी घालायचे.उत्तम.चालू द्या. खरं म्हणजे या समाजात ती मुलगी म्हणून जन्माला आली हीच तिची चूक. दुसरे काय?

जेनी...'s picture

15 Jul 2012 - 9:08 pm | जेनी...

:(

प्रभाकर पेठकर's picture

15 Jul 2012 - 9:30 pm | प्रभाकर पेठकर

श्री. पुण्याचे वटवाघूळ,

"पिडित जर स्वैराचार करत असेल तर पिडणाऱ्याला का दोष द्या"

दुर्दैवाने ह्या वाक्यातील उपरोध आपल्या ध्यानात आलेला नाही कींवा आपण सोयिस्करपणे त्याकडे दुर्लक्ष करीत आहात. असो.

समस्येची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. सहभागी सर्व सदस्यांना समस्या कळली आहे. नैतिक पोलीसांनाही व्यवस्थित झोडून झाले आहे. आता, थोडाफार उपाययोजनांवरही काही उहापोह झाला आणि त्यातून काही विधायक मार्ग निधाला तर स्त्रियांचा काही अंशी फायदा होईल.

सततच्या प्रत्यक्ष किंवा निनांवी तक्रारी पोलीसात करणे, वृत्तपत्रांमध्ये तपशिल (अनेक महिलांनी) कळवित राहणे, मंत्रालयावर महिलांनी मोर्चा नेणे, साहित्यिक महिलांनी ह्यावर रान उठविणे, दृक माध्यमांना कळवून पाठपुरावा करणे, स्त्री-मुक्ती संघटनांनी समस्येची गांभिर्य धूनी सतत प्रज्वलीत ठेवणे आदी उपाय मला दिसतात. एखादी घटना घडल्यावर काही स्त्री - मुक्ती संघटना थोडे दिवस दृक वाहिन्यांवर मिरवतात आणि आपण फार मोठे समाजकार्य केले असे स्वतःलाच फसवत राहतात. तसे न होता, स्त्री-मुक्ती संघटनांनी आपली नैतिक जबाबदारी समजून सतत नेटाने ह्या समस्येवर कार्य करीत राहावे. गृहमंत्रालयाला निवेदने पाठविणे, गृहमंत्र्यांच्या भेटी दरम्यान काळे झेंडे दाखविणे आदी अनेक मार्ग निघू शकतील.

काही खेडेगांवातून दारुच्या अड्ड्यांवर महिलांनी हल्ला बोल करुन असे अड्डे उद्ध्वस्त केल्याच्या बातम्या होत्या तसेच ह्या विरुद्धहि महिला शक्तीने एकत्र यावे असे मला वाटते. पुरुषांचे सहकार्य लाभेलंच.

शिल्पा ब's picture

15 Jul 2012 - 10:20 pm | शिल्पा ब

तुमच्या वाक्यातुन उपरोध अजिबात जाणवत नाही...त्यामुळे अशा विषयावर तरी दुर्लक्ष वगैरे करण्याचा प्रश्नच येत नाही.

तुम्ही जे मार्ग सांगितलेत त्याने फारफार तर मुक्तीवाल्यांचे फोटो झळकतील..

एक मुख्य मार्ग हा की आपल्याला जर मुलगा असेल तर त्याला मुलींचा आदर करायला शिकवणे. हा पुढच्या पिढीला सुसंकृत करण्याचा एक मार्ग.

सध्याच्या परीस्थितीत काळ / वेळ अन आपली - बरोबर असणार्‍यांची ताकद ओळखुन जोरदार प्रतिकार करणे.

एक उदा. : कुर्ल्याच्या वालावलकर शाळेसमोर ६-७ वर्षांपुर्वी एक माणुस शाळा सुटायच्या वेळी यायचा अन मुली बाहेर यायला लागल्या की स्वतःची पँट काढुन लिंगाशी खेळायचा. (अतिशयोक्ती नाही). एक दोन वेळा असं झाल्यावर मुलींच्या घरी समजलं. काही बायका मग वेळ साधुन आल्या अन त्या नालायकाला चपलांनी मारलं. शाळा प्रशासन म्हणे शाळेबाहेर हा प्रकार असल्याने ते काही करु शकत नाहीत. इतकं झाल्यावरही हा प्रकार सुरुच राहीला.

एक गोष्ट जाणवते की निम्न स्तरातल्या बायका बिनधास्त विरोध करतात...अगदी शारीरीक सुद्धा. हेच मध्यमवर्गीय प्रतिष्ठा जपायला पांघरुण घालतो. (त्यात प्रतिष्ठा कसली अन कोणाची देव जाणे.)

आमच्या ओळखीची एक स्त्री झोपडपट्टीत रहात असतानाची गोष्ट - दुपारच्या वेळी एक पुरुष घराबाहेर येउन अचकट विचकट बोलायचा. एक दोनदा हे झाल्यावर तिसर्‍यांदा त्या काकुंनी झाडुन त्यांची हाड चेचली अन मग बंद झालं.

लोकांना तमाशाच हवा असतो...मदत करणार कोणी नसलं तरी आपलीच सुरक्षा आपण करणं अशक्य नाही. गुवाहाटीएच्या मुलीचं याबाबतीत कौतुक की तिने विरोध केला, नंतर काय झालं हे सांगायला पुढे आली.

गवि's picture

16 Jul 2012 - 2:39 pm | गवि

प्रतिक्रिया जरी या प्रतिसादावर असली तरी ती धाग्यावरही आहेच.

एक मुख्य मार्ग हा की आपल्याला जर मुलगा असेल तर त्याला मुलींचा आदर करायला शिकवणे. हा पुढच्या पिढीला सुसंकृत करण्याचा एक मार्ग.

येस. हाच तो दीर्घ मुदतीचा आणि सर्वात योग्य मार्ग. या मार्गाने होणारा बदल नुसता स्त्रियांचा छळवाद थांबण्यापुरता मर्यादित नसेल तर त्यावर जाऊन स्त्री-पुरुष अशा एकत्रित मनुष्यप्राण्याला बरेच मोठे फायदे त्यामधून दिसतील.

या उपायाने फलित दिसायला वेळ लागणार आणि हा उपाय सर्वगामी नसणार. म्हणजेच अशा शिकवण्यानंतरही बरीच मुलं या पल्स पोलिओ मोहिमेतून बाजूला राहणार किंवा अन्य बर्‍याच जणांवर लस देऊनही मोठे झाल्यावर तिचा परिणाम दिसणार नाही.

यामुळे स्त्रियांचा आदर करणारी पुरुषसंख्या सिग्निफिकंटली वाढली तरी मधे एक बराच मोठा काळ असा जाणार की ज्यात काही टक्के प्रमाणात तरी असे ग्रोप करणारे, मोलेस्ट करणारे आणि अन्य चाळे करणारे पुरुष राहणार. ते गुन्हे करणार आणि त्यातल्या काहीजणांना शिक्षा होणार. बलात्कार होणं म्हणजे सर्वस्व हरवणं ही कन्सेप्ट मुलींच्यातही राहणार आणि त्यामुळे "आयुष्य उध्वस्त" झालं ही भावनाही राहणार.

अशा वेळी या मधल्या काळात खबरदारी म्हणून पेठकर काकांनी म्हटलेल्या गोष्टी एकदम "नॉन अ‍ॅप्लिकेबल" ठरवता येत नाहीत. इथे थोडा गोंधळ होतोय.

१) अन्यत्र उल्लेखलेले बसमधले ग्रोपर्स, रस्त्याने बाजूला चालताना फोन पकडून रेट काय विचारणारे अन लिंगाशी चाळा करणारे

आणि

२) रात्री उशीरा पबबाहेर एका समूहात येऊन एका मुलीला पकडून तिला मारहाण / वस्त्रहरण / स्पर्श करणारे

हे दोन्ही लोक एकच आहेत.. पहिल्या प्रकारातल्या एकेकट्याने जमेल तेवढा चान्स मारणार्‍या लोकांना केवळ सामूहिक संधी मिळाली की अगदी उत्स्फूर्तपणे दुसरा प्रकार केला जातो. चर्चगेट स्टेशनला रात्री लाईट जाऊन अंधार झाला म्हणून एका म्हातार्‍या बाईला ग्रोप अन मोलेस्ट केलं गेलं होतं. त्या ठिकाणी कोणीही ठरवून आलेले नव्हते.. जस्ट चान्स मिळाला म्हणून एकमेकांना साधं ओळखतही नसलेल्या जमावाने ते करुन घेतलं.

कोणत्याही लिंगाची व्यक्ती कोणत्याही जागी कितीही वाजता जाऊन काहीही प्यायली तरी तिला सुरक्षितता मिळालीच पाहिजे, यात काही प्रश्नच नाही.. ती मुलगी रात्री दारु प्यायली / पबमधे गेली म्हणून तिच्यावरचा बलात्कार समर्थनीय असं विधान कोणी करु धजावणार नाही आणि इथेही कोणी केलेलं नाही. कारण ते सरळसरळ दुरित आहे.

अशा वेळी आपण कायद्याकडून अपेक्षा करणं १०० टक्के रास्त आहे. याला कायद्याची तीव्र भीतीच रोखू शकेल.. पण ओव्हरऑल "समाजा"कडून इन्स्टंट किंवा लाँग टर्म बदलांची कसलीच अपेक्षा ठेवून आपण स्वतःला स्वतंत्र म्हणू शकत नाही. ते डोळे मिटून दूध पिणं होईल..जोपर्यंत कायदा आखूड पडतोय आणि जोपर्यंत बलात्कार = आयुष्य बरबाद ही आपल्या समस्त स्त्रीपुरुषांच्या मनात घट्ट आहे तोपर्यंत आपण स्वातंत्र्य / गुलामी या गोष्टी मनात न आणता स्वतःला जपून असणं यात गुन्हेगारीचं समर्थन कुठेच येत नाहीये.

इनफॅक्ट अगदी पूर्णवस्त्रांकित सभ्य मुलीलाही बस/ट्रेनमधे किळस येणारे प्रकार सहन करावे लागतात ही दु:खदायक गोष्ट आहे. आणि या भयंकर वास्तवाचा उदाहरण म्हणून वापर करुन अर्धवस्त्रांकित राहण्याचं समर्थन करणं हाही उद्देश इथे स्त्रीवर्गाचा नसावा.. त्या फक्त इतकंच म्हणू इच्छिताहेत की पूर्ण वस्त्रांतही त्रास होतो. . केवळ कमी कपडे हे कारण नाही..

मी सिगरेट ओढतो म्हणून हार्ट ट्रबल होईल अशी भीती घालताय ? ... अहो सुपारीच्या खांडाला न शिवणारी माझी मावशी पन्नाशीच्या आत हार्ट अ‍ॅटेकने गेली...अन तिकडे तो चेनस्मोकर चर्चिल मस्त दीर्घायुष्य जगला,

मावशी मेली आणि चर्चिल जगला म्हणून सिगरेट ओढणार्‍या माझी रिस्क शून्य होते का? चर्चिलला तेवढं ओढण्याचं स्वातंत्र्य, अन मला हार्टट्रबल?? ही सिस्टीम (वैद्यकीय शोधांनी) सुधारेपर्यंतही मी सिगरेट ओढत राहणार अन मलाच हार्टट्रबल होणं हा अन्याय आहे .. असं आपण म्हणतो का?

असो..

....एकूणच विधानांचे उफराटे अर्थ काढले गेले की वाईट वाटतं.

इथे पेठकरकाकांनी जे म्हटलं गेलंय ते दुर्दैवाने अशा भलत्याच अर्थाने घेतलं गेलंय याचा खेद होतो..

विश्वनाथ मेहेंदळे's picture

16 Jul 2012 - 8:08 pm | विश्वनाथ मेहेंदळे

इथे पेठकरकाकांनी जे म्हटलं गेलंय ते दुर्दैवाने अशा भलत्याच अर्थाने घेतलं गेलंय याचा खेद होतो..

कसे आहे ना गवि, एकदा झापडे बांधली की फक्त समोरचे दिसत राहते. आता दोष झापडांचा की घोड्याचा ते ज्याचे त्याने ठरवावे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 Jul 2012 - 4:37 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

गवि, सिग्रेटचा दृष्टांत इथे पूर्णपणे अस्थानी आहे. सिग्रेट तुम्ही ओढलीत, त्रास तुम्हाला होणार. इथे पॅसिव्ह स्मोकिंगचा दृष्टांत अधिक योग्य आहे. सिग्रेट शेजारचा ओढतो, (असल्यास) आनंद फक्त त्यालाच मिळतो, मला फक्त फुप्फुसातली घाण आणि कर्करोगाची वाढीव शक्यता.

कपडे, लैंगिकता विकृत स्वरूपात पॅसिव्ह स्मोकिंगसारखी समोर येते. काही पुरूषांना वासनेवर ताबा ठेवता येत नाही, काही पुरूष विकृत असतात आणि उरलेल्यांतले बरेचसे दुर्लक्ष करणारे किंवा स्त्रियांच्या कपड्यांच्या फॅशनींवर आपलाही (का आपलाच?) हक्क आहे असं समजणारे आहेत म्हणून समाजाच्या अर्ध्या भागाला पारतंत्र्य भोगावं लागत आहे. कमी कपडे घालू नयेत म्हणजे नक्की किती कपडे घालावेत? बुरखे पुरतील का तंबू घालून फिरावं? यातला उपहास सोडून द्या, तो वैतागामुळे आलेला आहे. मकीच्या प्रतिसादांमधे पीडीत मुलींनी किती कपडे घातले आहेत याचा पुरेसा उल्लेख आहे. बिशाद आहे या प्रसंगांना सामोर गेलेल्या मुली जख्ख म्हातार्‍या झाल्या तरी पावसापाण्यातही बाहेर पडताना अर्ध्या तुमानी घालून घराबाहेर पडतील!

आपल्या देशासारख्या उष्ण कटिबंधाच्या देशात मुळात एवढे कपडे घालण्याची स्त्रियांवर सक्ती होते ते मुख्यत्त्वे काही पुरूषांच्या विकृतीमुळे! पॅसिव्ह स्मोकर्सना अनेकदा इतरत्र जाण्याची किंवा धूम्रपान करणार्‍याला "बाजूला जा" असं सांगण्याची सोय असते. स्त्रियांना तीही सवलत नसते. "मी पूर्ण कपडे घातले आहेत, मला छळू नका" असं कोणी म्हणताना दिसत नाही. कमी कपडे हे कारणच नाहीये. असेल तरीही ते कधीही समर्थनीय नाही.
अनेक ठिकाणी, विशेषतः सार्वजनिक ठिकाणी, धूम्रपानावर बंदी असते. धूम्रपान न करणार्‍या लोकांना कायद्याचं जेवढं संरक्षण आहे तेवढं मुली, स्त्रियांना नाही. का त्यांच्या या अडचणींची व्यवस्थेला दखलच घ्यायची नाही? बहुदा नसावी, स्त्रियांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहही नसणारा आपला देश आहे.

तुम्ही प्रतिसादात उल्लेखल्याप्रमाणे, अब्रू म्हणजे सर्वस्व असा एक पुरूषप्रधान विचार भारतीय मानसिकतेत घट्ट रूजला आहे. तसा विचार एखादीच्या डोक्यात नसेल तरीही हात लावणे, मॉलस्ट करणे यात अगदी अब्रू गेली नाही तरी आपण शारिरीकदृष्ट्या निर्बल आहोत, आणि आपल्या आजूबाजूचे पुरूषही तेवढेच निर्बल आहेत इतपत आत्मसन्माला धक्का पोहोचतो. अपर्णाच्या प्रतिसादात तिची ही अशी अगतिकता पुरेपूर दिसते आहे.

अवांतरः 'चांगल्या घरातल्या' शाकाहारी मुली-स्त्रियांच्या शरीरात ड-जीवनसत्त्वाची कमतरता असते का याचा तपास कोणी केला आहे का?

थत्तेचिच्यांनी ऐसीअक्षरे वर ही लिंक दिलीय..

तसंच अखिल गोगॉय या अक्टीव्हीस्ट ने लोकल टीव्ही चॅनलनेच हा अश्लाघ्य प्रकार घडवुन आणलाय हे सांगितलंय. http://www.youtube.com/watch?v=m2X__IS2Mps&feature=relmfu

नेहमीप्रमाणेच शुटींग घेण्यापेक्षा पोलिसांना बोलावणे किंवा स्वतः मध्यस्थी करुन व्हीक्टीमला सुरक्षीत करणे हे महत्वाचं वाटलं नाही.

मुंबई जुहुच्या चौपाटीवर असा प्रकार झाला त्याचं पुढे काय झालं हे माहीती नाही. :(

http://www.youtube.com/watch?NR=1&v=3lJzWltR69w&feature=endscreen
याव्यक्तिने मध्यस्थी करुन मुलीची विटंबना थांबवली.

बेवारशी कुत्री कशी एखाद्यावर हल्ला करतात तसा प्रकार वाटला.
एक सांगु , कुणालाही भाउ वा बाप वा पती म्हणायची लाज वाटावी असली माणस ही. अश्या लाथा घातल्या पाहिजेत की बस.
अतिशय चिड येतेय. स्वतःवरचे प्रसंग आठवताहेत,. सांगुन सुद्धा उपयोग नाही.
काय तोंड दाखवताहेत वर आणि, केव्हढस पोर ते. काय ताकद त्या बिचारीची. अरेरे, माझी स्व्॑तःची मुलगी एव्हढीच दिस्ते. पाणी आल डोळ्यात. अन संताप तर ...विचारु नका. भोसडीच्यांना रस्त्यावरआणुन मारायला पाहिजे. नुसती नावाला पँट घालणारे करुन ठेवायला हवेत. हलकट कुत्री.

क्लिंटन's picture

16 Jul 2012 - 7:13 am | क्लिंटन

पाणी आल डोळ्यात. अन संताप तर ...विचारु नका. भोसडीच्यांना रस्त्यावरआणुन मारायला पाहिजे. नुसती नावाला पँट घालणारे करुन ठेवायला हवेत. हलकट कुत्री.

अपर्णाताई, आपला संताप अगदी समजू शकतो. किंबहुना मलाही तो व्हिडिओ बघितल्यावर असाच संताप आला होता/आहे. पण या प्रतिसादातील एक शब्द मात्र खटकला.आणि तो शब्द त्या नालायकांविरूध्दचा अपशब्द आहे तसाच एका स्त्रीविरूध्दचाही अपशब्द आहे.हा शब्द वापरायलाच हवा होता का?

बाकी प्रतिसादाबद्दल सहमत आहे.

स्पंदना's picture

16 Jul 2012 - 4:12 pm | स्पंदना

ठिक आहे. कारण सांगते मी क्लिंटन तुम्हाला त्या शिवी देण्यामागच. पण पहिला हे ही सांगते, मला त्या शिवीचा अर्थ माहित नाही आहे. एकदा एका बाईने अशी खडसावुन ही शिवी दिली अन एका माणसाला माग सरताना पाहिले अन मी ही शिवी शिकले. घरुन एव्हढ एक्स्पोजर कधी मिळालच नाही. खरतर द्यायला हव होत. हे करु नये ते करु नये पण काय करायच शिकवायलाच विसरले बिचारे. ते जाउ दे.
लग्नाला साधारण दोन वर्ष झाली होती. माझ्या नवर्‍याच्या एका मित्राच्या घरी बांद्र्याला जाण्यासाठी आम्ही दोघे भाईंदर मधुन ट्रेन पकडुन निघालो होतो. अंगात साधा सलवार कमिज. विकडे मधला दिवस अन दुपार. त्यामुळे मी नवर्‍याबरोबर पुरुषांच्या कंपार्टमेंट मध्ये बसले होते. गाडी विरारहुन आलेली. मला हा प्रसंग आठवायला आजिबात नाही आवडत, पण वर मस्तकलंदर अन शिल्पाब अयांच्या धडधडीत सांगण्याचा धागा पकडुन मी हे लिहिते आहे. एक मध्यमवयाची चार माणस आम्ही दोघे हसत खेळत होतो ते पहात होती. बांद्रा आला अन आम्ही उतरण्यासाठी उठलो. नवर्‍याच्या मागोमाग मी दाराकडे. उगा कुणी धक्के मारायला नको म्हणुन सगळ्यांना जाउ देत नवरा उतरला. मागोमाग मी. पण मी त्या दारात्च मागुन पकडले गेले. एक हात तोंडावर, अन बाकिचे सारे हात ..
गाडी हलली. नवरा पुढे चालतोय पण माग वळुअन काही तो पहात नव्हता. अक्षरशः प्लॅटफॉर्म संपाय्ला आला अन मला त्या चालत्या गाडीतुन बाहेर फेकल गेल. प्लॅटफॉर्मवरचे पहाणारे, ट्रेनच्या आतुन पहाणारे कुणीही मदतीला नाही आल. नवरा अजुअन्ही चालतच होता. मी प्लॅटफॉर्मवर थरथरत उभी अन ज्यांनी हा प्रकार पाहिला होता ते ही नुसतेच उभे. जिन्याजवळ जाउन नवरा मागे वळला. मला त्याच थोबाड फोदावस वाटत होत. अक्षरशः जनावर भेटली होती मला. ओरबाडुन निघाल होत अंग सार. पण ते वळ दाखवुन ही नवरा मानायला तयार नव्हता. मी तिथेच होतो, अस कस होइल अस त्याच म्हणन.
त्या प्रसंगानंतर जवळ जवळ दोन महिने मी बाहेर तर नाहीच गेले, पण एक स्पर्श सोडुन बाकि काहीही सांग अशी अवस्था झाली होती. अजुनही कधी कधी जनावर दाबुन धरल्या सारखी ती अवस्था आठवली की रात्र रात्र झोप नाही लागत. हे लिहिताना मी आजही तेव्हढीच थरथरतेय. तुम्हाला काय वाटत? असले प्रकार फक्त शरीरापुरते रहातात? मनापर्यंत पोहोचत नाहीत? नवर्‍याचा सुद्धा स्पर्श किळसवाणा वाटायला लागतो अस काही घडल की. अअन असल्यांबद्दल चर्चा करताना मी श्बद जपुअन वापरायचे ? का?
ती एव्हढीशी पोर हा प्रकार जन्मभर नाही विसरु शकणार.
मी काय करते? दुसर्‍या कुनाला हात लावताना पाहिल की उठुन सरळ विरोध करते. अर्थात मी एकटीच असते. पण करते.

क्लिंटन's picture

16 Jul 2012 - 4:22 pm | क्लिंटन

भयानक. अंगावर शहारा आला हे वाचून. अशी लोकं शिव्या द्यायच्याच लायकीची नव्हे मरेपर्यंत लाथाबुक्क्यांनी बडवायच्या यात अजिबात शंका नाही. पण तुम्ही जी शिवी दिली आहे ती आईवरून आहे. कितीही घाणेरडी माणसे असली तरी त्यांच्या आयांना अपशब्दाचा धनी बनवू नये (विशेषतः त्या आयांविषयी आपल्याला माहित नसेल तर) असे वाटले म्हणून तसा प्रतिसाद लिहिला.

स्मिता.'s picture

16 Jul 2012 - 5:53 pm | स्मिता.

अपर्णाताई, अत्यंत भयानक असा अनुभव आहे. तुम्ही कश्याबद्दल लिहिणार आहात हे माहिती असूनही वाचून हात थरथरायला लागलेत तर त्यावेळी आणि नंतरही तुमची काय स्थिती झाली असेल हे समजू शकते.

असे हिडिस अनुभव टाळण्याकरता कायम स्त्रिलाच बंधनं घातली जातात. अश्या अनुभवानंतर कोणीही सहज म्हणेल की महिलांच्या राखीव डब्यात का बसली नाहीस? खरं तर अश्याच कारणांनी सगळ्या स्त्रिया महिलांच्याच डब्यातून प्रवास करतात. समाजाच्या ५०% (फारफार तर ४०%) भागाकरता संपूर्ण गाडीतला एक डबा आरक्षित? म्हणजे ज्या स्त्रियांनी त्यात जागा मिळवली त्या सुटल्या आणि बाकीच्यांवर ही जनावरं तुटून पडली तर चूक त्या स्त्रियांची कारण त्यांना त्या राखीव डब्यात जागा पटकावता आली नाही.

तसेच जी सार्वजनीक ठिकाणं महिलांकरता राखीव नाहीत ती त्यांच्याकरता कायमच धोकादायक का ठरावीत? याचाच अर्थ भारतात स्त्रियांना स्वातंत्र्य आहे ते फक्त संविधानात! वास्तविक समाजात स्त्रिला कायमच जपून, घाबरून, प्रसंगी त्याग करून जगावं लागतंय.

डोळ्यात पाणी आले. व्यनि केला आहे.

मृत्युन्जय's picture

17 Jul 2012 - 1:30 pm | मृत्युन्जय

काय प्रतिक्रिया द्यावी हेच कळत नाही आहे. हे सगळे भर दिवस मुंबैइत होउ शकते तर रात्री गुवाहटीत न होण्याची अपेक्षा कशी करावी?

चिगो's picture

19 Jul 2012 - 6:07 pm | चिगो

अत्यंत हिडीस, भयानक प्रकार.. असल्या आयघाल्यांना, हरामखोरांना त्यांचे लिंग कापून तिखट सारलं पाहीजे..

आता मुळ धाग्याबद्दलः
(अत्यंत उशीरा प्रतिसाद देऊन, साप गेल्यावर भुई धोपटतोय ह्यासाठी सॉरी.. पण नेट पुरतंच गंडलं होतं आठवडाभर, त्यामुळे वाचनमात्रच रहावं लागलं.. :-()

गुवाहाटीच्या घटनेवर अतिशय तीव्र प्रतिसाद उमटलेत.. मिपावर आणि इतरत्रही. मी इशान्य भारतात काही काळ असल्याने, मला ही गोष्ट का जास्त खटकलीय ते सांगतो.

इशान्य भारतात समाजातील स्त्रीचे स्थान (आतापर्यंत तरी) हे बर्‍यापैकी चांगले आहे. स्त्रीने स्वतंत्रपणे, तिच्या मर्जीने जगणे ह्यात काहीही वावगे मानले जात नाही. राज्या-राज्यांमध्ये परीस्थितीत तफावत असली तरी दिल्ली-मुंबई मध्ये ज्याप्रकारच्या हिडीसपणाला स्त्रीयांना तोंड द्यावं लागतं, तसे इथे नाही. आणि म्हणूनच, हा प्रकार म्हणजे इथली सामाजिक परीस्थितीही आता गटारगंगा होणार का, ही भिती वाटली..

मी मेघालयात जिथे राहतो, तो भाग प्रॉपर जंगल आहे.. म्हणजे टेकड्यांवर, जंगलामध्ये गावं वसलेली आहेत. जेमतेम १००-२०० जनसंख्या असलेल्या गावांमधेही मुली बिनधास्त संध्याकाळी, रात्री "हॉटपॅन्ट्स" घालून हिंडतांना पाहिल्या आहेत. रात्रीच्या वेळी सुनसान रस्त्यांवर, जंगलांतून अचानक पोरं-पोरी बिनधास्त हिंडतांना दिसतात.. त्यांना कसलीही भिती वाटत नाही, वाटावी अशी परीस्थिती नाही.

आसाममध्ये बिहू, सरस्वतीपुजा ह्या सणांच्या वेळी मुली,स्त्रीया नटून थटून फिरतात आणि एन्जॉय करतात.. बिहूच्या नाचात तर मुली आणि मोठ्या स्त्रिया देखील अत्यंत उत्स्फुर्तपणे नाचतात. आणि हे म्हणजे बाया-बायांचं हळदी-कुंकू, फुगड्या टायपातलं नाचणं नाही, तर त्यात पुरुषही सहभागी असतात.. ("डिआयडी लिटील चॅम्प्स" पहात असाल, तर मम्मीलोकांपैकी सगळ्यात बिनधास्त नाचणारी मम्मी, ओमची आई ही आसामातील दिफूची..) आतापर्यंततरी गर्दीचा फायदा घेऊन अंगचटीस जाणे, विकृत चाळे करणे हा प्रकार आसामात ऐकण्यात/ पाहण्यात नव्हता..

मागे गुवाहाटीच्या एका मॉलमध्ये शॉर्ट स्कर्ट घातलेल्या पोरींकडे डोळे फाडून फाडून बघणारा ३-४ मुलांचा घोळका बघून बायको (माहेर मुंबई) बोलली होती की, "झालं, सडणार आता हळूहळू इथेपण सगळं.." ती असं का बोलली ते वरील आणि इतर अनुभव वाचून कळले..

म्हणूनच गुवाहाटीच्या रस्त्यावर झालेला तो निंदनीय प्रकार हा कदाचित भारतातील स्त्रीला सन्मान देणार्‍या शेवटच्या काही संस्कृतींपैकी एकीच्या मरणाची सुरुवात आहे, असं मला वाटतंय.. बाकी वांझोट्या (?) चर्चामध्ये रस नसला तरी, उद्या माझ्या मुलाच्या तोंडून जर मुलींबद्दल वावगा शब्द गेला तर त्याचं मुस्काट फोडीन, एवढंच बोलतो..

इष्टुर फाकडा's picture

16 Jul 2012 - 1:45 pm | इष्टुर फाकडा

अगदी हेच आणि असंच म्हणायला आलो होतो. असल्या प्रवृत्तींना अशाच शिक्षांनी जरब बसते. भारतात लोकशाहीचा फारच उदो उदो झालाय. दोन टप्पू टाकून ज्या गोष्टी संपवायच्या तिथे वर्षानुवर्षे कोर्टात भिजत घोंगडी ठेवली जातात. जितकी मोठी बातमी घटनेची होते, तेवढीच जर शिक्षेची झाली तर झाल्याप्रकारावर अंशतः समाधान मिळू शकेल. नाहीतर हे होतच राहील.

शिल्पा ब म्हणतायत त्याप्रमाणे लहानपणापासुन च मुलांना शिकवायला हवं की मुलीँना नीट वागवा.
आणि मुलींनाही फार बंधनात ठेवण्याऐवजी शरिराने आणि मनाने अलर्ट व स्ट्रॉँग, टफ बनवायला हवं. व्यायाम, स्पोर्टस्, कराटे असलं काय तरी यायला पाहिजे.
आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना जो काही त्रास होतोय तो घरी येऊन सांगा. eg शाळा/कॉलेज पाशी येउन थांबणारे सायको, एक पाळणाघरातल्या काकू तर लहान मुलीला २ ३ तास शु ला पण जाउ देत नव्हत्या आता हेपण एक प्रकारच फिजीकल टॉर्चर च की...
आणि घरात असं वातावरण नको की मुलीँनी येऊन काही सांगीतलं तर त्यांच्याच कपड्यांवर/वागण्यावर/वेळांवर/घराबाहेर पडण्यावर बंधन येईल. हे म्हणजे victim bashing झालं. त्याऐवजी जो कोणी त्रास देणारा असेल त्याला शिक्षा व्हावी म्हणुन आपल्या घरातले खरंच प्रयत्न करतील असं वाटायला पाहीजे.
आणि गुवाहटी सारखा मॉब दिसला तर शक्य असेल तर intervene किँवा एटलिस्ट पोलीस ला फोन करा आणि नंतर कृपया victim bashing करु नका.

इनिगोय's picture

16 Jul 2012 - 1:49 pm | इनिगोय

अशा वर्तनाचा विरोध आणि बीमोड केल्याचं एक उदाहरण म्हणजे, २००४ साली नागपूर मध्ये झालेला अक्कू यादव या गुंडाचा वध. भर कोर्टात या नराधमाला शंभर-दीडशे बायकांनी हाती येईल त्या वस्तूने ठेचून मारलं. सहन करण्याची मर्यादा संपल्यावर, प्रतिकार करण्याला पर्याय नाही हे लक्षात आल्यावर उशीराने का होईना या घटनेत बायकांनी धाडस केलं.
स्त्री असल्याने अनुभवातून मला असं वाटतं, की अशा कोणत्याही - शाब्दिक, शारीरिक, मानसिक हिंसेला बाई बिचकते, आणि प्रतिकार करण्याचा विचारही मनात येईपर्यंत गुन्हेगाराचं काम झालेलं असतं. याचं कारण तिला कायम संरक्षित वातावरणात ठेवलं जातं. याउलट जगातल्या धोक्याची जाणीव वेळोवेळी करून देऊन, मानसिक आणि भावनिक कणखरपणा जर स्त्रीमध्ये रुजवला, तर प्रसंग येईल तेव्हा तो कृतीतून उतरण्याची काहीतरी शक्यता उरेल. कारण अक्कू यादवच्या उदाहरणात जमावाचा मिळाला तसा आधार कायमच मिळणं शक्य नाही. बर्‍याचदा प्रतिकार होतो आहे, हे समजल्यावर दडपशाही करणारा थोडा तरी मागे सरतो. हे घरात, घराबाहेर आणि खरंतर कुठेही वागताना लागू पडतं.
अर्थात (on your own) नडायचं केव्हा आणि पळायचं केव्हा हेही समजणं गरजेचं आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

16 Jul 2012 - 2:06 pm | परिकथेतील राजकुमार

जवळ जवळ १००% प्रतिक्रिया ह्या विषयाला सोडून आणि धागा भरकटवणार्‍या असलेल्या बघून आज एक मिपाकर म्हणून शरम वाटली.

असो...

वटवाघूळ साहेब पुढच्या लेखनात युरोप आणि ऑस्ट्रेलियाचे फटू पण येऊ द्या.

नाना चेंगट's picture

16 Jul 2012 - 2:20 pm | नाना चेंगट

सहमत आहे.

अमेरीकेचे फटू पहायला आवडतील.

परिकथेतील राजकुमार's picture

16 Jul 2012 - 5:31 pm | परिकथेतील राजकुमार

अमेरीकेचे फटू पहायला आवडतील.

युरोपात आणि ऑस्ट्रेलियात राहून अमेरिकेचे फोटो कशे बरे टाकणारे ते ? का त्यांचा असा छळ करतो आहेस तू ? 'साप पंचायतीचा' माणूस आहेस का तू ?

गेल्या काही दिवसात आपल्याच मिपावर हे असे काही प्रतिसाद आले आहेत ज्यामुळे कोणाही सुसंस्कृत मिपाकराची मान शरमेने खाली जाईल आणि संतापाचे अंगार दाटून येतील.आणि दुर्दैवाने आपण त्याविषयी काहीही करू शकत नाही म्हणून हळहळ व्यक्त करण्याशिवाय फारसे काही करू शकणार नाही.

नाना चेंगट's picture

16 Jul 2012 - 5:52 pm | नाना चेंगट

असे कसे ? भारताबाहेर राहून भारताच्या बातम्या, फटू टाकता येतात तर ऑस्ट्रेलिया युरोपातून अमेरीकेचे फटू का नाही टाकता येणार?

माझ्या कडे भारत, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि युरोप सगळीकडचे फोटु आहेत. ;) मी देऊ का?

अवांतरः काही अतिशय थर्ड क्लास प्रतिसाद पाहुन पुन्हा असे वांझोटे धागे उघडायचे नाहीत अशी शपथ घेतल्या गेली आहे. :)

स्पा's picture

17 Jul 2012 - 10:12 am | स्पा

जवळ जवळ १००% प्रतिक्रिया ह्या विषयाला सोडून आणि धागा भरकटवणार्‍या असलेल्या बघून आज एक मिपाकर म्हणून शरम वाटली.

वांझोट्या वांझोट्या चर्चा म्हणतात त्या याच का रे परा?

मस्त कलंदर's picture

16 Jul 2012 - 6:24 pm | मस्त कलंदर

मला एकदा कुणी ओळखीचे मुलींनी कसं नीट राहावं म्हणून उपदेश करत होते. त्यांना मी म्हटलं, "प्रॉब्लेम तुम्हा पुरूषांमुळे असताना नेहमी मुलींनीच नीट का राहायचं ?"
मुलींना त्या कितीही व्यवस्थित वागत असतील तरी डोस देणारे सगळेजण मुलाला एका शब्दाने कसे वागावे आणि कसे वागू नये यातलं काहीच सांगत नाहीत. त्यांचं घाणेरडं बोलणं बॉईज टॉक म्हणून कानाआड केलं जातं. मोठ्या मुलींचं तर जाऊ दे, लहानशा मुलींना पाहूनही बीएचएमबी (बडी होके माल बनेगी) म्हणतात. म्हणजे एवढ्याशा त्या जीवाकडे पाहूनही असलेच विचार असतील तर काय? मला हा शब्द माहित असेल असं न वाटलेल्या भावाच्या एका मित्राला हा शब्द बोलल्याबद्दल हाकलून दिलं होतं!!!
कधी शारिरिक तर कधी अर्वाच्य शब्द बोलून मानसिक मोलेस्टेशन!!!

आता लक्षात आलं असेल ना, पुरूषांकडे मुद्दे नसल्यावर त्यांनी कमरेखाली घसरून केलेले विकृत विनोद उच्चविभूषित स्त्रियांना का आवडत नाहीत ते??

Chief Minister, Assam: Prosecute the Molestors #JusticeForWomen - Sign the Petition!
Kavita just signed this petition on Change.org.
404 signatures are still needed!
Sign the Petition · via Change.org

https://www.change.org/en-IN/petitions/chief-minister-assam-prosecute-th...

स्वरालि's picture

16 Jul 2012 - 7:57 pm | स्वरालि

असा अनुभव घेतलाय..

कॉलेजच्या पहिल्याच दिवशी, बसमधुन उतरताना मागुन १ हात येवुन पुर्न छातीवर फिरला होता :(.... आणि काहि कळायच्या आत 'तो' माणुस गर्दित नाहिसा झाला.... ( मि साधा पन्जाबि ड्रेस घातलेला)... तेव्हापासुन बसमधुन जाताना दप्तर पाठिवर न लावता, उलटे पुढे पोटावर लावुनच जायचे... (जावे लागले)... 'तो किळ्सवाणा' स्पश्र आठवला तर आजहि काटा येतो...

तसच... सेकन्ड ईयरला असताना विक्रुत माणुस 'नागडा' रस्त्यात उभा राहायचा... कॉलेज मध्ये तक्रार केल्यावर कॉलेजनेच अ‍ॅक्शन घेतली...

असा अनुभव भारतात / जगात कुठेहि येवु शकतो... पण गेली ३ वष्रे यु.के. मध्ये राहतेय, गर्दितुन जाते/येते.... ऑफिस टाईमला ईथे ट्रेनमध्ये मुम्बई सारखिच गर्दि असते आणि वेगळा 'लेडीज' कम्पार्टमेन्ट नसुनहि... असा अनुभव आला नाहि .....

- स्वरालि

सुनील's picture

17 Jul 2012 - 3:42 am | सुनील

काही नाही. सेंच्युरी मारायला आलो ;)

पुण्याचे वटवाघूळ's picture

17 Jul 2012 - 7:36 am | पुण्याचे वटवाघूळ

चर्चेत भाग घेतल्याबद्दल सर्वांना धन्यवाद.यात मुद्दा त्या मुलीबरोबर झालेला अत्यंत वाईट आणि अश्लाघ्य प्रकार हा आहे.मुद्दा ती मुलगी अल्पवयीन असतानाही दारू कशी प्यायली, रात्रीच्या वेळी बाहेर कशी पडली, तिने १५-२० जणांशी वाद कसा घातला,तिने तोकडे कपडे घातले होते का हे मुद्दे मुळातच नाहीत.आणि यापैकी काहीही तिने केले असले तरीही तिच्याबरोबर झालेला प्रकार करायचा अधिकार त्या हरामखोरांना अजिबात मिळालेला नाही.

मी १६ वर्षांचा असताना केलेला एक प्रकार इथे जाहिरपणे confess करतो आणि त्याबद्दल मला तेव्हा आणि आजही भयंकर शरम वाटते हे पण सांगतो.मी त्या वयाचा असताना मुलींविषयी एक सुप्त आकर्षण होतेच.शाळेत असताना मुलींबरोबर बोलणे,त्यांच्यात मिसळणे या सगळ्या गोष्टी करायचा प्रश्नच नव्हता.आणि वायानुरूप असलेले मुलींविषयीचे आकर्षण एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्याशी बोलायचेही नाही अशी व्यवस्था.तेव्हा मुलीचा स्पर्श कसा असतो हे बघण्यासाठी एकदा गर्दीच्या ठिकाणी एका मुलीला मी मुद्दामून धक्का मारला होता.माझ्याहून दोनेक वर्षांनी लहान असेल ती.मी तिला धक्का मारल्यानंतर ती "आ" असे वेदनेने कळवळून ओरडली.अर्थातच तिला सामोरे जायची हिंमत माझ्यात नव्हती.मी गर्दीत मिसळून तिथून पळून गेलो.पण तेव्हापासून मी केलेल्या प्रकाराचे मला अतिशय वाईट वाटत आलेले आहे.त्या मुलीने मला सगळ्यांसमोर दहा कानाखाली का मारल्या नाहीत आणि मला तिथे उभे राहायची हिंमत का नव्हती असे प्रश्न मला पडले आणि हा प्रकार मी मुद्दामून कधीच करणार नाही हे मी ठरविले.आजही तो प्रकार आठवून मला अत्यंत गिल्टी वाटते.त्यानंतर अर्थातच मी तो प्रकार परत कधीच केला नाही.

अशा आकर्षणातून झालेले प्रकार आता कमी असतील असे वाटते कारण मी लहान असताना मुलामुलींवर जी बंधने होती ती आता तितक्या प्रमाणावर राहिलेली नाहीत. सौ.वटवाघूळ यांनी मला सांगितले आहे की मुलींना चुकून झालेला स्पर्श आणि मुद्दामून केलेला स्पर्श यातील फरक कळतो आणि ते कसब त्यांच्यात उपजतच असते. निदान समजत्या वयातील मुलींना असे आकर्षतातून झालेले स्पर्श नक्कीच कळत असतील.अशा मुलांना त्यांनी केलेली चूक त्यांच्या लक्षात आणून द्यायच्या उद्देशाने थोडा शारिरिक पण बराच शाब्दिक मार द्यावा असे मला वाटते.

प्रभाकर पेठकर's picture

17 Jul 2012 - 9:12 am | प्रभाकर पेठकर

पुण्याचे वटवाघूळ साहेब,

मुद्दा ती मुलगी अल्पवयीन असतानाही दारू कशी प्यायली....

गेली ३१ वर्षे मी भारता बाहेर आहे. त्यामुळे १५-१६ वर्षाच्या मुलीही बारमध्ये जातात हे वाचून खरंतर मला धक्काच बसला. सुट्टीवर भारतवार्‍या झाल्या तरी कमी दिवसांच्या वेळापत्रकामुळे हा सामाजिक बदल तेवढा कधी जाणवलाच नाही. त्या मानसिक अवस्थेतून माझे पहिले विधान होते. असो.

रात्रीच्या वेळी बाहेर कशी पडली, तिने १५-२० जणांशी वाद कसा घातला....

सुरक्षेच्या दृष्टी कोनातून, महिलांनीच काय पण एकट्या दुकट्या पुरुषांनीही १५-२० जणांच्या (बहुतेक प्यायलेल्या) तरूणांच्या घोळक्याशी पंगा घेउ नये, ह्या मताचा मी आहे.

गवतात चालतानाही आपण कुठे साप, विंचू तर नाही नं ह्याची सतत काळजी घेत असतो. रस्ता, रेल्वेचे रुळ ओलांडतानाही कुठुन वाहन/गाडी येत जात नाहीए नं ह्याची काळजी घेत असतो. रस्त्यावरून लहान वाहन (स्कुटर, मोटरसायकल इ.इ.) चालवतानाही ट्रक, बस, व्होल्व्हो अशा वाहनांपासून स्वतःला वाचवत वाहन चालवत असतो. विषाणू संक्रमण होऊ नये म्हणून प्यायच्या पाण्यापासून रस्त्यावरील उघडेवाघडे पदार्थ खाण्याचे टाळण्यापर्यंतची काळजी आपण घेतच असतो. तसेच, 'समाजातील गुंडप्रवृत्ती पासूनही आपले संरक्षण आपण केले पाहिजे' हा मुद्दा वरील विधानात आहे.

तिने तोकडे कपडे घातले होते का हे मुद्दे मुळातच नाहीत.

हा मुद्दा तुमच्याच अशा बुरसटलेल्या लोकांना नऊवारी साडीसोडून इतर सर्व काही तोकडेच वाटेल. ह्या धाडसी आणि अतिशयोक्त विधानामुळे आला. अलिकडेच रेव्ह पार्ट्यांचे पेव फुटले आहे. त्यावर कायद्यानेही बंदी आहे. एसिपी विश्वास नांगरे पाटीलांनी प्रथमच (माझ्या ऐकण्यात) पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण उघडकीस आणून प्रसार माध्यमांद्वारे आमच्या पर्यंत पोहोचवलं. तरुणाईचं खालावत चाललेलं कॅरेक्टर समोर येऊन आणि आपण काही करू शकत नाही ह्या विचारांनी खुप खंत वाटली.

यापैकी काहीही तिने केले असले तरीही तिच्याबरोबर झालेला प्रकार करायचा अधिकार त्या हरामखोरांना अजिबात मिळालेला नाही.

१०१ टक्के सहमत. त्यावर माझे विचार मी, माझ्या प्रतिसादातल्या खालील परिच्छेदात, मांडले आहेत.

कुठल्याच गुन्ह्याला नैतिक अधिष्ठान नसतं. कुठलाच गुन्हा समर्थनिय नाही. पण त्याच बरोबर बाहेरच्या जगात वावरताना सुरक्षेची काही बंधने सर्व स्त्री-पुरुषांना पाळाविच लागतात. आणि जर ती पाळली नाहीत तर अशा एखाद्या घटनेचे आपण बळी ठरू शकतो, हे कायम लक्षात ठेवले पाहिजे. हे मी 'बुरसटलेल्या विचारांचा नैतिक पोलीस' ह्या आरोपाची शक्यता स्विकारून सांगू इच्छितो.

गुंडांच्या वागण्याचे कुठेही मी समर्थन केलेले नाही उलट माझी भूमिका अत्यंत स्वच्छ शब्दात मांडली आहे, सुरक्षेसाठी फक्त महिलांनीच नाही तर स्त्री-पुरुष दोघांनीही काळजी घेतली पाहिजे हा विचार अधोरेखित केला आहे.तरीही, गुंडांच्या कृतीचे मी समर्थन करतो आहे अशा आशयाची विधानं मिपावरील काही महिला सदस्यांनी केली आहेत. एवढेच नाही तर त्या गुंडांच्या पंक्तिला मला नेऊन बसविले आहे. हेही 'नैतिक पोलीसिंग' झालं असं मला वाटतं. मनोगत आणि मिपावर गेली कांही वर्षे मी वावरतो आहे. पण आजच्या इतकी उद्विग्नता पूर्वी कधी अनुभवली नाही. असो.

काही जणांनी माझे मुद्दे समजाऊन घेतले, मला नैतिक पाठींबा दर्शविला, माझ्यावतीने इतरांशी वाद घातला त्या सर्वांचा मी ऋणी आहे.

धन्यवाद.

अवांतरः ह्या सर्व चर्चे दरम्यान मी ती यू ट्यूबवरील किळसवाणी चित्रफित मुद्दामच पाहिली नाही. कारण ती पाहिल्याने त्यात आपली भावनिक गुंतवणूक होते, त्रयस्थाच्या दृष्टीकोनातून विचारच करता येत नाही (निदान मला तरी) असे वाटते. असो.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

17 Jul 2012 - 1:03 pm | विश्वनाथ मेहेंदळे

गुंडांच्या वागण्याचे कुठेही मी समर्थन केलेले नाही उलट माझी भूमिका अत्यंत स्वच्छ शब्दात मांडली आहे, सुरक्षेसाठी फक्त महिलांनीच नाही तर स्त्री-पुरुष दोघांनीही काळजी घेतली पाहिजे हा विचार अधोरेखित केला आहे.

ज्यांना कळून घ्यायचा होता त्यांनी कळून घेतला. ते म्हणतात ना, "झोपलेल्याला उठवता येते, झोपेचे सोंग घेतलेल्याला नाही" :-)

तरीही, गुंडांच्या कृतीचे मी समर्थन करतो आहे अशा आशयाची विधानं मिपावरील काही महिला सदस्यांनी केली आहेत. एवढेच नाही तर त्या गुंडांच्या पंक्तिला मला नेऊन बसविले आहे. हेही 'नैतिक पोलीसिंग' झालं असं मला वाटतं.

कुणाकडे किती लक्ष द्यायचे हे आपले आपण ठरवले पाहिजे. जाऊ दे ना. त्यांच्या विधानांना इतकी किंमत देऊ नका. तुकारामांनी म्हटले आहे, लोकांचे बोलणे हे ओकारी सारखे असते, थांबवावेसे वाटले तरी आपल्याला थांबवता येत नाही. तितकीच किंमत त्या विधानाची आहे (खरे तर तितकीही नाही)

मनोगत आणि मिपावर गेली कांही वर्षे मी वावरतो आहे. पण आजच्या इतकी उद्विग्नता पूर्वी कधी अनुभवली नाही. असो.

काका, कृपया उद्विग्न वगैरे होऊ नका. फाट्यावर मारा.

ते सोडा, तुम्ही पावसाळ्यात मुंबईत येणार म्हणाला होतात. ते कधी ते सांगा, कट्टा करू. काय म्हणता ?

काय बोलणार...
माझी सगळ्यात पहीली कमेँट यासाठीच होती www.misalpav.com/node/22254#comment-412844
संपादित

मला grop करणारा पण टिळकांच्या शाळेतलाच मुलगा होता. तुमची चुक तुमच्या लक्षात आली पण त्या मुलीच्या मनात ते आयुष्यभर राहणार. सौ वटवाघुळ ने बरोबर सांगितलय साधारण १०+ वयाच्या मुलींना स्पर्श कळतो. आणि गुवाहटी सारख्या घटनांनी परत त्याची आठवण येते.

मन१'s picture

17 Jul 2012 - 1:04 pm | मन१

!

स्पा's picture

17 Jul 2012 - 2:12 pm | स्पा

.!.

व्हेरी गुड...
त्या वाक्यांचा उद्देश मिपावरचा गुवाहटी सिनारिओ होता. कोण व्हायोलेंस सुरु करतो, बघ्यांमधला कोण त्यांना जॉईन करतो, कोण बघेच राहतो आणि कोण मदतीला येतो...
दुसरा उद्देश स्त्रिया काही ठरावीक प्रतिसादांवर का तुटुन पडल्या होत्या आणि काही generalized statements का झोँबतात, हे पुरुषांना कळावे हा होता.
ज्याप्रमाणे या प्रतिसादातील वाक्यांवर काहीजण तुटुन पडले आहेत किंवा वैयक्तिक टिका करत आहेत त्यावरुन ते लक्षात येईल असे वाटते.
त्यातुनही काही संयमित/consistent प्रतिसाद देणारे आहेत याचा आनंदच आहे :-)
माझा उद्देश माझ्यापुरता पूर्ण झाला आहे सं मं ला अयोग्य वाटत असेल तर त्यांनी माझे प्रतिसाद काढुन टाकावेत...

दुसरा उद्देश स्त्रिया काही ठरावीक प्रतिसादांवर का तुटुन पडल्या होत्या आणि काही generalized statements का झोँबतात, हे पुरुषांना कळावे हा होता.

या विषयाचा चघळून चोथा झाला असतानाही पुन्हा प्रशिक्षणशिबिर सुरू केले यावरूनच पुरुषजातीबद्दलचे ज्ञान काय ते कळाले. असो.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

17 Jul 2012 - 4:50 pm | विश्वनाथ मेहेंदळे

मित्रा, हातून लिहिले गेले आणि मग चूक झाली असे वाटले तरी ते मान्य करण्याचा मोठेपणा नसला की मग ही अशी सारवासारव करावी लागते रे. आता आपण उदार मनाने "असे आहे होय, आम्हाला कळले नव्हते. बरोबर आहे तुमचे" असे म्हटले तर याला "यशस्वी माघार" म्हणायचे, नाही तर "पडलो तरी नाक वर" म्हणायचे. काय बोल्तो ??

बॅटमॅन's picture

17 Jul 2012 - 4:58 pm | बॅटमॅन

हो ते बाकी खरंय!!

एमी's picture

17 Jul 2012 - 5:09 pm | एमी

विमे... सलाम :-)

तिमा's picture

17 Jul 2012 - 10:11 am | तिमा

प्रत्यक्ष घटनेपेक्षा त्यावरची चर्चा वाचून उबग आला. कृपा करुन ही चर्चा आता बंद करावी .

उपास's picture

17 Jul 2012 - 11:10 am | उपास

'यथा प्रजा तथा शासन' दांभिक पुरुषप्रधान संस्कृतीकडून अजून काय अपेक्षा ठेवणार. राजकीय आरक्षण दिले की झाले इतकं सोप्प नाहीच हे.. सामाजिक सुधारणा जोपर्यंत तळागाळात पोहोचत नाहीत (शिक्षण - घरी, शाळेत) तोपर्यंत हे असंच चालत राहाणार..
परवा ते गाणं ऐकलं.. 'मै करु तो साला कॅरेक्टर ढिला है..' लहान मुलं मुली थिरकत होती गाण्यावर.. अशी गाणी अंगवळणी पडणार असतील तर काय शिक्षण देणार मुलांना आपण !!

llपुण्याचे पेशवेll's picture

31 Jul 2012 - 3:01 pm | llपुण्याचे पेशवेll

झक्कास बुल्स आय. ज्या जबाबदार मिडीयाने ही गोष्ट पुढे आणली त्या जबाबदार मिडीया म्हणजे प्रसार माध्यमे, सिनेमे यांनी च स्त्रीचे चित्रण जास्त करून उपभोग्य वस्तू असे केल्याचे सध्या दिसत आहे.

इरसाल's picture

17 Jul 2012 - 2:43 pm | इरसाल

काय हे ?

http://in.jagran.yahoo.com/news/national/general/sonali-cried-help-treat...

नई दिल्ली। कभी एनसीसी [नेशनल कैडेट कोर] की वर्दी पहनकर इतराने वाली झारखंड की सोनाली मुखर्जी अब जिंदगी की जद्दोजहद से बुरी तरह हताश हो चुकी है। असामाजिक तत्वों के दिए जख्म उसके चेहरे पर तो दिखते ही हैं, साथ ही उसके मन पर भी गहरा असर हुआ है। यही वजह है कि उसने राजधानी दिल्ली में आकर हुक्मरानों के दरवाजों पर दस्तक देकर गुहार लगाई है कि उसे या तो इलाज में मदद की जाए अथवा मौत दे दी जाए।

नौ साल से इन जख्मों के दर्द से कराह रही सोनाली कहती है कि उसने कई लोगों से मदद की गुहार लगाई पर हर जगह से सिर्फ आश्वासन मिला। 22 अप्रैल, 2003 को घर में घुसकर कुछ युवकों ने उसके ऊपर तेजाब डाल दिया था। कुछ दिन पहले इन्हीं लोगों ने उसके साथ दुष्कर्म भी किया था। तेजाब से उसकी दोनों आंखों की रोशनी चली गई और दाहिने कान से सुनाई भी देना बंद हो गया। पुश्तैनी जमीन से लेकर मां के जेवरात तक बेच डाले, फिर भी इलाज में पैसे कम पड़ गए। अब तक 22 छोटी-बड़ी सर्जरी हो चुकी है, पर जख्म भरने का नाम नहीं ले रहा। उसने दिल्ली में महिला व बाल कल्याण मंत्री कृष्णा तीरथ से मुलाकात की है। उन्होंने भी मुफ्त इलाज का भरोसा दिया है।

झारखंड के मुख्यमंत्री रहे शिबू सोरेन, अर्जुन मुंडा व मधु कोड़ा से भी वह मिल चुकी है, लेकिन किसी ने उसकी मदद नहीं की। सभी आरोपियों को कोर्ट ने जमानत दे दी है और वे आजाद घूम रहे हैं। सोनाली घटना के वक्त धनबाद महिला कॉलेज से समाजशास्त्र से ऑनर्स की पढ़ाई कर रही थी। सोनाली ने बताया कि इंसाफ के लिए जल्द ही दिल्ली में हस्ताक्षर अभियान शुरू किया जाएगा और वह राष्ट्रपति को ज्ञापन भी देगी।

मराठमोळा's picture

17 Jul 2012 - 7:34 pm | मराठमोळा

या चर्चेत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रित्या सहभागी असलेल्या सर्व धागाकर्ते/प्रतिसादक्/वाचक लोकांना माझं निवेदनः

१. तुम्ही स्वतः या चर्चेतुन काय साध्य करत आहात?
२. तुम्ही ही चर्चा गंभीरपणे केली असे समजून तुम्ही मानसिक संताप आणि दु:ख याशिवाय काय मिळवलं? शिकलं? ज्यांनी केलं ते हे वाचत नाही आहेत, जे वाचतात/प्रतिसाद देतात ते 'त्या' प्रकारात मोडत नाहीत हा माझा दावा आहे.
३. खर्‍या पिडीत मुलीला किंवा तत्सम पिडीतांना यातुन किती लाभ झाला किंवा होणार आहे?
४. इथे लिहिणे म्हणजे फक्त वड्याचं तेल वांग्यावर काढणे नव्हे का?
५. हे जग किती सुंदर आहे हे तुम्ही विसरलात का?

द्यायची असतील तर सर्व प्रश्नांची उत्तरे द्या.. अर्धवट मुद्दे मांडणार्‍यांना सुळी दिले जाईल.

मन१'s picture

17 Jul 2012 - 7:37 pm | मन१

हे सर्वच प्रश्न बहुतांश सर्वच द्विशतकी आणि त्रिशतकी धाग्यांना लागू पडतात.
तिथेही चर्चा करावी की न करावी?

मराठमोळा's picture

17 Jul 2012 - 7:45 pm | मराठमोळा

>>तिथेही चर्चा करावी की न करावी?
तुम्ही तुमचे गाळ उपसण्याचे काम चालू ठेवा हो मनराव१.. :)
बाकी चिंता कशाला? प्रश्नांची उत्तरे असतील तर बोला. :)

बॅटमॅन's picture

17 Jul 2012 - 7:58 pm | बॅटमॅन

इथे लिहिणे म्हणजे फक्त वड्याचं तेल वांग्यावर काढणे नव्हे का?

अगदी तसं नाही पण इथे लिहिण्याने खर्‍या जगतात काही फरक पडणार तर नाहीच. लोकांची इथली पोटतिडीक पाहून तुम्ही हे म्हणताय हे तर स्पष्टच आहे. पण मग कुठल्याही धाग्याबद्दल असेच म्हणता येईल, नाही का? शेवटी शब्द बापुडे केवळ वारा.

मग इथे लिहिण्यामागचा उद्देश कोणता? जे मनात वाटते ते स्पष्टपणे मांडणे. खर्‍या जगात हे जमतेच असे नाही. इथे तसे होते, चार लोक दखल घेतात, म्हणून समाधान मिळते. याची खर्‍या जगात किंमत शून्य आहे. पण हे तुटपुंजे का होईना, समाधान मिळते, हेही नसे थोडके.

अगदीच ब्लंटलि बोलायचं झालं तर विचारमैथुनासाठीची एक हक्काची जागा म्हणजे मिसळपावसारख्या अनेक साईट्स. आपण तसेही फार छोटे लोक आहोत, आपल्या छोट्याशा भावनिक गरजा जर इथे काहीबाही लिहिण्याने भागत असतील तर त्यात गैर काहीच नाही. मग जगाच्या लेखी त्याचे मूल्य काहीही का नसेना.

तुमचा मुद्दा लक्षात आला. निव्वळ कीबोर्डप्रहार करून अशा गोष्टींत काहीही सुधारणा होणार नाहीये. पण म्हणून ही पूर्ण प्रक्रियाच गैरलागू नाहीये. इतकेच माझे म्हणणे आहे.

मराठमोळा's picture

17 Jul 2012 - 7:59 pm | मराठमोळा

वटवाघूळपुरुष,

तुम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत म्हणून पास.. :)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

17 Jul 2012 - 8:12 pm | विश्वनाथ मेहेंदळे

अगदीच वेळ जात नाही झाला का रे बाबा. की सुपारी मिळाली आहे धाग्याचे प्रतिसाद वाढवायची ?

विश्वनाथ मेहेंदळे's picture

17 Jul 2012 - 8:09 pm | विश्वनाथ मेहेंदळे

आयला, मिसळपाव वर बोलायलाच नको रे मग. ममो, तुला खरेच असे वाटते की चर्चेने काहीही होत नाही ? तू काढ आता एखादा काकू, बघतो मी. हेच सगळे प्रश्न तिथे विचारतो ;-)

असो, शिकायचे म्हणालास तर जालावर काही लोक किती xxx* असू शकतात हे पुन्हा एकदा शिकलो.
जोक्स अपार्ट, इकडच्या काही सदस्यांनी सांगितलेले प्रसंग वाचून अत्यंत अस्वस्थ झालो. आज सकाळी ट्रेन मधून प्रवास करताना काही गोष्टी डोक्यातून जात नव्हत्या. (डोकायची तार इतकी सटकली होती की त्या नादात ऑफिस समोर रिक्षा वाल्याशी valid पण शुल्लक मुद्द्यावरून जोरदार भांडण करून घेतले ते वेगळे) डोळ्यासमोर असे काही जर घडताना दिसले तर काहीतरी करेन अशी शक्यता या धाग्याने नक्कीच निर्माण केली. ते करण्याजोगे स्वतः ला घडवले पाहिजे, ही जाणीव झाली.

तुला एक किस्सा सांगतो. माझा एक जवळचा मित्र. त्याने एकदा कलरीप्पायतचा क्लास लावला. वयाच्या २६-२७ व्या वर्षी हे काय रे सुरु केलेस असे विचारल्यावर त्याने एक अनुभव सांगितला. दादर स्टेशन बाहेर हा चालला असताना, समोरून एक मुलगी येत होती. याच्याच पुढून जाणाऱ्या एका मुलाने तिला जोरदार धक्का मारला. इतका की तिचा तोल गेला आणि ती कळवळली. माझा मित्र म्हणाला की त्या क्षणी मी त्या मुलाला धडा शिकवू शकलो नाही याची टोचणी लागली आणि काही तरी शिकायचे ठरवले. पुढील वेळेस अशा व्यक्तीला किमान कानफटवून काढता यावे इतके तरी स्वतः तयार असावे असे ठरवले होते म्हणाला. तो तसे का म्हणाला ते मला आज कळले.

अशा वेळेला एकच धोका जाणवतो तो म्हणजे आपण लाख भांडणात पडू, पण ऐन वेळेला ती मुलगीच आपल्या बाजूने उभी नाही राहिली तर? मागे मिपा वरील एका धाग्यात बस मधील राखीव सीट वरून आपण भांडण करणे आणि जिच्यासाठी भांडतो आहोत तिनेच नामानिराळे राहणे असे किस्से लोकांनी सांगितले होते. बसच्या सीट चे ठीक आहे, विनयभंगावरून आपण मारामारी करायला गेलो आणि असे तोंडावर पडलो तर काय करणार ? झाली मारामारी आणि आले पोलीस आणि तोवर ती मुलगीच गायब झाली असेल तर. हे काही न करण्याचे कारण नाही, पण एक शक्यता डोक्यात आलीच.

* गाळलेल्या जागा प्रत्येकाने आपापल्या कुवतीप्रमाणे भराव्यात.

पैसा's picture

17 Jul 2012 - 7:55 pm | पैसा

मूळ विषयाशी संबंधित प्रतिसाद बाजूलाच राहिले आणि दुसर्‍याच जंगी सामन्यांना सुरुवात झाली. असो, नेहमीचंच. माझेही काही विस्कळीत विचार.

इथे अनेक महिला सदस्यांनी आपल्या व्यथा मांडल्या आहेत आणि त्या वाचून अस्वस्थ, स्तब्ध व्हायला झालं. पण ही आजकाल सुरू झालेली विकृती नाही. इथे जवळपास २४/२५ वर्षांपूर्वीच्या के पी एस गिल आनि रुपम बजाज केसची आठवण झाली. एका आय ए एस महिला अधिकार्‍याला दुसर्‍या उच्चपदस्थाकडून पार्श्वभागाला चिमटा काढण्यासारख्य घटनेला सामोरे जावे लागले होते. श्रीमती बजाज यानी त्या अपमानाविरुद्ध प्रदीर्घ लढा दिला. आपल्याकडे अशा गोष्टींविरुद्ध लढण्यासाठी इतका वेळ आणि धाडस नसतं.

आपल्या ज्या संस्कृतीच्या प्रभावामुळे किंवा अभावामुळे गुवाहाटी आणि इतरत्र स्त्रियांना त्रास देणारे समाजकंटक तयार झाले, त्याच संस्कृतीचा दुसरा चेहरा म्हणजे पबमधे जाणारी १५/१६ वर्षांची मुलं मुली. जो काही र्‍हास वगैरे आहे तो सगळ्याच बाजूंनी आहे. मुळात आधी दारू प्यावीशी वाटते यात काय स्वातंत्र्य आहे हे मला कळत नाही. या बाबतीत मी अडाणी आहे आणि ज्ञान मिळालं किंवा नाही मिळालं तर काही फरक पडत नाही.

सगळीकडे "गप्प बसा" मंत्रामुळे त्रास देणारे मुलगे आणि घाबरणार्‍या मुली तयार होतात. ते थांबेल तेव्हा आपोआप बराच फरक पडेल. सर्वांना स्वातंत्र्य हवंच, पण सर्वांनीच स्वातंत्र्याबरोबर येणार्‍या जबाबदार्‍या पण उचलल्या पाहिजेत. काळजी घ्या असं कोणी अनुभवी लोकांनी सांगितलं तर त्यात कमीपणा का वाटावा? काळजी घेणे हे जबाबदार असल्याचं लक्षण आहे. काळजी घेण्यात स्वसंरक्षणाच्या पद्धती शिकून घेणे, काळ वेळ पाहून यशस्वी माघार सुद्धा घेण्याची तयारी हे सगळं आलंच. एकदा आईवडिलांच्या संरक्षणाशिवाय घराबाहेर पडल्यानंतर आपणच आपलं संरक्षण करणे ही प्राथमिकता असली पाहिजे. जान बची लाखों पाए. मुलीच काय, मुलांनाही हे लागू आहे. अनेकदा गवि म्हणतात तसा जमावाच्या मानसशास्त्राचाही मोठा भाग असतो. दुर्दैवाने अशा परिस्थितीत सापडलंच तर यशस्वी पलायन हा एकमेव सुटकेचा मार्ग असतो.

आपल्या देशात ६०/७०% लोक दारिद्र्यात जगतात, आंणि संध्याकाळी मुलांना खायला काय घालू या प्रश्नाचा विचार करण्यात अर्ध्याहून अधिक बायकांचं आयुष्य जातं तिथे भुकेपुढे इतर प्रश्न बेमतलब ठरतात. जिवंत रहाणे हाच मोठा संघर्ष असेल तर इतर सगळ्या गोष्टी चैन ठरतात. प्रचंड लोकसंख्या आणि सगळ्याच प्रकारची उपासमार बर्‍याच गुन्ह्यांना आमंत्रण देते. ही परिस्थिती कमी करण्यासाठी आपण काही करू शकतो का? बाकी काही शक्य नसेल पण निदान आपल्या मुलांना आणि मुलींना चांगलं आणि वाईट यातला फरक ओळखायला शिकवलं तरी पुरे. एक एक करून चांगले नागरिक वाढतील तसे असले प्रकारही कमी होतील. मी कमालीची अशावादी आहे.

मराठमोळा's picture

17 Jul 2012 - 8:13 pm | मराठमोळा

पैसातै,
रस्ता चुकला.. कुणापुढे डोकं फोडताय?
अहो, तुम्ही आम्ही जिथे लिहितोय, वाचतोय, तिथे हे लोकं पोहोचणं अजुन १० वर्ष लांब आहे. आणि जे इथे अनावश्यक विचार मांडताहेत ते खर्‍या परिस्थितीपासून करोडो किमी लांब आहेत. ते फक्त चर्चा करु शकतात. खर्‍या परिस्थितीत इथे चर्चा करणारे तिथे किती कृती करतील याबद्दल मी साशंक आहे.

स्त्रीला धक्का देणारे मी स्वतः बुकलुन काढलेत (स्वतःच्या ओळखी व्यतीरिक्त स्त्रियांच्या आणि स्वतःच्या जीवावर). इथे फक्त चर्चा करणारे सो कॉल्ड पुरुष, चर्चा करण्याव्यतिरिक्त खरे किती शेपुटघाले असतील याबद्दल मी साशंक आहे.

अर्धवटराव's picture

17 Jul 2012 - 8:22 pm | अर्धवटराव

कळफलक बडवुन पिडीत स्त्रियांचा कैवार घेणं फास सोपं... "खळ्ळ खटक" करण्याची वेळ येते तेंव्हा असे लोक औषधालाही सापडत नाहि.

अर्धवटराव

+१००, समर्थन द्यावा वाटला असा एकच प्रतिसाद.

पाण्यात पडुन प्रवाहाबरोबर वाहणा-या एखाद्या पानानं, बाजुचं दुसरं पान बुडतंय की तरंगतयं, याबद्दल करुन करुन किती तो विचार करावा, त्यापेक्षा पाण्याच्या वेगामुळं जे चांगलं जग पहायला मिळ्तंय तेवढं पहावं हे बरं.

प्रभाकर पेठकर's picture

17 Jul 2012 - 9:40 pm | प्रभाकर पेठकर

पैसा,

आपल्या ज्या संस्कृतीच्या प्रभावामुळे किंवा अभावामुळे गुवाहाटी आणि इतरत्र स्त्रियांना त्रास देणारे समाजकंटक तयार झाले, त्याच संस्कृतीचा दुसरा चेहरा म्हणजे पबमधे जाणारी १५/१६ वर्षांची मुलं मुली. जो काही र्‍हास वगैरे आहे तो सगळ्याच बाजूंनी आहे. मुळात आधी दारू प्यावीशी वाटते यात काय स्वातंत्र्य आहे हे मला कळत नाही.

शिक्षणापेक्षा ज्ञानाचा अभाव, संस्कारांचा अभाव, संवादाचा अभाव, पैशाचा-सत्तेचा माज, पोलीसांची निष्क्रिय मनोवृत्ती, राजकारण्यांचा पोलीस खात्यातील हस्तक्षेप अशा अनेक चुकीच्या गोष्टींचे फलीत म्हणजे हे गुंड आहेत. बाकी, रोजच्या जीवनांत येता-जाता स्त्रियांना त्रास देणारे कामांधतेच्या पहिल्या पायरीवर आहेत. आपली चोरी पकडली जाणार नाही असे प्रत्येक चोराला वाटते. चोरी पकडली गेली नाही किंवा त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं की अशांचा धीर चेपतो. आणि ते पुढच्या पायरीवर पाय ठेवायला प्रवृत्त होतात. सार्वजनिक ठिकाणी स्त्रियांनी एकत्र येऊन अशा नराधमांना झोडपून काढणं हा प्रभावी मार्ग ठरावा. दुर्दैवाने त्याला धाडस लागतं. मग सोपा मार्ग अवलंबिला जातो....संस्थळावर इतर पुरूष सदस्यांना दूषणे देणे आणि अपशब्द वापरणे.

सगळीकडे "गप्प बसा" मंत्रामुळे त्रास देणारे मुलगे आणि घाबरणार्‍या मुली तयार होतात.

'गप्प बसा' मंत्राने घाबरणार्‍या मुली तयार होत असतील पण त्रास देणारे मुलगे त्यांच्या हट्टांना, मागण्यांना, मतांना अवास्तव महत्त्व दिल्याने होतात. त्यांना 'नकार' पचवायला न शिकविणे म्हणजेच भविष्यातील एक हट्टी व्यक्तिमत्त्व तयार करण्यासारखे आहे. विभक्त कुटुंब पद्धती, अर्थाजनासाठी पती-पत्नी दोघांनीही दिवसभर घराबाहेर असणं परिणामी संवादाचा अभाव. कित्येक आयांना आपण मुलांपासून दूर राहून अन्याय करतो आहोत अशी भावना असते आणि त्या अन्यायाचे परिमार्जन मुलाने मागितलेली प्रत्येक वस्तू त्याच्या साठी आणणे आणि त्याच्या 'गुड बुक्स' मध्ये राहायचा प्रयत्न करणे ह्यात होते. हट्टी व्यक्तीमत्त्वाची बिजं इथे रोवली जातात.

आपल्या मुलांना आणि मुलींना चांगलं आणि वाईट यातला फरक ओळखायला शिकवलं तरी पुरे. एक एक करून चांगले नागरिक वाढतील तसे असले प्रकारही कमी होतील.

हे फार महत्त्वाचे. पण किती पालकांना (आजच्या) स्वतःला चांगलं आणि वाईटातला फरक ओळखता येतो? सुजाण पालकांचे प्रमाण झपाट्याने कमी होत चालले आहे. आणि त्यांच्या चुका त्यांच्या पदरी घातल्या तर त्या सुधारण्या ऐवजी त्यांना राग येतो. माझा मुलगा वर्षभराचा असताना, मी अर्थातच तरूण होतो, माझा हात मुलावर खुप चालायचा. वडीलांनी ते पाहिले आणि मला शेजारी बसवून शांत स्वरात सांगितले, 'त्याच्याशी बोल, आणि तरीही त्याने चुका केल्या तर स्वतःची सहनशक्ती वाढव आणि संवाद चालू ठेव पण हात चालवू नकोस.' ह्या त्यांच्या सल्ल्यावर मी विचार केला, मला सल्ला पटला आणि मी तो अमलात आणला. माझे कौतुक म्हणून लिहीत नाहिए. पण 'आधी स्वत:ला सुधारा मग इतरांचे 'मॉरल पोलिसिंग' करा' अशा वाक्यांना उत्तर म्हणून लिहीतो आहे.

मी कमालीची अशावादी आहे.

हा 'आशावाद'च आत्मबळ वाढवितो. मुलांनाही आशावादी बनवा.

मराठमोळा's picture

18 Jul 2012 - 6:25 am | मराठमोळा

.

शिल्पा ब's picture

17 Jul 2012 - 10:42 pm | शिल्पा ब

+ १००% अन असं शिकवायला प्रत्येक आई - बापाने पुढाकार घेतला पाहीजे. आपल्या लेकराची आपण नाही तर कोण काळजी करणार?

योगप्रभू's picture

18 Jul 2012 - 8:20 am | योगप्रभू

ज्योती,
विचारी स्त्रीचे खरे रुप तुझ्या प्रतिसादातून दिसून येतंय.
बरळण्यासाठी पिण्याची गरज असतेच, असे नाही, हे येथील काही प्रतिसादांवरुन समजले.
आखाडी दोन दिवस आधीच साजरी झाली या धाग्यावर :)

प्रभाकर पेठकर's picture

18 Jul 2012 - 9:32 am | प्रभाकर पेठकर

विचारी स्त्रीचे खरे रुप तुझ्या प्रतिसादातून दिसून येतंय.

म्हणूनच अशा प्रतिसादांवर विचार करून, आशय समजुन घेऊन आपले विचार मांडायला मला आवडते.

इरसाल's picture

18 Jul 2012 - 11:35 am | इरसाल

काही प्रतिसादांवरुन असे वाटले की इथे कळफळा बडवण्यापेक्षा दुसरे भरीव काम करावे म्हणुन माझे दोन पैसे

१. बाजारात पेपरस्प्रे मिळतो, त्याची हाताळण्याजोगी लहान बाटली पर्स मधे असु द्यावी.
२. पुर्वी स्रिया ज्या काळ्या पिना वापरत त्यातली १ टोक मोडुन पर्स मधे ठेवावी व जेव्हा जेव्हा गर्दीच्या ठिकाणी असाल तेव्हा हातात राहु द्यावी.(शक्यतो अश्या ठिकाणी टोचावी/खुपसावी कि तो अवयव भविश्यात कामास न येवो.).
३.बटाटा सोलायचे 'ते' पर्स मधे असु द्यावे, कधी काय वेळ येइल सांगता येत नाही.
४.बरोबर वडिल, भाउ, नवरा असेल तर त्यांना मागे ठेवुन स्वतः आधी उतरावे.
५.हात, तोंड धरले असेल तर डोके जोरात मागे आपटावे एक तरी नाक जरुर फुटेल.पाय शक्य तितक्या जोरात आणी शक्य तितक्या दिशांना ताकदीने फिरवावेत.
६.असा कटु प्रसंग जर समोरासमोर असेल तर नेम धरुन पाय किंवा गुढगा समोरच्याच्या पायांच्या मधल्या जोडावर शक्य तितक्या ताकदीने हाणावा.ह्या नंतर हातात असलेली कोणतीही वस्तु शस्त्र म्हणुन नाकावर किंवा कान आणी डोळे यांच्या मधल्या भागात वापरावी.
७. शक्य तितका आणी जमेल तसा नखांचा वापर करावा.

बाकी उपाय वेळ काळानुसार ठरवता येतिलच किंवा मिपाकर भर घालतीलच.

कवितानागेश's picture

18 Jul 2012 - 4:51 pm | कवितानागेश

आम्हाला कुंग फू शिकवताना 'स्ट्रीट फाईट' म्हणून वेगळे प्रकार शिकवले होते त्याची आठवण झाली.
मला कॉलेजसाठी ट्रेननी जायची वेळ आली तेंव्हा माझ्यापेक्षा १० वर्षांनी मोठी असलेल्या बहिणीनी अनेक सल्ले दिले होते, ते देखिल आठवले. त्यातले महत्त्वाचे ४.
१. कायम छत्री जवळ ठेवायची. गरज पडेल तेंव्हा बिनधास्त वापरायची, ठोकून काढायला.
२. बायकांच्याच घोळक्यातून जायचे, कितीही उशीर झाला तरी बायकांच्या घोळक्यातून बाहेर पडायचे नाही.
३. तंद्रीत रहायचे नाही. आजूबाजूला बारीक लक्ष ठेवायचे, अंदाज घेत रहायचा माणसांचा.
४. ( सगळ्यात धक्कादायक) २० वर्षांच्या वरच्या वयाच्या पुरुषांवर सहजासहजी विश्वास ठेवायचाच नाही.

Kavita Mahajan's picture

18 Jul 2012 - 10:54 pm | Kavita Mahajan

काही वाचकमित्रांच्या सांगण्यावरून काल मी मिसळपाववर आले. ही पहिलीच चर्चा वाचली. विषयाचे काहीएक गांभीर्य राखून येथील मंडळी चर्चा / वाद / संवाद साधत असतील... अशी प्राथमिक अपेक्षा होती. अर्थातच अपेक्षाभंग झाला.
यातील एकाही व्यक्तीने काही सुचवले नाही की आपण काय करू शकतो. भले हे प्रमाण लहानसे असेल, पण प्रयत्न व्यर्थ नसतात. अगदी एका व्यक्तीला मदत झाली तरीही ते पुष्कळ ठरते.
असे कुणाला म्हणावे वाटले आहे का स्पष्टपणे की :
मी असे वागणार नाही. माझ्या परिवारातील मुलींची मी काळजी घेतो / घेते तशीच मुलग्यांचीही घेईन. त्यांना योग्य माहिती व ज्ञान वेळेत देऊन त्यांचे दृष्टिकोण व वर्तन योग्य राहील याची काळजी घेईन.
या विषयांवर जे व्यक्तिगत पातळीवर व संस्थात्मक पातळीवर उपक्रम सुरू आहेत, त्यांची माहिती करून घेईन आणि शक्य तसे त्यात सहभाग नोंदवेन. इत्यादी.
काही स्त्रियांनी आपले अनुभव मोकळेपणाने नोंदवले आहेत. क्वचित पुरुषांनीही. याचा अर्थ ही मंडळी त्या मानसिक वेदनेतून अजून बाहेर पडलेली नाहीत. यावेळी निव्वळ कौतुकपूर्ण सहानुभुती न दर्शवता काही अशी चर्चा होऊ शकली असती की जे शोषित / बळी आहेत, त्यांनी अशा अनुभवाच्या कचाट्यातून बाहेर पडण्यासाठी नेमके काय करावे? या विषयांवर जी पुस्तकं आहेत, त्यांची माहिती देणे, त्या पुस्तकांमधील अनुभव व मतांविषयी मोकळेपणाने बोलणे इथे अपेक्षित होते. उदा. पिंकी विराणी यांचे बिटर चॉकलेट. किंवा http://en.wikipedia.org/wiki/The_Accused_(1988_film).....
The Accused (1988 film) - Wikipedia, the free encyclopedia ही फिल्म.
हे काहीही न घडता वांझ बौद्धिक चर्चा, तीही निव्वळ शब्दांचा किस पाडत सुरू आहे. काहींची भाषा व मांडणी संतापजनक आहे. तुम्ही चर्चा करता आहात की टाइमपास करण्यासाठी हे बौद्धिक मैथुन आहे? येथील सर्व मंडळी सुशिक्षित व नेट वापरताहेत या अर्थी किमान संपन्न घरातली आहेत. कुणालाही ( व संपादकांनी आणि ज्यांनी हा धागा काढला त्यांनाही ) या चर्चेला योग्य वळण देता येऊ नये, हे खेदकारक आहे.

अर्धवटराव's picture

18 Jul 2012 - 11:48 pm | अर्धवटराव

>>मी असे वागणार नाही. माझ्या परिवारातील मुलींची मी काळजी घेतो / घेते तशीच मुलग्यांचीही घेईन. त्यांना योग्य माहिती व ज्ञान वेळेत देऊन त्यांचे दृष्टिकोण व वर्तन योग्य राहील याची काळजी घेईन.
-- ही गोष्ट इतकी ऑब्व्हिअस आहे कि त्याची जाहिरात करायची गरज वाटु नये.

>>हे काहीही न घडता वांझ बौद्धिक चर्चा, तीही निव्वळ शब्दांचा किस पाडत सुरू आहे. काहींची भाषा व मांडणी संतापजनक आहे. तुम्ही चर्चा करता आहात की टाइमपास करण्यासाठी हे बौद्धिक मैथुन आहे?
-- तुम्हाला हि चर्चा शब्दांचा किस पाडणे, वांझ, बौद्धीक मैथुन वगैरे वाटत असेल तर तुम्ही नक्कीच उंदीर मारण्याच्या डिपार्ट्मेंटमध्ये काम करत अमेरिकेची आर्थीक घडी बसवणार्‍या बुद्धीवादी आहत (जय गुरुदेव पु.ल.)

अर्धवटराव

प्रभाकर पेठकर's picture

19 Jul 2012 - 1:33 am | प्रभाकर पेठकर

यातील एकाही व्यक्तीने काही सुचवले नाही की आपण काय करू शकतो. भले हे प्रमाण लहानसे असेल, पण प्रयत्न व्यर्थ नसतात.

अरेरे! म्हणजे तुम्ही सुद्धा आलेल्या प्रतिक्रिया न वाचताच आपल्या मतांची पिंक टाकली आहे.

खालील जोडणीवर थेट उपाययोजना सुचविल्या आहेत.

प्रतिक्रिया १

श्रावण मोडक's picture

18 Jul 2012 - 11:37 pm | श्रावण मोडक

येथील सर्व मंडळी सुशिक्षित व नेट वापरताहेत या अर्थी किमान संपन्न घरातली आहेत. कुणालाही ( व संपादकांनी आणि ज्यांनी हा धागा काढला त्यांनाही ) या चर्चेला योग्य वळण देता येऊ नये, हे खेदकारक आहे.

संपन्नतेचा इथं काय संबंध आला हे कळलं नाही. त्याचप्रमाणे, संपन्नता आणि चर्चेचं योग्य वळण याचाही संबंध कळला नाही. मुळात, सुशिक्षित या शब्दाचा अर्थही कळला नाही. आणि तो शब्द व नेट वापरणं या अर्थी 'संपन्नता' म्हणजे काय हेही कळलं नाही.

काही वाचकमित्रांच्या सांगण्यावरून काल मी मिसळपाववर आले. ही पहिलीच चर्चा वाचली. विषयाचे काहीएक गांभीर्य राखून येथील मंडळी चर्चा / वाद / संवाद साधत असतील... अशी प्राथमिक अपेक्षा होती. अर्थातच अपेक्षाभंग झाला.

काल इथं आला आहात ना? 'ही पहिलीच चर्चा वाचली', याचा अर्थ तुम्ही इथं हीच चर्चा प्रथम वाचलीत असा असावा (मिसळपाववर आल्यावर पहिल्यांदा काय वाचलं, तर ही चर्चा). थोडा वेळ घ्या. अपेक्षाभंग वगैरे बाबी मागे पडतील. एक तर इथल्या व्हाल, किंवा हे ठिकाण विसरून जाल.
हे 'मिसळपाव'साठी सांगत नाही; 'कविता महाजन' यांना सांगतो आहे.
या धाग्यावर अनेकांचा तोल सुटला. प्रत्येक जण आपापल्या मर्यादित वर्तुळातून पाहतो आहे (दोन-तीन अपवाद आहेत, ते वगळता). त्यात्या वर्तुळात तो, तो बरोबर आहे. त्यामुळेच, या चर्चेत, मांडणीत समग्रतेचा अभाव आहे, हे खरे आहे. पण जे घडले आहे त्यात संताप, उद्वेग, क्रोध हेच दिसते आहे. त्याला इलाज नाही. हे समजून घेतलेच पाहिजे असा आग्रह नाही. पण या संपूर्ण धाग्याकडे तसेही पाहता येते, हेही विसरता कामा नये; कारण एरवी मग चर्चा-वाद-संवाद, किंवा,माझ्या दृष्टीने त्यातील समग्रता, समतोल, यांची अपेक्षा किंवा आग्रह इथं फसतो असे होईल.

दुसऱ्‍या पँराशी सहमत
काही जणांचे प्रतिसाद वाचून गंमत वाटली

Kavita Mahajan's picture

19 Jul 2012 - 2:34 pm | Kavita Mahajan

१. मला हा धागा पाठवून आमंत्रित करण्यात आलं होतं, म्हणून स्वाभाविकपणे पहिल्यांदा हा धागा वाचला.
२. तोल सुटणे, समग्रतेचा अभाव इत्यादी त्रुटी कुठेही असू शकतात. त्या जागीच तुमच्यासारख्या व्यक्तींचे खरे काम सुरू होते. आणि त्याला वळण देता येऊ शकते.
३. कृती काय करायला हवी हे व्यक्तिगत पातळीवर व सार्वजनिक पातळीवर सांगता येण्याचे काम एखाद्या व्यक्तीने केले तरी पुरते.
४. ही चर्चा वाचल्यानंतर इथल्या व अजून काही मराठी वेबसाइट्सवरील चर्चा आवर्जून वाचल्या. मी निव्वळ शब्दच्छल करू इच्छित नाही, लेखन-वाचनातून 'विचारांत बदल' , 'भावनांना वळण' आणि 'कृतिशीलता' या पैकी काही निष्पन्न होते का हे पाहणारी एक व्यक्ती आहे. त्यामुळे प्रथम खटकली ती भाषिक असहिष्णुता. विनोद वा प्रसंगी टवाळी समजू शकतो, पण त्यामुळे विषयाचे गांभीर्य ढळता कामा नये. एकमेकांना केवळ शब्दांनी ओरबाडणे/ लचके तोडणे इ. स्वरूपाची भाषिक हिंसा या साइट्सवर मोठ्या प्रमाणात आढळून आली. ( हा धागा वेगळा काढून असे का घडते आहे याचीही एक चर्चा होऊ शकेल.) श्री. अरुण खोपकर यांनी या विषयावर लोकवाड्मयगृह वार्ता मध्ये एक अप्रतिम लेख लिहिला आहे. तो जरूर पहावा.
५. इथली होणे वा विसरून जाणे असे पर्याय आपण सुचवलेत. मी कुठलीही नसते व मला अशा खटकलेल्या गोष्टी पटकन मनाआड टाकता येत नाहीत. वेळेनुसार अधूनमधून मी इतरत्र डोकावते तशी इथेही येत राहीन. इथे व्यक्त व्हायचे की नाही, हे मात्र ठरवेन. कारण अशा असहिष्णु वातावरणाचा एक भाग बनणे टाळावे, असेच कुणाही शांतपणे चांगली कामे करू इच्छिणार्‍या व्यक्तींना वाटेल.
प्रतिसादाबद्दल आभार.

श्रावण मोडक's picture

19 Jul 2012 - 4:21 pm | श्रावण मोडक

तुमच्या मूळच्या प्रतिसादात "हे काहीही न घडता वांझ बौद्धिक चर्चा, तीही निव्वळ शब्दांचा किस पाडत सुरू आहे. काहींची भाषा व मांडणी संतापजनक आहे. तुम्ही चर्चा करता आहात की टाइमपास करण्यासाठी हे बौद्धिक मैथुन आहे?" या वाक्यांमध्ये 'वांझ बौद्धिक चर्चा' आणि 'बौद्धिक मैथुन' हे शब्द आहेत. ते नसते तर, हा संपूर्ण प्रतिसाद अपेक्षाभंग आणि येथील होणे किंवा न होणे यासंदर्भात समजू शकतो. अन्यथा, भाषीक हिंसा त्याही शब्दांतून होते. ते शब्द तिथं अपवादात्मक आले असे तुमच्या आत्ताच्या प्रतिसादातील समजूतदार सुरावरून मानता येते (आणि तुमच्याकडून आधीपासूनच ती अपेक्षा होती), म्हणून येथेच थांबतो.
अवांतर: एका अशाच मराठी संस्थळावर (जिथं एक 'कविता महाजन' आहेत, त्या तुम्हीच असाव्यात असा अंदाज आहे. ओळखीची खूण म्हणजे 'ब्र') मी एकदा शाब्दीक हिंसा (मी त्याला शाब्दीक 'खळ्ळ-खट्याक' म्हणतो, आणि, शाब्दीक खळ्ळ-खट्याक चालत असेल, तर...! असा माझा मुद्दा असतो) हा शब्द वापरला होता. तर तेथील तर्कवाद्यांनी 'शाब्दीक हिंसा', त्यातून 'मने दुखावली जाणे' वगैरेमध्ये तथ्य नसते हे मला सुनावण्याचा प्रयत्न केला होता. ही आठवण झाली.

मन१'s picture

19 Jul 2012 - 5:24 pm | मन१

मला इथे आणि इतरत्रही बर्‍याच जणांनी बरेच काही म्हटले. एरवीही म्हटले जाते.
दरवेळी मी justify सुद्धा करायचा प्रयत्न केला.(इतरत्रच अधिक)
आता वाटतय की असं justify दरवेळी केलच पाहीजे का?
उठसूट कुणीतरी काहीतरी म्हणणार, त्यास आपण उत्तर देणार, तोही "तुमची भूमिका मान्य करायचीच नाही" हे ठरवल्यासारखेच बसलेले असणार* आणि त्यातून पुन्हा फक्त फाटे फुटणार.
खरं तर कुणीही कुणालाही इतकं स्पष्टीकरण देणं लागतं का?
उदाहरण म्हणून खुद्द ह्याच धाग्यात एक अगदि फालतू प्रतिसाद होता "दाखवायचे दात " म्हणून.(http://www.misalpav.com/node/22254#comment-412936 इथे तो पाहता येइल.) त्याला तुम्ही काय उत्तर देत बसणार? आत्मशून्य ह्याने दिलेलं एका लायनीतले उत्तर हा मला सर्वोत्कृष्ट उपाय वाटलं.
त्याचा प्रतिसाद हा इथं http://www.misalpav.com/node/22254#comment-412958.

मागं पंगाशेटच्या सहीमध्ये बहुदा एक झकास ओळ होती, ती इथं लागू पडावी.
I am responsible for what I said,I am not responsible for what you understand.

*काही सन्माननीय अपवादही पाहण्यात आलेत, विशेषत: मिपावर अशी मंडळी सापडली, त्यांचा मी फ्यान आहे.