हे कसे? ते कसे? विचारू नकोस
जे बोलले जात नाही त्या ठिकाणी
एखादे वारूळ आहे...
समज अपसमजाच्या कवड्या घेऊन खेळलेले हे डाव
पोहताना, नदीचे विशाल पात्र चिरायची जिद्द घेऊन हात चालवत नव्हतो.
मासे जगतात तसा जगायचा प्रयत्नही नव्हता...
केवळ कसल्याशा फाटकेपणाला
आकांताने टाके घालत होतो.
शब्दावर वजन देऊन बसलो आहे.
तू येतेस तेव्हा फडफड होते
मग तू पंख देतेस नेहमीच
हे वजन त्यांच्या मानेवर जाड झालेलं आभाळ आहे
एकमेकापासून काहीतरी चोरताना
आपण एकमेकात रुतत गेलो की रुजत?
ही फुले वितळून गेली आहेत...
दिवस पिळून काळा रस सगळी कडे उतरला आहे...
चित्रावती नंतर हातांना कालवण्यासाठी
तू शरीर वाढवून, सजवून ठेवले आहेस.
मचामचा जेवणाऱ्या अनेक क्षणांची पंगत कर्कशं आहे.
माझ्या गावात समुद्र नाही.
तुला सामावून उसळण्या इतकी माझी खोली नाही.
ह्या कागदावर उन्हाळ्यातील वाळवणासारखी
पसरवून ठेवली आहेत अटीतटीची सारी द्वंद्वे
खोली आवरतेस तसे एकदा माझे सारे रकाने स्वतःपुढे धर
तुझा स्पर्श झालेले सारे शुभ्र होते...
ओझे होते कसे म्हणू?
तुझी काळी सावली विणायची खूप इच्छा आहे..
हे कसे? ते कसे? विचारू नकोस!
-पूर्वप्रकाशित
प्रतिक्रिया
29 Jun 2012 - 3:05 pm | अत्रुप्त आत्मा
हे (असे) कसे...?

29 Jun 2012 - 3:43 pm | मराठमोळा
वा सुंदर कविता (?)..
हे कसे पचते? ते कसे पचते? विचारू नकोस
जिथुन बोलता येत नाही त्या ठिकाणी
एखादे दुखणे आहे...
पचन-अपचनाच्या कवड्या घेऊन खेळलेले हे डाव
खाताना, पोटाचे विशाल पात्र चिरायची जिद्द घेऊन भात ओरपत नव्हतो.
जुलाब लागावे असा खायचा प्रयत्नही नव्हता...
केवळ कसल्याशा अल्सरपणाला
आकांताने टाके घालत होतो.
कमोडवर वजन देऊन बसलो आहे.
ती येते तेव्हा फडफड होते
मग ती वास असह्य देते नेहमीच
हे वजन कमोडच्या मानेवर जाड झालेलं आभाळ आहे
चित्रविचित्र आवाज काढताना
आपण एकमेकात रुतत गेलो की लाजत?
दुपारी खाल्लेले भजे वितळून गेली आहेत...
पोट पिळून पिवळा रस सगळी कडे उतरला आहे...
जेवणानंतर नंतर हातांना काम लावण्यासाठी
मी पोट वाढवून, सजवून ठेवले आहे.
मचामचा जेवणाऱ्या तोंडापेक्षा नंतर येणारा कर्कशं आहे.
माझ्या संडासात समुद्र नाही.
तुला सामावून उसळण्या इतकी माझी खोली नाही.
ह्या कमोडवर उन्हाळ्यातील वाळवणासारखी
पसरवून ठेवले आहेत अटीतटीचे सारे शिंतोडे
खोली आवरतेस तसे एकदा सारे पार्श्व स्वच्छ कर
हार्पिकचा स्पर्श झालेले सारे शुभ्र होते...
माझेच होते कसे म्हणू?
कविता करायची अजुनही खूप इच्छा आहे..
हे कसे पचते? ते कसे पचते? विचारू नकोस!
असो.. किती जमलय माहित नाही.. पण संपादक विभागाने कौलाप्रमाणे कविता विभाग बंद करावा अशी मनोमन ईच्छा होतेय. :)
29 Jun 2012 - 3:57 pm | अत्रुप्त आत्मा
मेलो...मेलो...
म.मो... अता आणखी टंकता येत नाही... विडंबन केल्याबद्दल लाख्खो धन्यवाद.. 
29 Jun 2012 - 8:51 pm | पेशवा
ममो. जोरदार 'झालय' विडंबन!
29 Jun 2012 - 9:00 pm | मोहनराव
ख्खिक्क!! _/\_
30 Jun 2012 - 5:31 am | मुक्त विहारि
अरे सॉलीड