आज गुरुवारच्या मुहुर्तावर ब्रम्हकमळ नावाने ओळखले जाणारे २४ कॅकटस आमच्याइथे फुलले. हे फुलले म्हणजे सण असल्यासारखे आम्ही सगळे बाहेर असतो फुलांना पहात. बाहेर ह्या फुलांच्या सुगंधाने वातावरणही धुंद केलेले असते.
१)
हायला तुमचे ब्रंम्हकमळ फुललेसुद्धा , भारियेत फोटो :)
मी आमचे ब्रंम्हकमळ फुलन्याची वाट बघत होते इथे फोटु पोस्ट्ववायला ;)
कालच कळ्या मोजल्या , ६० आहेत आता उमलण्याची वाट पाहते ,काय भारी द्रुष्य असेल ते देखील :)
ब्रह्मकमळ मध्यरात्री फुलते ना?@ सुनील तसे काही नाही ,रात्री केव्हाही फुलते . हा पण सकाळ पर्यंत फुल सुकुन जाते .खुप नाजुक अन सुंदर,कॉलनीतले सगळे जमा होतात ही शुभ्र नाजुका पाहायला :)
आमच्याकडे ही एक दिवस ३५ आणि दुसर्या दिवशी ३० अशी दोन दिवस उमललि होती फुले. या फुलान्चा सुगंध फारच छान असतो. मंत्रमुग्ध करणारा. फुलं बघुन मन अगदी प्रसन्न होउन जातं.
मस्त फोटो आहेत.
'ब्रम्ह' कमळांवरून आठवलं. आमच्या शाळेच्या रस्त्याच्या कडेला काही छान उंच झाडं होती. त्यांना मोठी मोठी फुलं असायची. त्याचं नाव कोणीतरी आम्हाला कृष्ण कमळ असं सांगितलं होतं. कृष्णकमळ म्हणण्याचं कारण म्हणजे, त्याला पाच मोठ्या पाकळ्या होत्या (पांडव) , आत शंभर-एक पुंकेसर होते (कौरव) आणि मधे आणखी एक पाकळ्यांचा गुच्छ होता (कृष्ण).
(त्या जुन्या वाड्याच्या जागी जेव्हा बिल्डिंग बांधली तेव्हा बहुतेक ही सगळी झाडं गेली )
प्रतिक्रिया
29 Jun 2012 - 12:29 am | रेवती
एकदम भारी बरं का जागुतै!
29 Jun 2012 - 10:54 am | पियुशा
हायला तुमचे ब्रंम्हकमळ फुललेसुद्धा , भारियेत फोटो :)
मी आमचे ब्रंम्हकमळ फुलन्याची वाट बघत होते इथे फोटु पोस्ट्ववायला ;)
कालच कळ्या मोजल्या , ६० आहेत आता उमलण्याची वाट पाहते ,काय भारी द्रुष्य असेल ते देखील :)
29 Jun 2012 - 12:34 am | सुनील
मस्त!
ब्रह्मकमळ मध्यरात्री फुलते ना?
29 Jun 2012 - 10:58 am | पियुशा
ब्रह्मकमळ मध्यरात्री फुलते ना?@ सुनील तसे काही नाही ,रात्री केव्हाही फुलते . हा पण सकाळ पर्यंत फुल सुकुन जाते .खुप नाजुक अन सुंदर,कॉलनीतले सगळे जमा होतात ही शुभ्र नाजुका पाहायला :)
29 Jun 2012 - 10:09 pm | सुनील
माहितीबद्दल धन्यवाद!
29 Jun 2012 - 12:38 am | गणपा
मस्तच !!!
29 Jun 2012 - 1:04 am | श्रीरंग_जोशी
या पुष्पांसाठी याखेरीज दुसऱ्या विशेषणाचा विचार करणे मला शक्य नाही.
29 Jun 2012 - 2:28 am | स्मिता.
जागुताई द ग्रेट! दुसरा आणि सातवा फोटो खूप आवडला.
29 Jun 2012 - 3:07 am | शुचि
अप्रतिम!!!!
29 Jun 2012 - 7:28 am | मराठमोळा
मस्त आलेत फोटो,
मधे महादेवाच्या पिंडीसारखा आकार असतो ना या फुलात? असे आठवते आहे. तो फोटु नीट आला असता तर अजुन मजा आली असती :)
29 Jun 2012 - 9:02 am | जाई.
सुरेख
29 Jun 2012 - 10:18 am | जागु
रेवती, गणपा, श्रीरंग, स्मिता, शुची, मराठमोळा, जाई धन्यवाद.
सुनिल साधारण ८ वाजल्यापासून फुलायला सुरुवात होते. १० पर्यंत बरेच फुलते. १२ ला पुर्ण उमलते.
29 Jun 2012 - 11:02 am | किसन शिंदे
मस्तच आहेत ब्रम्हकमळाचे फोटो!
29 Jun 2012 - 12:32 pm | उदय के'सागर
अहाहा! सुंदर :)
29 Jun 2012 - 12:35 pm | शिल्पा ब
मस्त. अशीच लालसर / गुलाबी रंगाचीसुद्धा फुलं असतात.
पण हे कॅकटस नाही तर सक्युलंट आहे. कोणतीही फांदी तोडुन लावली तरी येते. कॅकटससारखा प्रकार.
29 Jun 2012 - 3:26 pm | बिपिन कार्यकर्ते
अप्रतिम! ही फुलं खूपच सुंदर दिसतात!
29 Jun 2012 - 3:40 pm | अत्रुप्त आत्मा
शांत शांत उत्तर रात्री मंद मंद तारे....
29 Jun 2012 - 5:32 pm | आनंद
खुपच सुंदर!!!
आमच्या कडेही बुधवारी रात्री उमलल होत.
या फुलाच एक वैशीष्ट म्हणजे ही साधारण अष्टमी किंवा नवमीला उमलतात.
29 Jun 2012 - 9:28 pm | जागु
कार्यकर्ते, आत्मा, आनंद धन्यवाद.
30 Jun 2012 - 2:52 pm | स्वाती दिनेश
फार सुंदर ग!! आणि कॅक्टसवरचे चांदणे हे नावही फार आवडले..
स्वाती
30 Jun 2012 - 4:34 pm | स्पंदना
शिर्षक फार आवडल.
जागु फुल फार सुरेख.
1 Jul 2012 - 11:02 am | अमितसांगली
मस्त...
2 Jul 2012 - 1:03 pm | जागु
स्वाती, अपर्णा, अमित धन्यवाद.
6 Jul 2012 - 9:53 pm | नेहरिन
आमच्याकडे ही एक दिवस ३५ आणि दुसर्या दिवशी ३० अशी दोन दिवस उमललि होती फुले. या फुलान्चा सुगंध फारच छान असतो. मंत्रमुग्ध करणारा. फुलं बघुन मन अगदी प्रसन्न होउन जातं.
7 Jul 2012 - 12:06 am | मराठे
मस्त फोटो आहेत.
'ब्रम्ह' कमळांवरून आठवलं. आमच्या शाळेच्या रस्त्याच्या कडेला काही छान उंच झाडं होती. त्यांना मोठी मोठी फुलं असायची. त्याचं नाव कोणीतरी आम्हाला कृष्ण कमळ असं सांगितलं होतं. कृष्णकमळ म्हणण्याचं कारण म्हणजे, त्याला पाच मोठ्या पाकळ्या होत्या (पांडव) , आत शंभर-एक पुंकेसर होते (कौरव) आणि मधे आणखी एक पाकळ्यांचा गुच्छ होता (कृष्ण).
(त्या जुन्या वाड्याच्या जागी जेव्हा बिल्डिंग बांधली तेव्हा बहुतेक ही सगळी झाडं गेली )
7 Jul 2012 - 12:13 am | जेनी...
वॉव
11 Jul 2012 - 1:18 pm | सुमीत भातखंडे
सुंदर आहेत फुलं!