उदंड झाले वार प्रतिसादांचे
किती गेले घातवार प्रतिसादांचे
कुस्करणारे, कुजके बोलणारे
कसे असे व्यवहार प्रतिसादांचे
तू प्रेमाने कुरवाळले कवितेला
शब्द शब्द टोचले प्रतिसादांचे
मिळे न प्रोत्साहनाचे उत्तर
उठले बाजार प्रतिसादांचे
थडगे माझ्या लाडल्यांचे अन,
गळाभर हार सडक्या प्रतिसादांचे
मोक्ष मिळावा निदान फाट्यावर
फोफावले आजार प्रतिसादांचे
-- फुकटरंग
प्रतिक्रिया
20 Jun 2012 - 10:37 am | निश
अरुण मनोहर साहेब, लय बेस. एक मारा लेकिन सॉलिड मारा .
मस्त. माझा तुम्हाला नमस्कार व सलाम.
कविता किंवा तिखट व्यंगात्मक कविता खरच उत्तम व भल्या भल्यांची पार वि़केट उडवणारी आहे.
20 Jun 2012 - 5:34 pm | सूड
वाह वाह !!
(उपटसुंभ)
20 Jun 2012 - 6:42 pm | उपटसुंभ
अरूणजी, विडंबन उत्तम आहे, पण मूळ गझलेचं वृत्त वापरलं असतं तर आणखी मजा आली असती.
23 Jun 2012 - 8:56 am | अमितसांगली
मिळे न प्रोत्साहनाचे उत्तर
उठले बाजार प्रतिसादांचे
थडगे माझ्या लाडल्यांचे अन,
गळाभर हार सडक्या प्रतिसादांचे.......मस्तच....