असणं!

वेणू's picture
वेणू in जे न देखे रवी...
19 Jun 2012 - 5:10 pm

एखाद्याचं निव्वळ 'असणं' इतकं सुंदर असतं?
की आपल्या भावविश्वाची सारी सूत्र,
त्या हाती सुपूर्द व्हावीत...
आपण रिक्त होऊन!

बेदरकारपणे स्वतःला
आयुष्याच्या आरामखूर्चीत झोकून द्यावं,
मिटल्या डोळ्यांनी आता,
ते असणं अनुभवावं!
नव्याने साठवावं!

ते असणं मात्र टिकावं, रेंगाळावं-
जगताना पुरून उरावं!
कायमच, सुख मिळालं की दु:ख
मागे रांगेत उभेच असतात, ह्या नियमाला तोडून......

-वेणू

कविता

प्रतिक्रिया

नाना चेंगट's picture

19 Jun 2012 - 6:45 pm | नाना चेंगट

"असणं" या शब्दाच्या ठिकाणी "नसणं" असा शब्द टाकून पाहिलं. गंमत वाटली.

जाई.'s picture

19 Jun 2012 - 10:54 pm | जाई.

+1